जी जाता जात नाही ती 'जात'..... होय तीलाच म्हणतात जात....
जग ग्लोबल व्हीलेज झाले आहे. या एवढ्या मोठ्या खंड्प्राय देशात तुम्ही कोठेही जा, कोणत्याही गावात जा नाहीतर शहरात जा. तूम्ही विचारा की , तूम्ही जात मानता काय? तर तो माणुस कानावर हात ठेऊन सांगेल मी कशाला जात मानू? विज्ञान आणि तत्वज्ञान सांगते की , देवानं सर्वांना सारखचं जन्माला घातलयं,कुणाला काही कमी दिलं नाही की जास्त दिलं नाही.आपण सर्व समान आहोत, वरच्या जातीच्या अन खालच्या जातीच्या माणसाला काय वेगळं दिलेलं नाय ना? असा ईरसाल सवाल करायला ही तो मागे पुढे पहात नाही. वर आपल्यालाच तो धर्म्,माणुसकी आणि जात कर्माधारीत कशी आहे? हे समजावुन सांगेल.
या सामान्य माणसाला अधिक छेड्ले तर म्हणेल की, " रावसाहेब, या जगात एकच जात हाय ! ती म्हणजे पैसा ! खरं सांगु , या जगात दोनच माणसं जगुन र्हायले. एक तो की ज्याच हातावर पोट हाय, अन दुसरा त्यो ज्याचा पोटावर 'हात' हाय त्यो ! मग आपुन ना त्यातले ना हयातले म्हणून जाती बिती आपण नाही मानत सांगेल.
या सामान्य माणसाशी असाच सवाल पुढे चालु ठेवला, तर काही वेळाने तो विचारणार, तुम्हाला तुमचं नावं ,नावारुन काही अंदाज नाही आला तर तो आडनाव विचारेल , पण काही आडनाव अनेक जातीत असल्यानं त्याची पुन्हा गोची. ह्या गोष्टीतून धर्म तर त्याला कळ्तोच मग जातीचा विषय सोडुन तो धर्मावर बोलत रहातो. तो म्हणतो धर्म कोणाला नाही प्रत्येकाला धर्म आहे. कुत्र्याला, घोड्याला, पाण्याला, देशाला आपला एक धर्म व गुणधर्म आहे. मग आपलाच देश निधर्मी का? त्याला आजुबाजुच भान येताच, मग स्वतःला सावरुन तो म्हणतो, या निधर्मीपणामुळेच जगात आपल्या देशाचे वेगळेपण दिसते नाही का?
मग हा सामान्य माणुस विचारतो , तुम्ही कुढ्ले राव? यातुन त्याचे तुमची जात शोधण्याचे संशोधन चालुच असते. यातुनही त्याला जर जातीचा पत्ता लागला नाही तर तो विचारील तुमचे आजोबा काय काम करायचे ? व्यवसायातुन जात शोधणे सोपे असले तरी ग्लोब्लयझेशन मध्ये आजोबा अस्ले की प्रयत्न फसतो. उदा. आजोबा मिल मजदूर आहेत? मग काय कप्पाळ करणार त्याला... मग मात्र तो सरळ मुद्यालाच हात घालतो आणि विचारतो कि आपली जात कोणती? किंवा आपण कुणापैकी ? असा साळ्सुद प्रश्न.
