नकार देणे - एक कला
आपल्याला बरेच वेळेस नकार देणे खुपदा अवघड होत असते. असे अनेक प्रसंग येत असतात ज्यावेळेस आपण मनात असुनही नकार देवु शकत नाही. ब-याच वेळेस आपण नंतर विचार करत बसतो, की अरे त्याचवेळेस मी नाही म्हटले असते तर बरे झाले असते. हो कि नाही ?
बघा बरे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यातले स्मरुन की ज्यावेळेस खरे तर तुम्हाला नकार द्यायचा होता पण तुम्ही तो देवु शकलाच नाही.
- लग्नाचा वाढदिवस, बायकोला संध्याकाळी बाहेर फिरायला, जेवायला जाण्याचे कबुल केलेले. अचानक काही काम निघते जे तुम्ही नाकारु शकला असता पण नाकारत नाही.
- बाहेर मित्रांबरोबर सिनेमा, नाटकाला जाण्याची इच्छा असते पण अचानक वडील काही काम सांगतात. ते काम खरे तर नंतर केले तर चालणार असते पण तुम्ही नकार देत नाही.
- तुम्ही एक छानसा शर्ट आणला असतो व तो काही विशिष्ट दिवशी घालण्यासाठी ठेवलेला असतो. नेमका त्याच दिवशी लहान भाउ मी तोच शर्ट घालणार असा हट्ट करतो. तुम्ही नकार देवु शकत नाही.
- कंपनीतला सहकारी ज्याच्या बरोबर काम करावे लागते पण त्याव्यतिरिक्त त्याच्याबरोबर तुम्हाला काही संबंध वाढवायची अजिबात इच्छा नसते. पण काही वेळेस काही कामानिमित्त तुम्हाला एकत्रित जावे लागते. तसे वेगवेगळे गेले
तरी फारसे बिघडणार नसते पण तुम्ही तसे म्हणु शकत नाही.
असे अनेक छोटे मोठे प्रसंग आपल्या आयुष्यात सतत घडत असतात. आपल्याला मनातुन अगदी ओरडुन नाही असे म्हणायचे असते पण आपले ओठ शांतपणे बोलतात 'ठिक आहे. चालेल'
असे का व्हावे किंवा असे का होते? असे काय घडते की ज्यामुळे आपण अगदी हतबल झाल्यासारखे होकार देवुन बसतो. नातेसंबंध तुटण्याची भिती हे यामागील प्रमुख कारण आहे. तुमच्या मनात भिती असते की मी जर नाही म्हणालो तर कदाचित ह्याच्याशी असलेले माझे चांगले संबंध संपतील. वितुष्ट येईल. त्यामुळे त्या नात्यांना, मैत्रीला, संबंधांना बाधा पोहोचु नये म्हणुन तुम्ही सतत आपल्या मनाला मुरड घालत रहाता. समजावत रहाता की अरे जावु दे
काही बिघडत नाही. तो/ती तर खुश होईल ना? बास.
तुमच्याचसारखे अनेक लोक आहेत. जे सतत आपल्या मनाला मुरड घालतात. मन मारत रहातात. मनात असुनही नाही न म्हणता समोरील माणसाला खुश करण्याचा प्रयत्न करत रहातात. कारण लहानपणापासुन आपल्या मनावर बिंबवले गेले आहे, कुणाच्याही भावना दुखावु नये, भावनांचा आदर करावा वगैरे वगैरे. पण यामुळे समोरील माणसाला तुम्हाला गृहित धरायची सवय लागते. तो त्याचा आनंद तुमच्या आनंदावर विरजण टाकुनही मिळवु शकतो. असे होणे त्याला कितीही फायदेशीर असले तरी तुम्ही मात्र यात भरडले जाता.तुम्ही असे समजता की मी जर नकार दिला तर
जग मला स्वार्थी, स्वतःपुरता पहाणारा असे समजतील. स्वार्थत्यागाचा अति उदो उदो तुमच्या मनावर नकळतपणे इतका स्वार होवुन बसलेला आहे की असे करणे हेच खरे जगणे असे हळुहळु तुम्ही समजु लागता. कुणी काही सांगितले किंवा मागितले अन तुम्ही नाही म्हणाले तर पुढील वेळी आपल्याला विचारले जाणार नाही, आपले महत्व कमी होईल अशी सुप्त भिती सुद्धा अनेक वेळेला तुम्हाला नकार देण्यापासुन परावृत्त करते.
