ह्या लाजीरवाण्या घरात....

0
0

२/३ दिवस घरी काही कारणामुळे लवकर जात होतो रात्रीचा, त्यामुळे टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रासही सहन करावा लागला हो ! परमेश्वरा, अरे काय अर्थहीन आणी महामुर्ख मालीका असतात हो ह्या टि.व्हि. वर.
एक मुलगा अपंग, एका मुलाची बायको माहेरच्या श्रीमंतीचा प्रचंड माज असलेली आणी त्याला कयम चुकीचे सल्ले देणारी, मुलगी वेडी आणी हरवलेली, वडिलांना अर्धांगवायुचा झटका आलेला आहे आणी ते कमी कि काय म्हणुन ते तुरुंगवारी सुद्धा करुन आले आहेत येव्हड्यातच. आणी मालीकेचे नाव काय तर म्हणे 'ह्या गोजिरवाण्या घरात'. डोंबलाचे गोजिरवाणे ? मालिकेचे नाव सोडले तर सगळे लाजिरवाणेच आहे !

आणी एक मालीका, नाव काय तर असंभव. ह्या असल्या मालीका फक्त आपल्याकडेच पाहणे संभव आहे हो ! कवट्या, हाड, पुनर्जन्म, करणी हे अगदी इतक्या सहजपणे दाखवले आहे कि वाटावे, प्रत्येक २ घर सोडुन एका घरात कोणीतरी निलम शिर्के राहाते. आणी तो आनंद अभ्यंकर नी काढलेला म्हातार्‍याचा आवाज ऐकला न कि त्याला पटकन "चालला का काय? नाहि म्हणजे वैकुंठात मोघे गुरुजींना फोन करतो !" असेच म्हणावेसे वाटते.

तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कशी रोगाची साथ पसरते ना तशी ह्या मालिकात कथाकथनाची साथ पसरते, म्हणजे 'ह्या' मालिकेतल्या नायिकेचा छोटा मुलगा पळवला गेला कि 'त्या' मालीकेतल्या नायिकेचा पण पळवला गेलाच. हिच्या नवर्‍याला अपघात झाला कि तिकडे तिच्या नवर्‍यानी छातीवर हात दाबलाच म्हणुन समजा !

मला तर कधी कधीना हे निर्माता दिग्दर्शक विक्रुत असतात का काय अशी शंका येते ! तुम्हि बघा हि लोक बाईला व्यवस्थीत बाळंत म्हणुन होउन देत नाहित. कुठलीही मालिका बघा, बाईला दिवस गेले रे गेले कि ६ महीन्यात ती जिन्यावरुन पडलीच पाहिजे, नाहितर कोणाला तरी अपघातातुन वाचवताना पोटावर तरी पडली पाहिजे. एक तरी नायिका सुखरूप आणी आजुबाजुला सासु, नवरा काळजी घ्यायला खंबीर असताना बाळंत झालेली दाखवली तर टि. आर. पी. कमी होतो का ?

हिला (जर जिना, अपघात, विषप्रयोग ह्यातुन वाचली तर) बाळंत पणाला डॉक्टरनी ऑपरेशन थेटर मध्ये घेतले रे घेतले की तिकडे कोणीतरी गचकलेच म्हणुन समजा. नाविन आत्मा जन्माला आलाच नाहि पाहिजे ! इकडे आत्मा मुक्त झाल्याबरोबर तिकडे "ट्यॅहॅ ट्यॅहॅ " चा आवाज चालु ! तो स्रुष्टिकर्ता सुध्दा हाताची ५ बोट तोंडात घालुन बसत असेल आश्चर्यानी.

मी मध्ये एक मालिका बघत होतो साधारण २ महिन्यापुर्वी ची गोष्ट आहे, त्या दुखी:यारी नयिकेचा नवरा अपेयपान करुन गाडी चालवत असताना अपघातग्रस्त होउन दवखान्यात आता जातो का माग जातो (जा बाबा एकदाचा) अशा अवस्थेत पडलेला असतो. ह्याचा बापुस डॉक्टरला हुकुम सोडतो "पैसे कि चिंता मत करो लेकिन मुझे मेरा बेटा जिंदा चाहिये."