आपल्या देशात जातीविषयी नेहमी कोणीना कोणी बोलतच असतो.. मग ते जनगणना असेल नाहीतर आरक्षण असेल पण अगदी त्याविरुध्द वागुन जातीव्यव्स्था आपण कटाक्षाने पाळ्ली आहे. जात ही सोयीची बाब आहे. जातीची आठ्वण येण्याच्या काही वेळा ठरलेल्या आहेत. घरात, रानात, शेतात वा कार्यालयात राबताना जात आठ्व्त नाही. कार्यकर्ता पक्षाचं वा मंडळाचं कार्य करतांना जात विचारत नाही पण मोबद्ला देतांना मात्र जात पाहीली जाते. कार्यकर्त्याला तिकीट देतांना जातीपातीच राजकारण करतात. नोकरी लागायला जात.. शिक्षणाला जात.. पोरीच्या लग्न्नाला जात.. सामाजीक प्रतिष्ठा देतांना जात.. मान सन्मान देतांना जात.. घेतानां जात...उमेदवारी देतानां जात.. मतदान करतांना जात... जर सामान्य माणुस जात मानीत नाही तर मग जन्मापासुन बांड्गुळासारखे चिकट्लेले हे काय आहे? थोड्क्यात, या देशातून फक्त स्पृश्य वा अस्पृश्य भेद नष्ट झाला आहे.जात नव्हे? जातीभेद नव्हे ?
देशात असलेल्या या भेदातुन आपण अनेक पिढ्यानपिढ्या जातो अहोत.. थोड्क्यात या देशात जात आहे आणी नीट लक्षात ठेवा जी जाता जात नाही ती 'जात'..... होय तीलाच म्हणतात 'जात'....
पवन शिन्दे
.jpg)
जात, धर्म, भारतीयत्व, या
जात, धर्म, भारतीयत्व, या विषयांवरील पोकळ चर्चा खूप झाल्यात. काहीच निश्पन्न होत नाही.
या चर्चा आता बास करूयात
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
ते सांगण्यासाठीच हा लेख लिहला
ते सांगण्यासाठीच हा लेख लिहला आहे.... ही चर्चा नाही हा विचार आहे.
ते सांगण्यासाठीच हा लेख लिहला
ते सांगण्यासाठीच हा लेख लिहला आहे.... ही चर्चा नाही हा विचार आहे. चर्चा थांबवता येते.. पण विचार नाही थांबवता येत... हां विचारांची फक्त दिशा मात्र बदलता येऊ शकते...
जगात कुठल्या ना कुठल्या
जगात कुठल्या ना कुठल्या स्वरुपात भेद असतोच्.कुठे जातीच्या स्वरुपात तर कुठे रंगभेदाच्या स्वरुपात.आणि हे जगाच्या अंतापर्यंत हे चालणार.फारतर स्वरुप बदलेल दिसेल.
धन्यवाद
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !
जगात कुठल्या ना कुठल्या
जगात कुठल्या ना कुठल्या स्वरुपात भेद असतोच्.कुठे जातीच्या स्वरुपात तर कुठे रंगभेदाच्या स्वरुपात.आणि हे जगाच्या अंतापर्यंत हे चालणार.फारतर स्वरुप बदलेल दिसेल.
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद ! अगदी बरोबर आपण फार खोलवर विचार केला तर वर्गिकरण केल्या शिवाय मानवाची प्रगती नाही हे सत्य असतांना आपण उगाच का लपवतो जात ?
चांगला विचार आहे.. पण काळ
चांगला विचार आहे..
पण काळ ह्या सर्वांवर ऊपाय आहेच
ऊ.दा. आजपासुन २० वर्ष आधी कुणी म्हणाले असते..
गहुवर्णीय लोकांमधला एक जण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल .. तर कुणालाच खरे नसते वाटले.. पण आज सत्य परिस्थीती सर्वांसमोर आहे
आपण उगाच का लपवतो जात ?
आपण उगाच का लपवतो जात ?
कालाय: तस्मे नम....!
जात पण जाईल हो..पण त्याला खुप वेळ लागेल.
मागील १० वर्षापेक्षा आता अंतरजातीय विवाह वाढलेत. हे त्याच एक उदाहरण नाही का?
कालाय: तस्मे नम...!
श्रीवर्धन
आपण उगाच का लपवतो जात ?
आपण उगाच का लपवतो जात ?
>>>>>आपण उगाच का लपवतो जात ?
>>>>>आपण उगाच का लपवतो जात ?<<<<<
अगदी बरोबर! मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो .त्यात लपविण्यासारख काय आहे.मात्र तीचा दुराभिमान नको .
