रेड्युस्ड कॅलरी चिकन बिर्यानी/बिर्याणी

0
0

रेड्युस्ड कॅलरी चिकन बिर्याणी...

biryaani

साहीत्यः

चिकनः
२ पाऊंड चिकन- स्वच्छ करून धुवून मोठाले तुकडे करुन
३ मोठे चमचे दही
मीठ

मसाले:
२ चमचे गरम मसाला
१ चमचा हळद
३ चमचे तिखट
२ तेजपत्ते
८-१० मिरे
४-५ लवंगा
३ चमचे आले-लसूण पेस्ट
१ चमचा धणे पावडर
अर्धा चमचा शाहीजीरे
३-४ वेलची
१-२ मोठ्या वेलच्या
२-३ काड्या दालचीनी
खडे मसाले नसतील तर ३-४ चमचे आयता बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल...
३-४ काड्या पुदीना - बिर्याणीसाठी अगदी मस्ट...

भातः
२ वाट्या बासमती तांदूळ - (मी सोनामसूरी वापरला होता) अर्धा तास आधी नुसतेच धुवून निथळत ठेवावेत.
४ वाट्या पाणी
अर्धे लिंबू
१ टेस्पून तेल/तूप
२ चिमूट शहाजीरे, नसल्यास साधे जीरे
३-४ काळीमिरी
२ लवंगा
१ काडी दालचीनी
२ हिरव्या वेलच्या
१ तेजपत्ता
मीठ

सजावटीसाठी:
२ कांदे बारिक चिरुन १ चमचा तेलात कुरकुरीत भाजून...
३-३ चमचे प्रत्येकी हीरव्या मनूका आणि काजू तुकडा, तव्यावर खरपूस भाजून घ्यावेत.
४-५ पुदीना पाने
१-२ चिमट्या केसर(ऐच्छीक) असल्यास उत्तम
१ वाटी दूध - दूध नको असल्यास पाणी वापरले तरी चालेल.

Biryaani

कृती:

१) एका वाडग्यात चिकन + दही + सगळे मसाले + तिखट + मीठ मिक्स करून २-३ तास चांगले मुरत ठेवावे.
२) तेव्हाच दुधात केसर भिजत घालावे.
३) एका मोठ्या भांड्यात ४ वाट्या पाणी घेउन त्यात तांदूळ, लिंबाचा रस, मीठ आणि मसाले घालून मध्यम आंचेवर शिजत ठेवावे. अंदाजे १५ मिनीटे लागतात.
४) भात शिजत असताना उगाचच ढवळू नये, नाहीतर भात चिकट आणि तुटका बनतो.
५) एका कढईत मुरत ठेवलेले चिकन टाकून मध्यम आंचेवर शिजवावे. अंदाजे २०-२५ मिनीटे लागतात. चिकन अगदी कोरडे करू नये, लागल्यास थोडे पाणी टाकावे.
६) आता शिजलेले चिकन आणि भात थोडे थंड करून घ्यावे. भात परातीत किंवा मोठ्या ताटात उपसून थंड करावा आणि तेव्हाच थोडेसे तेल घालावे म्हणजे चिकट होणार नाही. भाताचे ४ भाग तर चिकनचे २ भाग करावे
७) आता एका खोल भांड्याला किंवा कढईला २-३ थेंब लावून घ्यावे, त्याऐवजी ऑइल-स्प्रे वापरला तरी चालेल.
८) सगळ्यात खाली भाताचा थर घालून घ्यावा. त्यावर चिकनचा थर घालावा.
९) परत भाताचा १-१.५ इंचाचा थर घालावा, त्यावर पुदीना आणि अर्धे काजू-मनूका घालाव्यात.
१०) परत भाताचा हलका थर घालून त्यावर चिकनचा शेवटचा थर घालावा.
११) आता भाताचा शेवटचा थर घालून त्यावर कांदा, बारिक कापलेला पुदीना आणि काजू-मनूका घालाव्यात.
१२) आता रवी किंवा सांडशीच्या टोकाने ५-६ ठिकाणी भांड्याच्या बुडापर्यंत खड्डे करून त्यात केसर घातलेले दूध टाकावे.
१३) सगळ्यात शेवटी घट्ट झाकण लावून १० मिनीटे मंद आंचेवर ठेवून द्यावे.
१४) कांदा-टोमॅटोच्या रायत्यासोबत सर्व्ह करावे.

