आजवर कामाच्या स्वरूपामुळे अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. अजूनही येतच आहे, पायाला चक्र लागलंय कधी थांबणार माहिती नाही. ताकद आहे तोवर फिरतोय, घरट्याची ओढ वाढलीये, भरारीची झेपही. नवीन मुलूख बघतोय, अनवट वाटा शोधतोय, नवीन माणसं धुंडाळतोय. चालूच आहे माझा शोध आणि ‘माझा’ शोध.
माझे सगळे प्रवास तसे लहानसे असतात, दहा-पंधरा-वीस दिवस फारतर एक महिना. आतापर्यंतची सगळी भ्रमंती, सगळे प्रदेश तसे नेहेमीच्या पठडीबाहेरचे, इंग्लंड अमेरिकेत आम्हाला कुणी बोलावत नाही. तिथे जाण्याची तीव्र इच्छा एकेकाळी होती तशी आता जाणवत नाही, तिथे जायचं नाहीच असेही नाही. (‘२२१बी, बेकर स्ट्रीट’ वर मात्र अजूनही जायचंय एकदा तरी ) अजूनही खूप भ्रमंती होणार आहे, सुरुवातीचा ‘लाजते पुढे सरते, फिरते’ चा काळ आता गेलाय. आता मजा वाटतेय... चष्मा काढून बघितलं तरी धूसर नाही दिसत आता.
जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. जाणवतो हा समान धागा या सगळ्या रंगांमध्ये कधीतरी. असो, पाल्हाळ आवरतो नाहीतर रूपक होऊन जायचं.
आजच्या टंकनकळा आहेत, एका नवीन रंगपेटीसाठी. निमंत्रीत प्राध्यापक म्हणून आफ्रिकेतील एका विश्वविद्यालयात यायचा योग आहे. मला त्यांच निमंत्रणपत्र आलेलं, मुद्दाम कुणा मित्रांना दाखवलेलं नाहीये, माझा माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे त्यावरचे कुत्सित कटाक्ष, आणि हलकट्ट हास्य, हे कुणाचाही आत्मविश्वास गमावण्यासाठी पुरेसे आहेत. तर ते एक असो. मी ह्या विश्वविद्यालयात तात्पुरता का होईना पण प्राध्यापक म्हणून दाखल झालो आहे.
आफ्रिकेतला गरीब देश असल्यामुळे विजा, अर्ज, विनंत्या वगैरे भानगड नाही, अगदी ‘येवा, टांझानिया आपलाच असा’ हा घोष सुरुवातीपासूनच ऐकू येतोय. इथे या, साधा अर्ज भरा, सही करा, थोडे डॉलर द्या, लगेज विजा. त्या इमिग्रेशन वाल्या महिला अधिकाऱ्याने, गोड हसून ‘वेलकम’ म्हणाल्यावर डोळे अंमळ पाणावले. कुठल्याही गणवेशधारी अधिकाऱ्याला, सामान्य जनतेकडे बघून हसताही येतं ही भारतात केवळ अफवाच. थोडक्यात काय, तर जगाकडे बघून आपलं ते सुंदर मोहक आफ्रिकन हास्य करत लोकं स्वागताला उत्सुक आहेत.
१०-१२ तासाचा कंटाळवाणा प्रवास करून गेल्यावर, नेहेमीचे कंटाळवाणे सोपस्कार करायला अगदी जीवावर येत होतं. सामान वगैरे शोधाशोध झाल्यावर, स्थानिक चलन घ्यायला गेलो आणि पहिला सुखद धक्का, टांझानियन शिलीन्गाची भलीमोठी गड्डीच घेऊन बाहेर पडलो, चक्क साडेसात लाख शिलिंग मिळाले अवघ्या पाचशे डॉलरला. अगदी खरं लक्षाधिश झाल्यासारखं वाटलं काही क्षण.