गर्वाने सांगा ! जसे मी घाटी
गर्वाने सांगा ! जसे मी घाटी आहे आता लोक सांगतात तसे आपण दुसर्याला आपली जात सांगतांना का भ्यावे ? आणी दुसृयाने ती मिळ्व्ण्यासाठी एवढे प्रयत्न करण्याची गरज नाही. मग जाती दुराभिमान राहाणार नाही
Big people talk about big
Big people talk about big ideas.
Average people talk about average ideas.
Small people talk about other people.
जात किंवा धर्म आंतरजालावरील कंपु प्रमाणे असतात. एकटं पडण्याच्या भितीने कुणीही आपला कंपु सोडत नाही. आणी कंपु मोठा झाला की दुसस्या कंपुबद्दल तेढ/खुन्नस आपोआप निर्माण होते.
आयला हा राक्या आजकाल लै भारी
आयला हा राक्या आजकाल लै भारी लिहायला लागलाय.
जात किंवा धर्म आंतरजालावरील कंपु प्रमाणे असतात. एकटं पडण्याच्या भितीने कुणीही आपला कंपु सोडत नाही. आणी कंपु मोठा झाला की दुसस्या कंपुबद्दल तेढ/खुन्नस आपोआप निर्माण होते.

लाजवाब.
(Small people)
पेशवे
-पुण्याचे पेशवे
सही जवाब! दुसर्या कंपुची
सही जवाब!
दुसर्या कंपुची हेटाळणी नाही केली तर कंपुचा उपयोगच तो काय!
कंपुची मेंबरशीप लोकं अभिमानानं मिरवतात..जात ही लववायचं काही कारण नाही. तशीही लपवता येत नाहीच, प्रत्येक सरकारी कागदपत्रावर नमुद करावी लागते.
पुष्करिणी
राम नगरकर यांनी अभीमानाने जात मिरवली
राम नगरकर यांनी अभीमानाने जात मिरवली... सरकारी कागदपत्रावर नमुद करावी लागते मिरवत नाही... हाच तर फरक सांगतो आहे.
भारतीय असल्याचा अभिमान असावा
भारतीय असल्याचा अभिमान असावा का?
पुष्करिणी
हो
हो
हो
हो
धर्माचा / जातीचा / भाषेचा /
धर्माचा / जातीचा / भाषेचा / घराण्याचा अभिमान असावा का? आणि असल्यास का? किंवा नसल्यास का नाही?
पुष्करिणी
आतंरजाल हे समविचारी माणसांना जोडायचे माहीती साधन आहे
When the creature create the human same , his structure , blood , Mind , kind thinking for others . Then only our politicians divide us only for their own benefits , governments , to get the power . We think all human beings are same then why we are separate from other cast
and one more thing
Before, if u want to make a different, U have to be a different
आतंरजाल हे समविचारी माणसांना जोडायचे माहीती साधन आहे. त्यातील स्पर्धा (तेढ/खुन्नस) ही मानवाची स्पर्धेत आपले कोश्यल्यासाठीची धड्पड आहे.. त्यातही आपले नाव बद्लणे वा लपविण्याची आपण काळ्जी घेतलीच आहे ना ? मग जन्मापासुन चिकट्लेली जात लपवायची वा दुसर्याची जात शोधण्याची ही मानवी प्रवृत्ती आहे असे मला वाटत नाही. तो बहूतेक पालकानीं वा समाजाने मुलानां दिलेला नक्ळ्त संस्कार असण्याची शक्यता आहे.
सुचवतो
खालिल पुस्तकात अनेक उत्तम विचार मान्डलेले आहेत. पवन शिन्दे साहेब, आपल्याला नक्की आवडतील.
त्यामध्ये प्लेटो आणि अडम स्मिथ यान्च्या मध्ये असलेली विचार भिन्नता मान्डलेलि आहे.
Why I, Too, Am Not a Conservative: The Normative Vision of Classical Liberalism [Hardcover]
James M. Buchanan
To Plato, some persons are natural slaves; others are natural masters.
