धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४
त्या जंगलात फिरण्यासाठी स्वतःची गाडी असणे आवश्यक होते.. तिथल्या गाड्या नाहीयेत.... झालं.. एवढ्या कष्टावर बोळा फिरणार असं वाटलं क्षणभर. थोडी आजुबाजूला चौकशी केल्यावर शेजारच्या गावात भाड्याने गाडी मिळू शकेल असा सुगावा लागला.
एकट्यासाठी एवढे पैसे द्यायला जिवावर येत होतं. पण माज करायचाच तर दात टोकरून कशाला असा अस्सल विचार करून, थेट टोयोटाची, उघड्या छताची, फोर व्हील ड्राइव्ह, स्टेशन वॅगन ठरवली दोन दिवसासाठी, तिथल्याच एका रेंजरला चालक म्हणुनही ठरवून टाकला.. आणि क्षणाचाही विलंब न करता जंगलात घुसलो...आत शिरल्यावर सर्वप्रथम काय झालं असेल, तर जंगल ह्या संकल्पनेला जोरदार धक्का बसला.
पण हा धक्का सुखद होता. हे काही सदाहरीत जंगल नव्हे. हा तर सॅव्हाना प्रदेश. चारही बाजुला क्षितीजापर्यंत पसरलेलं पिवळंधम्मक गवत, चार ते बारा-पंधरा फूट उंचीचं... अधुनमधुन 'जागते रहो' असं सांगत रामोशासारखे उभे असणारे वृक्ष... नजर जाइल तिथपर्यंत फक्त पिवळा सोनसळी प्रकाश... मावळत्या प्रकाशात नववधुसारखं सामोरं आलेलं हळदीच्या माखल्या अंगाचं रान... वाह.. काय बेहोषी पहिल्या भेटीतच...
मी भारावल्यासारखा तो पिवळा-तांबूस सोहळा पाहात होतो. ती मावळतीची छटा, पिवळ्या गालिचावरून अस्तंगत होणारा तो लाल गोळा.. रंग बघावेत.. की आकार.. की सावल्या पहाव्यात.. की नुसते आवाज ऐकावेत.. गवताच्या पात्याची ती तळपत्या तलवारीसारखी सारखी सळसळ्..त्या पात्यावरून प्रकाशाची तिरीप चमकुन होणारा भास्..कधि ते चकाकतं सळसळतं गवत पाण्यानं भिजुनंच चमकतय असं वाटतं..
आणि ह्या सगळ्यावर आपल्या आरस्पानी सौंदर्यानं मुक्त बागडणारे ते पशुपक्षी. कधी शेकडो हरणांचे, काळवीटांचे कळप तर कधी एखादाच हत्ती, तर कधी लगबगीनं जाणारा एखादा जिराफ किंवा झेब्रा.
एखादा निवांतपणे गवत खाण्यात गुंग झालेला शेकडो हरणांचा अथवा काळविटांचा कळप म्हणजे तर साक्षात काव्यच.. ती झोकदार, अवखळ चाल, जराशा आवाजानं टवकारणारे कान.. तुमच्याकडं पाहुनही न पाहिल्यासारखं करणारी ती मोहक नजर.. आणि अचानक, अगदी अनपेक्षीत उधळणारा तो संपुर्ण मुक्तछंद....पाण्यावर दगड मारल्यावर अचानक जशा लहरी चौफेर उसळाव्यात तशी चपळ, त्वरीत पण लयबद्ध हालचाल..
एक एक चित्र म्हणजे अक्षरशः एकेक कविताच...
आमच्या करंट्या प्रतिभेला सीमा आहे.. सौंदर्याला नाही. आपली गाडी दिसायला लागल्यापासून दिसेनाशी होइपर्यंत टक लावून मान किंचितही न झुकवता दोन-तीन नर सतत आपल्याकडे बघत असतात. त्या नजरेचं संमोहन जबरदस्त असतं.. खेचलेच जातो आपण.. यालाच रानगारूड म्हणत असावेत का..
आम्हाला झेब्रा माहीती आहे तो, RTO च्या जाहिरातीतला, पण खरा झेब्रा जेव्हा रस्ता ओलांडतो तेव्हा जनजागृती मोहीम, शिट्टी, लाल दिवा कश्शाचीही आवश्यकता नसते. गाड्या आपोआप बंद होतात. नजर थबकते. जिराफ वगैरे भारदस्त मंडळींची तर काय ऐट विचारता, आपला घास खाता खाता मान तिरकी करून असं रोखुन बघतील की आपल्यालाच ओशाळल्यासारखं व्हावं, आणि आपण अनाहुतपणे बोलुन जावं 'चालुदे, चालुदे.. सावकाश'
पण हे सगळं, बघायला ओपन ४*४ असेल तरच खरी गंमत. छत उघडं टाकून, उभं राहुन, मोकळा, भणाणता वारा कान सुन्न होइपर्यंत तोंडावर घ्यायचा. चारीबाजुला नजर फिरवुन, त्या अथांग पिवळ्या कॅनव्हासवर एखादा फटकारा जिकडे दिसेल ती दिशा चक्रधराला ओरडुन सांगायची... की निघाले त्या दिशेने सुसाट.. चांगली गाडी, चांगला चालक आणि चांगली नजर असेल तर सफारीत मजा आहे.. नाहितर थोडं अडचणीचंच काम आहे ते... माझ्या बरोबर एक युरोपियन जोडपं बिचारं छोट्या कारमधुन आलं होतं.. प्रत्येक ठिकाणी हे पोहोचेपर्यंत प्राणी पसार व्हायचे.. प्रत्येक वेळेला हे त्यांच वरातीमागुन घोडं बघुन मलाच दया आली.
