मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

0
0

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे

गोल चेंडू उडला
सुर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सुर्य तापला

ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले

सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मगं
तिचे झाले ढगं

ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो

मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा

गंगाधर मुटे
...................................

मस्त

1

मस्त बालकविता!
अगदी लय्-तालात बसते.

+१ अगदी लय्-तालात बसते. असेच

2

+१

अगदी लय्-तालात बसते.

असेच म्हणतो

सुंदर बालकविता !

3

सुंदर बालकविता !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मला खूप आवडली एकदम लहान

4

मला खूप आवडली एकदम लहान झाल्यासारखे वाटले

टोपी काढतो आहे.

5

मुटेसाहेब टोपी काढली आहे. अशी कविता मोकळेपणाने गाता यावी यासाठी तात्पुरते लहानपण घ्यावे म्हणतो. (ययातीला तारुण्य द्यायला जसा पुरू भेटला तसा कोणी बाल्य देणारा भेटला तर...)

वा!! फारच मस्त बडबडगीत.

6

वा!! फारच मस्त बडबडगीत. बर्‍याच दिवसांनी एखादं नवीन बडबडगीत ऐकलं, त्यामुळे एकदम छान वाटलं हास्य

खरच खूप सुंदर! खूप दिवसानंतर

7

खरच खूप सुंदर! खूप दिवसानंतर या निमित्ताने बालपणाचा भावनिक का होईना आस्वाद पुन्हा घेता आला.