असच एक एकत्र पण विभक्त कुटुंब.
असाच एक समारंभ.
सगळे खुप दिवसांनी भेटलेले.
जेवणावळी झाल्याणंतरच्या गप्पा.
थोड्याश्या उखाळ्या पाखाळ्या.
एकमेकांची सुख.
तो असताना सहसा दु:खाची चर्चा नाही असा नियम होता.
"माझा जावई इतका चांगला आहे ना. कसा प्रसन्न मुद्रेत असतो बघ. आल्यावर नेहेमी पाया पडतो. अगदी नातवंडाना पण खुपच चांगले संस्कार दिले आहेत. संध्याकाळी हात पाय धूउन शुभं करोति कंपल्सरी." -एक बहीण
(साला एकदम कॅल्क्युलेटीव आहे. दोन बहीणीत इस्टेट वाटली जाणार माहीत आहे ना. गुड बुक्स मधे असले की धोका नाही-तो)
"माझी सुन पण किती छान स्वयंपाक करते. ये रे कधी घरी. तु कुठे येतच नाही बघ."-एक भाउ
( हॅट तिच्यायला त्या सुनेच्या. वहीनी जिवंत होती तो पर्यंत तरसली एका घासाला. साला पोळ्या करायला पण बाई. आता बहुतेक एक कोटीचा फ्लॅट दिसतो आहे.-तो)
"आई वडिलांचे संस्कार महत्वाचे. फॉरेन बँकेचा वाईस प्रेसिंडेंट आहे पण सर्व समारंभाला अगदी न चुकता हजेरी लावतो कुटूंबाच्या. जरा सुद्धा गर्व नाही बघ"
(ह्याच्या छोट्या पोरीला असल्या संमारंभाचे आकर्षण नसते तर्................तो)
" माझा ४ वर्षे अमेरिकेला होता. पण तिथे सुद्धा मुलांवर सर्व भारतिय संस्कार."
( च्या मारी हे भारतिय संस्कार म्हणजे काय भानगड असते. अमेरिकेत आई बाप संस्कार करत नाहीत?)
"तुझा कुठे दिसत नाही रे. काय चाललय त्याचे. फारसा कुणात मिसळत नाही. हे बरोबर नाही हां. आपल्या घराण्याचे संस्कार तु केले नाहीस असे वाटते.. तुझ्या बायकोने कायम वेगळाच ठेवला. हे बरोबर नाही." दोन जावई वाला भाउ
तस काही नाही रे. आज त्याचे काही तरी काम निघाले म्हणुन नाही आला. इतक्या वर्षात पहील्यांदाच्.-तो
"असुन नसल्यासारखाच. अगदी तुझ्याप्रमाणे"- दो.जा. भा.
"तु सर्व काही करतोस. पण कुठे तरी अस वाटते की ह्यात तु नाहीस. हे चुक आहे. आई वडीलांचे संस्कार सर्वांवर झाले. पण तु नेहेमी वेगळाच वाटलास" दो.जा. भा.
"आता त्याला कितीतरी वेगळी कारणे असतील" तो
"असतील ती असतील. आता असलीच कारणे उद्या तुझ्या मुलाने देता कामा नयेत"
" अरे माझा फक्त श्राद्ध वगैरे कर्मकांडाला विरोध आहे. पण तुम्हाला वाईट वाटु नये म्हणुन भाग घेतोच की. उद्या मी गेल्यावर माझे श्राद्ध करु नकोस असे सांगितलय त्याला" -तो
" काय म्हणतोयस तु हे" एक बहीण कण्हली.
"छे. हे काही बरोबर नाही हां. शेवटी परंपरा नावाचे काही तरी असतेच की"
"तेच तर मला नकोय. कुठलेही ओझे त्याने बाळगावे असे मला वाटत नाही. ऐक नीट. मी माझ्या मुलाने हा शब्द वापरला नाहीये. फक्त त्याने म्हटले आहे. मघापासुन ऐकतोय मी. माझा जावई, माझा मुलगा वगैरे वगैरे. हे 'माझा' शब्द मला कळतच नाही. संस्कार तर त्याहुन ही नाही. चल तुझा जावई खुप चांगला. काय करेल? चंदनाची लाकडे आणेल? शुद्ध घरगुती तुप वापरेल. हा मात्र घासलेट वापरेल. किंवा वाट बघायला नको म्हणुन विद्युत दाहीनीचा उपयोग करेल. पण शेवटी फरक काय पडणार आहे का?"
सर्व एकदम स्तब्ध.
"वाईट वाटुन घेउ नका. त्याचे जिवन,त्याचे जग, त्याच्या चुक आणि बरोबर च्या चौकटीत मी काही करु शकतो ह्याचा विचार मी कधीच सोडुन दिला आहे."