For Adam Smith, persons are natural equals, and one of his familiar references is to the absence of basic differences between the philosopher and the street porter. [p. 4]
Plato is the conservative (or modern "liberal"); Adam Smith is the true liberal. Plato and his followers naturally believe that society's best and the brightest should have great lee-way in directing the lives of the masses. Adam Smith and his followers, while recognizing that individuals differ from one another along many dimensions, believe that we are all equal in our humanity, with none of our differences justifying the rule of some of us over others of us.
http://www.amazon.com/Why-Too-Not-Conservative-Liberalism/dp/1845423143/...
माझ्या मते - व्यक्ती ला तिच्या आवडीचा व्यवसाय निवडण्याचे स्वातन्त्र्य नाकारणे ही जाती-व्यवस्थेची फार मोठी चूक होति. अस्प्रुश्य्ता त्याहून (सर्वात) मोठी चूक.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
Truth About Dalits, Caste
Truth About Dalits,
Caste System And Untouchability
हे एक चांगले पुस्तक आहे. व्यक्ती ला तिच्या आवडीचा व्यवसाय निवडण्याचे स्वातन्त्र्य नाकारणे ही जाती-व्यवस्थेची फार मोठी चूक होति. अस्प्रुश्य्ता त्याहून (सर्वात) मोठी चूक. ह्या तुमच्या मताशी मी गब्बर सिन्गजी मी सहमत आहे.. उत्तरास उशीर झाल्याबद्द्ल क्षमस्व...
माझ्या मते - व्यक्ती ला
माझ्या मते - व्यक्ती ला तिच्या आवडीचा व्यवसाय निवडण्याचे स्वातन्त्र्य नाकारणे ही जाती-व्यवस्थेची फार मोठी चूक होति. अस्प्रुश्य्ता त्याहून (सर्वात) मोठी चूक.
जरा याकडे वेगळ्या दृष्टीने पाहीलंत तर त्यात त्या व्यवसायाचा अधिकारही दिला होता. १२ बलुत्यांची पद्धतही अशीच होती. गावातील प्रत्येक शेतकर्याने आपल्या उत्पन्नचे दोन वाटे करायचे. त्यातल्या एका वाट्याचे १२ वाटे करायचे. व त्यातील एक भाग प्रत्येक बलुत्यास द्यायचा. त्याबदल्यात बलुत्यानी जी काही सेवा त्याच्याकडे असे ती द्यायची. त्यामुळे गावातलं उत्पन्न(धन) गावाबाहेर न जाता गावातच राहत असे. किंवा तुलनेने फारच थोडे उत्पन्न गावाबाहेर जाई. व उत्पन्नाचे वितरणही न्याय्य असे. जस जसा पुढे त्याचा गैरवापर होऊ लागला व ब्राम्हणांनी उत्तर पेशवाई काळात इतर धंद्यांमधे आक्रमण केले तशी ही बलुतेदारी बंद पडत गेली.
त्यामुळे इतर धंद्याचे स्वातंत्र्य नाकारणे या पायवर ही व्यवस्था आधारलेली होती याच्याशी मी असहमत आहे.
-पुण्याचे पेशवे
जरा याकडे वेगळ्या दृष्टीने
जरा याकडे वेगळ्या दृष्टीने पाहीलंत तर त्यात त्या व्यवसायाचा अधिकारही दिला होता.
ह्याकडे कॊणत्या वेगळ्या दृष्टीने पाहता येतं?अहो,जी गोष्ट नाकारली जाते तिथे अधिकाराचा प्रश्न येतो का? स्वातन्त्र्याला नकार म्हणजे पारतन्त्र्याचा अधिकार असे होते का?
उत्पन्नाचे वितरणही न्याय्य असे.
हे कुणाचे म्हणणे आहे? बलूतेदारांचे? मग तक्रार कुणाची तक्रार आहे? बलूते देणाय्रांचीच असेल.
ब्राम्हणांनी उत्तर पेशवाई काळात इतर धंद्यांमधे आक्रमण केले तशी ही बलुतेदारी बंद पडत गेली.
