पुर्वाध - ऊत्तरार्ध

0
0

पुर्वाध

जिवनाच्या ह्या वाटेवर, साथ हवीय कुणाची तरी |
दिसते रोज पण का मिळत नाही, ती स्वप्नातली परी ||

रोज रात्री डोळा लागतो, तिचीच स्वप्ने बघण्यासाठी |
मिळाली नाही तर तयार आहे, मरण्या मारण्यासाठी ||

तू तिथे मी ईथे, असा कसा हा न्याय |
तुझ्यापासून मला तोडणारा, आजून जन्मलाच नाय ||

राणी जगू कसं मी तुझ्याशिवाय, हे जरा सांग |
झुलवत ठेवून तू मला, नको हं देऊस टांग ||

आठवतात का गं तुला, ते दिवस समुद्रकिनारीचे |
जिवनात आलेल्या लाटेचे, ओथंबलेल्या श्वासांचे ||

पुढे काय झालं, ते कुणालाच कळालं नाही |
पाहिलेल्या चंद्रावर, आमचं यान कधी ऊतरलचं नाही ||

राणी म्हणाली, वेड्या तुला सांगितलचं नाही का कोणी |
अरे ..बोळा निघाला, आणी केंव्हाच वाहतं झालं पाणी ||

ऊत्तरार्ध

गेलो होतो फिरत, असचं जूहूच्या चौपाटीला|
लायनी मारलेल्या ज्यांच्यावर, त्या आलेल्या पोरं बाळं फिरवायला ||

म्हणालो स्वत:शीच, प्रेमात रहिला नाही काही राम |
आता बनुया किशन कन्हैया, दुसरे नाही काम ||

अशीच एके दिवशी, भरली "ती" मनात |
डोळे फिरले श्वास अडकला, धडकी भरली ऊरात ||

टाकला खोडा एक दिवस, करून थोडी हिंम्मत |
ती आणी तिचा बाप आले वसकन, काय रे तुझी किंमत ||

त्या दिवशी परत चालू झाले, पहिले पाढे पंचावन्न |
अश्वथाम्या सारखा भटकतोय इकडे तिकडे, वणवण वणवण वणवण ||

*इतरत्र पुर्वप्रकाशीत

बाबा रे.. तुझं जग निराळं..

1

बाबा रे.. तुझं जग निराळं.. माझं जग निराळं... - इती नाथा कामत.

हा बाबा

2

हलकट आहे. देवाच्या भावनांची खिल्ली उडवल्याबद्दल अर्धवटरावांचा निषेध. भारतात परतल्यावर (म्हणजे तव्यावर नाही, मराठीत कम बॅक या अर्थाने) त्यांची आवडाबाई त्यांना फक्त भातावर (टिंग्याने केलेल्या किंवा राजेने केलेल्या रेसिपीनुसार) ठेवो असा शाप देतो.

मस्तं रे प्रभ्या.. छाण छाण

3

मस्तं रे प्रभ्या.. छाण छाण लेखण कसे काय जमते तुला?


-पुण्याचे पेशवे

बाप रे

4

एकदम अश्वत्थामा? लैच होमसिक झाले काय.

पाहिलेल्या चंद्रावर, आमचं यान कधी ऊतरलचं नाही ||
अरे म्हणून तर मुखचंद्राला चंद्राची उपमा देतात... Seems so near, yet so far.

ती आणी तिचा बाप आले वसकन, काय रे तुझी किंमत
आयला हे बाप असलेच. स्वतः पट्ट्यापट्ट्याच्या पायजम्यात वावरतात नि साले पोरीला बिल गेट्सने मागणी घातली तरी म्हणतील, काय तुझी किंमत म्हणून. (कन्या-)जन्मसिद्ध विरोधक हे.

अरे काळजी नको रे, एका कागदावर त्रिकोण चौकोन नि त्यात कायतरी आकडे लिहून जमाखर्च मांडून (आणि तू उसात जाऊन आलेला म्हणून एक्स्ट्रा हँडिकॅप देऊन - नाही तुला हँडिकॅप करणे नंतर - ) एखादी परी येईलच रे बाबा, काळजी नको. तो आहे ना वर बसलेला सगळ्यांच्या पर्‍या नेमून दिलेल्या असतात त्याने. बाकी विजुभाऊंची थियरी विसरू नकोस, झाड हवे असेल तर तुला माकड व्हावे लागेल, बघ जमतंय का.

>>झाड हवे असेल तर तुला माकड

5

>>झाड हवे असेल तर तुला माकड व्हावे लागेल, बघ जमतंय का.

वा वा..

मस्त!

6

मस्त.

मस्त.

7

मस्त.

उत्तरार्ध

8

उत्तरार्ध जास्त आवडला .....


आपला स्नेहांकित...
-अशोक

मस्त रे, छान लिहले आहेस.

9

मस्त रे, छान लिहले आहेस.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छ्य्या

10

अश्लील व मवाली काव्य

ओ दादा

11

नेम चुकला काय? की जाणीवेला वयाचा अडसर पडलाय? (च्यायला आपण पण खांडेकरी भाषेत लिहू शकतो यार. खी: खी: खी:)

अवघड आहे

12

अवघड आहे