ऑनलाईन फोटो स्पर्धा निकाल
सर्व प्रथम पिडाकाका आणि राजेंचे आभार. पिडाकाकांनी एक जबरदस्त कल्पना मांडली आणि राजेंसह तुम्ही सर्वांनी ती उचलुन धरलीत. मला दिल गेलेल पंचपद देखिल मान्य केलत म्हणुन आपणा सर्वांचे धन्यवाद. 
निवड करताना फोटोची सुस्पष्टता (क्लॅरीटी), फोटोग्राफीचे बेसीक नियम, कंपोझिशन, विषयाची मांडणी / सादरीकरण ह्या बरोबरच ईतर बारकाव्यांचा देखिल सखोल विचार केला आहे. सगळे फोटो छान आहेत. (क्रमांक देण्यासाठी मला सिलेक्शन करता येत नव्हत म्हणुन मग एलीमनेशन कराव लागल ईतके छान आहेत सगळे फोटो) सर्व स्पर्धकांचे अभिनंदन.
टिप - कृपया मझ्या फोटोला क्रमांक का दिला नाही / मिळाला नाही? अशी विचारणा करु नये.

तुमच्या फोटो विषयी व्य.नि. अथवा खरडीतुन नाक्कीच चर्चा करता येईल. (यातुन मला देखिल काही शिकता येईल)
तर आता आम्ही लावलेला हा निक्क्क्क्काल
प्रथम क्रमांक = श्री. स्व्प्नील

द्वितीय क्रमांक = श्री. नंदन

त्रितीय क्रमांक = श्री. सँडी व श्री. प्रभो (विभागुन)
सअँडी

प्रभो
उत्तेजनार्थ = श्री.पाषाणभेद आणि श्री. पराग
पाषाणभेद

पराग
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
.jpg)
{अभिनन्दन........}
अभिनन्दन........
{दादा !!}
अभिनंदन
दादा !!
निवडालेले फोटो इथे टाकाल का?
{अरे फोटो पण अॅड कर ना}
अरे फोटो पण अॅड कर ना मित्रा.
Hope is a good thing...
{अभिनंदन आणि आभार!}
सर्व विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंद्न आणि आभार!!!
सर्वांच्या फोटोंनी मनाला विलक्षण आनंद दिला...
स्पर्धा निकोप आणि खेळीमेळीची ठेवल्याबद्दल सर्व सभासदांना धन्यवाद!!!
अरे हो, जज्जशिप निभावल्याबद्दल जयपालाचेही आभार!!
आपला,
पिडांकाका
{मी मराठी तर्फे सर्वे}
मी मराठी तर्फे सर्वे विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन !
एवढी छान कल्पना येथे राबवल्या बद्द्ल पिडाकाकांचे आभार व वेळात वेळ काढून जयपाल यांनी परिक्षकाची भुमिका अतिशय उत्तम प्रकारे निभावली आहे त्यांचे देखील अनेक आभार.
लवकरच पिडाकाका नवीन एखादी योजना घेऊन येतील अशी आशा मी व्यक्त करतो.
धन्यवाद.
राजे / व्यवस्थापक
मी मराठी.नेट
Hope is a good thing...
{>>>>> पहिल्या ३ विजेत्याचे}
>>>>> पहिल्या ३ विजेत्याचे चित्र त्याचे नाव व माहिती बरोबर पुढील इंद्रधनुष्यच्या अंकात वापरले जातील व पहिल्या क्रमांकाचे चित्र मुखचित्र म्हणून वापरले जाईल.
आता कसं करणार?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{विचार करतो आहे ?}
विचार करतो आहे
?
Hope is a good thing...
{काय राजे लगेच प्रतिसाद. मला}
काय राजे लगेच प्रतिसाद. मला हॅ हॅ हॅ करायचं होतं ना!
असो.
आमचे बाळबोध छायाचित्र निवडल्याबद्दल परीक्षकांचे अन आयोजकांचे आभार.
एक सुचना:
>>>त्याने/तिने काढलेला फक्त एकच फोटो शीर्षकासकट इथे द्यायचा....
अशी सुचना होती.बर्याच लोकांनी शिर्षकही समयोचीत दिलेले आहे.
उदा: प्रभोची टॅगलाईन बघा:
"मला पक्कं ठाऊक आहे की
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणून मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे"
तरी माझी विनंती आहे की आपण फोटो संपादीत करून शिर्षकासहीत द्यावेत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
पुष्करिणी
{चित्रपाला}
माज्या फटूला बक्षीस का नाय दिलं, पार्शालिटी पार्शालिटी. कारण काय देतोय तर म्हणे तुम्ही फटूच दिला नाही. इतक्या क्षुल्लक कारणासाठी आमचं नाव विजेत्यांच्या यादीतून काढले. शेम शेम.
असो. आमचा नेहमीचा चावटपणा पुरे. चित्रपालाची निवड मस्त आहे. पहिले दोन्ही फटू खरंच मस्त आहेत. आमचे मत सँडीच्या फटूला होते. पण आता चित्रपालाशी सहमत (न होऊन सांगतो कुणाला, अक्कल नाही काडीची...). नंदनभौंच्या फटूत नव्यानेच जाणवलेली गोष्ट म्हणजे दूरचे डोंगर देखील आउट ऑफ फोकस झालेले नाहीत तरीही फटूमधे तिसरी डायमेन्शन (खोली) व्यवस्थित जाणवते आहे. अशीच गोष्ट पहिल्या फटूची. (जमतंय कारे चित्रपाला?)
अरे हो. महत्त्वाचे राहिलेच. सर्व विजेत्यांचे जोरदार हाबिणंदण. आम्ही आता तुम्हा लोकांकडे छायाचित्रणकला शिकायला येणार आहोत. (बाप रे कोण म्हणालं ते, नंदनच असणार खात्री आहे माझी.)
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{जिंकलेल्यांचे अभिनंदन.. न}
जिंकलेल्यांचे अभिनंदन..

