रे माझ्या गळणार्‍या केसा...

0
0

आम्ही विशी गाठेस्तोवरच केस गळतीनं आम्हाला गाठलं. नक्की काय करायला हवं ते ठरवे पर्यंत काही महिनेच गेले अस्तील पण आम्ही पार चाळीशीला भिडलेलं, बर्‍यापैकी टक्कल पडायला सुरुवात झालेलं शीर टोपीखाली ठेउन मिरवायला लागलो.
(होमिपथी,आयुर्वेदिक )उपचार ,उपास तापास्,भूत बाधा ,मानसोपचार केश-रंगकाम, जिरेटोप चढवणं(weaving/bonding) असे सर्व उपचार करुन, जाणार्‍या हरेक केसासोबत आम्ही त्याच्या दहापट पैसे घालवुन बस्लो.
तर अशी ही आमच्या विविध मार्गनं केलेल्या प्रयत्नांची दिशा आणी दशा:-
१.महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाच्या मध्याला कुणा हितचिंतकानं हळु हळु केस गळती लागल्याचं निदर्शनास आणलं.
२.काही दिवसातच डॉ सतिश वैष्णव ह्यांची केश समस्येवर "शर्तिया इलाज" सारखी वाटाणारी,होमिपथी वाली पेप्रातील जाहिरात बघुन तिक्डं डेरेदाखल.
३. तिथला फायदा दिसायला वेळ लागतोय म्हणल्यावर त्याच्यासोबतच सर्व धार्मिक्,दैविक,मांत्रिक असले paranatural उपाय सुरु.
४.दोन्-अडीच वर्षानंतरही सर्व पथ्ये पाळत असून सुद्धा उपयोग होत नाही म्हटाल्यावर,उपचार करणार दैवत आम्ही बदललं. पुण्यामध्ये "डॉ बात्रा" (हे ही होमिपथिकच)ह्यांचं शिष्यत्व पत्करलं.
६.सुमारे तीन वर्षे सलग उपचार घेउन काय उप्योग होत नाय म्हटल्यावर शहाणा माणूस थांबला अस्ता.
आता आम्ही अतिशहाणे असल्यानं आयुर्वेदिक च्या मागं पडलो.
वर्षभर झाले,उपयोग फारसा नाही. आता अनुपम खेर, अमरिश पुरी,राकेश रोशन ह्यांच्या लायनीत लागलोय.(पैशाच्या हिशोबानं असतो तर बरं झालं असतं तिच्य्आय्ला.)
७.शेवटी weaving करुन घेतलं.कुणा दुसर्‍याचेच केस दत्तक घेउन ते आपलेच आहेत असं मानलं.
पण हे सोंग काही दिवसाच्या वर वठवता आलं नाही.
८.आता hair transplant करण्याचा विचार आहे.(तेव्हढा एकच प्रकार राहिलाय, म्हटलं cosmetic surgeon ला तरी कौपशी ठेवावं, सगळ्यांना वाटात सुटालो आहोत तर.)

मिळालेला बोधः-
केस गळणं हे क्रियापद "गाळणीतुन चहा गळणं" ह्यासारखं घ्यावं.गाळणीत चहा घेउन कुणाला फिरता येतं का? नाय ना, बस्स मग.
लागलेली गळती (typical mail baldness pattern)सहसा थांबत नाही.
"खल्वाटो निर्धनम् क्वचित्" ह्या उक्तिच्या आशेवर जिवंत रहावं> आज नाय तर उद्या अंबानीच्या पप्पापेक्षाही अधिक पैका आपल्याला मिळेल्,ह्यावर विश्वास ठेवावा. नसेल तर.
डोक्याच्या शेतात केस गळु लागले,की चिंतांचं पीक येतं. निदान ते कमी ठेवावं.
काही जणांना नको तिथं केस असतात, काढायचे श्रम पैसे फार जातात्,त्यापेक्षा आपल्याला केस नाहित ह्यातच समाधान मानावं.
शेवटी काहीही झालं तरी केस जाणं ही एक सिरिअस केस आहे.
टाळक्यावरुन गेलेले केस बघताना अगदी आपल्या हातची केस दुसर्‍याच वकीलाकडे गेल्याच्या दु:खापेक्षा हे दु:ख नक्केच मोठं आहे.
मेसचं खाउन केस जातात हे ऐकुन आता तोंडाला फेस आलाय.
"गळणारे केस"ह्या समस्येला कसे करावे face ह्या चिंतेत आम्ही अजुनही आहोत.
ह्या चितेनं अजुन केस जातहेत.
एकदा टक्कल पडलं की मग त्यावर काही उगवण्यापेक्षा घरच्या सपाट फरशीवर भरघोस धान्य उगणं सोप्प आहे.

