इंद्रधनुष्य - ई-अंक - २

0
0

सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी मराठी.नेट इंद्रधनुष्य ई-मासिकाची दुसरी आवृती प्रकाशित करत आहोत.
ज्यामध्ये मीमराठी.नेट च्या सदस्यांनी लिहलेले लेख, कविता, प्रवासवर्णन, पाककृती ह्यांचा समावेश केला गेला आहे.
अंकासाठी खालील सदस्य समितीने लाख मोलाची मदत केली, त्या सर्वांचे अनेकानेक आभार. त्यांची नावे खालीप्रमाणे.

१. सुहास
२. पाषणभेद
३. चुचु
४. सागर
५. सोनाली
६. निल्या
७. जयपाल

इंद्रधनुष्य ई-मासिक

_____

अंकामध्ये खालील लेख विभागवार मांडणी करुन दिलेले आहेत, सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा व आपल्या मित्र मैत्रीणी पर्यंत हा अंक पोहचवा ही विनंती.

धन्यवाद.

व्यवस्थापक
मीमराठी.नेट

अरे वा नवीन अंक आला.. चाळुन

1

अरे वा नवीन अंक आला.. चाळुन मग प्रतिक्रिया देतोच.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

अंक वरवर चाळला. देखणा झाला

2

अंक वरवर चाळला. देखणा झाला आहे.
सर्व लेखकांचे, संपादकांचे आणि व्यवस्थापकांचे अभिनंदन.

ग्रेट जॉब... वेल डन !! हास्य

छान झालाय अंक काही ठिकाणी

3

छान झालाय अंक हास्य

काही ठिकाणी फोटोंपेक्षा बॅकग्राउंड जास्त उठावदार झालंय. फोटोंची मजा अशाने कमी झाली असे वाटले.

मागच्या अंकापेक्षा या अंकात साहित्यात विविधता आली आहे. संपादक मंडळाचे कौतुक हास्य :)


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

छान सजला आहे

4

छान सजला आहे अंक.
आवडला.
अनुक्रमणिका गायबली आहे हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

सहमत आहे.

5

सहमत आहे.

मी मराठी सदस्यांना आवाहन आहे

6

मी मराठी सदस्यांना आवाहन आहे की जे कुणी आपले मित्र ऑफलाईन असतात, जे मी मराठीचे सदस्य नाहीत त्यांच्या पर्यंत हा अंक दर महिन्याला पोचवीत जावा. बरेचसे मित्र कामाच्या रगाड्यात येथे येवू शकत नाही पण मराठी साहित्याशी त्यांना संपर्क टिकवून ठेवायचा आहे त्यांना अशा अंकाची फार मदत होईल. न जाणो त्यांना त्याची गोडी लागून त्यांची प्रतिभा स्पुरेल अन त्यातूनच साहित्यसेवा घडू शकेल.
अंक नजर लागण्याइतका सुंदर झालेला आहे. सर्व संबंधीतांचे अभिनंदन.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

१००%

7

पाषाणभेदशी सहमत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वरील सर्व प्रतिसादकांशी सहमत

8

वरील सर्व प्रतिसादकांशी सहमत आहे.
अनुक्रमणिकेचं काय झालं?

>>अनुक्रमणिकेचं काय झालं? एका

9

>>अनुक्रमणिकेचं काय झालं?

एका नाटकाच नाव आठवल...... बाय द वे अनुक्रमणिका हवीच का?? ते काय शाळेच क्रमिक पुस्तक आहे का?? Big smile

>>बाय द वे अनुक्रमणिका हवीच

10

>>बाय द वे अनुक्रमणिका हवीच का?

हो..कुणाचं लेखन वाचायचं, कुणाचं नाही ..हे ठरवायला सोप्पं जाईल ना.. wink

>>बाय द वे अनुक्रमणिका हवीच

11

>>बाय द वे अनुक्रमणिका हवीच का?
हार्ड अ‍ॅन्ड फास्ट रुल नाही, पण काये ना अंक म्हटला की अनेक गोष्टी/कथा/कविता आल्या त्यात.
मग अनुक्रमणिका असेल तर पटकन त्या पानावर जाता येत.

असो, हे झाल आपल माझ मत. हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

अरे काही कारणामुळे राहिले

12

अरे काही कारणामुळे राहिले ते.
पुढील अंकात नियमितपणे दिले जाईल.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

भोचक यांच्या अप्रतिम लेखाचा

13

भोचक यांच्या अप्रतिम लेखाचा अंतर्भाव करून त्यांना वाहिलेली आदरांजली आवडली
अंक सुरेख झाला आह्वे.. अभिनंदन


-ऋ

चार शब्द लिहून कार्य कसे झाले

14

चार शब्द लिहून कार्य कसे झाले आहे हे सांगण्यासाठी देखील पैसे पडतात की काय कळत नाही आहे.

असो,

पुढील वेळी अंकाचा धागा टाकणे बंद केले जाईल कारण ह्याचा उद्देश पुर्ण होत नाही आहे.
जर मेल मध्येच रिप्लाय देणे असेल तर मग अंक देखील मेल मधूनच दिला जाईल.
उगाच मी मराठीची बॅन्डविडथ का खर्च करु ?


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरेच्या

15

अरेच्या राजे तुम्ही आणि असा रिप्लाय?
एका जुन्या संस्थळ मालकांची आठवण झाली


-ऋ

काय आहे, एखादा लेख मी लिहला

16

काय आहे, एखादा लेख मी लिहला कोणी रिप्लाय दिला नाही अथवा मी एखादी सेवा चालू केली आवडली नाहीतर ती मी बदं करु शकतो पण एव्हा ८-९ सदस्य कष्ट व वेळ देईन असे कार्य करतात व त्यांना जर समजले नाही की अंक कसा झाला आहे तर त्यांना आपले कष्ट वाया गेले असे नाही का वाटनार ?

