पाऊस आवडतो का?

0
0

तुम्हाला पाऊस आवडतो का? आवडत असल्यास का आणी आवडत नसल्यास का नाही?

( वाचक मायबाप, एकोळी धाग्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, कृपया संभाळुन घ्या. )

आपला,
मराठमोळा

पाउस खूप म्हणजे खूपच आवड्तो.

1

पाउस खूप म्हणजे खूपच आवड्तो. रिमझिम पाउस मला काही काळासाठी तरी सगळं विसरायला लावतो, फक्त माझी मी असते त्या वेळेस..आणि खूप आनंदी हास्य . खूपसं स्पिरिच्युअल फिलिंग.

धो-धो, घोंगावणार्‍या वार्‍यसहित असणारा पाउस मला लहान्पणीची आठवण करून देतो, आमच्या घरात अशा पावसांत खूप पाणी शिरायचं, वस्तू इकडून तिकडं ठेवणं, पाणी बाहेर फेकणे असं रात्रभरही करायला लागायच. ४-५ नारळाची झाडं वार्‍यानं खूप हलायची, प्रचंड आवाज यायचा.., रात्री वीज गेलेली असल्यानं मेणब्त्ती किंवा कंदीलाच्या उजेडात सगळ्यांच्या सावल्या मजेशीर दिसायच्या.पण मला याची भीती, कटकट कधीच वाटली नाही.
त्यामुळे धो-धो पाउस मला खूप होमली फिलिंग देतो.


पुष्करिणी

मला पाऊस आवडतो. पाऊस आणि

2

मला पाऊस आवडतो. पाऊस आणि आठवणींचं माझ्या मनात घट्ट नातं आहे. पाऊस सुरु झाला की आठवणीही झरू लागतात. पुष्का म्हणते तसं मलापण पावसात भिजताना होमली वाटतं.
पाऊस आला की मनात मातीचा वास घमघमायला लागतो. मस्त गरम चहाची वाफ चेहर्‍याला जाणवते..रेडिओवर किशोर ऐकू येतो...आणि मी पावसात भिजायला जाते..


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

(विषय दिलेला नाही)

3

<<तुम्हाला पाऊस आवडतो का?
कधी आवडतो कधी नाही

<< आवडत असल्यास का
छान थंड वाटतं

<<आणी आवडत नसल्यास का नाही?

