जालावरच्या समस्त बल्लवाचार्यांना शिरसाष्टांग नमस्कार,
गेले काही दिवस एका अडचणीच्या ठिकाणी येउन पडलेलो आहे. 'पोटाला घाला गो.. मायबाप' अशी आर्जवी स्वरात भीक मागण्याची वेळ आली आहे. तेव्हा ताकाला जाउन भांड न लपवता सरळ भिक मागायला सुरूवात करतो.
सध्याच्या केविलवाण्या अवस्थेत, गेले १० दिवस मॅगी करून खात आहे. शाकाहारी असल्याने खाण्याचे खुप हाल चाललेत. लै काव आलाय. माझ्या कडे असलेल्या साहित्यात होउ शकणार्या पाककृती द्याल तर पुण्य मिळवाल.
माझ्याकडे असणारे साहित्य येणेप्रमाणे
* एक मायक्रोवेव्ह ओव्हन
* दोन प्लॅस्टीकची भांडी.
* काही चमचे.
या साधनांच्या मदतीने तयार होणारी पाककृती हव्या आहेत. या शिवाय बाकी सर्व मार्केट मधुन खरेदी करावं लागणार आहे. अजुनही काही लागले तर मार्केट धुंडाळता येइल. इथे कुठल्या भाज्या मिळतात ते माहीती नाही, मसाले बहुदा मिळत नसावेत, मिठ आणि मिरे आणता येतील. पाककृतीसाठी लागणार्या साहित्याची यादी सर्वसमावेशक दिलीत तर जास्त बरं होइल, एखादी वस्तु राहिली तर ५ किलोमीटर चालत जावं लागेल. इकडे केवळ एक महिना असल्याने सगळी भांडीकुंडी आणायला लावू नयेत.
निवेदन - सदर धाग्याचा आयटी आणि सैपाकाशी संबंध लावून, धाग्याचं काश्मीर करण्यापुर्वी, गरिबाच्या पोटाचा इचार व्हावा. पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये.. फाट्यावर तर मारूच नये..
अरे नीट चौकशी कर थोडेफार तरी
अरे नीट चौकशी कर थोडेफार तरी भारतीय असतील तिथे. मिळतील मसाले सुधा.
-पुण्याचे पेशवे
असंबद्ध प्रतिक्रिया, सबब
असंबद्ध प्रतिक्रिया, सबब फाट्यावर मारली आहे.
इथे उदरनिर्वाह कसा करावा या विषयी धागा काढलेला नाही, केवळ पाककृती विषयी आहे.
उपप्रतीसाद देउन भुकेपोटी कावलेल्या जिवाला अजुन त्रास देउ नये.
प्लास्टीक्च्या भांड्यात काय
प्लास्टीक्च्या भांड्यात काय शिजव्शील रे.....
भात करता येइल दही विकतचे
भात करता येइल
दही विकतचे आणा
दही भात करता येइल
भात उरला की त्याला वरुन फोडणी
भात उरला की त्याला वरुन फोडणी घालता येइल.
फोडणीचा भात झाला तयार.
अगो
मावशे, पण फोडणी कशात करेल?

पूर्णवटराव, पास्ता, स्पागेती वगैरे गोष्टींची पॅकेट्स मिळतील, मॅगीला पर्याय.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
रेडीमेड जेवणपण मिळते ना,
रेडीमेड जेवणपण मिळते ना, पॅकेटबंद ????
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हॅ हॅ हॅ ! शेवटी कटोराच
हॅ हॅ हॅ !
शेवटी कटोराच
अरे सगळ्यात मस्त आयडीया ब्रेड घेऊन ये.. अंडे घेऊन ये व खा !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अरे तो शाकाहारी आहे रे.....
अरे तो शाकाहारी आहे रे.....
अंडे शाकाहारी ना
अंडे शाकाहारी ना
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बरोबर
ज्याला तरीही आक्षेप असेल त्याने मधला पिवळा बलक (तसेही त्याने कॉलेस्टोरॉल वाढते) काढून बाजूचा पांढरा प्युअर वेज भाग खावा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हेच म्हणतो. परवाच मी शाकाहारी
हेच म्हणतो.