( जीमेल वर जवळ जवळ २७-२८ लोकांचे रिप्लाय आले की अंक छान आहे म्हणून मग तुम्ही जीमेल वर लिहून शकता पण येथे धाग्यावर चार शब्द लिहले तर काय ह्यांचा अपमान होणार आहे की कोणी ह्यांना कोर्टात खेचणार आहे wink म्हणून तो प्रतिसाद दिला आहे.)


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ह्म्म्म...चालायचंच.. अंक

17

ह्म्म्म...चालायचंच.. अंक आवडला ना!
*शिवाय अंक आता सतत निघणार आहे असे मी तरी समजतो. तेव्हा प्रत्येक वेळी प्रतिसाद देणे शक्य होईल असेही नाहि मात्र नक्की वाचेनच तेव्हा येऊ द्यात दर महिन्याला अंक.*


-ऋ

हो अंक तर वाचाच. त्यात येथीलच

18

हो अंक तर वाचाच. त्यात येथीलच निवडक साहित्य राहणार आहे. पण तो पुढे सर्क्रूलेटही करा जेणे करून जे येथे सदस्य नाहीत त्यांनाही सदस्यांचे साहित्य वाचायला भेटेल अन त्यांनाही समजेल की प्रतिथयश लेखनाचे काहीही बॅकग्राउंड नसतांनादेखील केवळ मराठी असणे या एकाच बंधापोटी कामात व्यस्त राहूनही मंडळी लेखनाचे किती कष्ट घेते आहे. यामुळे कदाचीत त्यांची लेखन उर्मी जागृत होईल अन तेही एखादा लेख लिहू शकतील.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पाभेशी सहमत आहे. केवळ मराठीशी

19

पाभेशी सहमत आहे. केवळ मराठीशी बांधिलकी म्हणून मिमं सारखी संस्थळं सुरु होतात आणि चालतात हे ही लोकांसमोर यायला पाहीजे.


-पुण्याचे पेशवे

राजे चील आउट मॅन... मान्य आहे

20

राजे चील आउट मॅन...

मान्य आहे की या धाग्यावर प्रतिसाद कमी आलेत. पण व्यनी वा मेल मधुन पोच मिळाली होती ना.
याचाच अर्थ की लोकांनी अंक पाहिला/चाळका/वाचला. काम फत्ते.
आता ज्यांना तो फोर्वडावासा वाटतो ते लोकं तो पुढे ढकलतीलच.

निदान मलातरी या अंकाबद्दल याच धाग्यातुन माहिती मिळाली.
आणि हा ते अनुक्रमणिकेच ही मनावर घेउ नका जास्त, जस्ट दिसली नाही म्हणुन सांगावस वाटल. त्यात चुका काढण्याचा उद्देश मुळीच नव्हता.

उपक्रम चांगला आहे आणी तो चालुच रहावा अशी अपेक्षा ठेवतो आहे.
ज्या सर्व सदस्यांनी आपला वेळ खर्चुन यास हातभार लावला त्या सर्वांचे आभार.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

पाभे सहमत.

21

हास्य

पाभे सहमत.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मालक.. लहान पोरासारखं काय

22

मालक.. लहान पोरासारखं काय करताय.. चांगल काम आहे..

मॅक्डोनाल्ड्स ची संकल्पना सांगतो.. एखादा स्पॉट डेवलप करावा लागतो... शटर उघडल की माणसं येत नाहीत..

जरा कळ सोसा..

अंकाच म्हणाल तर पार्श्वभूमी जरा गडद वाटली.. भोचकभौंना लेखाच्या शेवटी श्रद्धांजली देता येतेय का बघा दोन ओळीत..

मागे म्हणालो होतो तसं HTML काढता आला अंक तर अजुन उत्तम..

मागच्यापेक्षा हा अंक अजुन

23

मागच्यापेक्षा हा अंक अजुन मस्त झालाय हास्य
बॅकग्राउंड आवडली

सर्वच लेखांची उत्तम निवड केलीय.

24

अंक आवडला. भोचक भाऊंचे स्मरण झाले.
राजेंच्या परखड मताशी पूर्णपणे सहमत आहे. अंक वाचल्यानंतर येथेच प्रतिसाद नोंदवावा. व्यनि करू नये.


*****

+१ अंक उत्तम..सगळेच लेख

25

+१
अंक उत्तम..सगळेच लेख आवडले.सदस्य समिती,लेखक आणि राजेंचे अभिनंदन.
चांगली मेजवानी आहे..झकास हास्य

अंक आवडला. उत्तम कल्पना आहे.

26

अंक आवडला.
उत्तम कल्पना आहे.

छान..

27

हा अंक सुध्दा आवडला, आत्ताच वरवर चाळला.. भोचक यांच्या लेखाचा समावेश ही उचित श्रध्दांजली.
स्वाती

छान

28

छान .हा अंक सुध्दा आवडला.भोचक यांच्या लेखाचा समावेश ...सदस्य समिती,लेखक आणि राजेंचे अभिनंदन

मस्त ... सुंदर.. सगळ्या टीमचे

29

मस्त ... सुंदर.. सगळ्या टीमचे अभिनंदन

धंकू बर्का राजे, अंक

30

धंकू बर्का राजे, अंक चाळल्यावर सविस्तर प्रतिक्रिया देइनच .


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

हुस्श्स !! राज मस्त झालाय रे

31

हुस्श्स !! राज मस्त झालाय रे अंक !!

सर्वांचे आभार.

32

सर्वांचे आभार.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."