ड्रायडे

0
0

स्वातंत्र्यदिनाच्या
सुट्टीचे दोन दिवस
आम्ही बाहेरगावी जाणार आहोत
तेव्हा तुम्ही
दिवसरात्र एक करुन
रंगाचे काम करुन घ्या
मात्र
पंधरा तारखेला
संध्याकाळी आम्ही परत येवु
तेव्हा काम झालेलेच पाहिजे
असे पुन्हा पुन्हा बजावुन
मल्टीनॅशनल मधला एक्सिक्युटीव्ह
गोंडस बायकोला आणि गोजिरवाण्या पोराला
मोटारीत घालुन हिल स्टेशनला गेला.

तिथेच
साजरा झाले झेंडावंदन
स्वातंत्र्य दिनाचे
आणि
त्याच्या घरात
दोन दिवस अन रात्र
राब राब राबत होती
चार डोकी अन आठ हात
आधीच चकचकणा-या भिंती
अजुन चकचक करण्यासाठी.

काम पाहुन खुश होवुन
एक्सिक्युटूव्हने पैसे काढुन दिले
झालेल्या कामाचे
आणि
शिवासची बाटली काढुन
बसला बायकोबरोबर
गप्पा मारत घुटके घेत.

स्वातंत्र्यदिनाच्या
संध्याकाळी मिळालेला मेहनताना
घेवुन चार डोकी
आपापल्या घरी आली
पोराबाळांना मिठाई दिली
अन
लवंडले श्रमपरिहारासाठी तसेच..
त्यांच्यासाठी ड्रायडेला कोण देणार ... क्वार्टर किंवा हाफ !

>>त्यांच्यासाठी ड्रायडेला कोण

1

>>त्यांच्यासाठी ड्रायडेला कोण देणार ... क्वार्टर किंवा हाफ !
Beer Beer

भेदक सत्य.......पैशाने काहीही मिळवता येत हा गैरसमज आहे लोकात.
असो पण स्वतःपुरते न पहाता समतोल विचाराने दुसर-यांचे ही पहावे

अश्लिल अश्लिल.

2

अश्लिल अश्लिल.


-पुण्याचे पेशवे

यात अश्लील काय आहे?

3

यात अश्लील काय आहे? स्पष्टीकरण अपेक्षीत आहे.

अती विरोधाभास आहे हा.

4

अती विरोधाभास आहे हा.

थोडे थांबा!आताशी कुठे धान्य

5

थोडे थांबा!
आताशी कुठे धान्य सडले आहे.
धीरे धीरे सबको मिलेगा, बराब्बर मिलेगा.

हेवा वाटतो

6

वा! फक्त दोन दिवसात दिवसरात्र एक करुन, सुपरव्हिजन नसताना मनासारखे रंगकाम करुन देणारा रंगारी (कवीकल्पनेत का होइना) असतो हे वाचुन डोळे पाणावले.

बाकी सँडी यांच्याशी सहमत, लवकरच रेशनकार्डावर धान्यापासुन दारु मिळेल असे वाटते.

नानाचा मला प्रचंड हेवा वाटतो

7

नानाचा मला प्रचंड हेवा वाटतो राव !!

अस्स काहीतरी थोडक्यात लिहीतो आणी मी बसतो पान-पानभर क्रमश: लिहीत !!

' वास्तव हे कल्पनेपेक्षा भयावह असते '

सहमत.. अगदी असेच म्हणतो..

8

सहमत..

अगदी असेच म्हणतो.. आमच्या गिरण्या चालुच..

नानाचा मला प्रचंड हेवा वाटतो

9

नानाचा मला प्रचंड हेवा वाटतो राव !! >>>>

खरंच... कधी कधी प्रश्न पडतो..हाच का तो? Grade Grade Grade Grade Grade


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

पैसा

10

समाजपरिस्थितीचे भेदक सत्य काव्य रुपात.
मनापासून विचार करायला लावणारी कविता.
मध्यमवर्गिय प्रिया

खुपच छान.

11

कविता मनापासुन आवडली.

हल्ली आमचं मन निबर झालं

12

हल्ली आमचं मन निबर झालं आहे
थोडं वाईट नि थोडं बरं झालं आहे


-पुण्याचे पेशवे

आयला ! पुप्या पण कविता करु

13

आयला !

पुप्या पण कविता करु लागला, अवघड आहे wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुप्या पण कविता करु

14

पुप्या पण कविता करु लागला>>>

याला जबाबदार नान्या हाये, आता ह्येच्यापुडं पुप्याच्या कव्ता वाचाया लागल्या तं नान्याला पकडा Evil


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

+१

15

याला जबाबदार नान्या हाये, आता ह्येच्यापुडं पुप्याच्या कव्ता वाचाया लागल्या तं नान्याला पकडा
सहमत.

मस्त

16

चांगली लिहली आहेस.

अशा कवितांना

17

अशा कवितांना "भेदक" वगैरे असा शब्द आहे....


आपला स्नेहांकित...
-अशोक