अश्रु

0
0

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी......................

छान लिहले आहेस आश्रुचे मनोगत

1

हास्य

छान लिहले आहेस आश्रुचे मनोगत काव्यात्मक पध्दतीने आवडले... !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुरेख कविता.

2

ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी...

अप्रतिम.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

मस्त

3

मस्त

मस्त.....छान लिहीलय

4

मस्त.....छान लिहीलय सोप्या...............

मस्त...

5

मस्त...