हे काही मला माहीत नाही.तुम्ही म्हणताय म्हणजे असेल. पण कोणत्या बलुतेदारी व्यवसायात आक्रमण केले ते सांगितले तर बरे होईल.आणि आपल्या उत्पादनाची किंमत कशाच्या स्वरूपात स्विकारली ते सुध्दा…
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
ह्याकडे कॊणत्या वेगळ्या
ह्याकडे कॊणत्या वेगळ्या दृष्टीने पाहता येतं?अहो,जी गोष्ट नाकारली जाते तिथे अधिकाराचा प्रश्न
येतो का? स्वातन्त्र्याला नकार म्हणजे पारतन्त्र्याचा अधिकार असे होते का?
केवळ नकाराच्या जोरावर गोष्टी चालत नाहीत. जेव्हा एकाद्या धंद्याबाहेर जायचा अधिकार नव्हता तेव्हा त्या धंद्यात दुसरा कोणी आक्रमण करणार नाही याची हमी होती. आणि हाच अधिकार होता.
हे कुणाचे म्हणणे आहे? बलूतेदारांचे? मग तक्रार कुणाची तक्रार आहे? बलूते देणाय्रांचीच असेल
ही तक्रार ब्रिटीश कालाच्या उत्तरात आलेली आहे. जेव्हा बलुतेदारी संपवली गेली. अन्याय्य कर लावून लोकांना लुटून गरीब केले गेले. अन्यथा इतिहासात थोडे मागे जाऊन पाहीले तर मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांनी दुष्काळामुळे न भरलेल्या सार्याची रक्कम मंगळवेढ्यातील खर्याखुर्या विठा महाराने भरल्याची नोंद तुम्हाला सापडेल. म्हणजे महार मनुष्य इतकी मोठी कमाई दुष्काळातही टिकवून होते. आणि त्या दामाजीपंतांच्या सज्जनपणामुळे त्यांना वाचवावे असे वाटले असेल. म्हणजे आपल्यासमोर चातुर्वर्ण्याचे अन्याय इतकेच जे चित्र उभे केले हे ही चुकीचेच होते. किंवा ते पेशवाईच्या उत्तर काळातील गोष्टींवर आधारीत असेल.
हे काही मला माहीत नाही.तुम्ही म्हणताय म्हणजे असेल. पण कोणत्या बलुतेदारी व्यवसायात आक्रमण केले ते सांगितले तर बरे होईल.आणि आपल्या उत्पादनाची किंमत कशाच्या स्वरूपात स्विकारली ते सुध्दा
मुख्यत्वे खोती स्विकारली. त्यामुळे सरकारात भरायचा सारा रोख रुपाने वसूल करण्यात येऊ लागला. उत्पन्न जरी आले नाही तरी. त्यामुळे येणार्या उत्पन्नाचे विभाजन होऊन ते गावात वाटले जाणे बंद होऊ लागले. अनेक कारणे आहेत. वेळ काढून सविस्तर लिहीन.
-पुण्याचे पेशवे
प्रश्न
पुष्करिणी,
धर्माचा / जातीचा / भाषेचा / घराण्याचा अभिमान असावा का? आणि असल्यास का? किंवा नसल्यास का नाही?
हा प्रश्न मला देखील पडला आहे. गेली कित्येक वर्षे हा प्रश्न मला सतावतोय.
राष्ट्रियतेचा देखील अभिमान असावा का?
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
आपण आपल्या जन्मदात्यांचा
आपण आपल्या जन्मदात्यांचा अभिमान का बाळगतो ? ह्या प्रश्नाचा जर मानवाच्या (येथे केवळ भारतीय नव्हे ! माझ्या लेखात मी ग्लोबल व्हिलेज म्हट्ले.. पुष्करिणीजी) मानसिक व जन्मापासुन होणार्या संस्कारांचा विचार केल्यास वरील प्रश्नाची उत्तरे मिळ्तील अशी आशा आहे.. उत्तरास उशीर झाल्याबद्द्ल क्षमस्व....
