मुल्ला नसरुद्दिनच्या कथा

0
0

मुल्ला नसरुद्दिनच्या कथा/किस्से हा मध्यपूर्वेचा वारसा आहे. सूफी परंपरेत या कथा अनेकदा त्यांच्या दार्शनिकतेसाठी वापरल्या जातात. वरवर पाहता दिसणारी विसंगती/अ‍ॅब्सर्डिटी (या संदर्भात नेमके भाषांतर सुचले नाही, मदत?) आणि त्याचबरोबर असलेल्या खोल अर्थामुळे आबालवृद्धांना एकाच वेळी खिळवून ठेवणार्‍या या कथा रुप बदलून इतर अनेक संस्कृतींमध्येही आलेल्या आढळतात.
अस्वीकृती-निवेदनः या पारंपारिक कथा असल्याने यावर कोणताही स्वामित्त्वहक्काचा प्रश्न उद्भवत नाही असा माझा समज आहे. माझा समज चुकीचा आहे असे निदर्शनास आल्यास हे धागे अप्रकाशित केले जातील.
निवेदन २: आबालवृद्धांचे एकाच वेळी रंजन-प्रबोधन करू शकत असल्याने अपरिपक्व लोकांनाही - निदान एका बाजूने - रंजक वाटाव्यात असे वाटते. 'मुल्ला' असा शब्द आल्याने यावर टीकाच केली पाहिजे असा समज असलेल्यांच्या टीकेला आगाऊच फाट्यावर मारून आमचे निवेदन संपवतो.
______________________________________________________________________________________________________________

किस्सा - १
मुल्ला नसरुद्दिनने एका श्रीमंत माणसाकडे काही पैसे उधार मागितले. 'हे पैसे तुला कशासाठी हवेत?' त्याने विचारले. 'मला हत्ती विकत घ्यायचाय' मुल्ला उत्तरला. 'अरे पण तुझ्याकडे पैसे नसतील तर तुला हत्ती पाळणे परवडणार नाही.' तो माणूस म्हणाला. 'मी पैसे मागितले होते, सल्ला नाही' मुल्ला फणकारला.

किस्सा - २
'मुल्ला, दैव म्हणजे काय?'
'गृहितक' मुल्ला उत्तरला.
'ते कसे काय?'
'तुम्ही गृहित धरता की एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडेल, पण तसे घडत नाही. याला तुम्ही दुर्दैव म्हणता. त्याऐवजी समजा तुम्ही गृहित धरता की ती गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडेल पण उलट घडते. याला तुम्ही सुदैव म्हणता. किंवा तुम्ही समजता की ती गोष्ट तुम्हाल अनुकूल घडेल वा घडणार नाही, थोडक्यात भविष्यात काय घडणार आहे हे तुम्हाला माहित नाही. म्हणजे तुमची कल्पनाशक्ती कमी पडते, पण तुम्ही गृहित धरता की भविष्य अज्ञात आहे. थोडक्यात तुमच्या गृहितकाविरुद्ध घडले म्हणजे त्याला तुम्ही दैव म्हणता.'

किस्सा - ३:
'मी अंधारातही पाहू शकतो' चहाच्या ठेल्यावर मुल्ला फुशारकी मारत होता. 'हॅ...' एक मित्राने फटकारले 'तसे असेल तर रात्री रस्त्यावरून जाताना तू कंदिल घेऊन का जातोस?'. 'ते इतरांना मी दिसावा आणि आमची टक्कर टळावी म्हणून' मुल्लाने स्पष्टीकरण दिले.

किस्सा - ४
'सगळे काही' उपलब्ध असल्याचा दावा करणार्‍या दुकानात मुल्ला गेला.
'तुमच्याकडे खिळे आहेत?'
'आहेत.'
'आणि चांगले कमावलेले कातडे?'
'आहे तर!'
'आणि रंग-रोगण?'
'सगळं आहे हो.'
'इतके सगळे आहे तर तुम्ही रिकामे बसण्यापेक्षा त्यापासून बूट का तयार करत नाही?' मुल्लाने वैतागाने विचारले.

