ग्यालरीतील (टेरेसमधील) बाग
नमस्कार मित्रहो,
मला माझ्या ग्यालरीत बाग करायची आहे. सध्या कठड्यावर ८-९ फुलांच्या कुंड्या आहेत, पण मला एक छोटा बगीचा कराचाय ज्यात फुलांबरोबर शक्य असेल तर भाजीपाला आणि फळ्झाड लावायची आहेत.
मर्यादीत जागेत हे कसे जमवता येईल, का हा योग्य पर्याय नाही? आपले अनुभव आणि सल्ला हवाय.
.jpg)
अभिजित, मी केली आहे अशी
अभिजित, मी केली आहे अशी बाग.
कुंभारवाड्यात थाळीच्या आकाराच्या पसरट थोड्या खोल अशा कुंड्या मिळतात. त्यात मेथी,कोथिंबीर मस्त येते. सध्या कुंडीत तुम्ही टोमॅटोचे वेल लावू शकता. मिर्चीची रोपे आणि वांगी पण ! मंडईत प्लास्टिकचे १०० किलो माती मावेल असे टब- टाक्या असतात. त्यात चाफा, जास्वंद अशी थोडी मोठी फुलझाडे, कृष्णकमळ, मोगरा, जाई अशा वेली खूप छान वाढतात.
( माझ्या घरातल्या त्या बागेचे आता काय झाले असेल बरे?
भारतात गेले की पहिले काम बाग नीट करणे ! )
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
>>> टोमॅटोचे वेल ????
>>> टोमॅटोचे वेल ????
=))
बाकी काही प्रश्नः अशा बागेने घराचे छप्पर गळते का?
स्लॅब चे वजन वाढते का? माझ्या पाहण्यात एक प्राचार्य होते. त्यांच्या बंगल्याच्या टेरेसवर माती टाकून शेतीसारखी बाग केली होती.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अरे झाडच असतं... पण त्याला
अरे झाडच असतं...
पण त्याला हवे तसे आपण वेली प्रमाणे वळवू शकतो
टमॉटो ची बाग आहे माझ्या मामाची तर बॉ... तेथेच पाहिले होते.. वेली सारखे वाढतं झाड..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
नाय बा आमी तर त्येंला तामटे
नाय बा आमी तर त्येंला तामटे म्हनतो!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
थ्यांक्यु
आभारी आहे माया.
तुमच्या उत्तरामुळे हुरुप आणि कल्पना दोन्ही मिळाल्या. पुनःश्च आभार. काही मदत पडली तर ह्याच धाग्यावर प्रश्न टाकीन, वेळ मिळाला तर जरूर उत्तर द्या.
माझे लिखाण
पुष्करिणी मदत कर ग....
पुष्करिणी मदत कर ग....
आलं, मिरच्या, ढोबळी
आलं, मिरच्या, ढोबळी मिरची,झुकीनी, लसूण वगैरे आरामात टेरेस वर कुंड्यांमध्ये होतात. माझ्याकडे अर्धाफूट खोलीच्या आणि ७ सेमी व्यासाच्या कुंडीत लावलेल्या मिरचीच्या रोपाला गेल्या एका महिन्यात ९१ मिरच्या आल्या आहेत.
सव्वा ते दीड फूट खोलीच्या आणि २० सेमी व्यासाच्या कुंडीत टोमॅटो आहे, त्या रोपाला वाढताना वेलीसारखा आधार द्यावा लागतो. त्यालाही २०-२२ टोमॅटो आलेत.
जाइचा,कारल्याचा,पॅशनफ्रुट(कॄष्ण्कमळ) हे वेल आडवे पसरतात त्यामुळे टेरेसवर चांगले येतील, १ फूट खोली आणि २.५ फूट लांबी ची कुंडी अशा वेलाला पुरेशी आहे. वाढताना आशार द्यावा लागेल. बुश रोझेस पण कुंडीत छान येतील.
बॉर्डर ला झेंडूची रोपं लावा..१२ महिने फुलं
पुष्करिणी
खतं कुठले वापरणार ?
खतं कुठले वापरणार ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
@ पाभे, अरे खरेच
@ पाभे,
अरे खरेच वेलीसारखे टमाट्याचे रोप असते. आता ही वेल जाईजुईसारखा मांडव करण्याएवढी नक्की नसते. माझ्याकडे ३ फूट वाढलेल्या टमाट्याच्या वेलीला भरपूर टमाटे आले होते.
@ राजे, तुमाला बरी खताची चिंता.
)
मी आमच्या चिंचवडच्या मंडईतल्या खताच्या दुकानातून १५ रु. किलो दराने गांडूळखत आणून सगळ्या कुंड्यांमध्ये टाकते. ८ दिवसात बाग टवटवीत दिसू लागते. ( बाकी त्यासाठी मात्र बागेला नवर्याचे नि सासूचे हातही लागतात
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
१५ रु. किलो दराने गांडूळखत
१५ रु. किलो दराने गांडूळखत
महागच आहे.
गावाकडे खताची चिंता नाही
गावाकडे खताची चिंता नाही
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
रासायनिक खतांपेक्षा हे
रासायनिक खतांपेक्षा हे गांडूळखत स्वस्त आणि हितकारक आहे. २ महिन्यातून एकदा लाडक्या बागेसाठी आणि फुललेल्या बागेकडे बघुन मिळणार्या समाधानासाठी ३० रु. खर्च जास्त नसावा.
गावाकडून इम्पोर्ट करता आले तर अजून उत्तम
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
हे
हे बघा, उपयोगी पडते का?
लोकसत्ता
तसेच २-३ वर्षांपूर्वी सकाळ मधे ओल्या कचऱ्यातून घरी बाग किंवा शेती कशी करायची या वर बरीच महीती आली होती, थोडेसे गुगलले तर सकाळ वर सहज मिळेल, बघा उपयोगी पडते का?
