स्वरालयीची दुनिया..९
![]() |
श्री रामचन्द्र कृपालु भज मन.. (येथे ऐका)
यमनकल्याण मधलं, रुपक तालातलं एक शांत, सुंदर भजन..दीदीचा शुद्ध गंधार, शुद्ध मध्यम - एकेक स्वर अगदी मोजून घ्यावा, तावून-सुलाखून-पारखून घ्यावा..! तिने मांडलेल्या रुपकच्या जादुई लयीसोबत हलकेच विहार करावा.. पोटातलं पाणीही हलणार नाही.. ! अदृष्य लय, सूक्ष्म लय! लयीची ही सारी विशेषणं दीदीच्या गायकीत अगदी बेमालूम आढळतात..!
तीं तीं ना धी ना धी ना..
जादुई लयीतला रुपक..रुपकचं वजनच वेगळं, अगदी खानदानी! रुपकची श्रीमंतीच वेगळी..! ३-४ अशी मस्त खाली-भरी! 'कृपालु' हा शब्द फक्त दीदीनेच गावा.. त्या 'कृपालु'तलं ममत्व फक्त दीदीच दाखवू शकते..!
सिर मुकुट कुण्डल तिलक चारु उदार अङ्ग विभूषणम्
आजानुभुज शर चापधर सङ्ग्राम जित खरदूषणम्...
सुंदर वर्णन, सुरेख शब्द..संस्कृत भाषेचा गोडवा काही औरच! 
जिथे यमनकल्याण असतो, जिथे दीदीची गायकी असते तिथे हमखासच श्री रामचन्द्राची कृपा असते..!
(हे चार शब्द माझे मित्र स्व श्री भोचक यांच्या स्मृतीस अर्पण..)
-- तात्या अभ्यंकर.
.jpg)

(विषय दिलेला नाही)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वा ! सुरेख !! >>>संस्कृत
वा ! सुरेख !!
>>>संस्कृत भाषेचा गोडवा काही औरच!
काय सांगतोस? ऐकावे ते नवलच
>>>संस्कृत भाषेचा गोडवा काही
>>>संस्कृत भाषेचा गोडवा काही औरच!
काय सांगतोस? ऐकावे ते नवलच wink
हाहाहाहाहा...
(विषय दिलेला नाही)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तात्या लय भारी दुनीयेची सफर
तात्या लय भारी दुनीयेची सफर घडवू राहीलात. संगीतातील पायाभूत (बेसीक ??) गोष्टीही समजावून सांगायला लिहा काहीतरी बॉ.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
+१
असेच म्हणतो. आमच्या सारख्या नुसत्या संगीतप्रेमींना थोडे 'शहाणे करून सोडा' असे म्हणतो. थोडेफार रागसंगीताच्या व्याकरणाच्या बाजूबद्दलही लिहावे अशी विनंती आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सर्व रसिकाग्रणी प्रतिसादींचा
सर्व रसिकाग्रणी प्रतिसादींचा मी ऋणी आहे..
तात्या.