बाहेर येऊन विमानतळावर जरा शोधाशोध करतो तर कुणीच माझ्या नावाची पाटी घेऊन दिसेना. मी हल्ली या प्रकाराला वैतागणे सोडून दिले आहे, तरी जरा अचंबाच वाटला. सगळ्या जपानी नावांच्या पाट्या, दोनचार अमेरीकन, ओळखीचे काहीच दिसेना.
त्यातल्यात्यात एका ओळखीच्या पाटीकडे नजर गेली, चांगला हसतमुख कार्यकर्ता होता, बहुतेक त्याने माझा फोटो आधी बघितला असावा किंवा माझ्या चेहेर्यावर केवळ ड्रायवर, रिक्षावाले यांनाच ओळखू येणारा, एक यडबंबु सारखा भाव गोंदून ठेवला असावा. पण तो लगबगीने माझ्याजवळ येऊन पाटीकडे बोट करू लागला. नीट वाचलं आणि दचकलोच. माझा नकळत का होईना पण एवढा मोठा सन्मान बघून मला शब्दच सुचेनात. मनात दणकून खुश झालो, म्हणालं चला सुरुवात तर चांगली झाली. आता ह्या देशात कुणाची माय व्यालीये माझ्या वाटेला जायची.
धक्का ओसरल्यावर मी विचारलं, ही पाटी कुणी लिहिलीये, तेव्हा त्यानं मला अत्यानंदानं आणि अभिमानानं माझ्या तिकीटाची प्रत दाखवली, त्यावरच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या विमानतळाचं नाव त्यानं माझंच नाव समजून अगदी न चुकता पाटीवर लिहून आणलं होतं. मी निरुत्तर. हे बघा काय ते...

क्रमशः
एक नंबर
मग वाचून उड्या मारल्यात की नाही?
मॉरीयार्टी.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
(विषय दिलेला नाही)
हा हा हा हा हा! क्षणभराकरिता
हा हा हा हा हा! क्षणभराकरिता का होईना तुझा चेहरा असा आनंदाने उजळुन गेला असेल.
येऊ द्या अजून. एवढ्यानं काय
येऊ द्या अजून.
एवढ्यानं काय होतंय !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
मस्त... तुम्ही छत्रपती
मस्त...
तुम्ही छत्रपती शिवाजी !!! छान लिहिलंय.. अजून लेख लिहा आफ्रिकेतल्या अनुभवांवर.
http://shilpasview.blogspot.com/
=)) म्हाराजांचा विजय असो.
म्हाराजांचा विजय असो.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
आधी कळवायचे तरी..
आधी कळवले असते तर " क्षत्रीssय कुलावतंsssस! गोब्राम्हणप्रतिपालक!! सिंsहाssसनाधीssश्वर !!!छत्रपतीss............" अशी ललकारी द्यायला सुध्दा कोणी तरी अरेंज केला असता. एखादा तुतारी वाला ही पकडून आणला असता.
बाय द वे पुढचा भाग टाकायला उशीर केल्यास टकमक टोकावरून कडेलोटाची शिक्षा आहे माहीत आहे ना?
तुम्ही महाराज असाल ते आफ्रीकेत इथे नाही.
(शिवाजी)राजे,पुढील भाग लवकर
(शिवाजी)राजे,पुढील भाग लवकर येऊ द्या.
पुढं लिहा हो लवकर!!!
पुढं लिहा हो लवकर!!!
हा हा हा... हा हा हा....हा हा
हा हा हा... हा हा हा....हा हा हा... हा हा हा....हा हा हा... हा हा हा....हा हा हा... हा हा हा....हा हा हा... हा हा हा....हा हा हा... हा हा हा....हा हा हा... हा हा हा....हा हा हा... हा हा हा....हा हा हा... हा हा हा....
जिथे मेलो वारलो खपलो संपलो हे शब्द संपत्तात तिथून हा जोक सुरु होतो.
-पुण्याचे पेशवे
जबरा !
जबरा !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी
जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. जाणवतो हा समान धागा या सगळ्या रंगांमध्ये कधीतरी. >>>
खंगरी रे अर्ध्या !!!
मी निरुत्तर. हे बघा काय ते...>>.
