काही दिवसांपुर्वी सहज म्हणून घराजवळच्याच एका पार्कमधे गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो..
शुभ्र पांढरी कमळं..


मला सुचलेलं नाव.. हिरण्यगर्भ

मस्त भलं मोठं पान


करकोचा (सॅन्डहील क्रेन)

ह्यांची घरटी अगदी झाडाच्या टोकाच्या फांदीवर असतात..

बदकं / गीस..

आणि हंस..

बुलबुल सारखा दिसणारा हा पक्षी.. फक्त बुलबुलसारखा शेपटीखाली लाल डाग नव्हता.. त्या ऐवजी दोन्ही पंखांखाली लाल डाग होते..

इथली करवंद?? अशा लाल, काळ्या, निळ्या बेरींची झाडं खूप होती


ही कसली फुलं आहेत माहित नाही पण त्यांच्या जवळून गेलं की त्याच्या सुवासाच्या घमघमाटानं मस्त फ्रेश वाटत होतं.

इथल्या भाषेत ह्या फुलाला "निअरली वाईल्ड रोज" म्हणतात.. जवळजवळ गावठी गुलाब.. ऐकायला मजेशीर वाटतं..

आणखी थोडी रानटी/गावठी(?) फुलं




मोठं ऐट्बाज फुल.. गावठी वाटत नाही.

चतुर... (असे फोटो काढताना कॅमेराचं आणि माझं फोटोग्राफिचं ज्ञान यातला तोकडेपणा जाणवतो..)

इथे त्या फुलांच्यावर असलेल्या कोळ्याचा फोटो काढायचा होता... पण साध्या कॅमेराने काढताना झूम/फोकस गंडलं.. फोटो काढता येइना लेन्स वाकडं.. हेच खरं.

एक गमतीशीर पाटी..

अशी मस्त संध्याकाळ असावी, जवळ तुमची आवडती माणसं असावी.. मग आणखी काय हवं??

अतिशय सुंदर. मस्त फ़ोटॊ.
अतिशय सुंदर. मस्त फ़ोटॊ.
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
सु़ंदर छायाचित्रे
सु़ंदर आणि अप्रतिम छायाचित्रे कोहम... छायाचित्रांच्या जोडीने पर्यटनाचे वर्णन आले असते तर अजून मजा आली असती
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
काय सुंदर फोटो आले आहेत कोहम
काय सुंदर फोटो आले आहेत कोहम !
जबरदस्तच !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आहाहा
कस बागेतुन फेरफटका मारुन आल्या सारख फ्रेश वाटतय फोटो बघुन. शेवटचा फोटो बघुन तो तलाव कृत्रीम असेल अस अजिबात वाटत नाही हो. (तुम्ही ज्यांना चतुर म्हणताय त्यांना आम्ही टाचण्या म्हणतो. चतुर अजुन मोठे असतात पन बहुतेक जात कुळी/ फॅमेली एकच असवी)
"अशी मस्त संध्याकाळ असावी, जवळ तुमची आवडती माणसं असावी.. मग आणखी काय हवं??" १०१% पटल बघा
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मानलं बुवा
मानलं बुवा
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
जबरा..........सही वाटल एकदम
जबरा..........सही वाटल एकदम