पराक्रमी असा मी : हझल

0
0

पराक्रमी असा मी : हझल

माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो

ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही
उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो

त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली
टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो

आधार लेखनीला खंबीर मेज आहे
सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो?

प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी
अंधार ही अताशा संगे मलाच नेतो

उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला,
तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो

ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी
तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो

ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते
नावात एक धागा का अभय आढळे तो?

गंगाधर मुटे
..................................

>>हझल ??? ? गझल का ?

1

>>हझल

???

thinking?

गझल का ?


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हझल

2

राजे,

कवितेत जशी वात्रतिका/विडंबन

तसेच

गझल आणि हझल हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

ओह ! मस्तच झाला आहे.

3

हास्य

ओह !

मस्तच झाला आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजे, आसं काय करता?

4

राजे, आसं काय करता?

झाला नाही.... झाली आहे.

हझल "ती" आहे "तो" नाही. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

मुटे साहेब मस्तं झाली आहे

5

मुटे साहेब मस्तं झाली आहे हझल. अर्थात कोणाला पडलीये या सगळ्याशी?


-पुण्याचे पेशवे

कळली नाही.

6

कळली नाही.