किस्सा -५
'ज्याला उत्तर नाही असा कोणताही प्रश्न नाही' चहाच्या ठेल्यावर बसलेल्या मुल्ला आणि त्याच्या मित्रांना फकीर म्हणाला. 'पण मला माझ्या विद्वान मित्राने उत्तर देता येणार नाही असा प्रश्न विचारला होता.' मुल्ला उद्गारला. 'मी तेव्हा तुमच्या बरोबर असायला हवा होतो. मी उत्तर दिले असते त्या प्रश्नाला' फकीर म्हणाला. 'असो. पण प्रश्न काय होता?' त्याने विचारले. 'ठीक आहे. मग मला सांग काल रात्री माझ्या खिडकीतून घुसून तू माझ्या घरात चोरी का करीत होतास?' मुल्लाने प्रश्न सांगितला.

किस्सा - ६
'मुल्ला, तुमचे वय काय?' चहाच्या ठेल्यावर बसलेल्या मुल्लाला विचारणा झाली.
'चाळीस.' मुल्ला उत्तरला.
'अरेच्या, पण मागच्या वेळेस मी विचारले तेव्हाही तू चाळीसच म्हटला होतास.' प्रश्नकर्ता विजयी मुद्रेने उद्गारला.
'अर्थात, मी माझ्या उत्तरावर अजूनही ठाम आहे.' मुल्ला म्हणाला.

किस्सा - ७
मुल्लाच्या गावात सर्वांचे धान्य एकाच ठिकाणी साठवले जात असे. एक दिवस दुसर्‍यांच्या कणगीतील गहू स्वत:च्या कणगीत टाकताना मुल्ला पकडला गेला. त्याला गावच्या काजीसमोर उभे करण्यात आले. काजीने त्याला असे करण्याचे कारण विचारले. 'मी मूर्ख आहे. माझ्या गव्हासारखाच असल्याने मला त्यांचा गहू माझ्या गव्हापासून वेगळा ओळखता आला नाही'. 'अच्छा. तसे असेल तर तू चुकून तुझा गहू इतरांच्या कणगीत कसा टाकला नाहीस?' काजीने विचारले. 'हॅ, मी एवढाही मूर्ख नाही काही. मला माझा गहू त्यांच्या गव्हापासून वेगळा ओळखता येतो म्हटलं.' मुल्ला विजयी मुद्रेने म्हणाला.

किस्सा - ८
मुल्लाचा अतिशय किंमती फेटा एकदा हरवला. 'तुला चिंता नाही वाटंत?' मित्राने विचारले. 'नाही, मला खात्री आहे तो परत मिळेल.' मुल्ला म्हणाला. 'ते कसे काय?' मित्राने विचारले. 'मी अर्ध्या दिनारचे इनाम जाहीर केले आहे' मुल्लाने माहिती दिली. 'पण फेट्याची किंमत तर याहून कितीतरी अधिक आहे. ज्याला सापडेल तो फेटाच ठेवून घेईल की त्यापेक्षा' मित्राने शंका काढली. 'मी त्याचा विचार आधीच केला होता...' मुल्ला स्वतःवर खूष होत म्हणाला 'म्हणून तर मी त्याचे वर्णन देताना तो मळका जुनाट आहे असे सांगितले आहे, मूळ फेट्याचे वर्णन मी दिलेलेच नाही.'

किस्सा -९
मुल्ला आणि त्याचा मित्र थकून चहाच्या ठेल्यावर पोचले. शक्तिवर्धक म्हणून ग्लासभर दूध घ्यावे असे त्यांनी ठरवले. पण दोघांत मिळून एका पेल्यापुरतेच पैसे त्यांच्याकडे निघाले. मग एक पेला अर्धा-अर्धा प्यावा असे त्यांनी ठरवले. 'तू आधी अर्धा ग्लास पी नि मग मला दे' मित्र म्हणाला. 'का, तू आधी घे की' मुल्ला म्हणाला. 'नाही माझ्याकडे थोडी साखर आहे ती मी माझ्या दुधात घालून पिणार आहे' मित्राने खुलासा केला. 'मग ती आधीच घाल की, तसेही मी फक्त अर्धा पेला दूधच पिणार आहे' मुल्लाने सुचविले. 'नको, माझ्याकडे फक्त अर्धा पेला दुधाला पुरेल इतकीच साखर आहे' मित्र म्हणाला. मुल्लाने क्षणभर विचार केला नि ठेल्यावरच्या पोर्‍याला मीठ आणायाची विनंती केली. 'तुला मीठ कशाला हवे आहे?' मित्राने विचारले. 'मी माझा अर्धा पेला दूध मीठ घालून पिणार आहे' मुल्ला उत्तरला.

