ऑनलाइन फोटो स्पर्धा
ठाणे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन फोटो स्पधेर्चे आयोजन केले आहे. व्यावसायिक व हौशी गटात होणाऱ्या या स्पधेर्सोबत वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनाही त्यात सहभागी होता येईल. व्यावसायिक गटासाठी स्पॉट न्यूज, क्रीडा, विशेष बातमी, दैनंदिन जीवन हे चार विषय दिले आहेत. तर हौशी गटासाठी उत्सव हा विषय दिला आहे. व्यावसायिक गटाची स्पर्धा अखिल भारतीय पातळीवर तर हौशी गटाची स्पर्धा राज्य पातळीवर आहे. स्पर्धकांनी आपले फोटो http://www.tdpc.org/ContestDetails.aspx या प्रेस क्लबच्या वेबसाइटवर पाठवायची आहेत.
वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसाठी असलेली स्पर्धा मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रतिनिधींसाठी खुली आहे. या गटात प्रतिनिधी, संकलक आणि कॅमेरामन या तीन विभागात पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पधेर्विषयीच्या माहितीसाठी क्लबच्या वेबसाईटला भेट द्यावी. फोटोंचे प्रदर्शन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील प्रबोधनकार ठाकरे कला दालनात आयोजित केला जाईल. त्याचे उद्घाटन सहा ऑगस्ट रोजी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

.jpg)