विकांताची खादाडी : काळ्या मसाल्याची वांगी !!!

0
-1

खर तर सदर प्रांत आमचा नाही , गणपा, दिपाली आणी ढब्बो...आपल हे..प्रभो..ह्यांचा wink
पण सहज कोणीतरी आठवण काढली आणी घुसलो आम्ही स्वंयपाक घरात..तिथे शिरल्यावर जाणीव झाली आम्ही ही काहीतरी बनवितो की..चला तर मग करूया सुरवात ..

साहित्य :
दोन पेग ..आपल हे ...दोन कांदे..Sad (गटारी फिव्हर) टीप : कांदे जरा 'तेज'घ्या !! आणी कापताना पाण्यात टाका.
लसुन
अद्रक
कडीपत्ता
कोंथंबिर
काळा तवा
कढई/पातेल//कुकर/भगोणे/घमेल ..सॉरी टॅम्प्लिज..नो घमेलं
दिड ग्लास पाणी (किचन छोटे असल्यास पाच ग्लास ..नाही म्हणजे बाकीचे स्वतालाच प्यायला किंवा मग बॅचलर असाल तर 'त्यात' टाकायला !!)
गॅस (खरोखरचा wink , चुल, स्टोव्ह ही चालेल)शेगडीसकट !!
डोकं (प्रमाण ओळखण्यासाठी.)
मिरची पुड

कृती :

सर्वात पहिले कांदा भाजुन घ्यावा

.a

भाजत रहा .मध्ये-मध्ये थोडं-थोडं,कांदा,जळुन,कंम्प्लिटली काळा पडणार नाही म्हणुन,पर्‍यासारख...आय मीन.. तेल ओतत रहा.हा पदार्थ बनविताना हा सगळ्यात काळजीचा भाग आहे, जरा कांदा काळा पडला की भाजी कडवट होऊ शकते,कांदा परतताना लाल तर झालाच पाहिजे,पण जास्तीचा काळा पडायलो नको, जर पडलाच तर गप डाळ बनवावी आणी वरनं तोच काळपटलेला कांदा टाकुन द्यावा ..गार्निश म्हणुन (गार्निशचा अर्थ गणपाला विचारा.)अरे हो एक सांगायच राहिल ,कांद्याच्या चकती लांब-लांब कापल्या की जरा बर असत.भाजण्याला चव येते !!

B

डन !! आता तो कांदा एखाद्या कटोरीत काढुन घ्या.त्यात,लसुन(सोललेला, टाकाल नाहीतर दक्षिणात्य जेवणप्रकारासारखा)अद्रक,ज्याला शुध्द भाषेत 'आले' म्हणतात, त्याच्या चिरा करुन टाका.सरते शेवटी कोंथंबिर, खुडून टाकायची,कापायची नाही,आपण मेथी किंवा शेपु बनविताना हिरवट दांड्याही टाकतो त्या टाकायच्या नाहीत.बाकी आपली मर्जी !!)

c

त्याची मिक्सर मध्ये पेस्ट बनवा , नसेल तर हाताने वाटुन घ्या ...त्यास थोडा ब्राऊनिश कलर आला पहिजे ..अरे हो पावसाळ्यात मी ह्याच्यात अद्रक जरा जास्त टाकतो ..त्यामुळे असाही कलर येऊ शकतो..

d

आता मुख्य पाककृती कडे वळुयात.
वांगी घ्या !!
चिरा !!(जशी आवडतात तशी, मला शेपटीसकट आवडतात,म्हणुन मी दोनदा ऊभ्या आडव्या चिरा मारल्या, आपल्या हवे असल्यास तुकडे ही करू शकता !!)
कढई/पातेल//कुकर/भगोणे गॅसवर ठेवा !!
गॅस स्लोवरच असायला हवा !!
तेल ओता !! [(जे प्रमाण असेल ते, मी दोन वांग्याना दोन कढची(तेलासाठी एक स्पेशल-टाईपची पळी टाकतो)]
त्यात कडीपत्ता टाका.
कड-कड असा आवाज आल्यावर फोटो क्र. ४ मधील मिश्रण टाका. मिश्रण हलवत रहा,पातेल्याला लागु देऊ नका.
थोडासा रंग पालटल्यावर, चिरलेले वांगे टाका.
वांगे एकजिनसी होईपर्यंत हलवत रहा !!
एकजिनसी झाल्यावर, लाल मिरची पुड टाका !!
पुन्हा एकजिनसी होईपर्यंत हलवत रहा !!
मग मीठ टाका !!
पुन्हा एकजिनसी होईपर्यंत हलवत रहा !!
आता पाणी टाका !!
प्रमाण स्वता ठरवायच आहे !! टीप : वांगे वाफेमुळे देखील शिजतात.
(तुम्ही म्हणाल फोटो कुठायत , बॉस हे सगळ ईतक पटापट कराव लागत की फोटो काढायला वेळच नसतो,आणी म्या रुम वर एकटाच आहे रे !! )
एक सिगरेट मारुन परत या !!
गॅस बंद करा !!
गरमागरम ' काळ्या मसाल्याची वांगी ' तयार .......

