सिगरेट सोडायची आहे?

0
0

काही सदस्यानी विचारणा केली होती त्यांच्या साठी म्हणून हे निवेदन :
सिगरेट किंवा कोणतेही व्यसन हे माणसाच्या मेंदूशी दोन प्रकारे जोडलेले असते. कालांतराने व्यसन ही सवय बनते
कोणतेही व्यसन हे केवळ निर्धार करून सुटत नाही. अथवा व्यसनापासून पळून जाऊनही सुटत नाही.. व्यसन आणि आपली विचारप्रणाली यांच्यात एक अनुबंध ( लिन्क) तयार झालेली असते जेणेकरून व्यसनाचे पदार्थ घेतले की ठरावीक विचार मनात येतात किंवा ठरावीक विचार मनात आले की व्यसनाची तल्लफ येते. व्यसनाची आणि विचारांची ही लिंक तोडता आली तर व्यसन सुटू शकते.
सिगरेट सोडवून देण्यासाठी मी एन एल पी चा ,श्वसनाचे एक्सरसाईज,आणि मेडीटेशनचा वापर करतो. सिगरेट सोडवून देऊ शकतो देतो.
आपल्यापैकी ज्या कोणाला किंवा त्यांच्या मित्रमैत्रीणीना सिगरेट सोडायची असेल तर एका/दीड तासाचे एक असे पाच सेशन चे एक वर्कशॉप आयोजीत करुयात. साधारणतः दहा किंवा अधीक जणांचा गृप असेल तर असे वर्कशॉप फिजीबल होऊ शकते.
जागा वगैरे चा विचार करता एखादा बंदीस्त हॉल किंवा ओपन टेरेस जिथे वाहनांच्या आवाजाचा किंवा लोकांच्या वर्दळीचा त्रास होणार नाही अशी जागा चालू शकेल
योग्य सदस्य संख्या जमल्यास शनीवारी पुण्यात आणि रवीवारी मुम्बैत हे अ‍ॅरेन्ज करता येईल.

राज ..बघा काहीतरी !!

1

राज ..बघा काहीतरी !!

का सोडायची ???

2

Angry

का सोडायची ??? Crazy

बर ठिक आहे तुम्ही म्हणता तर सोडुन पाहु हास्य

म्हणजे कट्टाच की! कधी करताय

3

म्हणजे कट्टाच की! कधी करताय कट्ट? अन त्या कट्टा करण्याच्या धाग्याचे काय झाले? ठिकाण ठरले का? की कट्टा होवून गेला?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

किती पैसे पडतील?

4

किती पैसे पडतील?

अहो नपु आयष्यभर शिग्रेटी ओढत

5

अहो नपु आयष्यभर शिग्रेटी ओढत राहिलात तर त्याचा जितका खर्च होईल (+ दवाखान्याचा (देव करो ती पाळी न येवो))
त्यापेक्षा नक्कीच कमी असेल.
काय म्हणता?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

फुकुन जो आंनद मिळतो त्याची

6

फुकुन जो आंनद मिळतो त्याची किंमत हिशोबात धरली का?

अरे फुकुन आनंद मिळतो आहे तर

7

अरे फुकुन आनंद मिळतो आहे तर मग तो नाद सोडायच्या वर्गाला जायच्या बाता कशाला?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

भविष्यात होउ शकणारा शारिरीक

8

भविष्यात होउ शकणारा शारिरीक त्रास.
हिशोब करतो आहे.
कशात जास्त फायदा ते.

by नवीन पुणेकर - 29/07/2010 -

9


by नवीन पुणेकर - 29/07/2010 - 16:53
किती पैसे पडतील?

मी फी घेत नाही. पण काही फुकटही देणार नाही.... हॉल वगैरे चे जे काही खर्च होतील ते वाटून येतील तेवढेच.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

हे फुकट का पैसे देऊन. फुक्ट

10

हे फुकट का पैसे देऊन. फुक्ट असेल तर मी येईन. हास्य
-पुण्याचे 'फुक'टे


-पुण्याचे पेशवे

आमाला पैशे भेटले तरच आपुन

11

आमाला पैशे भेटले तरच आपुन येऊ. (कट्टयाला म्हणुन तरी)
काये ना आता इतक्या लांबुन यायाच म्हंजे खिश्याला परवडाया नगं?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

स्तुत्य

12

उपक्रम विजुभाऊ. सगळ्या फुंक-संप्रदायी मंडळींना एकदा घ्याच आत. आम्हाला फुकटचा 'पॅसिव स्मोकिंगचा' ताप होतो तो तरी टळेल.
विजुभाऊ हम तुम्हारे साथ है.
अवांतर: संजय गांधीची चौकडी कुटुंब नियोजनाच्या केसेस जशा गोळा करायची तसे पळून जाऊ पाहणार्‍या काही 'खास' सभासदांची उचलबांगडी करायला टारझनसारख्या भक्कम लोकांशी टाय-अप करू या.

