ए मेथॉडीकल इंग्लिश ग्रामर
"इंग्रजी भाषा शिकण्यासंबंधीची धास्ती कमी करणारे पुस्तक' माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्पर्धात्मक परीक्षार्थी व इंग्रजीचे अभ्यासक अश्या सवा|ना उपयुक्त वाटावा अशा रीतीने ह्या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. म्हणजेच ज्यांना इंग्रजीचा "बाऊ' वाटतो आणि त्यामुळेच जे जीवनस्पर्धेत मागेच घोटाळत राहतात त्यांना पुढे येण्यात उपयुक्त ठरावे असे हे पुस्तक आहे. मुळात कोणतीही भाषा शिकण्यात एक अवीट गोटी असते पण ही गोडी अगोड होते ते त्या त्या भाषेच्या व्याकरणाने न् कधी कधी त्यातील परस्परविरोधी पण नियमाने, मोरे ह्यांनी नेमके कोठे अडते ते हेरूनच आणि नियमांना धक्का न लावता स्वत:ची अशी काही सूत्रे तयार करून हा सारा गुंता सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न योग्य दिशेनेच झाला आहे म्हणून तर अल्पावधीत त्यांच्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या झाल्या आहेत.