मी सनातनी का नाहिये
पवन शिन्दे साहेब,
आपण म्हणता "जन्मापासुन होणार्या संस्कारांचा विचार केल्यास वरील प्रश्नाची उत्तरे मिळ्तील अशी आशा आहे"
पुष्कळ विचार केला ... पण उत्तर सापडत नाहिये.
(मला जे वाटते ते खाली देत आहे ... टिका अपेक्षित आहे)
सन्स्कारातुन परम्परा, रुढी, प्रोटोकोल (अधिकारि व्यक्ति शी वागण्याची रित), टाबु (वर्ज्य असलेल्या क्रुति), नोर्म्स, पाळणार्या व्यक्ती निर्माण होतात.
coordination is the central problem of society. Customs, Traditions, Norms, Tabboos, Protocols, conventions help solve the problem of coordination. Customs, Traditions, Norms, Tabboos, Protocols, conventions are collectively part of culture. Culture is much more than that but these are main building blocks.
परम्परा, रुढी, प्रोटोकोल (अधिकारि व्यक्ति शी वागण्याची रित), टाबु यान्च मारा होतो ... लहान्पणा पासुन ... मुळे व्यक्ती चे वर्तन सुसन्स्क्रुत पणा कडे अति झुकते. सुसन्स्क्रुत पणा हे उद्दिष्ट होउन बसते. सुसन्स्क्रुत पणा हे माध्यम आहे उद्दिष्ट नसावे. उद्दिष्ट व्यक्ती ने स्वतः ठरवायचे आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Subjective_theory_of_value
http://www.fahayek.org/index.php?option=com_content&task=view&id=46
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
जर आपल्याला अभिमानास्पद अशा
जर आपल्याला अभिमानास्पद अशा काही गोष्टी असाव्यात असं वाटत ( म्हणजे ज्या गोष्टीच्या प्राप्तीत आपला सहभाग शून्य, म्हणजे राष्ट्रीयत्व,भाषा,धर्म, जात इ. इ.) तर अशा काही वाइट/चुकीच्या गोष्टी ज्यांचे कर्ते आपण नाही आहोत पण आपले देशबांधव, पूर्वज वगैरे आहेत त्या गोष्टींबद्दल लाज किंवा अपराधीपणाची भावना असावी का?
उदाहरणार्थ सध्या ज्यांच वय २०-३० वर्ष आहे त्या जर्मन लोकांनी महायुद्ध्, ज्यूंची कत्तल इ. बद्द्ल अपराधी वाटून घ्यावं का?
पुष्करिणी
पुष्करिणी शी सहमत
अगदी योग्य (उच्च प्रतीचा) प्रश्न पुष्करिणी.
जर मला अभिमान वाटावा (आपली दैदिप्यमान परम्परा, राष्ट्रियत्व, धर्म, सन्स्क्रुति) वगैरे चा. तर पूर्वजानी केलेल्या दुष्क्रुत्यान्बद्दल लाज व अपराधी पणा पण असावा.
पण माझा त्यामध्ये (दोन्ही मध्ये) सहभाग शून्य आहे. मग ????
दैदिप्यमान परम्परा वगैरे निर्माण केल्या त्या समाजाने, धर्माने आणि दुष्क्रुत्ये केलि ति मात्र व्यक्तिनि ? हा धुर्त पणा आहे.
अगदि आपली राष्ट्रिय प्रतिड्न्या (Pledge) सुद्धा आपल्याला आपले अभिमानाचे स्त्रोत काय असावे ते सान्गत राहते. http://en.wikipedia.org/wiki/Indian_National_Pledge
I am proud of its rich and varied heritage. If that is the case then I must be told to be ashamed of the misdeeds of my forefathers. But it does not. Vivekaanand was a great philosopher. But this is where he does not provide his insights.
म्हणूनच व्यक्ती ला एकटे सोडणे ... आणी तिचे अभिमानाचे स्त्रोत शोधण्याचे स्वातन्त्र्य हिरावून न घेणे हे उत्तम.
