कोर्टाची पायरी

0
0

कोर्टाची पायरी

"शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये" असं म्हणतात. पण व्यवसायाच्या निमित्तानं डॉक्टरांना कोर्टात जावं लागतं, एक्सपर्ट म्हणून साक्ष द्यायला. आता यामुळे डॉक्टर मंडळी शहाणी नाहीत असं म्हणायचं कां? तर विनोदाचा भाग सोडा. डॉक्टर म्हणून मलाही अनेकदा कोर्टात जावं लागलं. त्यातल्या काही अनुभवांनी नक्कीच माझ्या शहाणपणात भर पडली असं म्हणावं लागेल.

पैठणला ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात दहा वर्षं होतो. तेंव्हा एक पोस्ट्मार्टम करावं लागलं. तसे अनेक केली पण हा अनुभव खास. पोलीस एक लोखंडी पेटी घेवून आले. त्यात होती नुसती हाडं. काही तपासाअंती त्यांना सापडलेली. आता या अस्थींवरून मला पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. ही हाडं मनुष्य प्राण्याची होती कां? असल्यास स्त्रीची की पुरुषाची? मयताचं मृत्यूसमयी वय काय असेल? मृत्यू केंव्हा झाला असेल? आणि मृत्यूचं कारण काय असेल ? या सर्व गोष्टी खरं तर आम्हाला सेकंड एम.बी.बी.एस. ला अभ्यासात होत्या, फोरेन्सीक मेडीसीन (न्यायवैद्यक्शास्त्र) या विषयाच्या अभ्यासात. पण हा विषय तेंव्हा कुणी फारशा गंभीरपणे घेत नाही. निव्वळ टिवल्याबावल्या करून या विषयाचे क्लासेस, निदान मी तरी केलेले. पण आता उत्तरं देणं क्रमप्राप्त होतं. पोलीसांनी तपास चालवला होता आणि त्यात माझ्या मताला महत्व होतं. मी सरळ औरंगाबाद गाठलं आणि या विषयाच्या माझ्या गुरूंना भेटलो. त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि माझी नाव किना-याला लागली. सन्माननीय न्यायमूर्तींनी न्यायदानात महत्वाचं योगदान दिल्याबद्दल माझ्या बद्दल गौरवोद्गार काढले. मला आजही ते एखादं पदक मिळाल्या सारखे वाटतात.

......... पूढे चालू

दुसरा प्रसंग आहे पैठणला एकदा

1

दुसरा प्रसंग आहे पैठणला एकदा जातीय दंगल झाली तेंव्हाचा. ध्यानीमनी नसतांना एकदम दंगल पेटली आणि एका मागोमाग एकेक जखमी दवाखान्यात यायला लागले. यातल्या एका प्रकरणात माझी कोर्टात साक्ष झाली. साठीची एक बाई साक्ष द्यायला आली होती. त्यानंतर माझी सक्ष होती म्हणून मी कोर्टात बसलो होतो. साक्षीच्या दरम्यान तिनं माझ्याकडे बोट दाखवून मी जखमा शिवल्याचं सांगितलं. तेंव्हा सरकारी वकीलांनी विचारलं "भूल दिली होती कां?" यावर तिनं जखमेच्या जागी इंजेक्षन देवून बधीर केल्याचं सांगितलं. त्यावर वकिलांनी सहज म्हणून विचारलं, "भिती नाही वाटली डॉक्टरांच्या सूईची?" यावर ती निष्पाप स्त्री उद्गारली "कु-हाडीचे घाव पचवले मी वकिलसाहेब! डॉक्टरांच्या सूईला कां घाबरेन?" या प्रतिप्रश्नावर कोर्टात पसरलेला सन्नाटा आजही आठवतोय. या वाक्यानं मला अंतर्मूख केलं. त्यावर मी एक कविता केली, "ड्यूटी" या नावाची. मीम वर ती प्रकाशित झाली आहे(http://www.mimarathi.net/node/1472)

दारू पिवून बरीच मंडळी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात. मग पोलीस त्यांना पकडून सरकारी दवाखान्यात आणतात. पोलीसांनी त्यांचा खाक्या दाखवलेला असतो आणि आता दवाखाना. आपण दारू पिलेलो नाहीत, पिलेली असली तरी "चढलेली" नाही असं दाखवायचा त्यांचा आटापिटा चाललेला असतो. एकाला असंच आणलं तर बरोबर ऍंटी करप्शनचे डी, वाय.एस. पी! म्हणजे प्रकरण महत्वाचं होत तर! तपासणी करून लगोलग सर्टीफिकेट द्यायचं होतं. आता हा प्राणी "मी पिलेलो नव्हतो" असं म्हणणार असंच मला वाटलं गडी झोकांड्या खायला लागला. मी तपासणी केली. तो प्यायला असल्याचं लक्षण दिसलं नाही. पण पट्ठ्या झोकांड्या खात होता, काय काय बरळत होता. मला कळेचना. मी त्या डी.वाय.एस. पीं कडे चौकशी केली तेंव्हा त्यांनी सांगितलं की तो पोलीस हवालदार आहे आणि त्याला लाच घेतांना रेड-हॅंड पकडलं होत आणि आता नियमाप्रमाणे तपासणी करायला आणलं होतं. त्या हवालदाराचं म्हणणं की त्यानं दोन तीन क्वार्टर हाणली असून तो त्या अंमलाखाली आहे आणि त्यात त्यानं काय केलं त्याला आठवत नाही! मी त्याला समजावून सांगितलं की "ड्यूटीवर असतांना पिणं हाही एक गुन्हाच आहे!" यावर तो नुसताच हंसला. नंतर मला कळलं की न पिता लाच घेणं आणि दारूच्या नशेत असतांना "लाच घेणं" यापैकी दुसरा पर्याय त्याच्या नोकरीच्या दृष्टीनं कमी धोकादायक होतं. मी त्याला तो पिलेला नसल्याचं प्रमानपत्र दिलं. त्याच्या रक्ताच्या तपासणीत ही "अल्कोहोल नाही" असाच अहवाल आला. अशा प्रकरणात डॉक्टरला बहूदा कोर्टात जावं लागत नाही. मात्र या प्रकरणात जावं लागलं. दुस-याच काही मुद्द्यावर तो हवालदार सुटला.

