आज हापिसातुन घरी आलो, लॅपटॉप सुरु केला तोच त्यातुन अलादीनच्या दिव्याप्रमणे धुर निघाला आणी त्यातुइन एक आकृती तयार झाली. आकृती म्हणाली कसं काय?
मी विचारलं कोण तु? आकृती म्हणाली अरे मी तुझा आयडी, आंतरजालावरचा.
मी : - अरे मग असा कंप्युटर मधुन बाहेर का आलास?
आयडी: - आलो तुझ्याशी गप्पा मारायला.
मी: - काय बोलायचय बोल.
आयडी :- काही नाही यार. आजकाल आंतरजालाचा कंटाळा येतो. रोज उठुन तेच काम, इथे तिथे लोळ, तिथे प्रतिसाद दे, काहीतरी लिही, काहीतरी वाच, कधी उगाच फार विचार कर, धाग्यांचा गुंता सोडवत बस, विषय आणी प्रतिसाद नीट समजुन घ्यायला ईतिहासाचा अभ्यास कर.
मी:- मला एक गोष्ट सांग, कितीही झालं तरी तु आंतरजाल सोडु शकतोस का? एखाद्या नशेसारखं आहे ते, एकदा चटक लागली की बास, शरीरातलं निकोटीन कमी झालम की जशी सिगारेटची तलफ लागते तसं थोड्या थोड्या वेळाने काहीतरी लिहायला, प्रतिसाद द्यायला हात सळसळतात.
आयडी :- खरयं तु म्हणतोयस ते. धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय असं झालयं.
मी :-बर ते जाऊ दे. मला एक सांग तु जे काही लिहितो, वाचतो, गहन चर्चा करतो, टवाळक्या करतो त्यात कितपत फायदा होतो तुझा?
आयडी :- मग. फायदा तर नक्कीच होतो. मला नविन गोष्टी कळतात, कधी दोन घटका मनमोकळं हसायला मिळतं, कधी भांडायला मिळतं, तर कधी स्वतःचे अडकलेले प्रश्न सोडवायला मदत होते.
मी :- आणी सामाजिक किंवा राज्याचे/देशाचे प्रश्न किती सुटतात.
आयडी :- हे बघ. इथे काही सर्वज्ञान असलेले खुप मोठे आणी विचारवंत लोकंही येतात. खुपशा गहन चर्चा करतात. आता त्यातले कितीजण कृती करतात मला माहित नाही ब्वॉ. मी वाचतो, लिहितो आणी पुढे चालतो, प्रत्यक्षात मी किती कृती करतो ते मलाही माहित नाही. आणी इथे प्रत्येक मुखवट्याची एकदा एक ओळख झाली की ती कधी बदलत नाही, काहीही झालं तरी. त्यामुळे काही लोक सारखे मुखवटे बदलतात. काही मुखवटे आपल्यासारखे मुखवटे असलेल्यांनाच भेटायला येतात तर काही एकमेकांचे मुखवटे खेचायला बघतात.
मी :- असो, तु कधी कधी टवाळक्या करतोस, मुद्दाम तिरकस प्रतिसाद देतोस, भांडतोस, त्यातुन कुणी चांगला किंवा मोठा व्यक्ती दुखावला गेला तर?
आयडी :-अरे? इथे सर्वच सारखे असतात, कोण त्याच्या आयुष्यात किती मोठा आहे याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी जमेल तेवढं पाय खेचणार, मुद्दाम भांडणार. त्याला जमत असेल तर थांबाव नाहीतर जावं फाट्यावर. आणी मी म्हणजे कोण रे, तुझ्याच मनाचा एक कप्पा, जो प्रत्यक्षात कुणी पाहु शकत नाही किंवा तु प्रत्यक्षात उघडतच नाहीस. इथे तु मला मुखवटा म्हणुन वापरतोस, तोतया राहतोस म्हणुन मी काहीही लिहायला कसाही वागायला तयार होतो. जेव्हा तु अशाच मुखवटे काढलेल्या लोकांना भेटायला जातोस तेव्हा मला कधी नेतोस का? मला त्या कप्प्यात पुन्हा कोंडुन ठेवतोस ना.
मी: - पण तु तरी मला कुठे सुखाने लोकांना भेटु देतोस? त्यांना भेटताना आतुन डिवचतोसच ना - हाच तो त्या मुखवट्यामागचा माणुस. परसेप्शन आणतोच ना.