खरे सांगु का, संपुर्ण भागात ह्या एकाच शॉट चे आम्हाला कौतुक वाटले, अशा अवस्थेतही त्या बापानी डॉक्टरच्या चेहर्‍यावरील पैशाची काळजी ओळखली. प्रचंड हसर्‍या चेहर्‍याने डॉक्टर सांगतो "मुझे पता है ठाकुर साहाब, और दुनीया के सबसे डॉक्टर इस वक्त यही मौजुद है." ह्याला म्हणतात नशीब ! आम्ही साधी कधीतरी भेळ खायला म्हणुन प्लॅनींग करुन गेलो कि हमखास आमच्या नशीबात कुलुप ! आणी च्या आईला इकडे लगेच दुनिया का सबसे बडा डॉक्टर मौजुद.

बडा डॉक्टर आहे म्हणजे तो ह्रुदया पासुन मुळव्याधी पर्यंत सगळ्याचा इलाज करत असणार अशी आम्ही मनाची समजुत घालुन घेतली. हान तर हा सबसे डॉक्टर मग ह्या हिरोला ऑपरेशन थेटर मध्ये घेतो, बाहेर हिरो कि मॉ आणी बायको भगवान श्रीक्रिष्ण की चरणोमे पडलेल्या. कॅमेरा एकदा थेटर वरच्या लाल दिव्यावर मग एकदम ECग़ मशीन वर आणी मग एकदम उड्डाण करुन क्रुष्णा च्या हसर्‍या आणी आश्वासक चेहर्‍यावर.

ECG मशीनची लाइन आमच्या आठवी नववी इयत्तेमधल्या आलेखा सारखी वाकडी तिकडी खालती वरती नाचायला लागते, डॉक्टर लोग जमतील तेव्हडे मुर्ख भाव आणुन एकमेकांकडे बघायला लागतात, जणु आन्खो के सामने हे असले काहि पहिल्यांदाच घडत आहे. आणी अचानक भयप्रद संगीत वाजायला लागते आणी ECG ची रेषा गप्प होते. येकदम फ्लॅट------

"आय.एम.सॉरी" दुनिया का सबसे बडा डॉक्टर म्हणतो आणी ताडताड दरवाजा उघडुन निघुन जातो ! श्रीक्रुष्णा समोर फडफडणारी ज्योत शांत होते. माता, अर्धांगीनी एकत्र किंचळतात "नह्हि !!" ज्यु. डॉक्टर बाहेर येउन सांगतात "बहोत कोशीश कि हमने, लेकीन ऑपरेशन के वक्त हि उन्हे जोर से हार्ट एटॅक आ गया और हार्ट बंद पड गया. हम उन्हे नही बचा पाये."

अर्धांगीनी धावत धावत अर्धांगाच्या रुम कडे धावतात. (येव्हड्या कमी वेळात त्याचे शरीर टाके घालुन परत रुम मध्ये आणुन ठेवणार्‍या वॉर्डबॉय आणी डॉक्टरांना आमचा मानाचा मुजरा) अर्धांगीनी वेळ न घालवता अर्धांगाच्या शरीरावर पडुन त्याला "ऐसे कैसे मुझे अकेला छोर के चले गये ? भूल गये जिवनभर साथ निभाने का वादा किया था आपने ? आब मै किसके सहारे जिउंगी ?" असे प्रश्न विचारु लागते, मग काहि काळ नशिब व देव ह्यांना कोसले जाते. आणी मग संताप आणी रागाच्या भरात ती आपले दोन्ही हाथ नवर्‍याच्या छातीवर आपटुन बांगड्या फोडते...

देवा महाराजा ऐका सती सावित्रीची पुण्याई, बांगड्या छातीवर आपटताच ECग़ मशीनची लाईन परत उड्या मारु लागी, उड्या मारु लागी हो, जी जी जी.....
हो तुम्ही वाचताय ते सत्य आहे, डोळे चोळु नका ! तिने हाथ आपटल्या बरोब्बर सत्यवानाचे ह्रुदय कि धडकन लगेच परत चालु. अरे दुनिया का सबसे बडा डॉक्टर गेला तेल लावत, अरे पाहिजे कशाला हे सबसे बडे डॉक्टर आणी त्यांचे महाग इलाज ? मेला हार्ट एटॅकनी माणुन कि न्या हिला तिकडे आणी लावा आपटायला हात छाताडावर ! अरे हाय काय आन न्हाय काय !!

आयला ,पंच हैत का काय

1

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

आयला ,पंच हैत का काय ?माझ्यासारख्या 'खडुस'ला आफिसात ईतक दाताड काढुन हसताना बघुन शेजारच्या पीसिवाली खाली सांडली. माझ्या कलीगला चक्कर आली,आणी मॅनेजरीण बाईच थोबाड नुकतच चुना मारलेल्या भित्ताडागत पांढर पडलय !!