किस्सा १०
'जगातील उपलब्ध गोष्टींवर सर्वांचा शक्यतो सारखाच अधिकार असावा.' चहाच्या ठेल्यावर तत्त्वज्ञ सांगत होता.
'मला नाही वाटत हे जमेल' मुल्लाने शंका काढली. 'पण हे म्हणण्यापूर्वी निदान प्रयत्न तरी करायचा होतास' तत्त्वज्ञ म्हणाला. 'मी प्रयत्न केला होता' मुल्ला म्हणाला 'मी माझ्या गाढवाला नि बायकोला सारखेच वागवले होते'. 'पुढे काय झाले?' तत्त्वज्ञाने उत्सुकतेने विचारले. 'आता माझ्याकडे एक सुज्ञ गाढव नि मूर्ख बायको आहे' मुल्ला म्हणाला.

असो. आजच्यापुरते एवढे किस्से पुरेत. वेळ मिळाला तर आणखी टाकेन. खुदा हाफिज.

मुल्ला नसरुद्दिनच्या कथा

1

मुल्ला नसरुद्दिनच्या कथा आवडल्या.

कथा छानच..पोटलीबाबाची आठवण

2

कथा छानच..पोटलीबाबाची आठवण झाली Big smile

+१

3

आया आया झेनु वाली झुन्नु का बाबा .. बाबा रे~~~~~~~~~~~~~ अया ...

-(पोटली बाबा) टारझन

मजा आली ररा...

4

मजा आली ररा...


पुष्करिणी

मजा आली ररा. तुमच्या पोतडीतून

5

मजा आली ररा. तुमच्या पोतडीतून अशा छान छान गोष्टी बाहेर पडूदेत.


-पुण्याचे पेशवे

पुपे

6

शेवटच्या किश्श्यामधे 'बायकोला गाढवासारखे वागवले' असे म्हणता येईल.(दोन अर्थाने wink)

शी शी शी... अश्लील अश्लील...

7

शी शी शी... अश्लील अश्लील... wink ;)
(गाढवीप्रेम नसलेला)पेशवे


-पुण्याचे पेशवे

तुझ्या मनात पाप आहे लेका

8

सुग्रीवाने वालीची बायको पळविली या विधानावरून तू थेट व्यावहारिक प्रश्नाकडे वळला होतास. छोटे व्हा!

असो. इथे गाढवासारखे = गाढवासमान (वागवण्याबाबत) हा एक अर्थ नि गाढवासारखे म्हणजे तो स्वतः गाढव असल्याप्रमाणे (मूर्खपणाने) असा दुसरा अर्थ अपेक्षित आहे मला.

मुल्ला नसरुद्दिनचे किस्से

9

मुल्ला नसरुद्दिनचे किस्से आवडले हास्य

शेखचिल्लीचा हा भाऊ होता काय Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

दोन नावे

10

शेखचिल्ली हे बहुधा नसरुद्दिनचे एतद्देशीय नाव असावे.

ह्म्म ! असे असू शकते.

11

ह्म्म !

असे असू शकते.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त कथा

12

मस्त कथा!
हास्य

माझे किस्से कुणाला विचारुन

13

माझे किस्से कुणाला विचारुन टाकलेस इथे रमत्या ? Angry

बचाव

14

घाबरगुंडी
गुस्ताखी माफ कीजिए मियाँ. देखिये हम आपकी पब्लिशिटी कर रहे थे. आप का टीआरपी बढेगा. जरा जमानेके साथ चलिये मुल्लाजी.

अवांतरः नाना मीठ घालून दूध पितो ही माहिती नवीन आहे मला.

ओके ओके ... चालु द्या

15

ओके ओके ... चालु द्या निवांत...

अवांतर= आम्ही दूध पित नाही... wink

मुल्ला ररा... अजुन

16

मुल्ला ररा... अजुन येउद्या..

जाम आवडलं.. एवढं हलकंफुलकं पण शाश्वतमुल्य असलेलं लिखाण विरळाच

+१

17

+१...वा वा वा...फारा दिवसांनी विरळा हा शब्द वापरलेला पाहिला.

