धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
माझं असं दणक्यात स्वागत झालेलं बघून मनातून खुश झालो होतोच, तो कार्यकर्ता इतक्या निरागस चेहेऱ्याने बघत होता की त्याला समजावून काय सांगणार कप्पाळ. तो मला हौसेने त्याच्या पिकअप वॅगन मध्ये बसवून युनिवर्सिटी मध्ये घेऊन आला.
पहिल्या नजरेतच गारद झालो. दीडशे एकराचा हिरवागार कॅम्पस, घनदाट झाडी, मधे मधे डोकावणार्या छोट्या इमारती, झाडीतून वळणं वळणं घेऊन जाणारे रस्ते. कॉलेज तरुण तरुणींचे हसतखिदळत आपल्याच धुंदीत जाणारे थवे. सगळं अगदी स्वप्नांतल्यासारखं. माझी राहण्याची सोय युनिवर्सिटीच्या रिसर्च फ्लॅट मधे केलीये अशी बातमी लागली. किल्लीने दार उघडून आत पाउल ठेवलं आणि स्वप्न मोडलं.
अगदी रानात असावं तसं एक कॉटेज, म्हणजे काय, रानातच होतं म्हणा ते, आजूबाजूला किर्र झाडी. खायचे प्यायचे वांदे. माझा चालक मला सोडून निघून गेलेला, स्थानिक मालकिणीला मी इंग्रजीशी थोडी झटापट करून माझे ‘छत्रपती’पण पटवायचा प्रयत्न केला, एकंदरीत संवाद येणेप्रमाणे.
मी – प्यायचं पाणी मिळेल का?
मालकीणबाई – हो, किचनच्या नळाला आहे ते प्यायचंच आहे. (ती जे इंग्रजी बोलली त्याचा असं अर्थ मी काढला, वेगळा अर्थ असल्यास कळायला मार्ग नाही )
मी – ठीकाय, पण काही त्रास नाही नं होणार?
मालकीणबाई – काय माहित, आम्ही पीत नाही ते. आम्ही बाटलीबंदच पितो.
मी – मग ते कुठे मिळेल?
मालकीणबाई – इथे काही अंतरावर युनिवर्सिटीच्या कॅटीनमधे मिळेल.
मी – ठीक आहे , चालू असेल नं ते आता?
मालकीणबाई – नाही, बंद झालं ते आता.
मी – आता हो !!
मालकीणबाई - उद्या मिळेल पण तुम्हाला नक्की.
मी – आणि ए. सी. चालू नाहीये..
मालकीणबाई – पंखा चालू आहे.
मी – संडासाचे दार लागत नाहीये.
मालकीणबाई – हो.
मी अधिकचा संवाद टाळला, प्रवास बराच झाला होता. परक्या देशात स्त्रीहत्येचं पातक कशाला डोक्यावर म्हणून सोडून दिलं. हताश चेहेर्यानं रूमवर येऊन. थोडसं फरसाण खाल्लं. विमानतळावर एक कोकची बाटली घेतली होती ती अगदी शेवटच्या थेंबापर्यंत चवीचवीने संपवली आणि झोपलो.
कितीतरी वेळ झोप लागत नव्हती, किर्र झाडी अंगावर येत होती, कितीतरी वर्षांनी मी जंगलाचा आवाज एवढ्या निवांतपणे ऐकत होतो. एवढ्या शांततेत स्वतःलाच सामोरं जाणही खूप अवघड असतं बुवा.
आयुष्यातल्या काही रात्री, तुमचा अहं, मानसन्मान, प्रतिष्ठा, अक्कडबाजपणा सगळं सगळं खेचून पार नागवं करून सोडतात. त्यापैकी ती एक.... असो.
दुसऱ्याच दिवशी प्रवचन होतं, लवकरच जाग आली, थोडा बाहेर आलो फेरफटका मारायला तर, सगळ्या आसमंतानं एकदम रूपच पालटलं होतं. की मलाच रात्रीच्या त्या खोल, खडसावणार्या स्वसंवादामुळे नवी उत्तरं मिळत होती. कोवळं उन पांघरून, सगळं रान बेटं मोठ्या साळसूदपणे उभं होतं.
मस्त ताजी पहाट, पक्ष्यांचा किलबिलाटात, एवढ्या वृक्षांच्या समवेत बघायची म्हणजे, त्याला आमचं निबर मन काय कामाचं, त्याला बालकवींची किंवा बोराकारांची हळूवार, तरल प्रतिभाच काहीतरी न्याय देऊ शकेल. मी कितीतरी वेळ शांतपणे एकटाच घोटाघोटाने ती अप्रतीम सोनपहाट पीत होतो.