हिच्या नवर्‍याला अपघात झाला कि तिकडे तिच्या नवर्‍यानी छातीवर हात दाबलाच म्हणुन समजा ! >>>

Laughing out loud

बडा डॉक्टर आहे म्हणजे तो ह्रुदया पासुन मुळव्याधी पर्यंत सगळ्याचा इलाज करत असणार अशी आम्ही मनाची समजुत घालुन घेतली.>>>

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

क ह र !!

कॅमेरा एकदा थेटर वरच्या लाल दिव्यावर मग एकदम ECग़ मशीन वर आणी मग एकदम उड्डाण करुन क्रुष्णा च्या हसर्‍या आणी आश्वासक चेहर्‍यावर. >>>
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

त्यापेक्षा भयाण म्हणजे वेगवेगळ्या अ‍ॅंगल्स ना वेगवेगळे पार्श्वसंगीत ..विशेषता कृष्णाला बासरीवादन...

काहीही असुदे ..मी पहाते अश्या

2

Big smile काहीही असुदे ..मी पहाते अश्या मालिका.... माझ कुन्कु..होहो..माझ कुन्कु Party
आणी सध्याच्या अजुन आवडणार्या..माझिया प्रियाला प्रित कळेणा व लज्जा.
मी भाग्यलक्शी सुढ्हा पहाते Laughing out loud

दे टाळी, मी पण पहाते. आता

3

दे टाळी, मी पण पहाते. आता माझ्याकडे मराठी चॅनल नाहीये पण तत्सम हिंदी मालिका पहाते..मराठी सिरीयल मध्ये काही महत्वाचं(?) घडलं असेल तर मी जेंव्हा फोन करते तेंव्हा आई फोनवर सांगते अशा घडामोडी.


पुष्करिणी

चुचे, एकदा संध्याकाळी बायको

4

चुचे,
एकदा संध्याकाळी बायको घरात येउन गडबडीनं म्हणाली, मला कुंकू लावायचय म्हणुन, मी चांगलेपणाने म्हणालो करंडा देवापाशी आहे (आणि मॅगी करुन खाल्लं त्या दिवशी)

अवांतर - (किंवा खरंतर मुद्द्याचंच - बंदुक केवढ्याला मिळते हो, च्यायला ह्या मालिका वाल्यांना गोळ्या घालुन मारायची खुप ईच्छा आहे )

>>च्यायला ह्या मालिका

5

>>च्यायला ह्या मालिका वाल्यांना गोळ्या घालुन मारायची खुप ईच्छा आहे

+१ मलापण आहे अशी इच्छा..........हास्य भंकस मालिका आहेत या

कुंकु

6

आमच्या औफिसमधल्या एका विवहित महिलेला एकदा कामानिमित्त संध्याकाळि थांबावे लागले. थोड्या वेळाने तिने डायलोग टाकला
"माझ कुंकु गेलं..."


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

अग्ग्गग्ग्गा !

7

Laughing out loud

अग्ग्गग्ग्गा !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

थोड्या वेळाने तिने डायलोग

8

थोड्या वेळाने तिने डायलोग टाकला
"माझ कुंकु गेलं..." >>>

Laughing out loud (ईथे पाच-एकशे लोळ्णार्‍या स्मायली कल्पाव्यात)

पराग !! एक नंबर रे !!

मेलो खरोखरच मेलो हा किस्सा

9

मेलो खरोखरच मेलो हा किस्सा ऐकून.


-पुण्याचे पेशवे

किती बरे आहे, इथे नरकात....

10

माझ कुंकु गेलं...वाचल्यावर हसुन हसुन मेलो बघा,

इथे नरकात यमराजा पर्यंत या मालिकांची माहिती अजुन पोचली नाही हे किती बरे आहे, बाकी सार्‍या शिक्षा सहन होतील हो पण या मालिका? Crazy

ओss, कुठे घुसताय?

11

ओss अर्धवटराव, अहो, कुठे घुसताय, दिसत नाही का रांग किती मोठी आहे ती, तुम्हाला माहीत नाही वाटत, ही रांग मालिका बनवणाराना गोळ्या घालायसाठीच तर आहे, कवाधरनं हुबं हायेत लोक सारे, जा मागे रांगेत उभे र्‍हावा गुमान.( न्हाय तर म्यागी खायची सवय करा ) हांss, आता लय येळ लागला तर मग येक उपाय हायेच आपला शेवटचा, आपलीच बंदुक घ्याची अन..ढिश्क्यांव...
पर त्याआधी आपन नरका मधीच जानार याची खात्री पाहिजे, तिथे नाय या मालिका.