)
न जिंकलेल्यांना शुभेछा..फुड्च्या येळी साटी
भाग न घेतलेले..(बसा बोंबलत..आळशी लेकाचे..मी त्यातलाच एक महाभाग
>>लवकरच पिडाकाका नवीन एखादी योजना घेऊन येतील अशी आशा मी व्यक्त करतो.
व्यक्त केलेल्या आशेला दुजोरा देतो.
{धन्यवाद आणि अन्य विजेत्यांचे}
धन्यवाद आणि अन्य विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व मतदार बंधुभगिनीं(रराभौ, सौरभ२०००, माधुरी ,पराग, ममो)यांचे आभार.
तसेच स्पर्धा आयोजित केल्याबद्दल पिडां काका तसेच हा फलाट उपलब्ध करुन दिल्याबद्दल (गडकरी) मालकांचे आभार.
{वाह!}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
ररा त्याचे काय आहे आपण मॅरेथॉन जिंकणार नाही हे माहीत असते पण ५ किमीच्या स्पर्धेत भाग घेउन संपवणे यात आपणच जिंकल्यासारखे वाटते नाही का? तसा स्पर्धेत भाग घ्यायचा व स्वताला विनर मानायचे! कसे?
आणी हो उत्तेजनार्थ पुरस्कार नाही तरी किमान भाग घेतल्याचे सर्टीफिकेट कृपया पाठवणे.
{हम्म}
ररा त्याचे काय आहे आपण मॅरेथॉन जिंकणार नाही हे माहीत असते पण ५ किमीच्या स्पर्धेत भाग घेउन संपवणे यात आपणच जिंकल्यासारखे वाटते नाही का? तसा स्पर्धेत भाग घ्यायचा व स्वताला विनर मानायचे! कसे?

