गगनावरी तिरंगा ....!!

0
0

तिरंगा
.
गगनावरी तिरंगा ....!!

गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्‍ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रम्हपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!

तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!

गंगाधर मुटे
................................................
ध्वजचित्र सोनाली यांच्या सहकार्याने.

स्वातंत्र्यदिनाच्या आपणा

1

स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

||जयहिंद||

सुंदर काव्य

2

q

सुंदर काव्य

असेच म्हणतो

3

असेच म्हणतो

|| जय हिंद ||

4

|| जय हिंद ||


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१

5

+१



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

धन्यवाद

6

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

भारतमाता की

7

भारतमाता की जय...!
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो...!
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो...


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.