.

म्हणुनच !! माझिया प्रियाला

12

म्हणुनच !!

माझिया प्रियाला प्रित कळेणा >>>>

भावना पोचल्या !! दुखात शामील आहे !!

हुच्च हुच्च हुच्च हुच्च

13

हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud हुच्च Laughing out loud

खॅक खॅक

14

पराभौ दुसर्‍या बाजूने बघता यांचा फायदा आहे. अरे सगळ्या प्रकारचा ड्रामा त्यात असल्याने एक नैसर्गिक उर्मी असते अशा घटनांबद्दल ती परभारे शमते. तसे नसते तर हे सगळे प्रयोग घरात होतील ना, मग अवघड होईल. तुमचे आमचे ठीक आहे हो, धोका नाही, इतरांचा विचार करा राव.
वपुंची एक गोष्ट आहे 'चिंटू' म्हणून त्यात ते म्हणतात तुमची बायको चिंटू (ऋषी कपूर) किंवा अमिताभ वर फिदा झाली तर होऊ द्या त्यामुळे ती शेजार्‍यावर फिदा होण्याचा धोका अनेक पटींनी कमी होतो (जो तुमच्या दृष्टीने मोठा धोका असतो). जरा या दृष्टीने विचार करून बघा. wink
(बायांनो-बापड्यांनो वरील वाक्य वपुंचे आहे, कृपया मला याबद्दल जबाबदार धरू नये. अर्थात खबरदारीचा उपाय म्हणून हेल्मेट घालून बसलो आहे)

ररा, अभ्यास कमी पडतोय. हे

15

ररा, अभ्यास कमी पडतोय. हास्य

हे वाक्य चिंटु ह्या कथेतील नसुन 'अमिताभ' ह्या कथेतील आहे (आणि 'चिंटु' या कथेचं नाव वास्तवीक 'झिंटू' असं आहे.. )
बादवे, लेख वाचुन तुमची प्रतिक्रिया वाचण्याआधी मला येक्षॅक्टली हीच कथा आठवली होती.
(बहुश्रूत) अर्धवट

फक्त मला नाव बरोबर आठवलं होतं हास्य
(खवचट) अर्धवट

बाकी ५०- ६० लोळणार्‍या स्मायली परासाठी..
(हहपुवा झालेला) अर्धवट

आसंल

16

हे वाक्य चिंटु ह्या कथेतील नसुन 'अमिताभ' ह्या कथेतील आहे (आणि 'चिंटु' या कथेचं नाव वास्तवीक 'झिंटू' असं आहे.. )
तुमी म्हंता तसं आसल. लै वर्स जाहली वाचून. आन् आमी फकस्त मुद्याचं त्यवडं ध्येनात ठिवतो. wink

बादवे, लेख वाचुन तुमची प्रतिक्रिया वाचण्याआधी मला येक्षॅक्टली हीच कथा आठवली होती.
WPTA.

(शेजारी) रमताराम

शिर्षक वाचुनच फुटलोय.. लेख

17

Laughing out loud Laughing out loud

शिर्षक वाचुनच फुटलोय.. लेख वाचायला वेळ नाहीये.. उर्वरीत प्रतिसाद लेख वाचल्यानंतर..

परीकथेतील राजकुमार यांच्या सारख्या सुज्ञ आणी विचारी सदस्याकडुन लोकांच्या तनामनापर्यंत पोहोचलेल्या हुच्च मालिकांच्या बाबतचे हे विचार पाहुन अंमळ डोळे पाणावले. त्यांचा तीव्र णीषेढ.

(अगाग्गाअग्गग्गाअग्गग..... काय प्रतिसाद देऊ रे परा.. तु एक नंबरचा "हलकट" आहेस एवढेच म्हणतो बघ.. आपण तुझा पंखा आहोत. wink आणी उद्या संध्याकाळी भेट. पाणवठ्यावर. जाहीर निमंत्रण ) Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

_/\_

18

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

_/\_

(विषय दिलेला नाही)

19

Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud

आज गेट्टू मध्ये मला

20

आज गेट्टू मध्ये मला मालिकेबद्दल बोलता येइल Party
थोडा या लेखाचा अजून अभ्यास करते Laughing out loud Laughing out loud


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

आज पण गेट्टू.. आयला हिला काय

21

आज पण गेट्टू.. आयला हिला काय काम नसतं काय दुसरं..