परवाच मी शाकाहारी बोकडाचे मटण खल्ले की !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आणखी काही
तयार पराठे वगैरेची पॅकेट्स मिळतात का पहा. तसेच हीट अँड ईट प्रकारात काँटिनेंटल फूड मिळते ते पहा. पॅकेट आणायचे, वरची फॉईल काढायची, अवनमधे तीन ते पाच मिनिटे ठेवले की गट्ट करायचे. नसेल तर आपल्या दोशासारखा पण एक जाड प्रकार मिळतो जो ते रोटीसारखा खातात. तो मिळतोय का पहा. सगळ्यात बेष्ट म्हणजे त्यांच्या स्थानिक जेवणाशी -अर्थात शाकाहारी - जुळवून घ्या, तेवढाच नवा अनुभव. साला आपण तर बॉस्टन मधे एक प्रकार सोडला नव्हता. (त्यात आम्ही मांसाहार करणारे असल्याने त्याचा पुरावा अजून पोटावर मिरवतो आहे)
अवांतर: भाकरी मिळत नसेल तर केक खा. (पळा पळा. नाहीतर इदि अमीनची शस्त्रे आणून हाणतायत पूर्णवटराव आता)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>भाकरी मिळत नसेल तर केक
>>भाकरी मिळत नसेल तर केक खा
केक की ब्रेड ??
असो,
तुम्ही गवत शोधा... ते शाकाहारी जेवण हो मालक !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
Microwave Recepies याचा आधार
Microwave Recepies
याचा आधार घे
तिकडे बरीच भारतीय जनता राहते
तिकडे बरीच भारतीय जनता राहते त्यामुळे मसाल्याचे पदार्थ मिळायला फारशी अडचण येणार नाही.
http://www.climbmountkilimanjaro.com/travelling-in-tanzania/food-and-dri...
http://www.africa.upenn.edu/Cookbook/Tanzania.html ( या पानावरच वाचून वाट्तय की पोळ्या/चपाती मिळू शकतील )
पुष्करिणी
एक उपाय सांगतो. वरचे शिर्षक
एक उपाय सांगतो. वरचे शिर्षक तालासुरात म्हणायची प्रॅक्टीस करा.

मी ही तेच येथे अन येथे बसून करतो.
असो. आता सल्ला:
तांदूळ आणुन भात खिचडी करत चला. नाहीतरी भाज्या, मसाले आणायला बाहेर जावेच लागेल ना? मग तांदूळ आणा थोडा अन व्हा सुरू. बाकी एखादा महीना तांदूळ खाल्ल्याने काही होणार नाही. काय डॉक्टर?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हा हा
...धाग्याचं काश्मीर करण्यापुर्वी...
च्यायला हे नीट वाचलंच नव्हतं आधी. आता चूप बसतो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ब्रेड आण रोज ताजा. मिळतील
ब्रेड आण रोज ताजा.
मिळतील त्या भाज्या मसाले ते नाही मिळाले तर लसून आलं बारीक कापून भाजीत घालून हाय पावरवर मायक्रोवेवमध्ये उकडा
ब्रेड आणि लोणी आणि ही भाजी खा. वर सांगितल्याप्रमाणे खिचडी तर आरामात करता येइल.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
श्रावणाचा उपास करा. पुण्य
श्रावणाचा उपास करा. पुण्य मिळेल.
नानांच्या पुढील 'गरिब
नानांच्या पुढील 'गरिब ब्राह्मणाच्या' गोष्टीत चान्स आहे तुम्हांला ...
पुष्करिणी
पारणं
आणि उपासाचं उद्यापन म्हणून घरी गेलास की बायकोचे पाय धर !
अशी भिक मागण्यापेक्षा चार सोपे पदार्थ शिकून घे तिच्याकडून !
कुठ्ठं जायच्या लायकीचा नाहीस तू ! बायकोने वाचलं हे तर चमच्यात पाणी भरून जीव देइल ती
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
काय ठावं
ते पुण्य मिळंल का नाय ते ठावं नाय (त्या बाबत आपुन अडानी मानूस), पर हां दमड्या वाचतील आन् वजन बी कमी व्हईल (म्हंजी इकल्डे जिम चे पैसे बी वाचत्यान्) हाय का नाय डब्बल फायदा?
(पूर्णवटराव, धाग्याचे काश्मीर नानाने केले आहे, मी फक्त एक दगड फेकतो आहे हे कृपया ध्यानात घ्यावे. बाकी राजकीय प्रवाहात यायला आम्ही एका पायावर तयार आहोत हे ही लक्षात असू द्यावे)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ररा, सह्ही आयडीया आहे.
ररा,
सह्ही आयडीया आहे.
-पुण्याचे पेशवे
अर्ध्या ...काय केलस रं शेवटी
अर्ध्या ...काय केलस रं शेवटी ..का अजुन ऊपाशीच आहेस ??
हे
हे स्वतःच्या बायकोला म्हणून पाहीले का?