झकास

18

सार्‍याच कथा उद्बोधक/रंजक. दैव = गृहीतक हे विशेष आवडलं.

अरे वा ! नंदन साहेब आहेत काय

19

अरे वा ! नंदन साहेब आहेत काय मीमवर ? अरे वा वा आनंद वाटला

आभार

20

किस्सा क्र. ४ चा सारांश एका वाक्यात सांगता येईल. 'विकतं तिथं पिकत नाही'. Big smile

+ १

21

असेच म्हणतो.

येऊ द्यात अजुन!

22

येऊ द्यात अजुन!

मुल्ला नसरुद्दीन ने गाढवाच्या

23

मुल्ला नसरुद्दीन ने गाढवाच्या कानात काही साम्गितले. लोकाना फार आश्चर्य वाटले. त्यानी विचारले की गाडवाला तुझे बोलणे समजते.
मुल्ला म्हणाला समजते! त्याला विचारदेखील करता येतो.
मला कुठे जायचे असेल तर मी त्याला विचारतो. माझ्या विचारांशी सहमत असेल तर ते माझ्या बरोबर येते. अन्यथा मी त्याच्याबरोबर जातो


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

णिसेद

24

आमच्या पुढल्या भागाचे मटेरियल आधीच झाईर करू नका विजुभाऊ.
असो. या किश्श्याचे तात्पर्यः समज आणि विचार याचे मूल्यमापन कृतीवरून करू नये. कृतीच्या मागे नेहमीच एक विचार दाखवता येतो.
यावरून एक गोष्ट आठवली. दंतकथा असावी. मूळ गाभा तोच ठेवून विस्तार करतो आहे.

अर्जुन द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकत असतानाची कथा आहे ही. त्याचे शिक्षण पुरे होत आले होते नि सर्वश्रेष्ठ धनुर्धर असा त्याचा डंका आधीच वाजू लागला होता. एक दिवस काही स्नातकांबरोबर रानात फिरत असता ते जरा खोल अरण्यात शिरले. फिरता फिरता ते एका मोठ्या पठारावर आले. तिथे आजूबाजूच्या झाडावर धनुर्विद्येच्या सरावासाठी काढतात तशी समकेंद्री वर्तुळे काढलेली होती. प्रत्येक वर्तुळाच्या बरोबर केंद्रस्थानी बाणं रुतलेले होते. कुठेही एवढीसुद्धा चूक नव्हती. ती अचूकता पाहून अर्जुनसुद्धा विस्मयचकित झाला.असूयेने भारलेला तो द्रोणाचार्यांकडे गेला आणी आपण काय पाहिले ते त्यांना कथन केले नि - नेहमीप्रमाणे - आता मी सर्वश्रेष्ठ धनुर्शर कसा ठरणार असे गार्‍हाणे मांडले. द्रोणाचार्य त्याला नि काही शिष्यांना घेऊन त्या धनुर्धार्‍याच्या शोधात निघाले. त्या पठारा जवळच एक भिल्लाची झोपडी होती. तिथे चौकशी केले असता ते बाण त्या भिल्लाच्या बारा वर्षाच्या मुलाने मारले आहेत असे कळले. त्या सर्वांनी भिल्लाच्या मुलाला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावर भिल्लाने पलिकडील एका छोट्या मैदानाकडे हात दाखवून तो तिकडे आहे असे सांगितले. सर्वजण अधीरपणे तिकडे गेले. तिथे पोचताच त्यांना एक दहाबारा वर्षाचा मुलगा आपल्या धनुष्यातून इतस्ततः बाण मारताना दिसला. बाण मारून झाले की झाडावर जिथे तो रुतला आहे त्या जागेला केंद्र मानून त्याभोवती तो वर्तुळे काढत होता. त्या छोट्या मैदानावरही असे अनेक 'अचूक' वेध घेतलेले बाण रुतलेले दिसत होते.

हाहाहा.. (भिल्ल) पंडया

25

हाहाहा..
(भिल्ल) पंडया Evil

लै झकास!! पुढच्या भागाच्या

26

लै झकास!! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

लै भारी गोष्टी..... आजुन येवु

27

लै भारी गोष्टी..... आजुन येवु द्या !


