एक मस्त पावसाळी रविवार!!!


मस्त पाऊस सुरू झालाय...असा पाऊस पडू लागला की कांद्याची भजी, बटाटेवडा असं काही तरी खमंग खावंसं वाटतं....आणि त्यातून रविवार म्हणजे तर मग विचारयलाच नको Party

रविवारी सकाळी सकाळी (?) उठल्यावर पहिली जाणीव झाली ती कोसळणार्या पावसाची... हास्य

धोधो कोसळणारा पाऊस, जोरदार वारा, कुंद वातावरण...असा मस्त पाउस, वाफाळलेला चहा, खेकडा भजी.... अहाहा असा enjoy केलेला एक मस्त रविवार हास्य

गरमागरम भजी आयतीच खायला छान वाटतात...

गरमागरम भजी

आता बटाटेवडे हवेतच..

बटाटेवडे

आणि अमृततुल्य चहा

वाफाळता चहा

मग? तुम्ही कसा केला रविवार साजरा?

No votes yet

राजे's picture
(विषय दिलेला नाही)


मराठमोळा's picture
अस्मी तै, फोटो तुम्ही काढलेत

अस्मी तै,
फोटो तुम्ही काढलेत की आंतरजालावरुन घेतलेत? wink


अस्मी's picture
ममोदादा...आंतरजालावरुन घेतलेत

ममोदादा...आंतरजालावरुन घेतलेत हो

(खाण्याच्या आधी फोटो....? सुचलंच नाही बुवा) wink


राजे's picture
धाग्यामध्ये तशी नोंद करावी.

धाग्यामध्ये तशी नोंद करावी.


पुण्याचे पेशवे's picture
आम्ही गुरुपौर्णिमेच्या

आम्ही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात व्यग्र होतो.


-पुण्याचे पेशवे

सुहास's picture
विषय देणार नाही

व प्रतिसाद ही ...पण जळविल्याबद्दल निषेध !!


चुचु's picture
अस्मी...मिर्च्या त़ळुन त्याना

अस्मी...मिर्च्या त़ळुन त्याना मिठ लावले असते तर जास्त मजा आली असती wink


अस्मी's picture
हो ना गं...आता नेक्स्ट टाईम

हो ना गं...आता नेक्स्ट टाईम हास्य


मितान's picture
आमच्याकडे उन्हाळाच आहे अजून.

आमच्याकडे उन्हाळाच आहे अजून. काल दिवसभर ढग होते. त्याच्याकडे अगदी लगान सिनेमात बसतात तसे बघत बसलो ! तसेच ढग गेले पण.... Sad
पण रविवार खादाडी म्हणून आलूके पराठे आणि वेज बिर्याणी हादडलीच !


जोवरी सुचते पावसाचे गाणे, हिरमुसवाणे व्हावयाचे नाही !

प्रभो's picture
मस्त..काल मी मित्राकडे जाऊन

मस्त..काल मी मित्राकडे जाऊन त्याच्या बायकोनी बनवलेला फ्लॉवर बटाटा रस्सा आणी मच्छी फ्राय (तिलापिया) खाल्ला.. हास्य


देवबाबु's picture
च्या मारी..तिकडं बिर्याणीचे

च्या मारी..तिकडं बिर्याणीचे फोटु बघुन जीव जाळायचा नाय म्हनुन इकडं आलो होतो पण छे..
इथं बी तेच..
निषेध असे फोटु टाकुन जीव जाळणाराचा..


किशोर's picture
निषेध निषेध निषेध निषेध

निषेध निषेध निषेध निषेध Crazy