भारतीय तत्वज्ञान - भाग ९

0
0

मागचा भाग

वेदांमधील ब्राह्मणभागात शेवटी शेवटी जगाची उत्पत्ती, जगण्याचे प्रयोजन, इत्यादी बाबीसंबंधीची चर्चा आढळते. गुरुशिष्य संवाद रुपी या चर्चेला आरण्यके आणि उपनिषदे अशी नावे आहेत. यात विविध मते प्रस्थापित केली आहेत. कित्येक सकृतदर्शनी विरोधी सुद्धा आढळतात. काव्य दृष्ट्या यात उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे सुद्धा प्रकार आहेत. कित्येक कथा रुपकाच्या माध्यमातुन समोर येतात तर काही ऐतिहासिक सत्यकथांना संवाद रुपाने सांगत समोर आलेल्या आहे. ह्या सगळ्याला वेदांत (वेदांच्या शेवटी असलेले) असे संबोधले जाते. उपनिषदांची संख्या जरी सुमारे दोनशेच्या वर असली तरी पुरातन आणि सर्व मान्य अशी दहा अकरा उपनिषदे आहेत. इतर उपनिषदे या उपनिषदांवरच आधारीत आहेत किंवा बहुतांशी समान माहिती देतात.

पुढे केव्हातरी भगवद्गीता या ग्रंथाच्या सहाय्याने उपनिषदांमधेच असलेले ज्ञान तसेच त्याकाळी प्रचलित असलेली मते यांना एका ग्रंथात मांडले गेले त्यामुळे गीतेला उपनिषदांचे सार असे म्हटले जाते. बादरायण व्यासाने उपनिषदांतील ज्ञानाचे सुत्रमय ग्रंथात वर्णन केले तेच ब्रह्मसुत्र नावाने विख्यात आहे. अशा प्रकारे ब्रह्मसुत्र, गीता आणि उपनिषद मिळुन उत्तर मीमांसा किंवा वेदांत दर्शन मानले जाते. ब्रह्मसुत्र हा प्रमाणभुत ग्रंथ मानला जातो.

वेदांतानुसार जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हा ब्रह्मा मुळेच होतो. ब्रह्म सत्य, ज्ञान, अनंत, अद्वितीय असुन त्याच्याखेरीज अन्य काही नाही. वेदांता नुसार जीव हा ब्रह्मच आहे. हे ब्रह्म आणि जीवातले ऐक्य जाणणे हाच मोक्ष होय. जो कुणी स्वतः ब्रह्म जाणतो तो ब्रह्ममय होतो असे मानुन हे ज्ञान म्हणजेच तत्वज्ञान असे वेदांती मानतात. कट्टर वेदांती आपल्याहुन वेगळा देव किंवा ईश्वर मानत नाहीत. मात्र ज्ञानाची अनुभुती मिळेपर्यंत ब्रह्माला सगुण रुपात उपास्य देवतेच्या स्वरुपात मानुन अथवा ज्ञान देणा-या गुरुला ब्रह्मस्वरुप मानुन त्याची पूजा करणे गैर मानलेले नाही. ज्ञान केवळ शमदमाचे पालन करुन तसेच विवक्षित रित्या शरीर आणि मनाला मुरड घालुन प्राप्त होते असे वेदांती मानतात. सुख, दु:ख, मोह, शोक हे सर्व देहाचे आणि मनाचे विकार असुन आत्मा या सर्वांपासुन मुक्त असल्याने त्याच्यावर यांचा काहीही परिणाम होत नाही असे वेदांत दर्शन सांगते.

वेदांत दर्शनात उपनिषदे ही प्रमाणभुत मानलेली असली तरी सर्वच उपनिषदकारांनी एकाच पद्धतीने विचार केलेला नाही. अनेकांनी अनेक मते मांडली त्यामुळे अनेक वाक्यांचे नक्की काय अर्थ होतात हे बादरायणाच्या कालापर्यत त्याविशिष्ट उपनिषदाची गुरुशिष्य परंपरा खंडीत झाल्यास कळेनासे झाले होते. बादरायणाने बृहदारण्यक, छांदोग्य, कठ, केन, ईश, ऐतरेय, श्वेताश्वतर, मांड्क्य, तैतिरिय, प्रश्न, मुंडक उपनिषदांना आधार बनवुन ब्रह्मसुत्र रचले. ब्रह्मसुत्र, गीता आणि उपनिषदे मिळुन प्रस्थान त्रयी असे म्हटले जाते. वेदांत दर्शनाला ही प्रस्थान त्रयी आधारभुत आहे. पारमार्थिक आणि लौकिक अशा दोन्ही मार्गांचे प्रस्थानत्रयीत पद्धतशीर विवेचन आहे.

असे असले तरी इतर उपनिषदे, तसेच वेळोवेळी बनणारे नवे नवे ग्रंथ जसे रामायण, महाभारत तसेच वेग वेगळ्या भागात प्रचलित होणा-या स्मृती यांच्यात आणि वेदांतांचा परस्पर संबंध लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. तसा प्रयत्न करतांना जो भेद आढळला त्याचे आपापल्या पध्दतीने भाष्य करुन भेदाचे स्पष्टीकरण केले. हीच प्रस्थान त्रयीवरील विविध मते होत. यात प्रामुख्याने मायावाद सांगणारा शंकर, अद्वैत आहे पण एका विशिष्ट पद्धतीने असे सांगणारा रामानुज, वासुदेव भक्ती प्रतिपादन करणारा मध्व, अद्वैत आधार मानुन त्याला विष्णूरुपात पुजणारा वल्लभ, ईश्वरेच्छा प्रबल मानणारा भास्कराचार्य असे सुमारे ४० पेक्षा अधिक भाष्यकार झाले. त्यांनी आपापले मत मांडले. पुर्वसुरींचे मत खोडले किंवा पुष्टी केली. स्वतःचा संप्रदाय सुरु केला.

पुढिल भागात महत्वाच्या भाष्यकारांच्या मताची ओळख करुन घेवु.. पहिला मायावादी शंकर.

हजर..

1

हजर..

अफाट अभ्यास आहे बाबा तुझा !

2

Grade

अफाट अभ्यास आहे बाबा तुझा !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सगळे भाग परत वाचावे लागणार,

3

सगळे भाग परत वाचावे लागणार, खुप किचकट विषय आहे हा.

असेच म्हणते...!

4

सगळे भाग परत वाचावेच लागणार..!