तुषार
विश्व जालावरील मराठी जग
अजुन
अजुन थोडी माहीती इकडे
तुषार
विश्व जालावरील मराठी जग
मदतीबद्दल आभार
माया, तुषार, पुष्करिणी ह्यांचे माहीती दिल्याबद्दल आभार.
चुचुतैंचे स्पेश्शल आभार कारण त्यांनी पुष्करिणीताईंना बोलावले.
इतरांचेही आभार अजून माहीती मिळालीच, त्याचबरोबर धागा हसता-खेळता झाला.
सर्वात महत्त्वाचे म्हंजे सूचनांची अंम्मलबजावणी करून प्रगतीपुस्तक (जमल्यास फटूंसहीत) सादर करेन.
माझे लिखाण
बाग नीट फुलत नाहीय्ये
मी आधी आयती रोपे लावली, मग एक रोप विकणार्याकडे आउट्सोर्स केलं पण मला हवी तशी टवटवीत बाग नाही दिसत. मी परत शुन्यापासून सुरू करू इच्चीतो....मार्गदर्शन करावे. ह्या वेळी मी स्वतः हात घालणार आहे.
@ मितान, तुम्ही म्हणताय ते खतांचे दुकान सोमनाथच्या जवळच आहे का? मला तिथे एक अगदी छोटे दुकान बघीतल्यासारखे वाटते.
माझे लिखाण
अभिजीत, सोमनाथच्या जवळचे
अभिजीत, सोमनाथच्या जवळचे दुकान आता बदलले.
मी नव्याने लावलेल्या झाडांसाठी नर्सरीतूनच गांडूळखत आणले. हल्ली मोरया गोसावी मंदिराच्या आवारात पण 'निर्माल्यापासून तयार केलेले' खत मिळते. वापरून बघायला हरकत नाही.
तुम्ही मागच्या वर्षी लावली नं रोपं ? काय प्रगती ?
माझी बाग यंदा नव्याने लावली. २ गुलाब. जाई,सायली,मोगरा,कृष्णकमळ, सोनटक्का, गोकर्ण, रातराणी आणि नेहमीची कढीपत्ता, कोरफड वगेरे रोपं छान आली आहेत.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
अभिनंदन
तुमच्या नवीन आणि डंवरलेल्या बागेबद्दल अभिनंदन!!!! श्रम सार्थक झाल्यागत वाटत असेल.
माझे लिखाण
माझी बाग.....
प्रगती माझ्या मनासारखी नाही. पण बायको आणि सौ ऐकत नाहीत, त्यामुळे मी पुराव्यानेच शाबीत करून दाखवावे म्हणतो. अगदी कुंडीखरेदीपासून मीच सगळ करणार आहे. कुंडी, माती, खत आणि मग बियाणे कुठून आणावे आदी प्रश्न मनात गर्दी करून आहेत.
माझे लिखाण
बायको आणि सौ ????? असो.
बायको आणि सौ ?????
असो.
सध्या सगळ्या रोपवाटिकांमधून तुम्हाला हवी ती रोपं मिळतील. भाज्या लावायच्या अस्तिल तर जरा पसरट आकाराच्या मातीच्या कुंड्या मस्त !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
बायको आणि सौ
अरेच्च्या!!!! खरच की!! भारी गडबड केली मी...आई आणि सौ. म्हणायचं होत.
माझे लिखाण
जाणकारांनी मार्गदर्शन करावे...
मला पण गॅलरीमध्ये बाग करायची इच्छा आहे... पण पांढऱ्या फरशीवर (स्पार्तेक्स का काय म्हणतात त्याला) मातीच्या कुंड्यांचे डाग आवडत नाहीत... आणि प्लास्टिक कुंडी मध्ये झाडे व्यवस्थित वाढत नाहीत असे एका परिचितांनी सांगितले...
जाणकारांनी मार्गदर्शन करावे...
प्रसाद, गॅलरीतल्या रेलिंगला
प्रसाद,
गॅलरीतल्या रेलिंगला आतून एक स्टँड फॅब्रिकेट करून घ्यायचे. त्यात कुंड्या न ठेवता त्याला ती ग्रीनहाऊससाठी असते ती हिरवी जाळी बांधायची. पूर्ण स्टँडच्या आतून बसेल अशी. मग त्यातच थेट आधी विटांचे तुकडे, मग मिळाला तर रसवंतीमध्ये उसाचा रस काढल्यावर उरतो तो चोथा, त्यावर सध्या सगळीकडे कापणी केलेले गवत आणि शेवटी माती भरायची. साधारण जमिनीसारखे स्ट्रक्चर तयार होते. त्यात पुरेसे अंतर सोडून हवी ती रोपं लावू शकता. या पूर्ण स्टँडच्या खाली लोखंडी ट्रे करून घ्यायचे. त्याला पाणी वाहून जाण्याची जागा ठेवायची.
हा आमच्या बागेचा यशस्वी प्रयोग आहे. माती फरशीवर गळत नाही. पाणी गळते ते ट्रे मध्ये साठून वळवले तिकडे जाते.
जमले तर दोन दिवसात फोटो टाकीन.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
खूप छान उपाय सांगितला आहे
मितान,
खूप छान उपाय सांगितला आहे... १०० चौरस फुटाच्या टेरेसचा नक्की चांगला उपयोग करता येईल...
आता गृह खात्याकडून परवानगी काढून आधी फॅब्रिकेशनचे बघून घेतो...
फोटो अवश्य टाका लवकरात लवकर...
वरील बागेचे फोटो टाकल्यास
वरील बागेचे फोटो टाकल्यास गरजूंना मदत होईल.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही