छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका
छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका
छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
. गंगाधर मुटे
------------....--------------....----------...------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....----------...------------
.jpg)
वा.. नागपुरी भाषेचा तडका
वा..
नागपुरी भाषेचा तडका आवडला..
गावरान मेजवानी.
येऊ देत अजुन..
सुरेख मुटेसाहेब...
सुरेख मुटेसाहेब...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्तंच कविता मुटेसाहेब. बाकी
मस्तंच कविता मुटेसाहेब. बाकी हा सभ्यतेचा बाजार सर्वकडेच चालू आहे. त्यावर आम्ही काय बोलणार. कविता पटली.
-पुण्याचे पेशवे
हसत खेळत अंतर्मुख करायला
हसत खेळत अंतर्मुख करायला लावणारी कविता.......!!!
(अवांतरः ई टिव्ही च्या कॉमेडी सर्कस मधला 'बेन्चोर' उभा करणारा मास्तर आणि 'घंटा' वाजवणारा बंडू आठवले)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
ठसके बाज
तडका मुटेसाहेब.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
नागपुरी टच असलेली भाषा मस्त
नागपुरी टच असलेली भाषा मस्त आहे. अन तडका तर जबरा. एकदम ज्जाळ!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
मस्तंच कविता मुटेसाहेब.
मस्तंच कविता मुटेसाहेब.
करतो. करेन. व करेगें
धन्यवाद.
काटकरजी आभारी आहे.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
खरोखर जबरा. नागपुरी शब्द नविन
खरोखर जबरा. नागपुरी शब्द नविन वाटले.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
सोल्लीड आहे कवित मुटेकाका
सोल्लीड आहे कवित मुटेकाका
आत्ताच कवीता ऐकली जालवाणी
आत्ताच कवीता ऐकली जालवाणी मधे.. खुप सुंदर.. नागपुरी लहेजा.. कंटेंट.. ठेका.. नाट्य... सगळंच सुरेख..
प्रतिसादाबद्दल आभारी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
आपणास सर्व "नागपुरी तडका" या प्रकारातील रचना येथे वाचायला मिळतील.
------------....--------------....----------...------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....----------...------------
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.