(स्वातन्त्र्य. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते)
(स्वातन्त्र्याची व्याख्या - व्यक्ती समोर असलेल्या विकल्पान्चि मान्दियाळि म्हन्जे स्वातन्त्र्य.)
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
चांगली चर्चा
बाकी परंपरा देदिप्यमान/स्वीकारार्ह कुठली नि धिक्कारार्ह कुठली हे कोणी ठरवायचे. माझा नेहमी गोंधळ उडतो की अमूक एक परंपरा ही परंपरा आहे एवढेच कारण ती अभिमानास्पद असावी याला पुरेसे आहे का? की चांगली नि वाईट अशी पण परंपरा असू शकते? तसे असेल तर ती चांगली की वाईट हे मला कोण सांगेल? च्यायला इथे एकच गोष्ट एक जण वाईट म्हणतो तर दुसरा हिरिरीने ती कशी योग्य आहे ते सांगत असतो. आता आमच्यासारख्या अर्धवटाने अभिमान धरायचा की नाही हे कसे ठरवावे?
तसेच I am proud of its rich heritage या वाक्यात हेरिटिज च्या व्याख्येत काय काय बसते ते कळल्याशिवाय मला त्याचा अभिमान आहे की नाही हे कसे कळणार? बरे हे न समजता अभिमान कसा बाळगायचा? की I agree to the following terms and conditions या वाक्यासमोरचा चेक्-बॉक्स चेक करणे किंवा त्यापुढे सही करणे यासारखे आहे हे? की अभिमान आहे असे म्हटले की संपले काम? मी कुठल्या टर्म्स नि कंडिशन्स मान्य केल्या आहेत ते कसे कळणार?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
टर्म्स नि कंडिशन्स
टर्म्स नि कंडिशन्स are clauses in contract. नैतिकता, कायदा, धर्म most of them are contracts. many are implicit and some (eg कायदा) are explicit. Additionally clauses are the ways individuals exchange their options/choices. Sometime they accept some clauses that restrict their liberty in some area and in some cases they (hapily) accept conditions that increase their options.
All contracts try to balance between 2 fundamental things - Monopoly Vs Efficiency.
Complying with a paramparaa is the way you send a signal to the other person that you intend to live by a set of implicit contract and hence he can trust you and transact with you.
आयुष्य हे जवळपास एका मागुन एक केले गेलेले करार आहेत.
परम्परा, रुढि, टाबु, प्रोटोकोल वगैरे बहुतान्श करारच आहेत. implicit.
हे सर्व विषद करुन सान्गणे अत्यन्त अवघड आहे. पण खालिल पुस्तके ----
सजेशन -
http://people.ischool.berkeley.edu/~hal/people/hal/NYTimes/2002-01-17.html
http://www.amazon.com/Economic-Institutions-Capitalism-Oliver-Williamson...
http://www.amazon.com/Firm-Market-Law-R-Coase/dp/0226111016/ref=sr_1_1?i...