f

d

हाच पदार्थ आपण मटणाबरोबरही बनवु शकता !! फक्त मटन आधी 'अर्धवट' शिजवुन घ्यायचे .पण चिकनला मात्र काळ्या मसाल्याबरोबर चव येत नाही.
असो ..

पुढच्या विकांतास ...
राजस्थानी भेंडी !!

{झणझणीत मसालेबाज पाककृती आवडली}

1

सिगरेट मारुन परत या.
गॅस बंद करा.

सुहास

... हा वाचकांसाठी लिहीलेला पाककृतीतला भाग आहे ? कां कोणी तुला दिलेली आज्ञा आहे ?

{कां कोणी तुला दिलेली आज्ञा}

2

कां कोणी तुला दिलेली आज्ञा आहे ? >>>

दोन्हीही नाही !!

वांगे शिजायचा 'टायमिंग' आहे तो !!

{ह्म्म्म्म !! रेसिपी मस्तय}

3

ह्म्म्म्म !!
रेसिपी मस्तय खायला यायला हव एकदा........चायला पण यातल्या काही गोष्टी आम्ही केल्या तर
काय होईल याचा विचार कर की जरा Laughing out loud

{कांदा जरा बारिक चिरत जा हो !!}

4

कांदा जरा बारिक चिरत जा हो !! Big smile

{कांद्याच्या चकती लांब-लांब}

5

कांद्याच्या चकती लांब-लांब कापल्या की जरा बर असत.भाजण्याला चव येते !! >>>

काय ग !! हे तु म्हणतीयेस !! भाजलेल्या कांद्याची चव जाते ना ग !!

{आमच्या आवडीची ताटली आहे}

6

आमच्या आवडीची ताटली आहे ही.
सुहास अद्रक च्या ऐवजी आले म्हण बाबा. दुरूस्त कर वर.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{अरे वा}

7

बाळ्या पण स्वैपाक शिकायला लागला. काही खरं नाही आय टी पुरूषांनी स्वैपाकाचे भलतेच मनावर घेतलेले दिसते.
बाकी गटारीच्या तोंडावर चिकनची डिश द्यायची सोडून वांगं? अरारारा. पार भरीत केलं रे गटारीचं.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{>>बाकी गटारीच्या तोंडावर}

8

>>बाकी गटारीच्या तोंडावर चिकनची डिश द्यायची सोडून वांगं? अरारारा. पार भरीत केलं रे गटारीचं.

हेच म्हनतो...

{असेच म्हणतो.}

9

असेच म्हणतो.


Hope is a good thing...

{तोंडाला पाणी सुटले रे !}

10

ए अरे, साहित्यात वांगीच नाहीत तर टाकायची कुठून ? wink
आणि फोडणीत बचकभर जिरं मोहरी टाकली की अजून मस्त होते भाजी.

अशी भाजी चुलीवरचीच खायची असते. म्हणजे एक अप्रतिम असा खरपुस वास पण त्याला येतो. तो चुलीवरच येतो. गावाकडची आठवण आली. अशी भाजी नि गरम भाकरी , सोबत लसणाच्या पातीची चटणी आणि घट्ट दही

फोटोत हात घालायची सोय का नाही ????

(जम्बो आकाराच्या पांचट वांग्यांना नि हॉटप्लेटीवरच्या सैपाकाला कंटाळलेली)

माया


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{आँ}

11

साहित्यात वांगीच नाहीत तर टाकायची कुठून ?
अहो साहित्यात तर भरपूर वांगी - खरेतर त्यांचं भरीत - असतं की, कुठल्याही भाषेतील साहित्य घ्या.
असो. तुम्हाला सामग्री म्हणायचे होते का?