खुपच थंड वाटतं

मला पाऊस खूप आवडतो. पूर्वी

4

मला पाऊस खूप आवडतो. पूर्वी पुण्यात जेव्हा वाड्यात रहायचो तेव्हा पावसाळ्यात १-२ कौले फुटली असतील तर तिथून पाणी गळायचे. तेव्हा आई त्या खाली बादली लावून ठेवायची. तेव्हाच्या वाड्यांमधे कॉर्पोरेशनचे पाणि दिवसातून २ दा २ तास येत असे. त्यामुळे त्यावेळात दिवसभराचे वापरायचे पाणी भरून ठेवायला लागायचे. तेव्हा पावसाळ्यात अशा साठवलेल्या पाण्यामुळे पाण्याची ऐश असायची. एखाद्या ठिकाणी कौल थोडंच फुटलं असेल तर तिथे त्याखाली फरशीवर नुसतं फरशीपुसणं टाकून ठेवायची. मी मस्त वाड्याच्या गॅलरीत (किंवा सज्जात) उभाराहून कौलावर तडाडणारा पाऊस ऐकत उभा रहायचो. वाड्याच्या आजूबाजूला लावलेली झाडं जी गॅलरी पासून खूप दूर होती ती वार्‍याच्या फटक्यानी हलकेच वाड्याच्या भिंतीना थापट मारून जायची. अंगणात साचलेले पाणी वाड्याबाहेर पाणी जावं यासाठी असलेल्या बोगद्यातून बाहेर जाण्यासाठी झेपाऊ लागे तेव्हा त्यात भोवरे तयार होत. मग आम्ही कागदाचे कपटे वरून टाकायचो आणि भोवर्‍यात जाऊन फिरायला लागले की तयार होणारी नक्षी पाहून हरखून जायचो. वाटायचॉ आपण कागदाचे कपटे असलो असतो तर किती मजा आली असती मस्तं या वाहत्या पाण्याबरोबर जाऊन त्या भोवर्‍यात गरगर फिरलो असतो. मजाच मजा. आईला मग तसं सांगितलं की म्हणायची की "अरे कपटे केरातच जातात. ते त्या पाण्यात फिरतात आणि बाहेर जाऊन गटारातच जातात. त्यात कसली आलीये मजा". मला वाटायचं "तिला वेडीला कळतच नाही काय मजा आहे त्या कपट्यांची." पुढे मोठा झाल्यावर कस्पटासमान वागणूक मिळाल्यावर वाटलं बरं झालं की कपटे झालो नाही. मी वाढत राहीलो आणि पुण्यातला पाऊसही. पूर्वी खरंच आषाढातली पावसाची तोफ श्रावणात अगदीच पारीजातकाच्या सड्यासारखी हळूवार होत असे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने शाळांना सुट्टी असे कींवा शाळांमधेही गंमत जम्मत चालू असे. एखाद्या श्रावणातल्या शुक्रवारी शाळेत फुटाणे वाटायचे. एखाद्या सोमवारी केळी. घरी सुधा पुरणाची दिंड, पुरणाची पोळी, साखरभात, भाजणीचे वडे असे नेहेमीची चापरीतले (नेहमी चापायचे) किंवा कधी केनीकुर्डूची भाजी, भारिंगीची भाजी अशा अनवट भाजा खायला मिळायच्या. चातुर्मास घरी पाळत नसले तरी श्रावण महीना आवर्जून पाळला जायचा. म्हणून श्रावणात कांदा, लसूण कशात वापरायचे नाहीत. तसेच वांगं पण नसे श्रावणात (त्यामुळे मी खूष).
पावसाळ्यात शाळेत जाताना-येताना रेनकोट घालून कंपू करून चालत जायचं. एखादी रिक्षा अंगावर पाणी उडवून गेली तर शिताफीने कंपू रिक्षाचा पाठलाग करायचा आणि त्या रिक्षाला गाठून, रिक्षावर चिखल चिखल उडवून रिक्षावाला मारायला मागे धावला तर या बोळातून त्या बोळात या वाड्यातून त्या वाड्यात वेगवेगळ्या दिशांनी पळायचं. रिक्षावाला हैराण व्हायचा. मग ठरलेल्या ठिकाणि परत येऊन परत शाळेकडे-घराकडे जायचं.शाळेच्या ग्राऊंडवरच्या चिखलात लाल रबरी छोट्या बॉलनं फुटबॉल खेळायचा. चिखल उडवत बॉल तडकावयचा आणि २ विटांमधल्या गोलमधे मारायचा. त्यात नडग्यांना नडग्या, घोट्याला घोटे आपटून सडकून निघायचे. कोणतरी एक रोज झांजरलेला असायचा किंवा लंगडत असायचा. शाळेतून घरी जाताना जोरजोरात गप्पा मारत दंगा करत घरी जायचं. मित्रांच्या नावाच्या मागे भकार, मकार लावायला आम्ही लहान वयातच शिकलो. म्हणजे पाचवी सहावीत. जसा कंपू घराच्या रेंज मधे येई तशी शाळेत उधळलेला आमचा भाषेचा वारू पुन्हा साजूक तूपात शिरे. ;)घरी पोचताच आली डुकरं उकीरड्यात लोळून म्हणून उद्धार होई. मग कपडे बदलून गरमागरम वरणभात खाऊन पाऊस बघत, समोर स्वाध्यायाच्या (मराठी शाळेत शिकलेल्याना स्वाध्याय म्हणजे काय असा प्रश्न पडणार नाही. पण हा स्वाध्याय म्हणजे घरचा अभ्यास नव्हे तो वेगळा. स्वाध्यायाचा हप्ता प्रत्येक विषयात महीन्यातून एकदाच असे पण घरच्या अभ्यासाची वसूली रोजची असे. wink घरचा अभ्यास कधीच करत नसू पण स्वाध्यायाचा कर मात्र न चुकता भरत असू) वह्या घेऊन पेंगायचं. चारचा ठोका पडला की सारा कंपू बनियन-हाफपँट अशा कुमारसुलभ वेषात परत दंगा करायला हजर. मग दुसर्‍या दिवशी सकाळीच घरचा अभ्यास न केल्यामुळे गणिताच्या नाईक बाई आमची रवानगी वर्गाबाहेरच्या व्हरांड्यात करत. हास्य मग पुन्हा तो पाऊस आणि मी दोघेच सोबती. मस्तपैकी व्हरांड्यात उभे राहून गळणार्‍या पागोळ्या बघत बघत तास कसा संपायचा कळायचंच नाही. पावसाळ्यात धांद्रटपणामुळे पळताना पाय घसरून पडणे ठरलेलेच. मस्तंपैकी पार्श्वभाग सडकून निघे. एखाद्यावेळेला डोक्याला खोक पडणे वगैरे होत असे. इतरवेळेला घसरून पडल्यावर कपडे खराब झाले म्हणून ठरलेला घरचा 'आहेर' खोक वगैरे पडली तर मात्र मिळत नसे.
कॉलेजात मात्र या पावसाने अनेक वेगळे रंग दाखवायला सुरुवात केली. शिंग फुटलेल्या आमच्या डोक्यातून सिग्रेटिची झिंगही खेळू लागली. मस्तंपैकी एस एम जोशी पुलाखाली जाऊन आमचा कंपू शिग्रटी फुकायचा. कारण नदीपात्रातला रस्ता तेव्हा नव्हता त्यामुळे तो भाग एकदम निर्मनुष्य म्हणून आमचासाठी सेफ. पुलाखाली पाऊस पण लागत नसे, पण आजूबाजूला मात्र पाऊस मस्त रपरपत असे. थोडेसे नदीचेही पाणी वाढलेले त्यामुळे पाण्याला गटाराची घाण येत नसे. तिथल्या निर्जनतेचा वेगळा फायदा काही काही कॉलेजातली जोडपीही घेत. wink ते त्यांच्या खेळात दंगलेले आणि आम्ही त्यांना बघत बघत झुरके मारण्यात. त्यांचे ऊर प्रणायाने उसासत आणि आमचे शिग्रेटीने. wink
अजूनही काही लोक पावसाला शिव्या देतात किरकिरतात पण मी मात्र पाऊस पडू लागला की पावसासाठीची माझी खास जीन्स आणि टि-शर्ट घालतो आणि गाडीवर टांग टाकून बोंबलत बाहेर फिरायला निघतो.


