स्मशानात जागा हवी तेवढी

0
0

स्मशानात जागा हवी तेवढी - गझल

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?

जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

"अभय" काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!

.
.
गंगाधर मुटे
...................................................................................
(वृत्‍त - सुमंदारमाला)
...................................................................................
काही शेती संबधीत शब्दांचे ढोबळमानाने अर्थ.
खुरटणे = वाढ खुंटणे,
तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत
ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे
///////////////////////////////////////////////////////////////////

!

1

!

>>तणांचाच जेथे असे बोलबाला,

2

>>तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

>>तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

उत्तम..

>>समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!

खल्लास

चिंगारी कोई भडके सावन उसे

3

चिंगारी कोई भडके सावन उसे बुझाए.

सावन जो अगन लगाए उसे कौन बुझाये


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

जबरा !!!!!!!!!!

4

जबरा !!!!!!!!!!


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सणसणीत

5

जबरदस्त कविता. मुटेसाहेब आम्हाला जुने मुटे बरेच दिवसांनी सापडले बरं का.
विदारक वास्तव, नेमकी शब्दरचना, बोचरे प्रश्न आणि हृदयस्पर्शी दार्शनिकता. Grade


कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

सारेगमप(च) पाहणारे स्वत:ला संगीतप्रेमी म्हणवून घेतात, अर्वाचीन हिंदी चित्रपट पाहणारे स्वतःला चित्रपटशौकिन म्हणवतात, 'फाईव पॉईंट समवन' वाचून साहित्यप्रेमी समजतात तेव्हा आम्हाला असेच, अगदी असेच वाटते.


जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कसं बोललात. काय आहे यापेक्षा 'काय सिद्ध झाले' हे महत्त्वाचे. आणि सिद्ध करताना बहुमताने ठरवणे असेल तर रामा-शिवा-गोविंदा. पुरावाच बहुमताने फेटाळण्याची सोय असेल तर सत्य हे सुद्धा बहुमताने 'पास' केलेले - शिक्का मारलेले- असते, मग भले ते सत्य वास्तव असो वा नसो.

प्रत्येक कडव्याबद्दल लिहू तितके थोडेच आहे. आता थांबतो, नाहीतर कवितेपेक्षा प्रतिसादच मोठा व्हायचा.

ररा, लिही रे प्रत्येक

6

ररा,
लिही रे प्रत्येक कडव्यावर अनेक डोळ्यांनी एकच गोष्ट पहायला फार मजा येते. वेगवेगळे पैलू दिसतात.

मुटेसाहेब,
कविता फार फार छान.


-पुण्याचे पेशवे

प्रत्येक कडव्यामध्ये वेगळा

7

प्रत्येक कडव्यामध्ये वेगळा अर्थ लागत जात आहे.

रराचा प्रतिसाद तर १०० नंबरी सोनं !

>>सारेगमप(च) पाहणारे स्वत:ला संगीतप्रेमी म्हणवून घेतात, अर्वाचीन हिंदी चित्रपट पाहणारे स्वतःला चित्रपटशौकिन म्हणवतात, 'फाईव पॉईंट समवन' वाचून साहित्यप्रेमी समजतात तेव्हा आम्हाला असेच, अगदी असेच वाटते.

होतं असे कधी कधी.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

खरंय

8

ररांचा प्रतिसाद १०० नंबरि सोनंच आहे.
मुटेसाहेब, कविता फार आवडली, सगळ्याच द्विपदी उत्तम आहेत!
लिहीत राहा.

-मनमेघ.

जब्बर्दस्त................

9

जब्बर्दस्त................

धन्यवाद.

10

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

रमतारामजी, सुंदर पदर उलगडलेत.फार आवडले.
अजुन लिहिले असते तर.... आनंद मिळाला असता.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

मूटेसाहेब..जबरदस्त...

11

मूटेसाहेब..जबरदस्त...


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

शतशः

12

शतशः Grade

सुंदर कविता, अतिशय अर्थपूर्ण

13

सुंदर कविता, अतिशय अर्थपूर्ण आणि ररांचा प्रतिसादाही उच्च


पुष्करिणी

खल्लास, जबरी कविता...

14

खल्लास, जबरी कविता...


आपला स्नेहांकित...
-अशोक

धन्यवाद.

15

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

शिवारात काळ्या नि

16

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

"अभय" काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!

अतिशय सुंदर...