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
हे स्वतःच्या बायकोला म्हणून
हे स्वतःच्या बायकोला म्हणून पाहीले का? >>>
हम्म
सातारकर स्वतःच्या झालेल्या/होणार्या/संभाव्य बायकोला घाबरतात असे दिसते 'स्वतःच्या' हा शब्द कसा हळूच उच्चारताहेत, 'नरो वा कुंजरो वा' म्हणणार्या युधिष्ठिरासारखे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>सातारकर स्वतःच्या
>>सातारकर स्वतःच्या झालेल्या/होणार्या/संभाव्य बायकोला घाबरतात
देव भलं करो त्या साध्वीचं..
आम्ही नेहेमी म्हणतोच खाजगीत, आज जाहीर म्हणतो, गळ्यात धोंडा बांधुन आडात ढकलुन द्या एकवेळ पण ह्याला नको..
ओ
पूर्णवटराव, का उगाच बदनामी करताय दोस्ताची. किती शालीन सोज्ज्वळ माणूस आहे बिचारा. हे असले मित्र आहेत म्हणूनच घाबरून असावा असे दिसते.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>> शालीन सोज्ज्वळ माणूस आहे
>> शालीन सोज्ज्वळ माणूस आहे बिचारा
तीव्र आक्षेप तिसर्या शब्दाला..
संदर्भासहीत स्पष्टीकरण
आम्ही स्वतःच्या हा शब्द हळूच म्हटला कारण
१. आमचा "धाडसी" अर्धवटरावांवर असलेला "पूर्ण" विश्वास
२. आम्ही आमच्या आत्ता नसलेल्या नव्हे तर अर्धवटरावांच्या आत्ता असलेल्या अर्धांगीनीला घाबरतो म्हणून.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
हां
आम्ही आमच्या आत्ता नसलेल्या नव्हे तर अर्धवटरावांच्या आत्ता असलेल्या अर्धांगीनीला घाबरतो म्हणून.
हां, आत्ता आम्हाला समजलं पूर्णवटराव जंगलात जाउन का राहिलेत.
अवांतरः 'आत्ता असलेल्या' या शब्दप्रयोगावरून भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेचा संकेत मिळतो हे तुम्हाला ठाउक असेलच.
(माझं हेल्मेट द्या रे कुणीतरी लवकर)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
काही मिळाले का नाही
काही मिळाले का नाही खाण्यासाठी ?
नाय वो सायेब, त्यासाठी तर
नाय वो सायेब, त्यासाठी तर धागा काढला होता. पण कोण बोलतच नाय काय.. उगाच आमच्या धाग्याचं काश्मीर करुन राह्यलेत..
>>नाय वो सायेब, त्यासाठी तर
>>नाय वो सायेब, त्यासाठी तर धागा काढला होता. पण कोण बोलतच नाय काय.. उगाच आमच्या धाग्याचं काश्मीर करुन राह्यलेत..
शाण्या !! आख्खी साईटीची लिंक दिली की
हे सर्व साहित्य विका जवळ्च्या मार्केट्मध्ये आणि चांगल्या हाटेलात
हे सर्व साहित्य विका जवळ्च्या मार्केट्मध्ये आणि चांगल्या हाटेलात जाऊन जेवा. मार्केट्चा वेळ आणि पैसा वाचेल. शिवाय काही दिवस 'अड्चणीच्या" जागी आहात. काही दिवसानंतर ही विकायची वेळ येणारच आहे. ह्यानं काही नुकसान होणार नाही व एक्दाच ५ किमी जावे लागेल. वा घरगुती मेस ही पाहाता येईल. त्यामुळे आपल्याला 'गरीबाचे' आलेले फिलिंग ही कमी होईल. या धाग्याचा काश्मीरही होणार नाही. त्यामुळे अशी अड्चण वैर्यावरही येऊ नये अशी प्रार्थना भरल्यापोटी करता येईल.
हा हा हा
हा हा हा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लंघन करा!
लंघन करा!
ए कॉपी कॅट
हा सल्ला नानाने आधीच दिला आहे. का मालकांसारखे न वाचता प्रतिसाद द्यायला सुरवात केली आहेस तू ही.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
नाना
चोट्टा आहे!
तुम्ही तिथे कोणत्या भाज्या
तुम्ही तिथे कोणत्या भाज्या मिळतात याची माहिती दिली नाही.पण कोबी,एखादी पालेभाजी, टोमॅटो असल्या भाज्या मिळत असतील तर त्यांचे न शिजवता करता येण्यासारखे(मिठ मीरे लिंबु असले पदार्थ घालुन) खूप पदार्थ आहेत.सोबत ब्रेड किंवा तत्सम काही,(अनुभवाचे बोल,कारण गेली ८ वर्ष "अपना हाथ जगन्नाथ" चालु आहे)
धाग्याचा काश्मीर होऊ नये याची काळजी घेतली आहे(भुकेल्यावर दया!)