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{ररा,}

12

ररा, Big smile


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{अहो मायावती, सहित्यातलि नाहि}

13

अहो मायावती, सहित्यातलि नाहि तर पुराणातली वान्गी टाका की

{आयला केवढा हसलो मी फस्सकन नाव}

14

आयला केवढा हसलो मी फस्सकन नाव वाचुन.

वा वा, मस्त नाव... आजपासुन 'महा'माया बंद, माया'वती' चालू.

{ओ अतुलनीय ! सरळ माया म्हणा की}

15

ओ अतुलनीय ! सरळ माया म्हणा की राव ! angery दुसर्‍या धाग्यावर आधीच माया ची 'मैय्या' झालीये !

अर्ध्यामुर्ध्या, मायावती काय angery


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{एवढ रागाउ नका हो, आदराने}

16

एवढ रागाउ नका हो, आदराने म्हन्टल.

{वांग्याची भाजी नाय आवडत..बाकी}

17

वांग्याची भाजी नाय आवडत..बाकी रस्सा छान झालेला दिसतोय

{लै भारी... फोटोत तर मस्त}

18

लै भारी... फोटोत तर मस्त दिस्तेत वांगी...रश्यासकट ... तोंडाला पाणी सुटलं..

{व्वा व्वा! मस्त झालीये. आता}

19

व्वा व्वा! मस्त झालीये.
आता भरलेली वांगी टाका कोणीतरी, पाहुन तरी पोट भरेल. हास्य

{वा वा भाजी दिसतीए तर मस्त यात}

20

वा वा भाजी दिसतीए तर मस्त
यात दाण्याच कुट नाही का घालाय्च thinking

{अरे वा मिळाला का सुहासषेटला}

21

अरे वा मिळाला का सुहासषेटला मिमवर लिहायला वेळ ?

{सुहासषेटला मिमवर लिहायला वेळ}

22

सुहासषेटला मिमवर लिहायला वेळ ? >>>

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
नानबा आज पेटलय माझ्यावर ब्वा !!

...

राक्या, भात-क़टाळा असा कामी येतो !!

{सुहाश्या, लै भारी ब्वॉ... अन}

23

सुहाश्या,
लै भारी ब्वॉ...
अन ही पाकृ कुठे बेंगलोरात केलीस की काय? भाताला कंटाळुन? wink

{नाही}

24

बहुतेक वांगी-मसाला+भात असा बेत असावा.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{किंवा वांगी-मसाला आणि डोसा.}

25

किंवा वांगी-मसाला आणि डोसा. हास्य


-पुण्याचे पेशवे

{मस्त.}

26

मस्त पाककृती!
बाकी आयटीत भराभर प्रगती होत आहे पाककलेची!
अवांतर : पुढची पाककृती कधी?

{तेलासाठी एक स्पेशल-टाईपची पळी}

27

तेलासाठी एक स्पेशल-टाईपची पळी टाकतो
यातला टाकतो कंसाच्या बाहेर पाहीजे. wink
(प्रूफरीडर)पेशवे

त्यात कडीपत्ता टाका.
कढीपत्ता दूरूनच टाका. कारण काड काड आवाज झाल्यावर गरम तेल अंगावर उडू शकतं.
(सावध) पेशवे

वांगे एकजिनसी होईपर्यंत हलवत रहा !!
आयला वांगं एकजिनसी कस्काय होईल बॉ? शिजून पीठ झाले तरच ते एकजिनसी होईल.
(कूक)पेशवे

पाकृ मस्तं.
(आस्वादक) पेशवे

सुहाश्या आयटी नवरा झाला काय? wink
(तेलओत्या)पेशवे


-पुण्याचे पेशवे

{आपण मागल्या एखाद्या जन्मात}

28

आपण मागल्या एखाद्या जन्मात कंस होता का? wink

{+१}

29

>>सुहाश्या आयटी नवरा झाला काय?

तो सद्ध्या बायकोपासुन दुर असलेला आयटीतला नवरा झाला आहे.
आणि नवरा आयटीत असला की स्वयंपाक यायलाच हवा असा कायदा येणार आहे म्हणे. wink

{छान केले आहे.}

30

छान केले आहे.

{मस्त, वांगी लज्जतदार}

31

मस्त, वांगी लज्जतदार दिसतायत... सिगरेट मारायची नसल्यास वांगी कशी शिजवायची हे तेव्हडं सांगता का Oups
राजस्थानी भेंडीच्या प्रतिक्षेत..


पुष्करिणी