" देखो, विमान मे से मुंबई कितनी खूबसुरत दिखती है." खिडकी मधून खाली पहात इमिरेट्स
एअरलाईन्स च्या बहरिन-मुंबई विमानात इकॉनॉमी क्लास मधे शेजारी बसलेल्या गंगाधर ला मी म्हटले.
" नही , मैने आपको पहलेही बताया ना मुझे डर लगता "
खरेच, अंधारात नोव्हेंबरच्या पहाटेच्याथंडीत मुंबई आकाशातून फार सुंदर दिसत होती. विमानातून रात्री मी बहरिन, दुबई, ही प्रकाशाच्या ठिपक्यांनी रांगोळी घालावी तशी दिसणारी शहरे पाहिली होती. आपली मुंबापुरी मात्र जणू काही हि-यामाणकांचा खच पडल्यासारखी दिसते. पण गंगाधर ला ती बघायची भीती वाटत होती.
बहरिन ला विमानात आपल्या जागेवर बसल्या नंतर आता दोन तास तरी ताणून द्यावी अशा विचारात मी असतानाच वीसबावीस वर्षाचा मध्यम उंचीचा कालासावळासा दिसणारा एक मुलगा आपली सीट शोधत माझ्या जवळ आला. मी पाय बाजूला केले व म्हटले,
"बैठो भाई आपकी ये विण्डो सीट है."
"नही वहा आप बैठो "
" अरे क्यू भाई, अच्छी विण्डो सीट मिली है तो बैठो ना ." मी.
" नही, मुझे डर लगता है ."
"क्या बात करते हो? " मी.
" सचमुच!. आप हसोगे, पर मुझे सचमुच डर लगता है . वो जमीन दूर जाते दिखती है , उतरते वक्त जोर से पास आती है तब मुझे बडा डर लगता है. आप बैठो वहा . "
"ठीक है" असे म्हणून मी खिडकीजवळ बसलो.
मुलगा चांगलाच गप्पिष्ट होता. त्याचे नाव गंगाधर. आंध्र प्रदेश मधे हैदराबाद जवळ कोणत्या तरी खेडे गावाचा राहणारा. जेमतेम मॅट्रिक पास, नंतर उडाणटप्पूपणा मुळे शिक्षणात गती नाही. अशी माहिती त्यानेच मला गप्पा मारता मारता मला सांगितली.
"कहासे आ रहे हो ?" मी विचारले.
" इजिप्त से , वॉ शर्म-अल शेख सुना होगा ना मनमोहनसिंग अभी अभी गया था वहा , वो. वहासे आ रहा हु."
वहा इतने दूर? कौनसे कंपनी मे हो? क्या काम करते हो ? " मी एका दमात अनेक प्रश्न विचारले.
" ओमान के सुलतान के लिये काम करता हु...." मी उडालोच.
"क्या काम करते हो ? " मी पुन्हा विचारले.
"आप जैसा बडा आदमी नही हु भाई. झूट क्यो बोले?"
कुठल्या तरी पेट्रोकेमिकल कारखान्यात इंजिनीयर वगैरे असणे ही त्याच्या लेखी बडा आदमी ची व्याख्या होती.
"ओमान के सुलतान के पॅलेस मे हाउस कीपिंग का काम करता हु."
थोडक्यात गंगाधर सफाई कामगार होता.साफसफाई व्यतिरिक्त किरकोळ प्लंबिंग कामेही तो करू शकतो त्या मुळे च त्याला हे काम मिळाले होते. पण हाउस कीपिंग का काम हे शब्द आपण भंगीकाम करतो हे कसे सांगावे या संकोचातून आले नव्हते तर हिंदी फार चांगले येत नसल्याने आले होते हे मला लवकरच कळुन आले.
( असे काही बोलायचे असले कि लोक हमखास ईंग्लिश भाषेचा आधार घेतात आणि तोही हायफाय शब्दात. म्हणजे आपण भंगार वाले असलो तर माझा सॉलिड वेस्ट मॅनेज्मेन्ट चा बिझिनेस आहे म्हणण्यासारखे, भ्रष्टाचार हा त्यांच्यासाठी एथिकल फ्लेक्झिबिलिटी असतो. गटार म्हणायच्या ऐवजी इफ्लुएंट ट्रेंच असे लिहीत जा असे सांगणारा एक साहेब आठवला बघा.)
तर, ओमान च्या सुलतानाचे अनेक देशांमधे राजवाडे आहेत तो जिथे जाणार तिथे आधी साफसफाई करता आधी गंगाधर आणि त्याची टीम अन त्याचा साहेब जाणार, सुलतान असेल तोवर तिथेच राहणार, नंतर सुलतानाचा मुक्काम जिथे हालणार असेल तिथे गंगाधर परत आधी रवाना. अशी त्याची गाड्या बरोबर नव्हे तर गाड्या आधी नळ्याची यात्रा सुरू असते.