एका "तळीरामा"च्या बाबतीत ही मला असंच साक्षीला जावं लागलं. माझं सर्टीफिकेट तो पिल्याचं दाखवित होतं. रक्ताच्या तपासणीतही अल्कोहोलचं प्रमाण लक्षणीय होतं. बचावपक्षाच्या वकिलांनी अनपेक्षीत पणे माझ्यासमोर एक टॉनिकची बाटली काढली. एका प्रसिद्ध कंपनीचं ते टॉनिक, त्यात अल्कोहोल ईतर टॉनिकांच्या तुलनेत जरा जास्तच होतं. त्यांनी विचारलं "डॉक्टर, हे टॉनिक घेतलं तर या माझ्या अशीलाच्या रक्तात सांपडलं तेव्हडं अल्कोहोल सांपडू शकेल कां?" हा तर जबदस्त बाऊंसर होता. मी विचार केला आणि म्हणालो: "हो, येऊ शकेल की!" वकील्साहेब खूश झाले. त्यांनी विचार केला "कसा सांपडला डॉक्टर!" मी त्यांना थांबवत म्हणालो: "पण याच्या रक्तात सांपडलं तेव्ह्डं अल्कोहोल यायला त्यानं किती टॉनिक घ्यायला पाहीजे काही कल्पना आहे कां वकिलसाहेब?" वकीलांनी "किती ’ म्हणून विचारलं. "कमीत कमी दहा बाटल्या. आणि इतक्या बाटल्या त्यानं रिचवल्या असतील तर तो वेडाच असला पाहीजे. आहे कां तसा तो?" पूढे काय झालं ते सांगायला नकोच!


आपला स्नेहांकित...
-अशोक

लई भारी

2

त्यांनी विचार केला "कसा सांपडला डॉक्टर!" मी त्यांना थांबवत म्हणालो: "पण याच्या रक्तात सांपडलं तेव्ह्डं अल्कोहोल यायला त्यानं किती टॉनिक घ्यायला पाहीजे काही कल्पना आहे कां वकिलसाहेब?" वकीलांनी "किती ’ म्हणून विचारलं. "कमीत कमी दहा बाटल्या. आणि इतक्या बाटल्या त्यानं रिचवल्या असतील तर तो वेडाच असला पाहीजे. आहे कां तसा तो?

Laughing out loud

चांगलाच धडा मिळाला असेन त्याला हास्य

असेच वागले पाहिजे अशा लोकांबरोबर ... जियो डॉक्टरसाहेब जियो


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अरे वा...

3

डॉक्टर, पुढे? वाचतो आहे. भन्नाट किस्से येतील यातून हे नक्की!

जबरा ! लै भारी किस्से.. येऊ

4

जबरा !

लै भारी किस्से.. येऊ देत अजून सर..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

डॉक्टर नमुनेदार

5

किस्से आहेत एकेक पोतडी अजुन जरा ढिली करा .


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

"कमीत कमी दहा बाटल्या. आणि

6

"कमीत कमी दहा बाटल्या. आणि इतक्या बाटल्या त्यानं रिचवल्या असतील तर तो वेडाच असला पाहीजे. आहे कां तसा तो?

एकदम आवडल... Grade हास्य


(आमच्याकडे सर्व प्रकारच्या लेखांना झोडपून मिळेल)

असे खुलून बोलणारे अन

7

असे खुलून बोलणारे अन त्यातूनही लिहीणारे डॉक्टर कमीच. तूमचे अनुभवकथन महत्वाचे आहे.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अजून लिहा साहेब...

8

अजून लिहा साहेब...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्तं अजून किस्से लिहा की.

9

मस्तं अजून किस्से लिहा की.


-पुण्याचे पेशवे

छान किस्से आहेत.

10

छान किस्से आहेत.


करतो. करेन. व करेगें

मस्त मस्त..

11

मस्त अनुभवकथन..

योगी९००

अजुन किस्से येउ द्यात..मस्तच.

12

अजुन किस्से येउ द्यात..मस्तच.

मस्त अनुभव असतात डॉक्टरांचे.

13

मस्त अनुभव असतात डॉक्टरांचे. मजा येते वाचायला. हास्य


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

+१

14

एकदम झक्कास!!!!

धन्यवाद

15

धन्यवाद सर्वांना !!


आपला स्नेहांकित...
-अशोक