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

दुरदर्शनच्या जुन्या मालिकेत

28

दुरदर्शनच्या जुन्या मालिकेत मुल्ला नसुरूद्दीन याची भुमीका नसूरूद्दून शहाने केली होती काय?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मुल्ला नसरुद्दिनच्या कथा

29

मुल्ला नसरुद्दिनच्या कथा आवडल्या.

सगळेच किस्से आवडले......

30

पण दुसरा किस्सा जास्त आवडला.....दैवाचे गृहीतक ......... Grade


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

मस्त उद्बोधक कथा

31

आवडल्या.


दिप्ती जोशी

लेख उत्तमच. माझे दोन पैसे....

32

अकबर-बिरबल, तेनालीराम, मुल्ला नसीरुद्दीन, इसापनीती , पंचतंत्र, विक्रम्-वेताळ अशा साध्या साध्या कथातून रंजक पण संदेशयुक्त असे वैचारिक खाद्य डोक्याला लहानपणी मिळे.(तेव्हा फक्त रंजक म्हणूनच वाचले. त्याचे उपयुक्तता मूल्य आज जाणवते आहे, तेही विशेष्तः "self help"च्या नावाखाली दिवसाला डझनावारी निघणार्‍या पुस्तकांच्या जमान्यात.)
अशाच काही गोष्टी आठवतील तशा इथे देतोय. ह्या सर्व परंपरेने सांगितल्या गेलेल्या लोककथा आहेत :-
ह्याच्या बर्‍याच गोष्टीतून हे व्यक्तिमत्व कधी यडपट तर कधी वाक्चतुर, कधी लबाड्/धूर्त्/कावेबाज, कधी थेट जीवनावर खट्याळ भाष्य करनारे, कधी सूफी तत्वज्ञान मांडणारे दिसते. कधी सामान्याची ,दरिद्री माणसाची व्यथा मांडत R K Laxman ह्यांच्या common man च्या व्यंगचित्राचेच शब्द रूप वाटते.

गोष्ट १:-
कुठल्याही इतर ख्यातनाम विद्वानाप्रमाणे(सॉक्रेटिस्,कन्फ्युशिअस वगैरे) मुल्ल नसीरुदीन दरिद्री व कर्जबाजारी होताच. एकदा त्याच्याकडे राहिलेल्या थकबाकीला तो काहिच दाद देत नाही म्हणून एका सावकाराने त्याची एका काझीकडे/न्यायाधीकडे तक्रार केली. खटला सुरु झाल्यावर मुल्लाने प्रथम बोलायला सुरुवात केली.
मुल्ला:- "मी माझी गाय व घोडा विकून सदर सावकाराचे पैसे परत करण्यास तयार आहे. खटला मिटवावा."
सावकारः- "छे छे काझी साहेब. ह्या कफल्लक भिकार्याकडे गाय, घोडा काहिच नाही. धडधडित खोटे बोलतोय हा
ह्यायाकडे तर खायला पैसेही नाहित अन् नेसायला कपडेही नाहित."
मुल्ला:- "बघा. म्हणजे ह्याला ठावूक आहे की मजकडे खरोखरच पैसे नाहित. मी काही माझ्याकडे असूनही ह्यला देत
नाही असे नाही. तस्मात्, मला शिक्षा करूनही ह्यला काहीही मिलण्याची शक्यता नाही. बाहेर राहिलो तर
एखादेवेळेस काम धंदा करून पैसे देइन."

आणि मुल्ला सुटला!

गोष्ट२:-
एकदा दिल्लीच्या गजबलेल्या बाजारात साहेब पोचले. स्वस्थ बसलेल्या दुकानदाराकडे पाहून साहीब सुरु:-
मुल्ला:- तुमच्याकडे चामडे आहे काय?
दुकानदारः- हो. किती हवे?
मुल्ला:- नुसते ते घेउन काय करु? शिवायला दोरा व दाभण आहे काय?
दुकानदारः- हो तेही आहे. दोन्ही घ्या की आमच्याकडनच.
मुल्ला:- बस्स मग. आता फक्त दोन लहान खिळे मिळाले की पुरे.
दुकानदार(आशेने व अजिजीने) :- हो. हो. खिळे सुद्धा आहेत की. हे घ्या आत्ता देतो काढून.
मुल्ला:- एवढे सगळे आहे, तर रिकामा का बसला आहेस? जरा बूड हलवून उत्तम जोडे शिवत का बसत नाहिस?

