कराड - बौध्दकालीन लेणी

0
0

कोल्हापुरहून पुण्यासाठी निघालो होतो सकाळ सकाळी. कुठेतरी चहा मारु म्हणून बाईक जरा हळूच चालवत होतो तोच डाव्याहाताला एक बोर्ड दिसला, छोटासाच बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण. थोडासा विचार केला व बघू म्हणून गाडी आत वळवली. काही मिटर गेल्यावर रस्ता संपला. आता काहीच कळेना मार्गदर्शक बोर्ड तर इकडेच रस्ता दाखवत होता मग रस्ता गेला कुठे, एक दोन जणांना विचारले तर त्यांनी एक कच्चा रस्ता दाखवला, तो रस्ता आहे हेच मला पटत नव्हते हा विषय वेगळा. पण काही किलोमीटर आत गेल्यावर एक नितांत सुंदर अशी जागा दिसते एक पाण्याचे तळे, तळ्याच्या बाजूला एक शेडवजा बांधकाम असलेले आश्रम. बाईक तेथेच उभी केली व सरळ समोर दिसणारा डोंगरावर नजर टाकली तर येथे कुठे लेणी असावीत अशी अंधूकशी पण शक्यता दिसत नव्हती पण तरी आलोच आहोत तर चढू वरती व पाहू असा विचार केला व डोंगर चढायला सुरवात केली. अर्धा-एक तासामध्येच वर माथ्यावर आलो व नजर फिरवली तर समोरच्या डोंगरामध्ये लपलेल्या लेणी दिसू लागल्या. कप्पाळाला हात मारुन परत डोंगर उतरलो व समोरचा डोंगर चढावयास सुरवात केली. जसे जसे लेणी जवळ येत गेल्या तस तसे त्यांचे सौंदर्य खुलून दिसू लागले आता ते शब्दात व्यक्त करणे अवघडच आहे त्यांचे फोटो देत आहे तुम्हीच पहा. एकून २६ लेणी आहेत. काहीपुर्ण आहे तर काही अपुर्ण. थोडे फार अतिक्रमण येथे पण झाले आहे पण ते विठल-रुक्माई ने केले आहे म्हणून आपण माफ करु त्यांना. हे बौध्दांचे पुजास्थळ + विश्रामगृह असावे असा माझा कयास आहे. ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही नेट वर ही थोडी शोधाशोध केली तरी हातात काहीच गवसले नाही त्यामुळे फोटो सोडून जास्त काही माहीती देउ शकत नाही.

हा लेण्यांकडे जाणारा रस्त्ता.

ह्यांच डोंगरामध्ये लेणी आहेत.

ही लेणी संरक्षित आहेत एवढेच सांगणारा हा सरकारी फलक.

देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/)

शान की सवारी wink

परतीचा प्रवास चलो पुणे.

मस्त रे !!

1

मस्त रे !! अंमळ सुरेख फोटू हास्य

- टारझन

छान सफर घडवुन आणली

2

सुंदर फोटो. खांबावर कोरलेली नावे बघुन वाईट वाटले. ठाणे-पुणे-सातारा-कोल्हापुर भागात बौद्ध संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार फिरत्या व्यापारी व भिख्खुंनी केला होता त्यामुळे अशी लेणी बरीच आहेत असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

खरय...

3

लाज वाटते असे प्रकार पाहिले की.

बाकी, राजे, सफर उत्तम! आम्हाला कधी नेताय अशाच सुंदर सफरींवर? हास्य

हो ना काय

4

हो ना काय समाधान मिळते लोकांना स्वःताचे नाव कोरुन???


-निखिल

ह्या

5

ह्या लेण्या बुद्धकालीन आहेत ह्याचा काय पुरावा???


-निखिल

बरयाच दिवसांची इच्छा आज पूर्ण

6

बरयाच दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली . ह्या लेण्यांचा बोर्ड महामार्गावर नेहमी दिसायचा . पण नक्की लेणी कसली आहेत ही उत्सुकता होती. इथे बुध्द मूर्ती आहेत का कुठे ? किंवा इतर काही लेख वा चिन्हे ???

>>पण नक्की लेणी कसली आहेत ही

7

>>पण नक्की लेणी कसली आहेत ही उत्सुकता होती. इथे बुध्द मूर्ती आहेत का कुठे ? किंवा इतर काही लेख वा चिन्हे ???

२६ एक लेणी आहेत, बुद्ध मुर्ती नाही आहे, पण एका गुंफेत स्तुप आहे त्याचा फोटो आहेच वर, व काही गुहांच्या बाहेर बौद्ध चिन्हे कोरलेली आहेत.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुंदर फोटो. खांबावर कोरलेली नावे बघुन वाईट वाटले

8

सुंदर फोटो. खांबावर कोरलेली नावे बघुन वाईट वाटले.

यावर एका हास्यकलाकाराने केलेली कोटी आठवली. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मध्ये.

तो म्हणतो की -

गाव के लडके इतने भोले होते है की जेंट्स बाथरूम मे जाकर लिखकर आयेंगे - "संगीता आय लव यु."
उनको इस बात का पक्का यकीन है की संगीता और कही जाये या ना जाये ... जेंट्स बाथरूम मे अवश्य जायेगी.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

वाह !!!!!!! मस्त आहेत फोटो.

9

वाह !!!!!!! मस्त आहेत फोटो.

फोटो छान आहेत. आमच्या

10

फोटो छान आहेत. आमच्या नाशिकच्या पाडंवलेणी व चामरलेणी यांची आठवण दिली..... शान की सवारी छान,..... पण तिथे अनिल काळे येऊन नोंद करून गेले हे मात्र फार घाणेरडे झाले.

छान फोटो ! नादच खुळा या वेळी

11

छान फोटो ! नादच खुळा

या वेळी कराडला गेलो की नक्की ,

@राजेसाहेब ! मला नेमके कसे जायचे ते सांगाल काय ???


सही कशाला घ्याची !!

काही खास अवघड नाही.. सोपं

12

काही खास अवघड नाही.. सोपं आहे.

कोल्हापुर साईडने कराड जस्ट चालू झाले की डाव्या बाजूला बोर्ड दिसतो..

मग सरळ त्या बोर्डच्या दिशेने जायचे.. एक गाव लागते ते ओलांडायचे मग एक ओढा लागतो... चालत जायचे असेच पुढे... काही विचार न करता पाण्यातूनच wink मग कोणीतरी दिसेल (व्यक्ती... व्यक्ती.. भूत नाही) त्याला विचारायचे.. तो सांगेल व तुम्ही तेथे पोहचाल !

जय हिंद !!!


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

विशालभाऊ, कोल्हापूरकडून

13

विशालभाऊ,

कोल्हापूरकडून कर्‍हाडला जाताना ... कर्‍हाड जवळ आले की लक्ष ठेवायचे .... कृष्णा हॉस्पिटल च्या पलिकडे लगेचच डाव्या हाताला वळायचे. जेमतेम १ कि.मी. गेल्यावर .... डाव्या हाताला .....


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

अप्रतिम आहेत लेणी

14

अप्रतिम आहेत लेणी


एकत्र टोळी बनवून लचके तोडणार्‍या लांडग्यांपेक्षा.......एकटा वाघ नेहमीच श्रेष्ठ

http://coolprasann.blogspot.com/

लेख आवडला

15

लेख आवडला