कुंडलीने घात केला

0
0

कुंडलीने घात केला-गझल

कसा कुंडलीने असा घात केला
दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला

असे वाटले की शिखर गाठतो मी
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला

विचारात होतो, अता झेप घ्यावी
तसा पाय मागे कुणी खेचलेला

खुली एकही का, इथे वाट नाही
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?

पटू संसदेचा, तरी दांडगाई
म्हणू का नये रे तुला रानहेला?

दिशा दर्शवेना, मती वाढवेना
कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला?

"अभय" चेव यावा अता झोपल्यांना
असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला

गंगाधर मुटे
...................................................
(वृत्त-भुजंगप्रयात)

>>असे वाटले की शिखर गाठतो

1

>>असे वाटले की शिखर गाठतो मी
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला

विचारात होतो, अता झेप घ्यावी
तसा पाय मागे कुणी खेचलेला

खुली एकही का, इथे वाट नाही
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?

वा !

सुंदर ओळी !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुंदर

2

सुंदर. वृत्तद्ध रचना जास्त भावते.


आपला स्नेहांकित...
-अशोक

छान...

3

छान...

मस्त

4

मस्त

+१

5

+१

मस्तच.. आवडेश.

6

मस्तच.. आवडेश. हास्य

धन्यवाद

7

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांचे. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

मस्तं हो..

8

गझल आवडली.
मला एकदा गझल तयार करायची आहे. बघू या जमते कां ?

स्वागत आहे.

9

गझलेच्या प्रांतात आपले स्वागत आहे.
http://marathigazal.wordpress.com
माझ्या या ब्लॉगवर गझलविषयक तांत्रिक सहाय्य
उपलब्ध व्हावे या हेतुने तेथे काही लेखांच्या लिंक दिल्या आहेत.

कधि वेळ मिळाल्यास बघाव्यात. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.