"आक्रितच म्हणायचे"
एक्झॅक्टली -तो
:-)
हा हा हा 'तो' देखील विरझण लावायला काही कमी नाही.
पैसा माणसाकडून बरेच काही खेळ करुन घेतो हे तर जगाला माहीत आहे. पण जोवर चांगले चालले आहे तोवर एन्जॉय करावे जास्त खल न करता.
बाकी जर पैशाच्या अमिषाने वागणे चांगले असेल तर मृत्युपत्रातुन मस्त फाट्यावर मारायचे कसे ते माहीत असेलच की त्या भावडांना नसल्यास ते संस्कारवर्गही घ्या एकदा मास्तर ;-)
संस्कार म्हणजे बहुधा स्वतःला
संस्कार म्हणजे बहुधा स्वतःला जे वाटते ते करण्याची मुभा न घेणे , सदैव कुणाच्या तरी दबावाखाली मारून मुटकून जगणे.
कोण काय म्हणेल असा विचार करत बंद बाथरूम्मध्ये देखील नागव्याने वावरायची लाज बाळगणे इत्यादी इत्यादी..
भारतीय संस्कार म्हणजे शुद्ध बोलायचे झाल्यास टॉप मॅनेजमेन्ट ला दबून वागायचे ट्रेनिंग. काहिही गरज नसताना मुंज/लाजाहोम , कुळाचार ,सोवळे-ओवळे वगैरे कालबाह्य रुढी चे ओझे उरावर वागवत बसणे.वगैरे वगैरे
दुसर्याच्या विचाराना समजून घेणे , बुद्धी ला आदर देणे , ज्ञानाचा आणि कष्टाचा योग्य मान राखणे , इतराना ते ही एक व्यक्तीमत्व आहेत हे समजून वागवणे,इतरांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण न करणे हा खरा सभ्यतेचा आणि संस्काराचा अर्थ असू शकतो.
मेल्यावर घालेट ने जाळले काय ओली लाकडे लावली काय ,चम्दनी ढलपी लावली , डिझेलभट्तीत जालले काय , इलेक्ट्रीक फर्नेस मध्ये जाळले काय ; मेलेल्याला काहीच फरक पडणार नाही. चंदनी लाकूड वगैरे उपस्थिताना बरा वास यावा या साठीच असू शकेल.
या उलट देहदान केले तर तितकी लाकडे , झाडे वीज वाचेल, देहदान केले तर काही विद्यार्थाना शिक्षण मिळेल.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
ज्याला
ज्यांना हे करायचे आहे त्यांना करु द्या की.त्याला विरोध करणे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याला विरोध नव्हे का? युरोपात तर अनेक ख्रिश्चन लोक दर रविवारी चर्च मधे जातात्.त्याची गरज असते का? एका विशिष्ट धर्मातल्या स्त्रिया,ल्हान मुली पण बुरखे घालतात. गरज आहे का त्याची?
स्वातंत्र्यप्रेमी प्रिया
प्रश्न
ज्यांना हे करायचे आहे त्यांना करु द्या की.त्याला विरोध करणे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याला विरोध नव्हे का?
पण 'त्या'ने कुठे त्यांच्या करण्याबाबत विरोध केलाय. उलट त्याला ते पटत नाही तरी त्यात सहभागी होण्याची (भावनिक का होईना) सक्ती आहे हा 'अधार्मिक' स्वातंत्र्याला विरोध नाही का. जर एखाद्याला धार्मिक असण्याचे स्वातंत्र्य हवे असेल तर त्याने समोरच्याचे धार्मिक नसण्याचे स्वातंत्र्य मान्य करायला नको का? का स्वातंत्र्य ही फक्त बहुमताची मक्तेदारी आहे?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सहमत आहे.
सहमत आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
काका आलेले आहेत
काका आलेले आहेत
देवा
पालथ्या घड्यावर पाणी हो.
च्या मारी हे भारतिय संस्कार म्हणजे काय भानगड असते. अमेरिकेत आई बाप संस्कार करत नाहीत?
लाखमोलाचा प्रश्न. पण गुर्जी 'संस्कार म्हणजे आम्ही जे करतो ते' अशी व्याख्या असेल तर तुमचा प्रश्नच गैरलागू होत नाही का.
______________________________________________________________________________________________
लिहून-बोलून या देशाला जागवता येत नाही -श्रीधर कुलकर्णी (उध्वस्त धर्मशाळा)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
छान आहे.. चल तुझा जावई खुप
छान आहे..
चल तुझा जावई खुप चांगला. काय करेल? चंदनाची लाकडे आणेल? शुद्ध घरगुती तुप वापरेल. हा मात्र घासलेट वापरेल. किंवा वाट बघायला नको म्हणुन विद्युत दाहीनीचा उपयोग करेल. पण शेवटी फरक काय पडणार आहे का?"
>>>>>>> एकदम मस्त ..