स ह गेले
स ह देशपान्डे गेले. प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी माणुस गेला.
ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक-साहित्यिक स. ह. देशपांडे यांचे आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. पारंपरिक हिंदूत्ववाद्यांप्रमाणे हिंदूत्वाच्या विचाराची मांडणी न करता स्वतंत्र विचार मांडणारा, बंडखोरीची वाट चोखाळणारा विचारवंत अशी त्यांची प्रतिमा होती.
‘स. ह.’ यांच्या मागे त्यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी चंद्रहास आणि सून व प्रसिद्ध गायिका मीनल देशपांडे या आहेत. प्राध्यापक, हिंदूत्व-राष्ट्रीयत्व अशा विषयांवर विपुल व परखड लेखन करणारा साहित्यिक-समीक्षक अशी त्यांची त्यांच्या पंच्याऐंशी वर्षांच्या आयुष्यातील प्रमुख कामगिरी होती. गेले काही महिने ते आजारी होते आणि त्यातच आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
देशपांडे यांचा जन्म १७ डिसेंबर १९२४ ला शिरवळ येथे झाला. प्राथमिक शिक्षण शिरवळ येथे घेतल्यावर ते पुण्यात आले. पुण्यात नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यावर स. प. महाविद्यालयातून कला शाखेची पदवी त्यांनी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएच.डी. संपादन केल्यावर ‘स. ह.’ यांनी अध्ययन व संशोधनास सुरुवात केली. हिंदूत्व, राष्ट्रीयत्व या संकल्पनांची त्यांनी नव्याने मांडणी केली आणि कोणताही परंपरागत झापडबंद विचार करण्याचे नाकारले. त्यामुळे इतर हिंदूत्ववादी पक्ष, संघटनांपेक्षा ते वेगळे ठरतात. या त्यांच्या वैशिष्टय़ामुळेच कोणत्याही विशिष्ट विचारधारेशी जोडला न गेलेला तरुणवर्ग ‘स. ह.’ यांच्याकडे आकर्षित झाला.
स. ह. यांच्या लेखनापैकी काही महत्त्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे- ‘शारद्वत’ (व्यक्तिचित्रे), ‘भारतीय शेती’, ‘दलितमुक्तीची नवी दिशा’, ‘किबुट्झ- नवसमाजनिर्मितीचा एक प्रयोग’, ‘वर्किंग विथ ट्रायबल पीपल-द इन्स्टिटय़ूट्स ऑफ कोसबाड हिल्स’, ‘पॉलिटी, सोसायटी अँड इकॉनॉमी’, ‘संघातले दिवस आणि इतर लेख’, ‘व्हॉलियंट्री एजन्सीज इन अँड अराऊंड म्हैसाळ’, ‘रिपोर्ट ऑन रूरल फिमेल लेबर इन इंडिया’, ‘रिपोर्ट ऑन चाईल्ड लेबर इन इंडिया’, ‘विद्याधर पुंडलिक इन मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर’, ‘सावरकर ते भा.ज.प.-हिंदूत्ववादी विचाराचा चिकित्सक आलेख’, ‘संघाच्या इतिहासातला एक अल्पज्ञात अध्याय’, ‘काही आर्थिक काही सामाजिक’, ‘धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदूत्वविचाराची फेरमांडणी’, ‘भारताचा राष्ट्रवाद- डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निवडक लेख.’
-------
कुमार केतकरान्नि लिहिलेला अग्रलेख. श्रद्धान्जलि
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=896...
.jpg)
रा. स्व. संघात कार्यकारणभावाबद्दल प्रश्न विचारायची पद्धत नाही
रा. स्व. संघात कार्यकारणभावाबद्दल प्रश्न विचारायची पद्धत नाही - हे वाक्य आवडले.
आणि म्हणुन केतकरान्चा लेख आवडला.
--
तसेच खालिल लेख देखिल ....
मी सनातनी का नहिये -
http://www.fahayek.org/index.php?option=com_content&task=view&id=46
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
राष्ट्रवाद अभ्यास मंडळ
स.ह. ज्ञानप्रबोधिनीत राष्ट्रवाद अभ्यास मंडळ अशी बैठक चालवत असत. आताही जनतंत्र उदबोधक मंच नावाने चालू आहे. सध्या राजीव साने हा वारसा पुढे चालवतात. चार वर्षापुर्वी हिंदुत्वाची फेरमांडणी करणारी व्याखानमाला पत्रकार भवनाला घेतली होती. त्यात हिंदुत्वाची चिकित्सा करुन हिंदुत्ववादी मंडळींना फेर विचार करण्याचे आवाहन होते.
त्यांच्या मांडणीत कुठेही आक्रस्ताळेपणा नसायचा. शांतपणे परंतु ठामपणे मांडण्याची त्यांची हातोटी आम्ही अभ्यासमंडळात खुप वर्षे पहात असु.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.