किडन्यापिंग...द थरार (अंतिम)

0
0

भाग १
भाग २

Evil Evil Evil

मला तो प्रसंग आठवायला लागला..लग्नाच्या स्टेज सजावटीसाठी फुले आणायची होती त्यासाठी मावस भावाच्या काही मित्रान बरोबर मार्केट मध्ये गेलो होतो..आमची खरेदी जवळजवळ पूर्ण झाली होती..तेवढ्यात तिथे एका गजरेवाल्याजवळ एक सुंदर मुलगी दिसली..(रावडी भाषेत सांगायचे झाल्यास) कसली खवाट दिसत होती..तिला पाहिल्यावर माझे इकडे तिकडे भिरभिरणारे डोळे एकाच जागी स्थिरावले होते.."ओ पाव्हण..आपण फुलं घ्यायला आलो आहोत,बघायला नव्हे"..एकाने म्हणले.."मग घ्यायची का?" मी डोळा मारत त्याला विचारले..श्श्श्श..हळू बोला राव..ऐकेल कोणीतरी आणि आपल्या फोटोला फुलं घालायची वेळ येईल..तो म्हणाला..का म्हणे? कोण आहे हि बया? "अहो तुम्हाला माहित नाही, आप्पा ची मुलगी आहे..आणि हा आप्पा म्हणजे...."(माझे डोळे चमकले)"असू दे रे कोणीपण माझ्यासमोर कोणत्याही आप्पाच्या गप्पा नाही मारायच्या.."असे म्हणून मी त्याचे बोलणे तोडले..पुढे तो काही बोलणार एवढ्यात मी तिच्यापर्यंत पोहोचलो हि होतो..."हा गजरा कितीला आहे?मी मोठ्याने गजरेवाल्याला विचारले.."वेणी..वेणी म्हणतात त्याला..गजरा नव्हे" गजरेवाला तितक्याच शांतपणे म्हणाला..अर्रर्र तिच्या..लागली का वाट..तिच्यासमोरच फालुदा झाला होता.."अस कस? हे बघा..हि असते ती वेणी आणि आपण जो त्यात माळतो तो गजरा..वेणीमध्ये वेणी कशी माळणार?हो कि नाही हो?"मी तिला विचारले.."हो हो" ती डोळे मिचकावत म्हणाली.."बघा म्हणत नव्हतो मी"..विजयी मुद्रेने गजरेवाल्याला म्हणालो.."नवीनच आहे इथे..पुण्याला असतो..मावस भावाच्या लग्नाला आलो आहे.."मी आपले बळेच माहिती सांगितली..हो का?बर किती रुपयांची पैज आहे? तिने विचारले.."पैज??कसली पैज?" माझ्या चेहेर्यावर गोंधळलेले भाव आले.."उगाच नाटक करू नकोस..मी मगाशी त्या मुलांबरोबर माझ्याकडे पाहून बोलताना पहिले आहे..नवीन आहे ना..म्हणूनच पैजेच्या आमिषाने माझ्याबरोबर बोलायला आलास..नाहीतर आला नसता..जितक्याची पैज आहे त्याच्या अर्धे मला हवे आहेत.."ती म्हणाली.."ओ अस काही नाहीये..उगाच तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय"अस म्हणून मी ५-१० मिनिट तिच्याशी बोलून सटकलो..भलतीच फटाकडी पोरगी दिसते आहे..मनात म्हटले...आणि आत्ता त्याच फटाकड्या पोरीचा बाप माझ्यासमोर मिश्या पिळत उभा होता..आप्पा डोणजेकर..

ओके..ती होय..तिच काय?मी बेफिकीरीने विचारले..का रे ढुंगणाला दात आले का तुझ्या?कळत नाही कोणासमोर बोलतो आहेस?आप्पा डोणजेकर म्हणतात मला..माझ्या मालकीचे ४-५ गुत्ते-मटक्याचे अड्डे आहेत..१ फ़ुल आणि ३ हाफ मर्डर केसेस माझ्या नावावर आहेत..इथल्या प्रत्येक चौकीत मी टोपमोस्ट वान्तेड माणूस आहे..माझ्या पोरीबरोबर बोलतोस तू आणि म्हणतो ओळखत नाहीस?बोल परत कधी भेटशील का तिला? "नाही त्याची काही गरज नाहीये आता..मला तुलाच भेटायचं होत आप्पा..मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे म्हणालो..माझ्या वाक्याने त्यांच्या गोंधळलेल्या स्थितीचा फायदा घेऊन मी काही वेगवान हालचाली केल्या..उजव्या हाताने एक घणाघाती ठोसा मागच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या चोच्याच्या छातीवर मारला..गर्रकन वळून एकाच लाथेने आधी आन्नारुमाल आणि नंतर त्याच्या दुसर्या साथीदाराचे सेंटर पोइंटनिकामी केले..हि गडबड ऐकून आतल्या खोलीतला काळ्या ड्रआइव्हर बाहेर आला..त्य्लालाही हाताच्या च्योप्ने मानेवर वार करून लोळवले..आप्पा पाहताच राहिला..त्याला हे सगळे अनपेक्षित होते..त्याला दोरीने मुसक्या बांधून ठेवले..त्याच्या मोबाइल वरून कोल केला.."ह्यालो..ज्यू.सबइंस्पे.पंड्या बोलतो आहे..आप्पा डोणजेकर माझ्या ताब्यात आहे..तुम्ही ताबडतोप इथे या" असे म्हणून मी माझ्याकडची छोटी डबी काढली त्यातले बटन दाबले..त्यावरून पोलिसांना माझे लोकेशन कळणार होते..