क्षणभर माझापण गोंधळ ऊडाला !!
थेट छत्रपती !! मस्तच की !!
+१ नाव बदल म्हणून कितीदा
+१
नाव बदल म्हणून कितीदा सांगायचे हो अर्धवटराव....???
(स्वगतः आता या अर्ध्याला अहो अर्धवटराव म्हणावे लागणार थोडे दिवस तरी.)
बाकी सगळ्यांची सगळीकडची 'कलादालने'(जाऊन आल्याच्या जाहिराती?) बघितली तरी झाडांचा हिरवा रंग, तसेच दगड, तेच निळे पाणी (भारतातही 'वर्जिनली' पाणी निळेच हो), आणि मुख्यत्वे तशीच माणसेही दिसतातच.
बदल तपशीलात, तत्व तेच. दागिने वेगवेगळे, सोने तेच.
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
नाव बदल म्हणून कितीदा
नाव बदल म्हणून कितीदा सांगायचे हो अर्धवटराव....???
(स्वगतः आता या अर्ध्याला अहो अर्धवटराव म्हणावे लागणार थोडे दिवस तरी.)
अर्ध्या खरंतर परिपक्व आहे म्हणूनच मित्रांनी त्याला मजेत अर्ध्या म्हटल्याचा राग येत नसावा.
-पुण्याचे पेशवे
हो
काही अपरिपक्व माणसं असं स्वतःचं समाधान करून घेतात असं मी ऐकलंय.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
असेलही पण आमचा अर्ध्या
असेलही पण आमचा अर्ध्या परिपक्व आहेच हो.
-पुण्याचे पेशवे
छानच विनोद झाला !!!
छानच विनोद झाला !!!
मानसी
पुढ्च्या भागाच्या प्रतीक्षेत
पुढ्च्या भागाच्या प्रतीक्षेत
हा हा हा हा!!!!!
हा हा हा हा!!!!!
च्यायला हैट्ट है! मुजरा
च्यायला हैट्ट है!
मुजरा स्वीकारावा म्हाराज..
क्या बात.
(‘२२१बी, बेकर स्ट्रीट’ वर मात्र अजूनही जायचंय एकदा तरी )
मलाही. चला तिकडेच करूया का पुढचा कट्टा.
अवांतर: बाकी तुम्ही छत्रपती कुठले, सातारचे की कोल्हापूरचे? नाही पुण्यात असता म्हणून विचारले. तसे पुण्यात काही स्वयंघोषित अष्टप्रधान आहेत पण ते तुमचे की दुसर्या छत्रपतींचे ते माहित करून घ्यावे म्हणतोय.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मस्त लेखन पुढचा भाग कधी ?
मस्त लेखन
पुढचा भाग कधी ?
हाहाहा!
हाहाहा!
अफ्रिकन लोकांची बौद्धिक पातळी
अफ्रिकन लोकांची बौद्धिक पातळी स्वानुभवल्यामुळे ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं नाही.
तेंव्हाच हा टार्या ह्या गोष्टी झेलायला तयार झाला .. ( हे कोणत्या वाक्याच्या चालिवर ऐकायचं म्हाहित्ये नं ?)
आहो जेंव्हा या लोकांनी युजर अॅक्सेप्टंस टेस्टींग , जी क्लायंट ने करायची असते , ती देखील माझ्याकडुन करुन घेतली आणि म्हणाले की आम्ही सह्या करु
व्वा लै भारी... पुढचा भाग
व्वा :greenface लै भारी...
पुढचा भाग टाका लवकर...
मस्तच, > अगदी अगदी
मस्तच,
<<<(‘२२१बी, बेकर स्ट्रीट’ वर मात्र अजूनही जायचंय एकदा तरी )>>>> अगदी अगदी होम्सरावांना भेटणं तर शक्य नाही, तिथे त्यांचं (कथा कल्पनेतलं) घर शोधायला मलाही जायचय एकदा.
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
+ १ असेच म्हणतो.
+ १ असेच म्हणतो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."