म्हसवे - आशियातील सर्वात मोठा वटवृक्ष

0
0

शनीवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो, पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो, पुणे तर घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खूप वेळ हातात आहे असे वाटत होते फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला व एक कॉल केला व त्यांना विचारले येथे आहे का आसपास काही जागा बघण्यासारखी तर त्यांनी मला म्हसवे हे गाव सांगितले व म्हणाले जाऊन बघ बघण्यासारखं आहे तेथे. पाचवड मधून उजव्या हाताला वळलो चांगले दहा एक किलोमीटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या शेवटी एकाला थांबला व विचारले ते मोठे वडाचे झाड कुठे आहे तर तो म्हणाला उलट आला आहात सरळ परत पाचवडला जा व तेथून डाव्याबाजूने सरळ जाऊन पहिला उजवा कट तेथून दोन-तीन किलोमीटर नंतर म्हसवेचा कट. नेहमी प्रमाणेच कपाळ व हाताची गाठभेट घातली वर बाइक सरळ परत वळवली.
विराटगडाच्या पायथ्याशी हे हे म्हसवे गाव आहे जे जावळी तालुक्यामध्ये येते सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे ज्यावर वटवृक्षाची माहिती लिहिलेली आहे व सरकारी कृपेमुळे तो बोर्ड एकदम सुव्यवस्थित (? ) आहे फक्त अक्षरे उडाली आहेत, रंग उडालेला आहे त्यामुळे काय लिहिले आहे ह्यांची माहिती घेण्यासाठी कुटलिपी वाचक असा कोणी मिपाकर आहे का हे शोधावे लागेल असे लक्ष्यात आल्यावर सर्वात आधी त्या बोर्डाचाच फोटो काढून घेतला. एका गावकऱ्याकडून कळलेली माहिती अशी,

म्हसवे गावात असलेला हा वटवृक्ष पुरातनकाळापासून आहे ह्याने जवळजवळ ६ एकर जागा व्यापली आहे एकाच वटवृक्षाच्या पारंब्यांतून हे भले मोठे वटवृक्षांचे जंगल उभे राहिले आहे, जो मूळ वृक्ष होता तो काही वर्षापूर्वी पडला पण त्यांच्या पारंब्यांतून जो वृक्ष तयार झाला होता त्याने आपला डोलारा सांभाळून ठेवला आहे, सन १८८०-८५ च्या आसपास एका ली वॉर्नर या ब्रिटिश अधिका-याने ह्याचा सर्वात आधी उल्लेख केला आहे. आता सरकार ने हे संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले असल्या कारणाने त्या जागेत प्रवेश निषेध आहे व कोणी येत जात नसल्यामुळे प्रचंड झाडी वाढली आहे त्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही व जो गावकरी होता तो देखील इच्छुक दिसत नव्हता त्याचे कारण त्याने आर्थिक दंड आहे असे सांगितले. बाहेरून चक्कर मारल्यावर लक्ष्यात आले की खरोखर सरकारने किती प्रामाणिकपणे हा वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे, वट वृक्षाला देखील बाहेरून पाणी लागते हा माझ्यासाठी नवीनच बातमी होती अहो जो वृक्ष येथे शेकडो वर्षापासून दिमाखात उभा आहे त्याच्यासाठी पाणी? म्हणजे सूर्याला आपली टॉर्च देऊन म्हणावे अंधारात जपून रे. हा असा सरकारी खेळ. असो, तो आपला विषय नाही. जास्त माहिती घेतल्यावर असे कळले की हा आशिया खंडातील दुस-यानंबरचा सर्वात मोठा वटवृक्ष आहे, ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगाल मध्ये आहे ( कलकत्ता मध्ये - गूगल सेवा). तसेच ह्यापेक्षा लहान (तीन एकर मध्ये पसरलेला) वृक्ष हा म्हसवे गावातच आहे विराटगडाच्या पायथ्याजवळ. त्या सरकारी बोर्ड प्रमाणे हा भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे पण कलकत्तामधील ह्यापेक्षा थोडा मोठा आहे हा वैचारिक गोंधळ तिकडेपण ( त्या खात्यामध्ये) आहे हे पाहून थोडे हसू आले. खाली फोटो देत आहे.

आगामी आकर्षण : - अजिंक्यतारा व सज्जनगड वृतांत.

म्हसवे-पाचवड

1

हा भाग मुळात जावळी तालुक्यात होता. तोच शिवकालीन `येता जावली जाता गोवली' वाला हा भाग. या भागात अगदी २० व्या शतकापर्यंत घनघोर जंगल होते.

माझी स्मरणशक्ती बरोबर असेल तर (आत्ता या क्षणी ली वॉर्नरचे पुस्तक जवळ नाही आहे) या जंगलाचे सर्वेक्षण करताना ली वॉर्नर याला म्हसवे परिसरात वडाची पाच अतिप्रचंड झाडे दिसली. त्यापैकी सध्या दोन की तीनच शिल्लक आहेत.