सॅव्हाना मधे पाहायचे ते 'बिग फाइव्ह' म्हणजे सींह, हत्ती, चित्ता, बफेलो, आणि गेंडा.. यापैकी हत्ती, बफेलो उदंड दिसले.. गेंड्यानं पण लांबुन दर्शन दिलं.. चित्त्याचा काही योग आला नाही.. आणि वनराजांच काय झालं हे पुढच्या लेखात..
काही प्रकाशचित्रे टाकतोय.. अगदी साधा कॅमेरा नेला होता, पॉइंट अँड शूट... काही फोटो चांगले आले असतील तर ती रानाची जादू, माझी कला नाही.. काही नसतील आले तर ते काव्य मला लक्षांशानेही टिपता आलं नाही हा साधा निष्कर्श.
इथल्या फोटोंचा एक वेगळा संग्रह कलादालनात प्रकाशीत करावा म्हणतो.. म्हणजे अजुन बरेच फोटो टाकता येतील..
.jpg)
{वॉव...}
जंगलाचे फोटो आणि जंगलाचे वर्णनही वॉव...
पुढचा झिब्रा तर फोटोसाठी पोज दिल्यासारखा उभा आहे,
हा भागही आवडला आहेच हे वेसांनल.
स्वाती
{छान सफर चालू आहे. एक नवीन}
छान सफर चालू आहे.
एक नवीन पुस्तकाची तयारी करत आहे
Hope is a good thing...
{ये ब्बात है}
लगे रहो.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{छान! सगळ्या प्राण्यांचे फोटो}
छान! सगळ्या प्राण्यांचे फोटो मस्त आले आहेत!
{सहमत}
गाडीवरचा पण.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{अरे !}
अरे !
Hope is a good thing...
{बा अर्धवटा बघ हो, मी नाही हां}
बा अर्धवटा बघ हो, मी नाही हां म्हणालेलो काही अजिबात!
{मलक}
सगळयाच लेख माला आवडल्या . फोटो पण छान आले आहेत. चित्रमय लिहीता ....असेच लिहते रहा
अवांतर = तो शेवटच्या फोटोतला प्राणि कोणता म्हणायचा ?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{गेंडा?....}
अवांतर = तो शेवटच्या फोटोतला प्राणि कोणता म्हणायचा ? >>>
अगदी जिराफ नाही पण बर्या पैकी उंच आहे, गेंडा? ... नाही हो, आपले अर्धवटराव कुठ्ल्याच अॅंगलने राजकारणी वाटत नाहीत. अन ते करंट्या प्रतिभेला सीमा वगैरे उगाच हां
, अगदी मारुती चितमपल्लींचे पुस्तक वाचतोय असे वाटत होते.
बाकी सफर एकदम झकास सुरु आहे, वनराजाचे काय ते पुढल्या भागात... ...
वनराजाची अपॉइण्ट्मेण्ट मिळालेली दिसते
... वाट बघतोय.
{मस्त फोटोज्...शेवटचा जरा}
मस्त फोटोज्...शेवटचा जरा जास्तच छान आहे
{मस्त लेखमाला}
मस्त लेखमाला चालु आहे. पुढ्च्या भागाचि वाट पहात आहे
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
{गंधर्व मधे भेटला तो हाच}
गंधर्व मधे भेटला तो हाच प्राणी होता का असा प्रश्न पडावा एवढा ऐटदार फोटो.वनराजही लाजले असतील ही ऐट पाहुन.
बाकी वर्णन लाजवाब! सुपर्ब!
{तो शेवटच्या फोटोतला प्राणि}
तो शेवटच्या फोटोतला प्राणि कोणता म्हणायचा >> आणि गाडीमाग का लपलाय तो? ढेरीमुळ का? ;-)
बायदवे, फोटो आणि वर्णन अप्रतिम!!!
{जबरी रे..फटु अन लेख दोन्ही}
जबरी रे..फटु अन लेख दोन्ही वूत्तम...वनराजाला पण भेटवा लवकर..
{मस्तं रे अर्ध्या.. सर्व}
मस्तं रे अर्ध्या.. सर्व प्राण्यांचे फोटो छान आले आहेत. गाडीवरच्या वाघाचा पण.
-पुण्याचे पेशवे
{हॅ हॅ हॅ.... शेवटल्या फटूतील}
हॅ हॅ हॅ.... शेवटल्या फटूतील प्राणी वळखू नाय आला. कोन्ता हाय त्यो प्राणी?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{शेवटुन दुसरा फोटो, जगातला}
शेवटुन दुसरा फोटो, जगातला सर्वात सुंदर प्राणी
{लास्ट फटु कोण्त्या प्राण्याचा}
लास्ट फटु कोण्त्या प्राण्याचा म्हणाय्चा?
{अरे! हे सुटलंच होतं}
अरे! हे सुटलंच होतं वाचायचं..
खूप छान ! आणि फोटो
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{ढासु फटु.... जिराफाने जरा मेक}
ढासु फटु....
जिराफाने जरा मेक ओव्हर केलाय का? का ड्रेस बदलला आहे? जरा येगळं दिसतंय बेनं.
बाकी अर्धवटरावांचे फॅन फॉलोईंग वाढले म्हणा की....
(काक्वा टपून बसल्यात
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)