..... बाकी सगळं ठीक आहे !
आज माझ्या देशात देवा - सारं काही ठीक आहे ...
काही गरीब, कंगाल काही - काही मात्र श्रीमंत आहेत |
जगण्याच्या लढाई मधे , जनता सारी व्यस्त आहे
महागाई, भ्रष्टाचाराने , थोडी फार त्रस्त आहे |
रस्त्यांवर चारचाकी, रोज रोज वाढत आहेत
त्या खाली चिरडून सुद्धा , रोज काही मरत आहेत |
पावसाच्या काही सरी, नेतात रस्ते पाण्याखाली
नागरिकांचे सेवक मात्र, मागतात थोडी चिरीमिरी |
बॉम्बस्फोट आणि गँगवॉर - सारं काही सुरळीत आहे
चौका चौकात सिग्नलला - भिकारी देखील खूप आहेत |
अणू स्फोट करुन काही - भारत शक्तीशाली होतो
समुद्रातून येउन मृत्यु, रस्त्यांवर थैमान घालतो |
लोकांनाही त्याचे भय, आता फारसे वाटत नाही
मोठ्या मोठ्या शहरांसाठी, अशा घटना विशेष नाहीत |
धर्मांधतेची जीत सदा - सहिष्णुता पराजीत आहे
थोडे फार भांडण, तंटे ....
पण बाकी सगळं ठीक आहे |
आज माझ्या देशात देवा
सारं काही ठीक आहे ...
कुठे पूर , कुठे दुष्काळ - शेतकर्याच्या गळा फास
भेगाळलेल्या जमिनी मधे - माय-लेकराची अश्रुधार |
धान्य कुठे सडते अन् - तळमळते कुठे उपाशी पोर
मिजासी मधे धनदांडगे अन् सामान्याच्या जीवा घोर |
चोरांचीच इथे शिरजोरी - सामान्याला मात्र काठी
बळी तोच कान पिळी - मग कायदे कानून कोणासाठी? |
औषध नाही, डॉक्टर नाहीत - साथीचे सारे रोग आहेत
संशोधन अन् प्रयोंगांसाठी - गिनीपिग्ज् इथे खूप आहेत |
रस्ते नाहीत, शाळा नाहीत - वीज आणि पाणि नाही
कोणाला तू साकडे घालतोस? - नशीब तुझे सरळ नाही |
उन, थंडी, वारा, पाऊस - लेकरा, नको रे जेवण मागूस |
लाल दिव्याच्या गाडीला - उगीच नको बोल लावूस |
विठ्ठलाच्या भेटी साठी - वारकरी आसूसलेला
चंद्रभागेचा पान्हा - पण एकदशीला आटलेला |
शिर्डीच्या फकीराला बघ , रेशमाची शाल आहे
सामान्याला वस्त्र नाही ...
पण बाकी सगळं ठीक आहे |
दारिद्र्याने गांजलेल्या , लोकांचा थोडा क्षोभ आहे
सुख थोडे , दु:ख फार ....
पण बाकी सगळं ठीक आहे |
आज माझ्या देशात देवा
सारं काही ठीक आहे ...

.jpg)
वास्तवदर्शी कविता.
वास्तवदर्शी कविता.
करतो. करेन. व करेगें
ह्म्म्म्म !
ह्म्म्म्म !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
(विषय दिलेला नाही)
जबर्या
हृदयस्पर्शी कविता मनिषा
सर्व शब्द अंग अंग पेटवणारे आहेत.
हा धागा वाचनखुण म्हणून साठवला आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
छान कविता. पहिली चार कडवी
छान कविता.
पहिली चार कडवी वाचुन हे विडंबन सुचले :-
आज माझ्या मद्यालयात देवा - सारं काही ठीक आहे ...
काही नविन, जुने काही - काही मात्र रोजचेच आहेत |
पिण्याच्या लढाई मधे , जनता सारी व्यस्त आहे
व्हिस्कीने, बिअरने , थोडी फार मस्त आहे |
टेबलांवर नवखी गर्दी, रोज रोज वाढत आहे
जुन्यांचे हाल बघुन सुद्धा , रोज नवीन येत आहेत |
दारुच्या काही सरी, नेतात मेंदु अमलाखाली
मद्यालयांचे सेवक मात्र, म्हणतात अजुन मागवा काही |
बर्फ आणि सोडा - सारं काही सुरळीत आहे
टेबला टेबलावर बसलेले - अडाणी देखील खूप आहेत |
मस्त रे.. नवीन धागा टाक ना
मस्त रे..
नवीन धागा टाक ना प्रतिसाद काय देतोस
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छे रे ! उगाच पहिल्या चार
छे रे ! उगाच पहिल्या चार कडव्यांशी खेळलो झाले.
अजून एक कडवे छेडले असतेस तर
अजून एक कडवे छेडले असतेस तर कविताच संपलीच असती की रे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यवाद ! @ प.रा. : विडंबन
धन्यवाद !
@ प.रा. : विडंबन मस्त जमले आहे .
गझलेच्या अंगाने जाणारी कविता
गझलेच्या अंगाने जाणारी कविता वाटते आहे. (अर्थात गझल आम्हाला समजत नाही म्हणा)
आणखी एक. उगाचच "बॉर्डर" या खेळातलं "संदेसे आते है" या गीताच्या आधीचा प्रसंग आठवला. त्यात सगळे सैनीक घरून पत्रे आल्यानंतर वाचत असतात. एका सैनीकाला त्याचा बायको पत्र पाठवत "मुन्ना पेड से गीर गया, बाकी सब ठिक हौ | गाय ने बछडा दिया, बाकी सब ठिक हौ |"
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
छान वास्तवदर्शी.
दारिद्र्याने गांजलेल्या , लोकांचा थोडा क्षोभ आहे
सुख थोडे , दु:ख फार ....
पण बाकी सगळं ठीक आहे |
अप्रतिम.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.