मग आपला साहेब कसा चांगला आहे, साफसफाई च्या / प्लंबिंग च्या वगैरे कामात स्वत: कसा त्याला मदत करतो वगैरे गन्गाधर ने सांगितले.
" ये नौकरी तुम्हे कैसे मिला?" मी विचारले .
" वो मुंबई मे शापूरजी पालनजी कंपनी है ना, वहा मेरा मामा है. उसके पहचान से मिला . पिताजी गताजी गया, मा बहुत डाटता था, मामा भी बहुत समझाता था पर मै कुच सुधरा नही. दसवी के बाद स्कूल गया ही नही. आज आप जैसा लोग से बाता करता, तो लगता मै भी पढता तो आप जैसा इंजिनीयर बनता, पैसा कमाता."
"लेकिन अब दीदी को और छोटे भाई को पढायेगा, दीदी बहूत हुशार है, पढेगी तो रिश्ता अच्छा मिलेगा.छोटा भी मेरे जैसा नही है."
"जो कूच भी १०-१५ हजार कमाता वो सब सेविंग करता मै, उस के लिये घर भी मै दो साल बाद जा रहा हु. ये टिकेट भी मै खानेका पैसा मिलता उसमेसे बचाया और निकाला है."
" अभी उमर ही क्या है तुम्हारी,चाहो तो तुम अब भी सीख सकते हो, वहा तुम्हारे साथ कोई तो होगा पढालिखा. उसके साथ रोज थोडा वक्त बैठा करो अंग्रेजी तो तुम्हे कामचलाउ आती है ही, उसे सुधारो थोडा बहूत कम्प्युटर सीखोगे तो थोडा
जादा कमाओगे."त्याच्या बद्दल काहीतरी वाटू लागले म्हणून मी म्हणालो.
" आप सही कहते हो, पर क्या मुझे जमेगा?"
" हा हा, क्यो नही ? " मी दिलासा दिला.
विमान धावपट्टीवर उतरले, घाई घाईने उतरणार्या लोकांबरोबर गंगाधर ही माझ्याआधी उतरला. मग थबकला मागे वळला, माझ्या कडे पाहून त्याने निरोपाचा हात केला. आणि गर्दीत दिसेनासा झाला.
आपल्या कामाची लाज न वाटणारा, कष्ट करायची तयारी असणारा, जेवणाचे पैसे वाचवून तिकीट काढणारा, बचत करण्या साठी घरची खूप आठवण येत असून ही दोन वर्षानी घरी जायला निघालेला, बहीण व भावाला खूप शिकवण्याची, बहिणीचे लग्न चांगल्या घरात होईल, मी सुद्धा शिकेन
अशी स्वप्ने डोळ्यात असणारा गंगाधर मलातरी कॅटल क्लास वाटला नाही... तुम्हाला वाटला?
मा. संपादक हा अनुभव मी आधी मायबोली वर( http://www.maayboli.com/node/11323?page=2 ) लिहीला होता. शीर्षक व शेवटचा शशी थरुर यांचा संदर्भ जुना झाल्यामुळे शेवट बदलला आहे. अन्यत्र आधी लिहिलेल इथे प्रसिध्द्ध करणे तुमच्या धोरणात बसत नसल्यास लेखन उडवले तरी चालेल.
>>मा. संपादक
>>मा. संपादक हा अनुभव मी आधी मायबोली वर( http://www.maayboli.com/node/11323?page=2 ) लिहीला होता. शीर्षक व शेवटचा शशी थरुर यांचा संदर्भ जुना झाल्यामुळे शेवट बदलला आहे. अन्यत्र आधी लिहिलेल इथे प्रसिध्द्ध करणे तुमच्या धोरणात बसत नसल्यास लेखन उडवले तरी चालेल.
नो रुल्स
* फक्त चोरी नको, जे तुमचे आहे ते लिहा आनंदच होईल.
धन्यवाद.
आणी हो,
लेखन आवडले.
वेलकम !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मायबोलीवर
मायबोलीवर आधीही लेख वाचला होता. लेख खरंच आवडला.
शशी थरूरना नक्की काय म्हणायचं होतं हे कळलं नाही असं मात्र आवर्जून वाटतं!
लेख
लेख आवडला....
-निखिल
लेख
असच म्हणतो.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
+१
छान चितारले आहे शब्दचित्र
सोबत एक प्रश्नही...कॅटलक्लासमधला नक्की कोण? पुढे भरभराट व्हावी म्हणुन राबणारा तो की त्याकडे त्याच्या कामानुसार त्याला मोजण्याचा प्रयत्न करणारे इतर!
आवडला रे
आवडला रे भौ ..
लेख आवडला रे भौ
लेख आवडला रे भौ
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
ह्यानंतर तुम्ही काही लिहले
ह्यानंतर तुम्ही काही लिहले नाही.. ह्याचे नवल वाटले.. तुमचे लेखन छान असते राव...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."