बाजारात हे आहे का ते
बाजारात हे आहे का ते बघ.
पॅनकेक पावडर (पाकिटावर लिहिलेले वाचून विना अंड्याचा पॅनकेक करू शकशील).
आलं/लसूण कींवा त्यांची पेस्ट.
चायनीज सॉस (सोय सॉस/ केच-अप तत्सम)
मध (पॅनकेक पावडर मिळालीच, तर पॅनकेकवर मध घालून खायला चांगला लागतो)
फ्रोझन फूड मधे- काही मिक्स भाज्या (उदा. मटार, गाजराचे काप, मक्याचे दाणे इ.) आहे का बघ. उकडून खाऊ शकशील ब्रेडबरोबर.
लाल मिरची (वाळलेली) / चिली फ्लेक्स (जे की पिझ्झ्याबरोबर मिळतात) ते मिळाले, तर लाल तिखटाऐवजी वापरू शकशील.
टॉर्टिला नामक इटालियन का स्पॅनिश पदार्थ (पोळीसारखा असतो, थोडा भाजून पोळीसारखा खाता येईल.)
टिन/ कॅन मधे टोमॅटो/ राजमा/ छोले मिळतात का ते बघून घे. मिळाले तर भाजीत वापरता येईल.
केळी आणी इतर फळे घे, दही मिळत असेल तर ते नाय तर दूध, मिक्स कर, साखर घाल, थोडी मिरपूड घाल आणी 'हाण सावळ्या'.
आत्ता एवढंच आठवतंय.
बाकी काही लक्षात आलं तर कळवेन.
अरे अर्धवटा,
फ्रोजन सेक्शन मध्ये उकडलेल्या भाज्यांचे डबे मिळतात ही मनमेघाची आयडिया एकदम मस्त. टोमॅटो केचप घ्यायचं. ब्रेडवर लावायचं. त्यावर या उकडलेल्या भाज्या घालायच्या. वर चीजचा एक स्लाईस ठेवायचा. वरून दुसरा ब्रेड ठेवायचा. मायक्रोवेव मध्ये १ मिन गरम करायचे. मस्त सँडविच तयार होईल.
वेगवेगळ्या फ्लेवरचे फळे असलेले दही पण मिळते. ते पण खाऊ शकतोस.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
अर्द्याच्या पोटाचे काही खरं
अर्द्याच्या पोटाचे काही खरं नाही हे नक्की !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अर्धवट राव .. काही खाल्ला
अर्धवट राव .. काही खाल्ला नाही थोडा दिवस तर काहीही वाईट होणार नाहीये तुझा... जरा बारीकच होशील.. आणि तुला अशीच शिक्षा पाहिजे... घरी काही काम करत नाहीस ना.... भोग आपल्या कर्माची फळ ...
उकडलेले/वाफवलेले बटाटे , कांदे , गाजर वगरे खा...
सातारकर आपल्याला आल्यावर अर्धवट राव आधिसारखे बघायला मिळणार तर... काडी पैलवान
मिनी जिंदाबाद
अर्धवटराव,
अस म्हणायची वाट बघतोय
वेल्कम टू सातारकर काडी पैलवान क्लब.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
जळतात रे जळतात लोक माझ्यावर..
जळतात रे जळतात लोक माझ्यावर..
च्यायला मी चांगलं वजन राखुन असल्यामुळे असे टोमणे मारतात..
जळतात रे जळतात लोक माझ्यावर..
जळतात रे जळतात लोक माझ्यावर...
च्यायला मी चांगलं वजन राखुन असल्यामुळे
का कमी करता येत नसल्यामुळे ?
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
हेहेह साकापैक्ल.....
हेहेह साकापैक्ल.....
५०
झाले
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
साधे sandwitch करा की. लोणी
साधे sandwitch करा की. लोणी मिळत असेल ना तिथे. पावाला लावा. देशी दुकानातून चटणी मिळाली तर ती पण लावा. उकडलेला बटाटा, टोमाटो, काकडी, बीट, कांद्याच्या चकत्या यातील हाताला लागेल ते मध्ये घाला. चवीपुरते मीठ घाला. चीज चालत असेल तर चीज पण घाला. केचप बरोबर खा. छान लागेल. याची संक्षिप्त आवृत्ती पण आहे. थोडासा unhealthy प्रकार आहे. पण एकदम झटपट. पावाला थोडे लोणी लावा. उकडलेले बटाटा घाला दोन पावांमध्ये. मीठ, मिरी शिंपडा आणि हाणा. भारतात नाक्यावर उभे असलेले sandwitch वाले हेच तर करतात.