आप्पा अस पाहू नकोस,तू तडीपार होतास तरी इथे आल्याची खबर आमच्या खबर्या ने दिली होती..आता नक्की तुझा पत्ता माहित नव्हता..माझी नवीनच बदली झालीय इथे..आणि त्या दिवशी योगायोगाने तुझी मुलगी दिसली..म्हटल रिस्क आहे पण फायदा करून घ्यावा...मला वाटल नव्हत इतक्या लवकर तुम्ही हालचाल कराल म्हणून..मला कीडन्याप करण्यापासून आत्तापर्यंत मी मुद्दाम घाबरल्याचे दाखवत होतो..तुझी माणस गाफील राहावी यासाथी..हां आता थोड सहन कराव लागल..बुड चोळत म्हणालो..पण तू हातात सापडलास..तेवढ्यात पोलीस आले.."अरे माझा तेवढा तो मोबाइल घ्या बर का यांच्याकडून शोधून..मी शिपायांना सांगितले.. "वेलडन पंड्या,वेलडन" सबइंस्पे.पवार म्हणाले..मी थांक्यू म्हणालो आणि चालू लागलो..

समाप्त

शेवट गुंडाळल्यासारखा वाटला.

1

शेवट गुंडाळल्यासारखा वाटला. बाकी कथा सुरेख!

जो वेग आधीच्या भागांना होता

2

जो वेग आधीच्या भागांना होता तो कुठेतरी हरवला आहे व त्या बरोबर जी मज्जा होती ती देखिल !

नाही आवडला बॉ शेवटचा हा भाग...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

शेवटचा भाग नाही आवडला.

3

शेवटचा भाग नाही आवडला. Sad


-पुण्याचे पेशवे

>>शेवटचा भाग नाही

4

>>शेवटचा भाग नाही आवडला.
सहमत.. Sad

हॅ शेवट एकदम पिचपिचीत का

5

Sad
हॅ शेवट एकदम पिचपिचीत का केलास की रे दादा.
सुरुवात तर एकदम झकास झाली होती.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

आवडली

6

मान्य आहे की आधीच्या दोन भागांतला थरार कमी पडलाय या भागात, पण मला तरी आवडली कथा.
शेवट जरा लवकर गुंडाळलास. अजुन फुलवता आल असतं कथानक.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

ए या गणपाला किडन्याप करायचा

7

ए या गणपाला किडन्याप करायचा प्लॅन करारे कुणीतरी.....
एकसे एक रेशीप्या येतात त्याला. क्लास संपला की सोडून देऊ या.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

>>एकसे एक रेशीप्या येतात

8

>>एकसे एक रेशीप्या येतात त्याला. क्लास संपला की सोडून देऊ या.

क्लास नको .. पोट आणि मन भरलं की सोडुन देउ .. wink

(विषय दिलेला नाही)

9

Big smile


करतो. करेन. व करेगें

एवढ्या लोकांची मते आली आहेत

10

एवढ्या लोकांची मते आली आहेत निगेटिव्ह... पुन्हा लिहायला घे रे हा भाग...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मला आवडला शेवट..

11

असे वाटत होते की अप्पाच्या पोरीनेच किडनॅप केले..पण अनपेक्षित शेवट..

मस्त मस्त..

योगी९००

'सबइनिस्पेक्टर पवार' लैच फेमस

12

'सबइनिस्पेक्टर पवार' लैच फेमस दिसतात. बर्‍याच ठिकाणी भेटलेत! wink

छान जमले आहे रे

13

छान जमले आहे रे हास्य

चेत्या !! हे कधी लिहीलस रं

14

चेत्या !! हे कधी लिहीलस रं !!

आवडला तरीबी राजेंसारखच म्हणतो !!