-

{वा!!}

1

पाषाणा म्हनजे बॅटरी (री)चार्ज करुन आलास तर....
मामाच्या मळ्याला जाऊ या
बकरी च्या दुधाचा चा पिउया
ताजेतवाने होउ या
मामाच्या मळ्याला जाऊ या Big smile


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{एकंच नंबर हो पाभे .. }

2

बालपण आठवणारे फोटुज .. आता गावंही तितकंस जंगलमय राहिलं नाही. .. wink मस्त लेख.

अवांतर :

या कुत्रीला माणसांचा फार लळा होता.

हास्य हृदयास भिडले हास्य

{क्शणभर जुना मराठी सिनेमा}

3

Big smile क्शणभर जुना मराठी सिनेमा पाहातेय असे वाटुन गेले.
नशिबवान आहात तुम्ही..तुम्हाला असे मामाचे गाव लाभलेय.
आमचा मामा म्हणजे Stare JSS RD., Mahim, Mumbai -16

{मस्तरे दगड्फोड्या. गावच्या}

4

मस्तरे दगड्फोड्या.
गावच्या मातीचा सुगंध आला हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{मन प्रसन्न झाले}

5

लई भारी पाषाणभेदा...

मन कसे प्रसन्न झाले हास्य
मन वढाय वढाय ही बहिणाबाईंची कविता समर्पकरित्या आठवली

सुंदर फोटो आहेत. कस हिरवंगार वाटतं. हिरव्याकंच मिरच्यांच्या फोटू तर लई भारी wink
ते गाव कोणतं पण मी म्हणतो? ...
मामाच्या गावाचे नाव सांगत नाही म्हणजे काय? (मामाला पोरगी आहे नि तुला आवडली आहे म्हणून तर नाय ना लपवत? wink )

अवांतर : तुझे फोटु कुठे हाईत त्यांमंधी? Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{गावची आठवण आली बघ....}

6

गावची आठवण आली बघ.... झटक्यात.


Hope is a good thing...

{फोटो एकदम झक्कास आम्ही आपल}

7

फोटो एकदम झक्कास Big smile
आम्ही आपल क्रुत्रिम शेतात राबतो आणी समाधान मानतो हास्य

{ग्रेट राव..फटु लै भारी..मस्त}

8

ग्रेट राव..फटु लै भारी..मस्त मळा..मधल्या ओळी पण छान हास्य

{मस्त}

9

पाभे. फटू एकदम झकास नि तुमची कामेंट्री एकदम समर्पक. एखाद्या डाकुमेंट्रीचा स्टोरीबोर्ड पाहतोय असे वाटले. मजा आली.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{मंडळी कालच्या या टाकलेल्या}

10

मंडळी कालच्या या टाकलेल्या धाग्यात मी ज्या ओळी टाकल्या आहेत ती कविता खाली देत आहे.

माझ्या जमीनीच गाणं

हि जमीन माझी काळी काळीभोर
हि जमीन माझी लई दिलदार ||धृ||

हिच्यामंदी करीतो मी जोंधळा
लावीतो कधिमधी हरभरा
पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर ||१||

हि जमीन माझी ...

कोंबडी शेळी बकरं मेंढरं
तसच पाळीतो मी रानपाखरं
गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं ||२||

हि जमीन माझी ...

हि विहीर माझी लईलई भारी
सतरा झरं तिच्यामंदी पानी भरी
अहो मोटर चाले तास चार ||३||

हि जमीन माझी ...

एका तुकड्यात लावले तांबटे वांगे हो
एक तुकडा लावला घास हो खातील जनावरं माझी खास
आलाय कलमी आंब्याला सोन्यावानी मोहोर || ४ ||

हि जमीन माझी ...

औंदा लावलाय मी उन्हाळी कांदा
देईल हातामधी रुपया बंदा
न्याहारी आसं माझी झुनका भाकरं || ५ ||

हि जमीन माझी ...

उस हा हो हिरवा जर्द
त्याला घालतो मी हो बारं
झालीत मनगटाएवढी त्याची पेरं || ६ ||

हि जमीन माझी ...

मी हो शेतकरी गोदातीरीचा
गुळासाठी लावतो गुर्‍हाळ
तिकड सहकारी करी साखर || ७ ||

हि जमीन माझी ...

कारभारनीनं लावली हौसेने कपास मऊ
हयो काय, इथं टरारला गहू
त्येला खायाला भिरभीरती पाखरं || ८ ||

हि जमीन माझी ...

कुदळ फावडं विळा नांगर
तण काढती हो ही औजारं
यंदा घ्यायाचा आहे हो ट्याक्टर || ९ ||

हि जमीन माझी काळी काळीभोर
हि जमीन माझी लई दिलदार || धृ ||

(इतरत्र पुर्वप्रकाशीत)

- वणी ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील काव्यसंमेलनात २००० साली वाचन केलेली कविता.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{मस्तच रे.}

11

मस्तच रे.


Hope is a good thing...

{खुपच छान! आवडले...}

12

खुपच छान!

आवडले...

{लै भारी}

13

लै भारी हास्य