-पुण्याचे पेशवे

मस्त रे पुप्या....

5

मस्त रे पुप्या....

मस्तच

6

मस्तच


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुप्या, एकदम झकास.... काही

7

पुप्या,

एकदम झकास....
काही काही वाक्ये मस्तच.
(माझ्या एकोळी धाग्याचा चांगला फायदा झाला. सकाळी सकाळी मस्त वाचायला मिळालं) हास्य

हम्म

8

माझ्या एकोळी धाग्याचा चांगला फायदा झाला...
पुप्या ...काळ सोकावतो रे. wink
पुप्याचे मस्त पर्तिसादाबद्दल हाबार मान्तो. लेक का नाय लिवलाय रं?

सुंदर रे पुप्या. आयला,

9

सुंदर रे पुप्या.
आयला, पुप्याने प्रतिसाद म्हणुन अखंड लेखच टाकला की wink

असेच म्हणते मी पण ! मस्त लेख.

10

असेच म्हणते मी पण !
मस्त लेख. हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

त्यांचे ऊर प्रणायाने उसासत

11

त्यांचे ऊर प्रणायाने उसासत आणि आमचे शिग्रेटीने.
लै..भारी...


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

लै लै आवडतो. सविस्तर प्रतिसाद

12

लै लै आवडतो. सविस्तर प्रतिसाद इथे पाहा.


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

पाऊस वेड लावतो मला.. पावसात

13

पाऊस वेड लावतो मला..
पावसात भिजणे व मनसोक्त फिरणे हा तर छंदच आहे माझा..... हास्य

परवाच जाऊ आलो सिंहगड ला भर पाऊसामध्ये... जबरदस्त धुके पडलेले होते.... जाम मज्जा येत होती... तोरणागडाकडे पण जाण्याचा मुड होता पण बरोबरचे फट्टु होते Sad पाऊस पाहून घाबरले म्हणाले नको जायला...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पाउस आवडतोच. फक्त डोके कोरडे

14

पाउस आवडतोच. फक्त डोके कोरडे ठेवतो. कधी कधी मोटरसायकलवर जातांना रेनकोट मुद्दाम नेत नाही.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

माझे अहमदनगरचे नातेवाईक

15

माझे अहमदनगरचे नातेवाईक सातार्‍याच्या पावसाला कायम वैतागतात. त्यंच्या मते पाऊस म्हणजे चिख्खल आणि ओलसरपणा.
आम्ही मात्र मस्त सातार्‍याचा पाऊस एन्जॉय करायचो.
भुरभुर पडणारा पाऊस , धुक्यात लपेटलेला हिरवाकच्च डोंगर, गार ओलसर फ्रेश हवा , हातात मस्त वाफाललेला मसालानी चहा चा मग.
दुपारी जेवल्यानंतर उकडून भाजलेल्या गरमागरम शेंगा,
पाऊस असा चवीने एन्जॉय करायचो
एकदा अहमदनगरला गेल्यावर त्या नातेवाइकांच्या पावसाला वैतागण्याचे कारण कळाले....
सातार्‍यातला पाऊस तुम्हाला एकदम हिरवाईत घेऊन जातो.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

मला पाउस अजिबात आवडत

16

मला पाउस अजिबात आवडत नाही..खुप उदास वाटते त्या काळात.