मग आता प्रश्न पडतो कि नकार तर द्यायचा आहे पण तो देता येईल काय? काय मार्ग आहे नकार द्यायचा? एखाद्या मित्राला किंवा मैत्रीणीला एखाद्या गोष्टीसाठी नकार द्यायचा आहे. तुम्ही शांतपणे विचार करा की तुम्ही जर नाही म्हटले तर काय काय घडु शकेल? काय काय उलट परिणाम होतील तुमच्या नकाराचे? तुम्हाला अशी भिती वाटते का की तो / ती परत तुमच्याशी बोलणार नाही? तुम्ही कर्मचारी असाल तर असे वाटते का की तुम्हाला कामावरुन कमी केले जाईल? नातेवाईक असतील तर ते दुरावले जातील अशी भिती वाटते का?
एकदा तुम्ही तुमच्या मनातील भिती काय असेल हे नक्की केले की तिला मुर्त स्वरुपात मांडा. समजा मित्राला तुम्ही एखादी गोष्ट करण्यास नकार दिला पण असे लक्षात आले की यामुळे तुमच्या मैत्रीवर फारसा परीणाम होणार नाही.
एखाद दोन दिवसात परत सगळे सुरळीत होईल. तर तुम्ही जर नकार देण्याचे तुमच्या मनात असेल तर नकार देणे अतिशय उत्तम, उलट अशामुळे तुमची मैत्री अजुन समृद्ध होईल कि ज्यामधे तुम्ही स्पष्टपणे तुमचे विचार मांडले आहेत.
तुमचे वरिष्ठ कदाचित जास्ती वेळ थांबण्यास नकार दिला म्हणुन नाराज होतील, पण कधी कधी तुम्हाला अडचणीचे असेल तर तुम्ही नकार देणे यात गैर काहीच नाही. जर एखादी गोष्ट जी आवडत नाही ती करण्यास होकार दिला तर कदाचित तुमची तुमच्यावरच चिडचिड होईल. त्याच्यामुळे तुम्ही हातातील काम नीटपणे करु शकणार नाही. इतरांशी उगाचच ताणपुर्वक संभाषण वाढु लागेल. अंतिमतः ते तुम्हालाच त्रासदायक ठरेल.
एकदा तुम्ही मनातील अमुर्त भितीवर काय आहे हे निश्चित केले आणि मी नकार दिला तरी माझ्या संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही ही खात्री एकदा झाली की पुढली पायरी म्हणजे हा नकार प्रत्यक्ष त्या व्यक्तिला सांगणे. हा नकार
देतांना तुमचा आवाज कुठेही तुच्छता दर्शविणारा नसावा की शब्दयोजने मधे अहंभाव नसावा. त्याचबरोबर तुम्ही वापरत असलेले शब्द, आवाज आणि प्रत्यक्ष चेह-यावरचे हावभाव एकमेकांना पुरक असु द्या. स्पष्टपणे समोरच्याच्या
नजरेत नजर असु द्या. तो तुमच्याकडे रोखुन पाहील तर अपराधीपणा चेह-यावर दाटु देवु नका. किंवा आवाजात अगदी दुर्बलता येवु देवु नका.
लहानपणापासुनच्या संस्कारांमुळे व मनाच्या घडणीमुळे सुरवातीला काही काळ तुम्हाला नकार देणे हा फार त्रासदायक ठरेल. याकरता सुरवातीला अगदी छोट्याशाच गोष्टींपासुन सुरवात करा जिथे तुम्ही नकार देणे हे तितकेसे
गांभीर्याने पाहीले जाणार नाही. हळुहळु तुमचा आत्मविश्वास वाढीला लागेल. हळुहळु तुम्ही अधिक अवघड स्थितितही न बावरता नकार देण्यास सुरवात कराल. सहसा काही ठराविक लोकांना नकार देणे हे इतरांपेक्षा सोपे असते. पण त्याच
बरोबर नेहेमी नकारघंटा वाजवणे हे पण चांगले नसते. याचा तुम्हाला हळुहळु सराव होईल. नकार देणे किंवा नकार न देणे यातील जी स्थिती तुम्हाला जास्त लाभदायक असेल ते करणे नेहमीच हितावह असते. कधीकधी लगेच उत्तर न देता वेळ मागुन घेणे हे फायदेशीर असते. त्यात तुम्ही शांतपणे विचार करुन निर्णय घेवु शकता.