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
काय बी कळंना
येक तर तुम्ही विंग्रजी मदी लिवलय. जल्ला डिक्शनरी घेऊन बी अर्दा तास लागला बगा वाचाया. आता अर्त कुटून समजावा वो. जरा आमच्या आईच्या भाषेत इस्कटून सांगा की राव. त्ये पुस्तक वाचायची आक्कल आस्ती तर हितं कशाला इचारलं आस्त वो, खरं का न्हाय?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आयुष्य हे जवळपास एका मागुन एक
आयुष्य हे जवळपास एका मागुन एक केले गेलेले करार आहेत
जात हळुहळु जात आहे
उघड्पणे जातिभेद शहराततरि थांबले आहेत. आता जातेचे मह्त्व आरक्षणात ( शिक्षणात व नोकर्यात ) आहे. पण ते ज्यांना त्याचा लाभ घेता येतो त्याच्यापुरते मर्यादित आहे.(आरक्षण हा वेगळ्या चर्चचा विषय आहे)
धर्मिक गोष्टित (परंपरा , लग्न इ) महत्व आहे पण त्याचा त्रास फार कमि लोकांना होतो. (उदा आंतरजातिय प्रेमविवाह). दोन्हिकडचे समजुतदार असतिल तर तोहि होत नाहि
कदाचित १५-२० वर्शात जातिचे महत्व अतिशय कमि होइल
आडनावावरुन जात विचारण्याचि प्रव्रुत्ति काहि जेष्ठ मंडळित आढ्ळते. असाच माझा एक अनुभव
माझ्या जुन्या ओफिसमध्ये काहि कामानिमित्त एक जेष्ठ ग्रुहस्त यायचे. एकदा त्यांनि मला आडनावावरुन जात विचारण्याचा प्रयत्न केला (.. म्हणजे तुम्हि कुठले? तुम्हि कोण? ). मि जातिला फारसे महत्व देत नसल्यामुळे मे प्रश्न टाळणाच्या प्रयत्न केला. पण त्यांनि परत प्रश्न केला. मि मोठ्याने "तुम्हाला माझि जात विचारायचि आहे का?" असे विचारले. बाजुला ३-४ सहकारि होते. सर्व या प्रश्नाने दचकले. त्या जेष्ठ ग्रुहस्तांनि परत ओफिसमध्ये कोणाला जात विचारलि नाहि
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद...
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद... खरचं आपण आपली नावं लपवुन लिह्तो... नाहीतर तुम्हाला भेट्ला तसा ... येथे एखादा असला तर...
..
वरिल प्रसंगात जात सांगण्यास माझि हरकत नव्हति पण सरळ प्रष्न असता त मि शांतपणे सांगितलि हि असति. प्रश्णांच्या आडुन विचारणे मला आवडले नव्हते.
आयडि घेताना आड्नाव न लिहिण्यासाठि जात लपवण्याचे कारण असु शकते हा मि कधि विचारहि केला नव्हता.
नाव आणी आडनावावरुन जाति शोधणारि सभासद येथे असतिल असे आत्तापर्यतच्या आनुभवावरुन तरिहि वाटत नाहि. कोणाला इछा असेल तर विचारावे. आड्नाव व जात दोन्हि सांगेन.
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
शाब्बास मित्रा ! माझ्या
शाब्बास मित्रा ! माझ्या ले़खातुन हाच संदेश.. लपऊ नका.. अभिमान बाळ्गा..(गर्व नव्हे)
जातपात नष्टच करा.. स्पृश्य अस्प्रुश्य्ता तर जवळ्पास घालवली आहे... म्हनुनच जात शोधे लग्नाच्या नाहीतर अन्य बाजारात भेटतातच...
अजून एक-दोन पिढी नंतर शक्यतो
अजून एक-दोन पिढी नंतर शक्यतो जातिचे अस्तित्व राहणार नाही असे वाटतं !
याबाबतीत मी सकारात्मक आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
होय, मी सुध्दा.. थोडे
होय, मी सुध्दा.. थोडे आरक्षणाचे भूत आहे.. पण ही कर्माधारीत जाती व्यवस्थेचा लोप होणार
पण ही कर्माधारीत जाती
पण ही कर्माधारीत जाती व्यवस्थेचा लोप होणार यात शंका नाही.
मला तर वाटते आपल्या कडे दोनच
मला तर वाटते आपल्या कडे दोनच जाती असाव्यात गरीब आणि श्रीमंत. मी अनेक जण पाहिले आहेत.अनेक हुशार मुले पॆसा नसल्याने पुढे शिकु शकत नाही.शॆक्षणिक आरक्षण हे जातीवर न होता आर्थीक निकषावर होणे गरजेचे आहे.तर व्यवसायिक आरक्षण हे गुणावर होणे जरुरीचे आहे.गरीब मुलाना शिकण्याची संधी मिळेल परतु काम त्याच्यातील गुणावर अवलंबुन असेल.