ली वॉर्नरने त्या झाडांची मोजमापे घेतली तेव्हा लक्षात आले की तेव्हा (साधारणता १९ व्या शतकाच्या अखेरीस) त्यापैकी एक झाड अशिया खंडातल्या मोजमापे करुन डॉक्युमेंटेशन केलेले सर्वात मोठे झाड आहे. त्यानंतर प.बंगालमधील तुलनेने नवीन झाडाचा शोध लागला.

ली वॉर्नरच्या शोधानंतरही अनेक वर्षे या झाडाचे जतन करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न झाले नाहीत. सातार्‍यातील काही संस्थांनी आग्रह धरल्यावरुन सरकारने तेथे बोर्ड लावला व प्रवेश बंद केला. सातार्‍यातील काही संस्थानी हे इकॉलॉजिकल मॉन्युमेंट त्यांच्या ताब्यात द्यावे, ते त्या ठिकाणाची काळजी घेतील असा प्रस्तावही मांडला आहे असे नुकतेच समजले.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

श्री रा रा

2

श्री रा रा राजेजीसाहेब

आपण हल्ली फार भटकता आणि भटकुन भटकुन चित्रं गोळा करुन आमच्या माथी मारता हे पाहुन आमच्या एका मिळेल तिथुन पुस्तकं गोळा करुन त्यांचे भुक्कड परिक्षण वाचकांच्या माथी मारणा-या एका मित्राची आठवण आली.

तुम्ही अनेक जागी फिरता, अनेक गावाचे पाणी पिता, केल्याने देशाटन मनुष्यास शहाणपण येते असे म्हणतात. पण आपल्या बाबतीत आपला बालिशपणा वाढत चालला आहे असे दिसते. दिवसागणिक आपल्या लेखनाचा, चित्रांचा दर्जा खालावत चालला आहे. शुद्धलेखनाविषयी तर बोलायलाच नको, पंण रहावत नाही म्हणुन सांगतो, अजुनही वेळ गेलेली नाही, सुधरा.

त्याचप्रमाणे काहितरी पाहुन त्यावरुन स्वतःलाच रुचेल असे अंदाज बांधायची आपली पद्धत अत्यंत घृणास्पद आहे. जसे की

पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे, वट वृक्षाला देखील बाहेरून पाणी लागते हा माझ्यासाठी नवीनच बातमी होती

ही विहीर कदाचित पुर्वी तिथे कुणी रहात असेल त्यांनी खोदली असेल, आता तो प्रदेश संरक्षित झाल्याने तिथे वावर नसेल, पण म्हणुन ती विहीर वडाला पाणी देण्यासाठी खोदली आहे असा अंदाज बांधणे म्हणजे पो वरुन पोलीस असा धेडगुजरी संबंध जोडण्यासारखे विक्षिप्त आणि मठ्ठपणाचे होय.

अशा अनेक चुका आहेत पण तुम्ही आमचे मित्र म्हणुन जास्त लाज आणवत नाही. असो.

बाकी लेख नेहमी प्रमाणे छान !
भटकत जा ! लिहित जा ! आम्ही प्रतिसाद देत जावु !!

धन्यवाद.

--अवलिया

वा वा छान

3

वा वा छान

सहीच!!!

4

झाडं बिडं एकदम भारी हो! हास्य
बाकी, तुमची काय मजाय बॉ...आला शनिवार रविवार की चालले भटकायला हास्य
एंजॉय माडी स्सार हास्य

माननीय

5

माननीय श्री. राजे यांच्या उपरोक्त लेखात अशी कोणतीही प्रमाणे दिसत नाहीत तर ते त्यांनी केलेले आरोप आहेत. शिवाय त्यांनी ते आरोप केले असल्याचेही नाकारले होते असेही ऐकिवात आहे. त्यामुळे त्या आरोपांना कितपत महत्व देणे गरजेचे आहे हे देखिल ठरवणे आवश्यक आहे. त्याशिवाय मोडक म्हणतात तसे एसओपी नक्की काय आहे हे समजुन घेणे अश्या चर्चा करण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्याखेरीज उगीचच मुद्दे रेटत बसण्यात मलातरी हेकेखोर पणाशिवाय काहीच अर्थ वाटत नाही.

बाकी लेख वाचला. चांगले वाटले. लेखात जे लिहिले आहे ते कितपत विश्वासार्ह वाटते, त्यात आजपर्यंत समोर न आलेले/ दडवलेले कोणते मुद्दे आहेत याचाही अंतर्भाव केला असता तर अजुन बरे वाटले असते. त्यायोगे ह्या स्थळास भेट किंवा कसे असा निर्णय घेणेही सोपे गेले असते.

कण्हेरी

अभिनंदन

6

एक चांगली माहिति उजेडात आणल्याबद्दल........

छान

7

छान हास्य

मस्त. सातारा जिल्हा

8

मस्त.

सातारा जिल्हा जिंदाबाद...

(खरंतर कोल्हापूर जिल्ह्यातही भुदरगड तालुक्यात म्हसवे नावाचे गाव आहे.)


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.