जर तुम्ही नकार दिला पण समोरचा मात्र तुमच्या नकाराला न जुमानता तुमच्यावर तुमचा नकार होकारात बदलण्यासाठी दबाव आणत असेल, तर ही वेळ तुमच्या कसोटीची असेल. तुम्हाला तुमच्या नकारावर ठाम रहावेच लागेल. आणि जर तुम्ही असे ठाम रहाल तरच तुम्ही नकाराचा योग्य वापर करु शकाल.
लहानपणापासुन आपल्यावर दुस-यासाठी झिजावे, कष्ट करावे हे जरी बिंबवले गेलेले असले तरी आपल्या स्वतःसाठी नकाराधिकार वापरणे काहीच गैर नाही. नकार देवु शकणे हा तुमचा ह्क्क आहे. आणि तो वापरण्यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. जेवढे तुम्ही स्वतःच्या भावनांना समजुन घेवुन त्याप्रमाणे वागाल तितके तु्म्ही इतरांच्या पण भावना जाणुन घ्याल. त्याचबरोबर त्यांनी केलेला तुमच्यावरचा नकारप्रयोग तुम्ही समजुन घेवु शकाल व त्यांच्या
भावनांना न्याय देवु शकाल.
काय म्हणता?

.jpg)
{मला कधिच नकार द्यायची संधी}
मला कधिच नकार द्यायची संधी मिळाली नाही..इन्फॅक्ट मिच नकार पचवत आलेय
{इन्फॅक्ट मिच नकार पचवत आलेय}
इन्फॅक्ट मिच नकार पचवत आलेय >>
ती पण एक कला आहे ....
नाना सविस्तर प्रतिसाद लिहीन ..
चला निघतो कडेकडेने ..हॅप्पी विकांत !!
{चुचु जेवढे तुम्ही}
चुचु
जेवढे तुम्ही स्वतःच्या भावनांना समजुन घेवुन त्याप्रमाणे वागाल तितके तु्म्ही इतरांच्या पण भावना जाणुन घ्याल.>>>>>
अगदी बरोबर..
(बादवे) कोणत्या महाराजां चे प्रवचन वगैरे ऐकले होते का..
आय मीन टु से .. हा लेख लिहिण्याची प्रेरणा कुठुन मिळाली
{किशोर अगदी मनापासुन हसलास ना}
किशोर अगदी मनापासुन हसलास ना
{नाना मस्त धागा काढलाय...}
नाना, आज सकाळीच माझ्या मनात या विषयावर काथ्याकूट टाकावा असा विचार आला होता. [ नुसते विचार येतात आणि ते हवेत विरुन जातात] पण नकार देणे ही कलाच आहे. बरे या नकाराने संबंधित व्यक्ती दुखावता कामा नये याचीही नकार देतांना काळजी घेतली पाहिजे. आणि त्याची काळजी करत आपण आपला सुखाचा जीव दु:खात का टाकायचा. ओठापर्यंत नकार येऊनही 'हो' म्हणावं लागते. आणि नंतर तेव्हाच 'नाही' म्हणालो असतो तर ही वेळ आलीच नसती अशी हळहळ अनेकदा व्यक्त केल्या जाते.मनातून आपल्याला एखाद्या गोष्टीला 'नाही'म्हणायचं आहे तेव्हा बिंधास्त नकार देऊन टाकावा. प्रेमाच्या आग्रहाला बळू पडू नये. बळेच 'होकार' देऊन आपण आपल्या जीवनात दु:ख वाढवून ठेवतो असे माझे मत आहे.
मी लिहितो खरंय पण मलाही नकार देणं जमत नाही.
-दिलीप बिरुटे
{काहीवेळा समोरचा माणूस पाहून}
काहीवेळा समोरचा माणूस पाहून नकार देण जमत नाही
पण शक्यतो मी स्वतःला बॅलस्न्ड ठेवायचा आटोकाट प्रयत्न करते, योग्य तिथे नकार देते
{उत्तम विषय !}
ज्या नकाराने दुसर्याचे काही वाईट होत नाही पण आपले मात्र भले होते असा नकार द्यायला प्रयत्नपूर्वक शिकले आहे.