केसाला लागलेली गळती, खिशापर्यंत पोहोचु नये म्हणुन (दिवसेंदिवस उजाड दिसत जाणारं)थोडं डोकं वापरावं.
अधिक सविस्तर (जमलं तर उपचार, उपचार प्रकार, लागणारा खर्च आणी त्याचा उपयोग ह्याबद्दल)लिहिनच wig वगैरे फिट करुन आल्यावर.

थोड अळीव पेरून बघा काही होतंय

1

थोड अळीव पेरून बघा काही होतंय का ते? हिरवे तर हिरवे पण नैसर्गिक पिक तरी उगवेल ना! गो ग्रीन !!!
भन्नाट लेख !!! आवडल Laughing out loud


(आमच्याकडे सर्व प्रकारच्या लेखांना झोडपून मिळेल)

केसपुराण आवडलं

2

केसपुराण आवडलं Laughing out loud


करतो. करेन. व करेगें

काही जणांना नको तिथं केस

3

काही जणांना नको तिथं केस असतात, काढायचे श्रम पैसे फार जातात्,त्यापेक्षा आपल्याला केस नाहित ह्यातच समाधान मानावं.
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

काही जणांना नको तिथं केस

4

काही जणांना नको तिथं केस असतात, काढायचे श्रम पैसे फार जातात्,त्यापेक्षा आपल्याला केस नाहित ह्यातच समाधान मानावं हास्य
जबरदस्त ....

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

मेल की मेल

5

>>लागलेली गळती (typical mail baldness pattern)सहसा थांबत नाही.
कोलकाता मेल सारखी मेल झाली ही तुमची ! अगदी मेलच्या गतीने जाताहेत का हो केस?

आयला हे केसपुराण वाचलेच

6

Laughing out loud

आयला हे केसपुराण वाचलेच नव्हते Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ह्यॅ

7

आपण तर खूष झालो असतो राव. भांग पाडायची कटकट नाही. आमचे केस एखाद्या हिरोच्या केसांसारखे (चेहरा विलनसारखा आहे ते जाऊ द्या, दिसण्यावर जाऊ नका) वार्‍याशी स्पर्धा करतात नि मारे कष्टाने पाडलेला भांग दुसर्‍या मिनिटाला ग्रीष्मकालीन प्रेअरीच्या कुरणासारखा होऊन जातो.
आणखी एक फायदा म्हणजे शांपूचा खर्चही वाचतो. हे सोडून वर केस उगवण्यासाठी पैसे घालवणे हा तर आतबट्ट्याचा व्यवहार आहे हो.

अवांतरः होमिओपॅथिक हा शब्द बराचसा 'तथाकथित' सारखा वाटतो नै.

तुमच्या दु।खात सहभागी....

8

तुमच्या दु।खात सहभागी....


Every child needs a family and every family needs a child
ADOPT A CHILD

तुमच्या दु।खात सहभागी....

9

तुमच्या दु।खात सहभागी....


Every child needs a family and every family needs a child
ADOPT A CHILD

तुमच्या दु।खात सहभागी....

10

तुमच्या दु।खात सहभागी....


Every child needs a family and every family needs a child
ADOPT A CHILD

तुमच्या दु।खात सहभागी....

11

तुमच्या दु।खात सहभागी....


Every child needs a family and every family needs a child
ADOPT A CHILD

तुमच्या दु।खात सहभागी....

12

तुमच्या दु।खात सहभागी....


Every child needs a family and every family needs a child
ADOPT A CHILD

तुमच्या दु।खात सहभागी....

13

तुमच्या दु।खात सहभागी....


Every child needs a family and every family needs a child
ADOPT A CHILD

खूप वेळा दुखः झाले वाटतं

14

खूप वेळा दुखः झाले वाटतं निरंजन साहेब wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

(विषय दिलेला नाही)

15

Laughing out loud


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

लोल्झ...

16

हिहिहिहिहि... Laughing out loud

झकास!!!!

17

झकास!!!!
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


मी इथेही असतो -- साधं-सरळ