बादवे, तिकडे मायबोली वर एक मॅडम आहेत, एकदम जबरा फोडतात त्या मालीकांना.

परा, मालीकांवरच लेखमालीका घेता आलीतर बघा एखादी.. मस्त काम होइल. (आणि ते बायकोला दाखवुन पाहुण्याच्या काठीनं साप मारायला मिळेल.)

निशब्द !

22

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

निशब्द !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

>>आज गेट्टू मध्ये मला

23

>>आज गेट्टू मध्ये मला मालिकेबद्दल बोलता येइल
स्त्री विश्व मध्ये ह्यावर लेख लिहु शकलात तर बरे होईल. काही फोटो पण टाका.

अजुन एक राहीले. कोणत्याही महत्वाच्या दृष्यांनतर ३ वेळा कॅमेरा अभिनेता-नेत्रीवर येतो आणि जोडीला जबरा संगीत असते.

मालिकेचे नाव सोडले तर सगळे

24

मालिकेचे नाव सोडले तर सगळे लाजिरवाणेच आहे ! >>>>>>>>>>>>>>>>>>

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud

असल्या शॉट मालीका बघणे म्हणजे

25

असल्या शॉट मालीका बघणे म्हणजे एक शिक्षा आहे. सगळे रिटायर्ड कलाकार असल्या मालिकांमध्ये येत आहेत ही आणखीनच लाजिरवाणी गोष्ट. नाना म्हणाले तशी क्वान्टीटी वाढली पण क्वालीटी गेली. पुर्वी दुरदर्शनच्या काळात ३ भागात एक कथा संपवायचे. त्यात क्वालीटी होती. पहायलाही मजा यायची. कथेला शेवट असल्याने पाहणेही योग्यच होते.
यावर एक उपाय सांगावासा वाटतो. काय करायचे की कथेत समजा एक नायक ३ वर्षंपासून चालतो आहे. तो नायक एसटी स्टँडवर जातो. (माझी फेवरीट जागा आहे म्हणून उदाहरण दिले. तुम्ही मॉल घेवू शकता) त्या नायकाला एक म्हातारा कोकणातला माणूस भेटतो. म्हातार्‍याचा प्लॅशबॅक.... तो म्हातारा त्या नायकाला कोकणातली त्याच्या लहाणपणी भुताने पाहीलेली एका जागेची गोष्ट सांगतो. ही कथा तिन एपीसोड खावू द्यायची. ४ था एपिसोडला रिटर्न टू एसटी स्टँड..... नायक घरी येतो. त्याची बायको (कितवी हे विचारायचे नाही.) गिरणीत दळण आणायला जाते. वाटेत तिला शाळेतली टिचर भेटते. टिचरचा प्लॅशबॅक... तिन एपिसोड टिचर मुख्याध्यापक कसे अत्याचार करतो ते दाखवायचे. रिटर्न टू नायिका. असले 'वरणात पाणी' टाकत रहायचे. म्हणजे तिन तिन एपिसोड नविन मालिका होईल.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

@पराग >>"माझ कुंकु

26

@पराग
>>"माझ कुंकु गेलं..."

ठार मेलो Laughing out loud =)) Laughing out loud

रे मेल्या पर्‍या तु पण वाया गेलास चक्क मालिका पहाण्यात वेळ वाया घालवलास, तरे तेवढ्या वेळात २ पाककृती शिकुन झाल्या असत्या.
आणि मग उद्या लग्न झाल्यावर तुझ्याच उपयोगी पडल असतं ना?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

अगदी मनातलंच लिहलयं. मस्त.

27

Laughing out loud अगदी मनातलंच लिहलयं. मस्त.

या ठराविक मालिकांच्या वेळात भारतात फोन केला तर घरातील महिला मंडळ फोनकडे ढुंकुनही पहात नाही. असो.

अवांतरः मालिकावाल्यांच्या सुपार्‍या द्यायच्याय, घेताय कोणी? सुरवात 'केकता कपुर' पासुन...

>>>>हिच्या नवर्‍याला अपघात

28

>>>>हिच्या नवर्‍याला अपघात झाला कि तिकडे तिच्या नवर्‍यानी छातीवर हात दाबलाच म्हणुन समजा !

खल्लास ! फुटलो ! लै भारी