सगळ्या फुंक-संप्रदायी

13

सगळ्या फुंक-संप्रदायी मंडळींना एकदा घ्याच आत
ररा त्यासाठी बहुतेक मि म चा कॉमन गुडगुडी कट्टा घ्यावा लागेल.
असो.
गम्मत सोडा.
आत्ता पर्यन्त व्यनी /फोन नुसार पुण्यात पाच सदस्य होतील असे वाटतेय.
जागा पुण्यात मध्यवर्ती पाहूया. एखादा हवेशीर मोठा फ्लॅट वगैरे असेल तरी चालेल


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

खरे खरे सिगारेट सोडली तर ...

14

शिग्रेट सोडू मी पाह्ता
जीव थोट्का थोटका होतो
कामातील लक्ष विचलते
धंदाच फाटका होतो Star

सिगरेट सोडण्यासाठी समुदेशन

15

सिगरेट सोडण्यासाठी समुदेशन करण्याआधी एक जोरदार शेवटचा फुकपुर्ण कट्टा होउ द्यात.

विजुभाउंना विधायक कार्यासाठी

16

विजुभाउंना विधायक कार्यासाठी शुभेच्छा हास्य

सिगारेट सोडायची असल्यास मावा / गुटखा / तमाखु सुरू करावी.

टारचंद माणिकचंद बिडीवाला.
प्रो.प्रा. , खंडोबा बिडी कारखाणा, फुकणेवाडी, बिड

विजुभाउ, आम्ही येउ

17

विजुभाउ, आम्ही येउ समुपदेशनाला.

पण कदाचित उलट परीणाम झाला तर. तुम्हीच सिगारेट फुकायला सुरवात केली तर????

म्याबी !

18

Innocent म्याबी !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वोक्के बहुतेक आवश्यक सदस्य

19

वोक्के बहुतेक आवश्यक सदस्य संख्या पुण्यात पूर्ण होईल असे वाटतेय.
तारीख आणि ठीकाण कळवतो.
धन्यवाद


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

ठरवा मी देखील असेनच.

20

ठरवा मी देखील असेनच.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ह्या सोडण्याच्या कार्यक्रमात

21

ह्या सोडण्याच्या कार्यक्रमात लोकांच्या णाकांचा ईण्शुरंस काढला आहे का विजुभाऊ ? कायद्याप्रमाणे कोणताही सार्वजणिक कार्यक्रम ऑर्गणाईझ करतांना सुरक्षेचे उपाय जरुरी असतात. हास्य
इथे हळुच सोडुन देऊन मग आपण त्यातले नाहीच , असे दाखवणारे आहेत खुप हास्य

- ( जोरात सोडुन हिहॉहॉ म्हणनारा जबाबदार सोडा ) विझपाहु

मी गेली २१ वर्षें सिगरेटला हातही लावलेला नाहीं

22

या विषयावर स्वानुभवावर आधारित एक लेख मी लिहिला होता. पंचवीस वर्षें रोज पंचवीस सिगारेटी ओढणार्‍या मी गेली २१ वर्षें सिगरेटला हातही लावलेला नाहीं. सोडली तीही तब्येतीच्या कारणामुळे नव्हे तर ती संवय प्रकृतीला अपायकारक आहे म्हणून.
जर सभासदांना रस असल्यास तो लेख इथे प्रकाशित करायला मला आवडेल.
(हा 'नेकी और पूछ-पूछ?"चा प्रयोग नाहीं.)
धन्यवाद.
सुधीर काळे


सुधीर काळे
------------------------

एक णंबर्स !! दिवसाला २५

23

एक णंबर्स !! दिवसाला २५ षिग्रेटी ? म्हणजे अ‍ॅव्हरेज १६ तास जागे असता गृहीत धरल्यास २ तासाला ३ षिग्रेटी हास्य
आणि अशा अवस्थेतुन टर्मिनेट ? लाजवाब... ह्या ( आणि असल्या) विषयांवर वाचायला कोणाला आवडणार नाही ?
येऊण्द्यात बिंढास्त ..

सुधीरकाका. नक्कीच. लेख

24

सुधीरकाका. नक्कीच. लेख वाचायला आवडेल. मालक नक्की परवानगी देतील. नक्की टाका इथे लेख.


-पुण्याचे पेशवे

लिहा काका !

25

लिहा काका !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सगळ्यांना माझ्या शुभेच्छा

26

adfa


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

(विषय दिलेला नाही)

27

जय पाल

28

तुमी बी कंचा तरी क्लास काडा हास्य

सिगारेट

29

सध्या विजुभाउंना काही काम दिसत नाही म्हणुन हे रिकामटेकडे विचार डोक्यात पिंगा घालताना दिसतात.