बाकी एखादे भांडे, डाव, सुरी आणि cutting बोर्ड (कट्टा स्वच्छ असेल तर हा ही वगळता येईल, पण असलेला बरा), असेल तर अजून बरेच काही करता येईल.
तवा असेल तर बरे, नसेल तरी चालेल. तवा असेल तर वरून फोडणी देणे, चपात्या शेकणे, पाव भाजणे असे करता येईल. तवा घेतल्यास कडा असलेला घ्यावा.
हळद लागेलच. बाकी सगळे मसाले नका आणू. गरम मसाला पूड /पावभाजी मसाला/ तवा मसाला / चिकन मसाला (हा शाकाहारी असतो) यातील एक काहीतरी घ्या. ते नसेल तर धणे-जिरे पूड.
तिखटाच्या ऐवजी मिरी वापरा. खडा मसाला लागणार नाही.
हिंग, मोहरी, जिरे लागेल. नसले तरी चालेल. चव बदलेल पण खाण्याजोगे होईल.
वरील साहित्यात बरेच प्रकार करता येतील. आधी जेवण बनवले असेल तर सोपे पडेल. मायक्रोवेव्ह मध्ये १८-२० मिनिटात भात होतो. थोडीशी फोडणी देऊन त्यात १० प्रकार करता येतील. दाक्षिण्यात्य बंधू तेच करतात. लेमन राइस, टोमाटो राइस, tamarind राइस असे प्रकार असतात त्यात काही वेगळे नसते. फक्त फोडणी बदलते.
बाकी सुचेल तसे सांगत जाईन.
अवांतर शंका :- भांडे नाही आहे तर मॅगी कशात करता?
पिझ्झा ऑर्डवा.
पिझ्झा ऑर्डवा.
हे मस्तच..
आपल्या देशात म्हणे पोलिसांच्या आधी पिझ्हा येतो.
ह्यावरुन मी असा निर्क्र्श काढलाय कि अर्ध्या डेटला जाताना गर्लफ्रेन्दला दब्यात पोहे व थर्मास मधे चहा घेउन जात असावा
(विषय दिलेला नाही)
चुच्स अर्ध्याची बाय्को अर्ध्याला व अर्ध्या तुला हाण्तात बघ......
(विषय दिलेला नाही)
आलि क! आट्वन
आहो सरकार, चितले बन्धु ना पत्र टाका.
धन्या वडेर
कोण चितळे धन्यवाद. आम्हाला
कोण चितळे
धन्यवाद.
आम्हाला फक्त कंदी पेढ्यांची आठवण होउ शकते.
चितळे बंधु आणि कंदी पेढ्यांचा
चितळे बंधु आणि कंदी पेढ्यांचा संबंध काय?
अर्धवट रावाना शिथ्ट लोकाचे
अर्धवट रावाना शिथ्ट लोकाचे स्वईट्माटॅ आवड्त नाहि. अनि सतार चे कन्दि पेदे आवड्तात.
शीत पेटीका आहे का?
शीत पेटीका असेल तर ग्लूकोज ची बिस्कीट आण. दूध आण. पीठी साखर आण. vanilla essence वगैरे काही हव असेल तर आण.
बिस्कीट पूडा फोड. एका पातेल्यामधे( or भान्ड/tray) बिस्कीटान्चे थर रच. दूधामधे पीठी साखर घाल. essence आण्लास तर तो ही घाल. मग ते त्या थरावर ओत. अजुन एखदा थर रच. सेम प्रोसीजर परत फोलो कर. शीत पेटीके मधे ठेव. सेट झाला की खा. ओके???
प्रसन्न
http://www.prasannap.co.nr/
हे इथे सुचवाय्ची जागा नाही हे माहीत आहे. माफी असावी.
उपप्रतीसाद Hide/शो karta ale tar bara hoil. उगाच scroll कराव लागत. जर कुणाला उपप्रतीसाद वाचाय्च असेल तर शो असा ओप्शुन आणी नसेल तर हाईड..कारण उपप्रतीसाद मूळ विशयाला धरुन अस्तिलच अस नाही. फोर एग्झमोप्ल- हा थेड.
हे इथे सुचवाय्ची जागा नाही हे माहीत आहे. माफी असावी.but this thread happens to be a good example of उपप्रतीसादs.
प्रसन्न
http://www.prasannap.co.nr/