Biryaani

वॉव ! मस्तच.. दिपाली ताई

1

वॉव !

मस्तच..

दिपाली ताई वेलकम बॅक !

हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

झकास.... अप्रतिम.. बिर्याणी

2

झकास....
अप्रतिम.. बिर्याणी म्हणजे खास आवड.

+१

3

अशेच म्हंतो.
यकदम शिश्टिकमॅटिक दिलीय न्हवं पाकृ. लै लै आबार.

+२

4

मस्त

शाकाहारी असल्याने रायत्याच्या

5

शाकाहारी असल्याने रायत्याच्या फोटूवरच समाधान मानले Sad

सुरेख फोटो....परा चिकन न

6

सुरेख फोटो....परा चिकन न घालता करायला सान्ग सॉ.परांना

सुरेख फोटो....परा चिकन न

7
सुरेख फोटो....परा चिकन न घालता करायला सान्ग सॉ.परांना

आता हे सांगण्यासाठी आधी मला लग्न करावे लागेल चुचुआत्या.

सुरेख

8

बिर्याणीचे सुरेख फोटो Party

परा तुझ्यासाठी मुली बघायला मी सुरवात करु का? Laughing out loud


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

चूप रे

9

बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना.(अरे वा, लागोपाठ दोन दिवस का वाक्प्रचार वापरायला मिळाला)
तू कशाला मुली बघतोयस रे चोरा. त्याचे त्याला बघू दे ना.

ब्रंम्हानंदी टाळी लागली आहे

10

ब्रंम्हानंदी टाळी लागली आहे हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

या पाकक्रतीवाल्यांना फोटु

11

या पाकक्रतीवाल्यांना फोटु टाकायला बंदीच घालायला पायजे बघा..
बाकी दिपालीतै लै बेस साधलीया बिर्याणी..

ज-ह-ब-ह-रा!!!

12

ज-ह-ब-ह-रा!!!

अप्रतिम, करुन पहावयास हवं.

13

अप्रतिम, करुन पहावयास हवं.


करतो. करेन. व करेगें

अप्रतिम

14

खुपच छान !

"रेड्युस्ड

15

"रेड्युस्ड कॅलरी"............????

बिर्याणी छान झाली आहे पण 'रेड्युस्ड कॅलरी' कसे ते कळाले नाही.....


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

मलाही हाच प्रश्न पडला आहे.

16

मलाही हाच प्रश्न पडला आहे.

अहो रेड्यस्ड कॅलरी बिर्याणी

17

अहो रेड्यस्ड कॅलरी बिर्याणी म्हणजे त्यात काही तेल-तूप फार वापरले नाहीये ना...नाहीतर बिर्याणीत तेला-तुपाचा वापर सढळ हस्ते केला तर बिर्याणी काय अप्रतिम बनते....

आयला, तुम्ही दिलेलीच एवढी

18

आयला, तुम्ही दिलेलीच एवढी भारी दिसते आहे की,उगाच कशाला जास्तीचे तेल तूप असा प्रश्न पडतोय.

........साँप भी मर जाए और लाठी भी ना टूंटे।
बिर्याणी खाण्याचे सुखही आणि कॅलरीज पण कमी.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

दिपाली ताईंची पाकृ पाहुन

19

दिपाली ताईंची पाकृ पाहुन पुन्हा त्या झणझणीत सुक्या मटनाची आठवण झाली !!!

सगळ्यांना धन्यवाद...व्हेज

20

सगळ्यांना धन्यवाद...व्हेज बिर्याणीसाठी... उभा चिरलेला कांदा, पातळ कापलेला फ्लॉवर् ,मटार् ,फरसबी, गाजर...थोड्याश्या तेलात/तुपात नुसतेच थोडे तपकीरी होइपर्यंत भाजून घ्यायचे, मग वरिलप्रमाणे दही+मसाला, हवा असल्यास एखाद चमचा मसाला वाढवावा... बाकी कृती सारखीच...बाकी गणपाने तर दिलीच आहे व्हेज बिर्याणी....