गोष्ट३:-
मुल्ला जी आपल्या झोपडीवजा घराबाहेर शिळ्यापोळीचे तुकडे टाकत असताना शेजार्‍याने कुतुहलाने विचारले:-
शेजारी:- "काय हुजूर काय हे काय चाल्लय?"
मुल्ला:- (स्थिर चित्त)"काही नाही. इकडे वाघ फिरकू नये म्हणून शिळ्या पोळिचे तुकडे टाकतोय."
शेजारी:- "अरे पण ह्या इलाख्यात कुठे वाघ आहेत?"
मुल्ला:- (विजयी स्वरात)"तेच तर म्हणतोय. बघ माझा इलाज कस्ला यशस्वी झालाय!"

गोष्ट ४:-
मुल्लाच्या दोन्ही बायका त्याला विचारत "आमच्यापैकी कुनावर तुझे अधिक प्रेम आहे?"
तो वैतागून जाई. एकदा त्याने एकांतात प्रत्येकीला एक एक माणिक दिले. व सांगितले की "दुसरीला सांगशील तर ती असूयेने तुझा मणी घेईल. तुलाच त्रास होइल."
ह्या भीतीने दोन्ही बायका कधीच एकमेकींना आपल्याकडे मणी आहे हे सांगू शकल्या नाहित.
पुन्हा जेव्हा कधी मुल्लाला "अधिक प्रिय कोण" हा प्रश्न त्या बायका विचारत, तेव्हा तो गंभीर होउन म्हणे:
"माझे खरे प्रेम जिच्यावर आहे तिला मी माणिक दिलेलाच आहे. पण दुसरीही इतकी समजूतदार आहे की ती पहिलीचा हेवा न करता हे मान्य करते व सुखासमाधानाने आमच्यासोबत राहते. तिचा हा मोठेपणा!"
दोन्ही बायका आपणच त्याच्या कशा लाडक्या व दुसरी समजूतदार आहे म्हणून ऐकून तरी घेते असा सहानूभूतीपूर्ण उसासा मनात टाकत मनोमन खुश होत!!

गोष्ट५:-
मुल्ला हे अतीव प्रसिद्ध व लोकप्रिय व्यक्तिमत्व झाल्याने साहजिकच काहीजण त्याच्यावर जळतही असत, द्वेषही
करत.त्यात दरबारातले सरदार, काझी ही मंडळीही होती. एकदा मुल्ला रस्त्याने जाताना एका अनोळखी माणसाने त्याला फाडकन एक थोबाडित लगावली. व पुढच्याच क्षणी मुल्लाचा चेहरा निरखत तो माफी मागू लागला. "माफ करा साहेब.. मला वाटलं आपण दुसरेच कुणी आहात. चुकून लगावली."
मुल्ला मात्र ऐकेना. त्याने सरळ त्या माणसाला धरून काझीसमोर उभे केले. काझीचेच हे कारस्थान असल्याचे त्याच्या थोड्याच वेळात लक्षात आले. काझीने निवाडा दिला तो असा :-
"सदर माणसाने मुल्लाला केवळ चापट मारली आहे.कोनतीही इतर वित्तहानी वगैरे केलेली नाही. त्याबद्दल तो माफीही मागतो आहे.सबब, त्याने मुल्लाला रु१ दंड म्हणून द्यावा ; मग त्याला सोडण्यात येत आहे."
मुल्ला:- (मनातून वैतागून व वरवर गंभीरपणे):- "एखाद्याला थोबाडित मारल्यावर इतकी शिक्षा खरोखरच पुरेशी आहे
असे वाटते का?"
काझी:- "होय . नक्कीच.कारण त्याने माफिही मागितली आहे."
मुल्लाने तत्क्षणी खाडकन् सगळ्यांदेखत काझीला कानाखाली लगावली.वर "काझीजी,तुमची माफी मागतो " असे म्हटले व त्या अनोळखी माणसाकडून येणारा रुपया तुम्हीच ठेउन घ्या असेही सांगितले!!

अजूनही पुष्कळ किस्से आहेत. सवड झाल्यास आथवतील तसे टंकत जाईन.