किडन्यापिंग...द थरार (भाग-२)
मी कीडन्याप होत होतो?? नव्हे झालो होतो..शुद्धीवर येताना डोके जड वाटत होते...जिभेची चव काहीतरी विचित्रच वाटत होती..पाय हलवला तर ठणका उडाला..सेकंदात सगळे ध्यानात आले..लग्न..विमोंचा फोन..रुमाली डोकी...रस्त्यातली म्हैस..अन "टोचन"..त्या चोच्या रुमालाने क्लोरोफोर्म तोंडात पण टाकला होता वाटत..यक..कसली भंगार चव लागत होती...चविवरून आठवल मला भूक लागली होती..मला आग्रहाने वाढणार्या वाढप्यांना मी विशेष प्रेमाने दुवा दिला आणि "बास कि आता किती खातो आहेस..लग्नाला आला म्हणून काय झाल?पुढच्या पग्तीसाठी गुलाबजाम शिल्लक ठेव" असा लुक देणाऱ्या घरच्यान विषयी अजून तिरस्कार वाटू लागला..किती दिवस झाले होते काय माहिती.. माझ्यासमोरच एक ढेरपोट्या पडलेला दिसला..नीट निरखून पहिले तर त्या चौकडी रुमालीन्पैकी एक दिसत होता..मला शेवटची झटापट आठवली(स्लो मोशन मध्ये)...तो उग्र दर्प नाकात शिरताना मी डोके हलवले होते..आणि त्याचा झटका एकाला लागला होता..मला माझ्या डोक्याचा कधी नव्हे इतका अभिमान वाटला..घरच्यांना तोंड वर करून सांगू शकत होतो..पहा माझ्या "डोक्याची" करामत..नेहमीची वाक्ये आठवली.."आमचा पंड्या न..एक काम डोक्यानी करेल तर शप्पथ"..बघा म्हणव काय "काम" केलाय...हाहाहाहा हसायला आले आणि "त्या" टोचन ची आठवण झाली..जीभेनी दाढ शाबूत आहे ते पहिले..परत ती चव तोंडात आली..अंग शहारून आले..माझे हात-पाय मोकळे होते..काळ्याला पाणी मागितले..पाणी पिल्यावर थोडी हुशारी आली..मोबाईल गायब झाल्याचे कळले..अरेरे आज मी तिला एसएमएस करू शकणार नव्हतो..(हो अजून मेसेजिंग वरून गाडी पुढे हललीच नाहीये)..मग खोलीचे निरीक्षण करू लागलो..एक जुना वाडा होता तो कदाचित..भिंतींचे पोपडे निघाले होते..एक तुटलेली खुर्ची दिसत होती..जाऊ दे ना..मी हे काय सांगतोय..मला भूक लागली होती.."आन्ना..मला जेवायला..जेवायला" असा डायलोग मारण्याची तीव्र इच्छा होत होती..अंग मोडून भिंतीला टेकून बसलो.
इतक्यात आन्ना रुमाल अन चोच्या रुमाल आले..चोच्या ढेरपोट्याकडे पाहत हसून म्हणाला.."हे येड बघ आडव झालाय तुझ्यामुळे..आणि सॉक्स कुठाय माझा? खाल्लास कि काय?" . "कसला सॉक्स??" आणि तो मी का बरे खाऊ? मला काही कळेना.."अरे चिरकुट,नाकावर दाबून तोंडात कोंबून ठेवला होता तुझ्या..गीळालास कि काय?" "सॉक्स??? तु मला सॉक्स दिला होतास हुंगायला?"मी ओरडलो.."गप्पे..च्यायला एकतर साध्या सॉक्सच्या वासाने बेशुद्ध झालास..म्हणून आणलेल्या क्लोरोफोर्मच्या रुमालाच काय करायचं याच्या विचारात ढेरपोट्याने स्वतः:च त्याचा वास घेतला..झोपलाय आता ढुंगण वर करून..तूला बोंबलायला काय झाल?" चोच्या गुरकावला..अर्रर मागच्या सगळ्या फ्रेम्स खाल्लाकन फुटल्या..ढेरपोट्याच डोक अन माझ डोक..उताण्या पडलेल्या ढेरपोट्यावर माझ डोक..घरातले प्रेमाने कुरुवळत आहेत डोक्याला..सगळा विचका झाला..सगळ्यात वाईट म्हणजे मला त्या चवीचे रहस्य कळले होते..ब्याक..त्याचा विचारही करण्याचे सोडून दिले..किती दिवस झाले? मी विचारले..दिवस?? च्यामारी ३ तास पण झाले नाहीत..भाड्या झोपेत पण तू इतके वाईट वास मारतो..कि आम्ही अजून रुमाल काढले नाहीयेत.."मग माझ्या पोटात कोणी मारायला सांगितले होत..मी पोटावर हात फिरवत बोल्लो.."तुझ्या मायला तुझ्या..एकतर पोरींशी सलगी करतोस..वरून हे का केलास ते का केलास म्हणून आम्हालाच शिकवतोस?"असे म्हणून चोच्या अंगावर धावला..पण आन्ना ने त्याला अडवले.."कोणती पोरगी??मला कोणीही माहिती नाही.."मी म्हणालो खरा पण मनातून चरकलो होतो..(आमच्या म्याडमचे इतके कोंट्याक्ट होते हे मला माहित नव्हते..दोन दिवसांपूर्वी मेसेज-मेसेज खेळताना एका सेंटी मेसेज ला मी दुसरा सेंटी मेसेज न करता चुकून PJ पाठवला..त्याचा बदला म्हणून हे अस कराव??बर त्यानंतर मी २-३ सेंटी मेसेज पण टाकले होते..तरीही अस??मला तो माझ्या मेसेजेस चा अपमान वाटला..मी ठरवून टाकल यापुढे फक्त 15Aug आणि 26Jan लाच मेसेज करणार..) "का बे उगी बडबड करतोयस?थोड्या वेळात शायबासमोर नेणारच आहे मग सगळं कळेल तुला.."
