गोभी मसाला

0
0

नमस्कार मंडळी ,

पेश करत आहे बॅचलरी सैपाकाच्या मालिकेतील एक डिश - गोभी मसाला

साहित्यः
१. एक मोठा कांदा - हवा तसा चिरून
२. एक मोठा टोमॅटो - हा पण हवा तसा चिरून
३. अर्धा किलो फ्लॉवर - हा पण हवा तसा चिरून
४. मीठ, तिखट चवी/कॅपॅसिटी नुसार
५. दोन चिमुट हळद
६. एक चमचा गरम मसाला
७. एक चमचा अशोकचा सब्जी मसाला
८. कडिपत्ता, कोथिंबीर
९. दोन मिरच्या चिरून - हव्या तश्या चिरून
१०. तेल , जिरे - फोडणीसाठी
११. आलं-लसूण पेस्ट
वरच्या लिस्टमधील मसाल्याच्या गोष्टी कमी असल्यास त्याप्रमाणात सब्जी मसाल्याचे प्रमाण वाढवा.. हास्य

कृती :

एका चोत्या छोट्या कुकरमधे तेल + जिर्‍याची फोडणी करा.
त्यावर कांदा लाल होईपर्यंत परता. त्यात टोमॅटो टाकून परता. कांदे-टोमॅटो शिजले की त्यात फ्लॉवर सोडून सर्व गोष्टी टाकून दोन मिनीट परता.

आता त्यात फ्लॉवर आणी एक वाटी पाणी टाकून कूकर लावा. एक शिटी झाल्यावर कूकर बंद करा. सर्व वाफ (वायू नाही wink ) सरली /झाकण पडलं की मंद आचेवर उरलेलं पाणी अटवा. दहा-पंधरा मिनिटात गोभी मसाला तयार....

घरी असाल तर तर आईने बनवलेल्या पोळ्या, बाहेरगावी असाल तर पोळीभाजी केंद्रातल्या पोळ्या , परदेशात असाल तर फ्रोजन आणून गरम केलेल्या पोळ्या/पराठ्या सोबत लुटा लुफ्त गोभी मसाल्याचा ... गोड आवडत असल्यास सोबतीला काहीतरी विकत आणलेलं / घरी बनवलेला गोड पदार्थ घ्या. गेला बाजार तुप-साखर्,दही-साखर, गुळ-तुप घ्या...आणी ऐश करा....

मस्त रे! माझी आवडती भाजी

1

मस्त रे!

माझी आवडती भाजी Sad

कारण दिल्ली साईडला सर्वात कॉमन भाजी म्हणून

खरं फोटोत मस्त दिसत आहे, एक भाकरीचा तुकडा मोडावा व भाजी उचलावी असे वाट्त आहे हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्तं रे प्रभ्या. तिकडं आलो

2

मस्तं रे प्रभ्या. तिकडं आलो तर तुझ्याकडेच रहायला येईन म्हणतो.


-पुण्याचे पेशवे

मस्त रे प्रभो... काय पटवली

3

मस्त रे प्रभो... काय पटवली का?

आणि आय्टीवाली आहे की काय ?

4

आणि आय्टीवाली आहे की काय ?

मस्त

5

मस्त केलीयेस भाजी!
अवांतर : काय लग्न ठरलय की काय?

+१

6

+१

मस्त रे

7

तुला इतका स्वयंपाक जमत असेल आणि तुझी लग्नाची गरज येथील काही सदस्यांच्या व्याख्येप्रमाणॅ 'जेवणाच्या सोयी'पाशी संपत असेल तर तुला लग्नाची गरज नाही असे वाटते. wink

धन्यवाद मंडळी

8

धन्यवाद मंडळी

वा वा..छानच दिसते आहे भाजी.

9

वा वा..छानच दिसते आहे भाजी.

