आमच्या ईथे अमेरिकेत.. काल १५ ऑगस्ट .. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला..
नेहमी प्रमाणे छोट्या मुलांची नाच गाणी वगैरे प्रकार झाले..
आमच्या लोकेशन ला हा ईव्हेंट दरवर्षी साजरा केला जातो..
ह्या वेळेस एक तेलगू - वंदे मातरम गाणे चालु होणार होते.. त्या साठी भारताचा नकाशा लावण्यात आला..
आणी लाजिरवाणी बाब म्हणजे .. त्या नकाशा मधे पाकव्याप्त काश्मिर चा भाग वगळला होता.. आणी चीन जो प्रदेश अनधिक्रूत पणे बळकावला आहे तो पण वगळला...
आणी आता लिहित असताना पण खुप वाईट वाटते हे सर्व ईथल्या भारतीय लोकांनी केले..
त्यामागची कारणे कितीपण असतील
१ अमेरिकेतील लोक भारताचा हाच नकाशा आहे असे मानतात.. आणी ह्य ऑर्गनासींग कमीटी ला त्यांना दाखवायचे असते की आम्ही असले ईव्हेंट करुन अमेरिका आणी भारत ह्यांच्यातील नाते मजबुत करत आहोत
२ ह्या कमीटीतील लोकांनी पुर्णपणे निर्लज्ज होऊन हार पत्कारली तर आहेच आहे .. आणी त्या वरुन त्याचा असा गवा करायचा की पुढच्या पिढीला पण विसरुन जावे लागेल की भारताची अशी पण जागा बळकावली होती.. ईथली भारतीय मुले .. तो कापलेला नकाशा म्हनजेच भारताचा असेच म्हणनार...
आणी ह्यांना पण तेच हवे असेल..
जर आपले लोकच आप्ल्या देशाचा मान ठेवत नसतील तर दुसर्या देशांतील व्यक्तींकडुन काय अपेक्षा करणार..
मला ही गोष्ट फारच दु:ख दायक वाटली.... रहावले नाही म्हणून ईव्हेंट ऑर्गनायजर ला जाऊन भेटलो..
आणी विचारले.. "हा कोणत्या देशाचा नकाशा आहे"
त्यावर एक निर्लज्ज ऊत्तर "भारत"
त्यावर माझा परत प्रश्न " आर यु शुअर??"
त्याची मान शरमेने का होईना थोड्या वेळासाठी खाली गेली असावी..
आणी माझ्या त्या प्रश्नाला ऊत्तर... "वहा पडदे पे रिंकल्स आये है.. तो मॅप ठीक से नही दिख रहा"
ह्या त्याच्या ऊत्तराला आता काही प्रतिसाद देणे जरुरीच नाही वाटले आणी अर्ध्या कार्यक्रमातुन
निघुण आलो..
कार्यक्रमाला १५०+ भारतीय लोक होती.. एकानी सुध्दा त्या नकाशावर आक्षेप घेतला नाही...
का???????
ह्या प्रश्नाचे ऊत्तर मी तरी नाही लिहु शकत ..... 
अर्वाच्च्य शिव्या द्यायला
अर्वाच्च्य शिव्या द्यायला ह्या संस्थळावर बंदी आहे म्हणुन प्रतिक्रिया देत नाही.. आणि दुसरी प्रतिक्रिया सुचत नाहिये..
+१
खरोखर..
काय लिहावे ?? कुपुत्र आहेत
काय लिहावे ??
कुपुत्र आहेत ते...
माते त्यांना माफ कर.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अरे बापरे!!! आपल्याच लोकांनी
अरे बापरे!!! आपल्याच लोकांनी असं वागायचं मग इतरांनी धिंड काढली तर कुठल्या तोंडाने त्यांना विरोध करणार..
निषेध.
(खरं तर असं निषेध बिषेध करून काही फरक पडेलस वाटत नाही..)
http://shilpasview.blogspot.com/
या साठी अमेरिकेत कशाला जायला
या साठी अमेरिकेत कशाला जायला हवं????
"भारतमाता एक डायन है" या शब्दांचा उद्गाता आपल्या महाराष्ट्रात दिमाखात वावरत आहे
कोण आहे तो?
कोण आहे तो?
http://shilpasview.blogspot.com/
अबु आझमी (तोच तो विधानसभेत
अबु आझमी (तोच तो विधानसभेत चपला खाणारा)
ह्यांनाच हुच्चभ्रु लोक
ह्यांनाच हुच्चभ्रु लोक म्हणतात. हरामखोर साले.
-पुण्याचे पेशवे
सहमत
पुण्याचे पेशवे यांच्याशी सहमत..
ईथुन पुढे त्यांचे कार्यक्रम अटेंड करणार नाही .. आणी जमल्यास बाकीच्या मित्रांना पण नाही जाऊ देणार ..
कूणी विचारायला आल्यास ऊत्तर देणार आम्ही फक्त भारतीय लोकांच्या कार्यक्रमाला जातो
तुम्ही तेथे निषेध नोंदवला का
तुम्ही तेथे निषेध नोंदवला का ???
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मला त्यात नवल वाटले नाही. मी
मला त्यात नवल वाटले नाही. मी गेली ५ वर्षे अमेरिकेत हाच नकाशा बघत आहे. भारत सोडून सबंध जगात हाच नकाशा वापरण्यात येतो. त्यामुळे असा तुटत्लेला नकाशा जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रथम आपल्याला धक्का बसतो. आपले राजकारणी लोक हि गोष्ट आपल्यासमोर येऊन देत नाहीत. नाहीतर पुन्हा दंगल होईल अशी त्यांना भीती वाटते. त्या तुटलेल्या प्रदेशावरचा भौगोलिक आणि राजकीय हक्क आपण आधीच गमावून बसलो आहोत. केवळ कागडो पत्री तो भाग भारतात जमा आहे ज्याला बाहेर कोणीही विचारात नाही.
(आमच्याकडे सर्व प्रकारच्या लेखांना झोडपून मिळेल)
सहमत
जरी आपल्या दृष्टीने ते चूक असले तरी दुर्दैवाने वास्तव तेच आहे. प्रत्यक्ष ताबा असलेलाच प्रदेश नकाशात दाखविला जातो, दावा नव्हे. आज आपल्या देशात दाखवलेल्या इस्राईलच्या नकाशाबाबत एखाद्या पॅलेस्टिनीने आक्षेप घेतला तर आपले उत्तर काय असेल? आपल्या इथे नकाशामधे तैवान हा स्वतंत्र देश आहे, मग चीनचे काय. तात्पर्य त्या त्या देशाच्या अधिकृत भूमिकेनुसार नकाशे बनविले जातात. सार्वत्रिक सत्य असे काही असत नाही.
अर्थात भारतीयांचा कार्यक्रम असल्याने त्यांना इकडून नकाशा मागवून तो वापरता आला असता. परंतु ते जर अमेरिकेत असतील आणि त्या देशाच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत निर्णय घ्यायचा असे त्यांनी ठरवले असेल तर ते पूर्णपणे अयोग्य म्हणता येणार नाही.
पुणे विद्यापीठाची वेब्-साईट प्रथम लाँच झाली तेव्हा असाच नकाशा त्यावर होता. मी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून देऊन तो बदलायला लावला होता. अर्थात ही देशांतर्गत बाब होती.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
कोण अमेरिका ?
कोण अमेरिका ?
कठीण आहे
कठीण आहे