कोण साहेब?कोण पोरगी?आणि या लोकांशी माझा काय संबंध? काही विचारायला तोंड उघडणार पण त्याचे परिणाम माहित असल्याने मी गप्प बसलो..अन मुकाटपणे शायबाची वाट पाहू लागलो...तेथून उठवून मला दुसर्या खोलीत नेण्यात आले..यावेळी डोळे बांधून ठेवले..आता वाड्यातल्या वाड्यात कशाला डोळे बांधायचे..जाऊ दे सिस्टीम असेल त्यांची असे म्हणून चालू लागलो..डोळे उघडले तेंव्हा एक सावळा माणूस समोर उभा होता..हातात सोन्याचे कडे..ह्या मोठ्या-मोठ्या मिशा..डोक्यावर गांधी टोपी..धोतराचा सोगा एका हातात पकडलेला..त्या हाताच्या बोटात ४ अंगठ्या..मला पाहून म्हणाला.."आप्पा डोणजेकर म्हणतात मला" "नमस्कार आप्पा..मी पंड्या" मी माझी ओळख करून दिली.."ए गपे फुकण्या..विचारलाय का कोणी?" एकजण बोल्ला..माझ्या भोवती ३ जण होते..आणि समोर आप्पा..सगळे ४-५ फुट तरी लांब होते.."बोलू दे रे..तर पंड्या , आमच्या सारिकाला कधीपासून ओळखता?" "सारिका?" मी प्रश्नार्थक चेहरा केला (मनात म्हटले च्यामारी मला तर इतके दिवस तेजश्री नाव सांगितले होते..आणि असे कोणी नातेवाईक आहेत सोलापुरात तेही सांगितले नाही...बास..आता फक्त 15Aug लाच पाठवणार ) "हो जिच्याबरोबर तू परवा मार्केट मध्ये बोलत होतास.."(हुश्श्श्स तर ती हि नव्हे..छान..माझे मेसेजेस चालूच राहणार होते) "मला नाही माहिती..तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात.." मी खरेच आठवायचा प्रयत्न केला.."अय,टोचन दे रे याला.."आन्ना चा आवाज आला..माझे हात अभावितपणे गालावर गेले..पण यावेळी माझ बुड हादरल होत..चोच्याची लाथ खाली जाताना दिसली.."तीच मुलगी जिच्याबरोबर वेणी घेताना बोलत होतास.." 'वेणी' हा शब्द ऐकला आणि डोक्यात प्रकाश पडला..अच्छा..तिचे नाव सारिका होते तर..मला तो प्रसंग आठवायला लागला..
क्रमश:
.jpg)
ह्या अभिनव लेखणप्रकाराला काय
ह्या अभिनव लेखणप्रकाराला काय म्हणतात ? प्रभ्याच्या सुचणेखातर "खास" वाचायला घेतला होता लेख ..
असो
पुलेशु !
- टार्या...द फरार ...
हुच्च लेखन...लेखनप्रकार कोणता
हुच्च लेखन...लेखनप्रकार कोणता असावा हाच विचार करत आहे मीही..
हा हा हा मस्तच रे
हा हा हा मस्तच रे पंड्या...
पुढच्या भागांची वाट पहातोय.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
मस्तं रे.. छाण छाण. पुढं.
मस्तं रे.. छाण छाण. पुढं. पुढंचे भाग कधी कधी येणार?
-पुण्याचे पेशवे
लै भारी रे पंड्या, मस्त
लै भारी रे पंड्या, मस्त रंगतंय प्रकरण...लवकर टाक पुढचा भाग
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
पुढचा भाग कधी???
पुढचा भाग कधी???
सॉक्स चा शॉट बाकी जबरदस्त
सॉक्स चा शॉट
बाकी जबरदस्त रे पंड्या येऊ देत पुढचा भाग .. वाट बघतोय
हा हा हा दोन्ही भाग
भारी राव. पुढचा भाग येउद्या लवकर
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
आता वाड्यातल्या वाड्यात कशाला
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
शैली मस्तच आहे. आवडली.
शैली मस्तच आहे. आवडली.
वाचतोय, येऊ द्या पुढचे भाग.
लै भारी चालू आहे रे
लै भारी चालू आहे रे भावड्या... पुढे लिही लवकर.. वाचतो आहे !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लै भारी.....आवड्या
लै भारी.....आवड्या मेरेकु........पुढचे भग लव्कर टाका.........
छान.. येउद्या
छान.. येउद्या