छान छान पाकृ टाकण्यार्‍या

10

छान छान पाकृ टाकण्यार्‍या पुरुषांचे प्रमाण वाढते आहे, म्हणजे पुरुषांनी या विभागात सुद्धा स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले आहे. राहिला प्रश्न रिप्रोडक्शन्चा, तर तोदेखील भविष्यात सुटणार आहे म्हणे. चला तर मग, अखंड स्त्रीजातीला हळु हळु तुच्छ सांसारीक विवंचनांमधुन मुक्ती देऊयात.
अशीच प्रगती होत राहिली तर हे पुरुष लोकांनो तुम्हाला लग्नासारख्या असह्य जाळ्यात अडकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर पुर्णपणे आणि यशस्वी रित्या उभे रहाल (स्टँड अलोन अ‍ॅप्लीकेशन सारखे) wink.

(पळा आता.. होतोय धिंगाणा) wink

ओता तेल तुम्ही

11

ओता तेल तुम्ही wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हॅ हॅ हॅ

12

स्टँड अलोन अ‍ॅप्लीकेशन सारखे
वा रं बाला. काय उपमा दिलीये. क्लायंट्-सर्वर अ‍ॅप्लिकेशन नसू दे हो, पण मग तुम्ही 'क्लाउड कम्प्युटिंग' करणार की नाही? wink

मला उग्र वासामुळे कोबी

13

Big smile मला उग्र वासामुळे कोबी अजिबात आवडत नाही ..पण ही भाजि छान दिसतेय..

पण ही कोबीची भाजी नाही आहे.

14

पण ही कोबीची भाजी नाही आहे. Big smile

चायला हे असे कसे झाले

15

Laughing out loud चायला हे असे कसे झाले

हा हा हा.. होतं असं चुचु..

16

हा हा हा.. होतं असं चुचु.. लक्ष तिकडे 'प्राक्तनकर्त्या'त गुंतलेलं असताना प्रतिसाद दिल्यावर असंच होतं! Big smile

अरे कशाला त्याला बदनाम

17

Laughing out loud अरे कशाला त्याला बदनाम करता....मला तर केले आहेच तुम्ही Stare

आज ट्राय केला.

18

आज ट्राय केला.

Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

स्मायली बघऊन कसा झाला असावा

19

स्मायली बघऊन कसा झाला असावा ह्याचा अंदाज येतोय.. wink

हॅ हॅ हॅ ! कोबी नव्हता म्हणून

20

हॅ हॅ हॅ !

फ्लॉवर / कोबी नव्हता म्हणून बटाटा ट्राय केला होता Laughing out loud

मीठ जास्त झाले Sad

पानी कमी झाले.... Crazy

शेवटी जळले सगळ्ले.... गॅस बंद करायला विसरलो Evil


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कोबी नाय मालक...त्याला मराठीत

21

कोबी नाय मालक...त्याला मराठीत फ्लॉवर म्हणत्यात.. Big smile

तेच ते रे.

22

तेच ते रे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आता काकू आल्या की मरतोय राजा

23

Laughing out loud

Laughing out loud

आता काकू आल्या की मरतोय राजा

पर्भो

24

तु पण बलाव झालस तर एकदाचा. फोटो व कृती दोन्ही छान आहेत.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मस्त केलीयेस भाजी!

25

मस्त केलीयेस भाजी!

प्रभो... तिकडे उसगावात कधी

26

प्रभो... तिकडे उसगावात कधी वेळ मिळतो रे तुला हे सगळं करायला wink


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

वेळच वेळ असतो रे...हापिसातून

27

वेळच वेळ असतो रे...हापिसातून घरी आल्यावर काम काय दुसरं??? wink

सजेशन...

28

वेळच वेळ असतो रे...हापिसातून घरी आल्यावर काम काय दुसरं???

तू एक मैत्रिण का नाही करत छानशी?
तुला ही भाजी येतेय म्हटल्यावर कोणीपण तयार होईल!!!

आजच केली हि भाजी. लाल मिरच्या

29

आजच केली हि भाजी.
लाल मिरच्या नव्हत्या म्हणून हिरव्या वापरल्या, कांदा या भाजीत चांगला लागेल का नाही हि शंका आली म्हणून नाही घातला, आले लसून पेस्टच्या ऐवजी बारीक कापून घातले, कढीपत्ता घालायचा विसरले, टोमाटो मात्र वापरला.

छान झाली भाजी...एकदम सोपी करायला...कुकर लावला कि झालं. हास्य