ज्यांना माझा नकार कळतो ते समजून घेतात. ज्यांना कळतच नाही ते माझे 'आपले' कसे असतील ? म्हणून मी त्यांची काळजी करत नाही.
अवांतर : ( आमच्या पोटावर पाय देऊन राहिलाय हा बाबा ! मीम सदस्यांसाठी विजूभौंच्या मदतीने 'नकार- एक गरज ' कार्यशाळा घ्यावी असा विचार करत होते ! तेवढेच चार पैशे सुटले असते मीठमिरचीसाठी
)
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{च्यामारी}
ह्या च्या नावातच ना ना आहे.(आधीची आय्.डी)
{मुखवटे}
चांगला विषय
नकार देणे हि अवघड कला आहे.
बर्याच वेळा आपण समाजात / ओफिसात मुखवटे घेउन वावरतो. आपण आहेत त्याच्यापेक्ष्या चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो.
हेच मुखवटे नाहि म्हणणे अवघड करतात. 'नकार न देण्यामागे' आत्मविश्वासाचा आभाव व भिड्स्त स्वभाव हि पण कारणे असु शकतात
गोचि तेव्हा होते, जेव्हा हे मुखवटे मित्रांनध्ये / घरि वापरले जातात. मित्रांनध्ये / घरि त्यांचि काहि गरज नसते. मग पण त्यामुळे नकार देणे जास्तच अवघड होते. आणि स्वतःला त्रास होतो.
"समंजसपणे" , योग्य शब्दात, योग्य वेळि नकार देता आला तर कटुता टळेल व आयुश्य सोपे होइल
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
{सहमत}
परागशी एकदम सहमत.
अवांतर : नाना बाकी लेख पक्का दॅ.संध्यानंद मध्येही द्यायला हरकत नाही.
{मी तर सरळ जमत नसेल तर नाही}
मी तर सरळ जमत नसेल तर नाही म्हणून सांगते.
{मला}
मला जमत नाही एकदम सरळ नकार देणं!
पण आता ही कलादेखील शिकायला हवी
{लेख आवडला....पण मला अजूनही}
लेख आवडला....पण मला अजूनही असं एकदम नकार वगैरे देता येत नाही...शिकलं पाहिजे.
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket
{पण मला अजूनही असं एकदम नकार}
पण मला अजूनही असं एकदम नकार वगैरे देता येत नाही.
.. हे माझ्याबाबतीतही होत असंत मग माझं मन अवघडून जातं. समोरच्याला काय वाटेल असे विचार मनात येतात. मी मग खोटं बोलायला लागतो. ते तर फार वाईट.
{लेख आवडला. नकार घेणे हे देखील}
लेख आवडला.
नकार घेणे हे देखील एक कला आहे.
{नाही देणार प्रतिक्रीया..}
नाही देणार प्रतिक्रीया..
(च्यायला.. जमतय की.. धन्यवाद नाना)
{हम्म}
नाटकात जसे न-नाट्य असते तसे या कलेला न-कला म्हणावे का?
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{की 'नाना'कळा}
की 'नाना'कळा
{आवडला}
लेख आवडला. हवं तिथंच होकार देणं ही पण या कलेलाच पूरक अशी कला असावी असा आमचा तर्क आहे....
आपला स्नेहांकित...
-अशोक
{आणखी एक...}
आणखी एक... मनात नसतांना उगाच होकार दिला तर ते काम किंवा ती गोष्ट आपण मनापासून एन्जॉयच करू शकत नाही.. (उदा: मनाविरुद्ध सिनेमाला जावे लागले तर..इ.)
आणि आपल्याला बळजबरीने सोबत नेणारा माणूस आपल्याला कितीही चांगल्या मनाने वैगेरे नेत असला तरी त्या मनाविरुद्ध जाण्याने आपल्या मनात समोरच्याविषयी प्रचंड निगेटिव्ह भावना दाटून येतात.. (आणि अंतर्मनात ती आठवण टिकून देखील राहते)..