काही विशेष कारण्.....आठवणी

17

काही विशेष कारण्.....आठवणी वगैरे..??? (पळा आता चुचु मारते...........)

बाकी पाऊस आवडत नाही म्हणजे अरसिक असे म्हणायची फ्याशन आहे हल्ली..... त्यामुळे आम्ही 'सार्वजनिक' भिजतो.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

माझ्या काहि मित्रांबरोबर

18

माझ्या काहि मित्रांबरोबर धारेश्वरला पावसात गेलो होतो. त्याची आठवण आली. एकदम मस्त जागा आहे.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

आपली आवडती स्त्री अथवा आवडती

19

आपली आवडती स्त्री अथवा आवडती बाटली जोडीला असल्यास पाऊस कायमच आवडत आला आहे. अन्यथा त्याला आम्ही फाट्यावर मारतो.

स्पष्टवक्ता
परालाडू

पाऊस..

20

पाऊस म्हणजे नव्या कोर्‍या वह्यापुस्तकं,छत्री/रेनकोटाचा वास..
पाऊस म्हणजे ओल्या केसांना टॉवेल गुंडाळून गरमागरम कॉफी आणि खेकडा भजी खाणे..
पाऊस म्हणजे टप्पोरे थेंब अंगावर घेत रस्त्यात साचलेल्या पाण्याच्या डबक्यातून थबक थबक चालत एकमेकांवर पाणी उडवत जाणं..
पाऊस म्हणजे कुंपणावरची मेंदीची पाने तोडून पाट्यावर वाटून सगळ्या फ्रॉकावर डाग पाडून घेऊन ओरडा खाणं..
पाऊस म्हणजे चिखलात फुलबाजीच्या काडीने खेळलेली रुतवारुतवी..
पाऊस म्हणजे अतिवृष्टीमुळे शाळेला बुट्टी..
पाऊस म्हणजे लोकल्सचा गोंधळ, फलाटावर पाणी..
पाऊस म्हणजे मित्रमैत्रिणींच्या बरोबर माथेरान नाहीतर येऊरच्या जंगलात भटकणं..
पाऊस म्हणजे श्रावणातल्या मङगळागौरींची जागरणं, भाजणीचे वडे आणि दही..आणि शाळेतल्या श्रावणी शुक्रवारचे चणे..
हरतालिकांची पत्री,गणपतीच्या दुर्वा आणि आघाडा तोडत हिंडणं..
पाऊस म्हणजे...
अर्थातच पाऊस आवडतोच!
स्वाती

तुम्हाला पाऊस आवडतो का?

21

तुम्हाला पाऊस आवडतो का? >>>>

होय पाऊस हा नेहमीच आवडतो ....साधा शॉवरखाली आलेला जरी असला तरी आवडतो....

आणी ती जवळ असेल तर अजुनच !!!

पाऊस मला फारच आवडतो, कारण

22

पावसाळ्यातली भटकंती. ट्रेक्सच्या निमित्ताने केलेली.

पाऊस सुरु झाला कि, अगोदरचे ट्रेक्स आठवायला लागतात. दरवर्षी सगळंच नवीन असतं. नवीन ठिकाणं, नवीन निसर्ग, नव्या गमती जमती, आम्ही केलेला स्वैपाकही आठवायला लागतो. एखाद्या गुहेत, कपारीत, जंगलातल्या पाणवठ्यावर, गावातल्या - देवळात, समाजमंदीरात, शाळेच्या आवारात, अश्या वेगवेगळ्या ठिकाणी.

आठवणींच्या ह्या धारांमुळे नवीन ट्रेक्सच्या कल्पनेला कोंब फुटायला लागतात. त्याची वाढ एवढी जोमाने होते कि लगेचच नवीन ट्रेक्स ठरतात,निघतात, आणि होतातही. पुर्वीच्याच जोषात.

लवकर संपू नये वाटणार्‍या ह्या पावसाळी ट्रेक्समधल्या गमती जमती आठवणींच्या रुपाने कट्ट्यावरच्या विषयांमधून कायम प्रसन्नतेने वावरत राहतात.