आपण ह्याच केम्पस मधे राहणार असू तर रोज इथे असेपर्यंत ही पहाट पहायचीच असा तेव्हाच मनोमन निश्चय केला.
बाकी काही बघायला वेळच नाही मिळाला आज, सरळ प्रवचन चालू केलं. आमच्या शिष्यगणाचा एक फटू तेवढा काढलाय हा घ्या
क्रमशः
.jpg)
{(विषय दिलेला नाही)}
{ज्जाम आवडलं}
सगळं आफ्रिका प्रकरण सविस्तर ऐकायची / वाचायची जबरी इच्छा झालीय...
आपला स्नेहांकित...
-अशोक
{असेच म्हणतो आहे जबरा}
असेच म्हणतो आहे
जबरा लेखमाला चालू झाली आहे !
Hope is a good thing...
{लवकर लवकर येवु द्या पुढचे भाग}
लवकर लवकर येवु द्या पुढचे भाग
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{तुमच लेक्चर चालु असताना फोटु}
तुमच लेक्चर चालु असताना फोटु पाडला काय?
त्ये मागल्या रांगेतलं एक इद्यार्थी कपाळाला हात लावुन बसलाय तवाच वळिखल म्या
और भी आंदो.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{मस्त..थोडं मोठं लिव्हा}
मस्त..थोडं मोठं लिव्हा अर्ध्याशेठ...
{मस्त्च वाचतेय अजुन लिहा}
{पुढं काय झालं ? की तुला}
पुढं काय झालं ? की तुला प्रवचनाऐवजी फोटु काढताना बघून पळून गेले सगळे
आणि काय रे, एका तरी इद्यार्थ्याच्या तोंडावर हसू आहे का ? कसला ढोस देत हुतास ??
मस्त लेखन
खरंच थोडं मोटं लिवा !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{आयुष्यातल्या काही रात्री,}
आयुष्यातल्या काही रात्री, तुमचा अहं, मानसन्मान, प्रतिष्ठा, अक्कडबाजपणा सगळं सगळं खेचून पार नागवं करून सोडतात. त्यापैकी ती एक.... असो
खल्लास हे वाक्यं पटले. असे मी ही कधी काळी अनुभवलेले आहे.
जरा डिट्टेलवार लिव्हा की.
-पुण्याचे पेशवे
{+१}
+१ असेच म्हणतो.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{ती सोनपहाट कधी इथे डकवा.....}
ती सोनपहाट कधी इथे डकवा..... मि म वरच्या लोकाना अनभवु द्यात
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{चांगल...}
चांगल लिहताय!
जरा मोठा भाग टंका की!!!
बाकी फोटो भारी!
{काय बोलु? शब्द नाहीत}
काय बोलु? शब्द नाहीत
{छान लिहिलंय...}
छान लिहिलंय...
अजून जास्त लिहा न फोटो पण येउदेत ...
बाकी हा या भागातला फोटो बघून .. एकंदरीतच प्रवचन कोणाच्या पचनी पडलेले दिसत नाहीये...
पहिला फोटो एक नंबर .. छत्रपती शिवाजी ..भरून पावला असशील...
{मस्त लिहिलय!!! मिनिला}
मस्त लिहिलय!!!

मिनिला अनुमोदन, अजुन लेखन/माहिती मिळावी तसेच फोटुपण जादा टाक.
{मस्त लिहिलयं. सर्व}
मस्त लिहिलयं.
सर्व शिष्यगणांच्या चेहर्यावर शिक्षण हे आपले क्षेत्रच नाही असे भाव दिसुन येताहेत.
{अर्ध्या मिनी आणि सॅण्डी बघ}
अर्ध्या मिनी आणि सॅण्डी बघ तुला काय म्हण्ताय्त इन्डाय्रेक्ट्ली..............
लावली काडी
काड्यालावणारी
प्रीतमोहर
{तो पुढचा}
तो पुढचा मधला..................
{फोटो मध्ये जे आहेत त्यांना}
फोटो मध्ये जे आहेत त्यांना मराठी वाचता आले तर?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{>>फोटो मध्ये जे आहेत त्यांना}
>>फोटो मध्ये जे आहेत त्यांना मराठी वाचता आले तर?
(तुम्ही आम्हाला त्यांच्यापासुन वाचवणार अश्या आशेने)आम्ही सारे तुमच्या (त्यांच्या आवडत्या गुरुजनांच्या) मागे लपणार. मग ते आणि तुम्ही काय ते पाहुन घ्या.
{लिखाण आवडल पण}
हा फोटो टाकायचा का टाळलात ? (ह.घ्या.)
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)