यांचे नावच सहज आहे. हल्ली कायतरी क्रिप्टिक लिहून रायलेत. हा दिलासा आहे का टोमणा?
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{च्यामारी मी काढलेला फटु धूवुन}
च्यामारी मी काढलेला फटु धूवुन यायच्या आत निक्काल लावुन पण मोकळे !!! हा हंत !!!
सर्व विजेत्यांचे तसेच स्पर्धकांचे अभिनंदन..
{हम्म}
एवढा वेळ का लागला धुवायला, फोटो म्हणतोय मी.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{सर्व विजेत्यांचे, स्पर्धकांचे}
सर्व विजेत्यांचे, स्पर्धकांचे आणि पन्चानचे देखिल हार्दिक अभिनंद्न
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
{धन्यवाद :)}
धन्यवाद जयपालदा आणि पिडांकाका
स्वप्नील, सँडी, प्रभो, पाषाणभेद, पराग - हार्दिक अभिनंदन!
राजे, एखादा विषय/थीम घेऊन अशीच स्पर्धा यापुढे आयोजित करता येईल का?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{धन्यवाद जयपालदा, पिडांकाका}
धन्यवाद जयपालदा, पिडांकाका आणि राजे
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
{अर्रे व्वा..}
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!
स्वाती
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन आता}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
आता फुड्ली स्पर्धा कंची मनायची ?
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{सरवान्चे अभिनन्दन, नन्दनाच}
सरवान्चे अभिनन्दन, नन्दनाच मनावर घ्या. थिम वरुन आट्वल , जरा पावसा वर विचार करा
{सर्वांचे हार्दीक}
सर्वांचे हार्दीक अभिनंदन.
आत्ताच सगळ्या एन्ट्र्या बघितल्या.. सगळेच उत्तम आहेत.
{विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन}
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
{+१}
हे माझ्यातर्फे सर्व विजेत्यांना
{अभिनंदन}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्तने चांगले फोटो पहायला मिळाले.
त्यासाठि मिमराठि, पिवळा डांबिस व जयपाल यांचे आभार.
येथे बरेच हौशि फोटोग्राफर आहेत. तर थिमवर आधारित फोटोग्राफिचा धागा असावा असे वाटते.
दर महिन्याला/ १५ दिवसांसाठि एक थिम निवडता येइल. स्पर्धा असलिच पाहिजे असे नाहि. सदस्यांनि फोटो टाकावे व त्यावर सर्वांनि चर्चा करावि. यातुन बरेच काहि शिकायला मिळेल
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
{थीम}
थीम देऊन त्यावर फोटोस्पर्धा आयोजित करायची आयडिया चांगली आहे...
त्यासाठी इथे बक्षिस मिळालेल्या विजेत्यांनी आळीपाळीने पुढाकार घ्यावा (आणि मला म्हातार्याला रिटायर करावे!!!) ही विनंती!!!!
{अनुभवी व्यक्तीने अशी माघार}
अनुभवी व्यक्तीने अशी माघार घेऊ नये ही विनंती.
ह्या पंधरवड्याची स्पर्धा तुम्ही घ्या पुढील पंधरवड्यासाठी हे कार्य आपण दुसर्याला देऊ.
Hope is a good thing...
{>>अनुभवी व्यक्तीने अशी माघार}
>>अनुभवी व्यक्तीने अशी माघार घेऊ नये ही विनंती.


माघार? शिंच्या माघार?
तू ना, साल्या असलाच आहेस!!!!
ठीक आहे....
पुढल्या पंधरवड्याचं थीम....
"वाहन"
काढ नवीन धागा आणि दे हे थीम!!!!
पिडां म्हणे आता, उरलो उपकारापुरता!!
{आता कसं कुठे पिन मारल्यावर}
आता कसं
कुठे पिन मारल्यावर स्टो पेटतो ते कळतं बरं का मला
Hope is a good thing...
{हम्म!}
येतोय लवकरच तिथे!!
सोबत चिंचेचा फोक घेऊन!!!
बघीनच एकेकाला!!
{आम्ही बाहेर चाललो आहे}
आम्ही बाहेर चाललो आहे
Hope is a good thing...
{काका फक्त मला बक्षिस}
काका फक्त मला बक्षिस आणणारेत..... बाकी सर्वांना चिंचेचा फोक.
{ही घ्या आमची यंट्री}
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{सगळ्यात पहिली एंट्री, राजाची}
सगळ्यात पहिली एंट्री, राजाची जगप्रसीद्ध बाइक!
{शंका}
दुरूस्तीपूर्व की दुरूस्तीपश्चातचा फटू ग्राह्य धरायचा?
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{टाकल आहे}
टाकल आहे
Hope is a good thing...
{अर्थात दुरुस्तीपूर्व}
अर्थात दुरुस्तीपूर्व
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन !}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन}
फोटो मस्तच आहेत.
सर्व विजेत्यांचे हादिक अभिनंदन.
{धन्यवाद मंडळी...}
धन्यवाद मंडळी...
{मीम वरच्या कविता वा आस्वाद मधील लेख जर थिम म्हनुन दिला तर ...}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
थिम: बालमन,रान्,प्रकाश,बालपण्,समस्या,समाधान्,शांतीचा शोध, पाण्याची रुपं,आभाळाची माया, झिंग तरुणाईची,किंवा मीम वरच्या कविता वा आस्वाद मधील लेख जर थिम म्हनुन दिला तर त्या लेखाचा काव्याचा सन्मान आणि त्यास छान फोटो ही मिळेल..
बघा माझी आपली छोटीशी सुचना...
{अगदी असेच म्हणतो}
अगदी असेच म्हणतो