आयडी :- कधी कधी असं होणारच ना. तिथे तुझी ओळख ही माझ्यामुळे आहे. कितीही प्रयत्न केलास तरी माझा उल्लेख तिथे येणारच.
मी :- सोड ते सगळं, मला सर्व गुण्यागोविंदाने रहावे आणी कटुता कधी येऊ नये असेच वाटते. सगळे आपलेच लोकं आहेत.
आयडी :- पण मी असं होऊच देणार नाही मुळी. हा हा हा. माझ्या मुडनुसार मी कधी मत्त, कधी टीकाकार, कधी कंपुबाज, कधी टवाळखोर, कधी भांडकुदळ तर कधी वैचारीक हा वागणारच. तु कसं वागायचं हे तु ठरव. तुम्हा माणसांची जातच अशी आहे मी तरी काय करु.
तुझ्यासाठी ही वर्च्युअल रिअॅलिटी आहे की रिअल वर्चुअॅलिटी आहे तुझं तुच ठरव. मी चाल्लो.
एवढं बोलुन आयडी पुन्हा कंप्युटरात विरघळला.
लै भारी... म्हणुनच आम्ही
लै भारी... म्हणुनच आम्ही आयडीरुपाने आंतरजालावर येतो तो आतला माणुस सोडुन आणि माणुस म्हणुन जेव्हा असतो तेव्हा आयडीने गमन केले असते.
थोडक्यात ह्यांचे अनेक आयडी
थोडक्यात ह्यांचे अनेक आयडी आहेत.
-Nile
अनेक आयडी असलेला तो
अनेक आयडी असलेला तो टिंग्या....
आयडी
आयडी पंचविशी लिही रे...
आयडीची जमाडी-जमंत आवडली रे
आयडीची जमाडी-जमंत आवडली रे
छान लिहले आहेस रे. अजून थोडे
छान लिहले आहेस रे.
अजून थोडे लिही ह्यावर गरजेचे आहे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हम्म
यावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
कधी
कधी, कुठं ठरलं की सांगा. मी येतोच...
मस्तं रे राक्या... आवडला लेख.
मस्तं रे राक्या... आवडला लेख. म्हणूनच अनेक आयडी प्रत्यक्षात फार वेगळे वाटतात असतात. काही प्रत्यक्षातही तसेच असतात. चालायचंच. राक्या लई भारी भारी लिहायला लागला आहे आजकाल.
-आयडी धारी
-पुण्याचे पेशवे
हा हा हा मनीचे(आयडी) बोल
हा हा हा
मनीचे(आयडी) बोल भारीच रे भाऊ
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
लै भारी
लै भारी
फारच इंटरेस्टिंग आहे विषय. एक
फारच इंटरेस्टिंग आहे विषय. एक प्रश्न मला नेहमी पडत आलाय.ह्या धाग्याशी अप्रस्तुत असेल कदाचित पण विचारतोच.
हा स्वताला दडवण्याचा प्रकार आहे का स्वताला व्यक्त करण्याचा प्रयत्न? दडवणे असतेच हे उघडच आहे.मग व्यक्त काय करायचे असते?
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
>>हा स्वताला दडवण्याचा प्रकार
>>हा स्वताला दडवण्याचा प्रकार आहे का स्वताला व्यक्त करण्याचा प्रयत्न? दडवणे असतेच हे उघडच आहे.मग व्यक्त काय करायचे असते?
तुमच्या प्रश्नाचे उत्तर लेखातच आहे. तुमच्या आयडीशी बोलुन (विचार करुन पहा) पहा एकदा .सर्व उत्तरे फटकन मिळतील.
इडंबन
आता याचे कोणी 'मी आणि माझी बायडी' असे इडंबन करणार आहे का?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
"मी आणि माझी बायडी" समजा कुणी
"मी आणि माझी बायडी" समजा कुणी लिहीलं आणि ते जर बायडीनं वाचलं तर घरी जेवायचे वांदे होतील त्याचं काय??
हे हे हे ममो झकास लिहीलयस
हे हे हे ममो झकास लिहीलयस एकदम.....
(चिमटे, पिचक्या बरोबर आहेत)
सहमत
मस्त विषय,
वरती निवान्त पोपट म्हणतात,
"हा स्वताला दडवण्याचा प्रकार आहे का स्वताला व्यक्त करण्याचा प्रयत्न? दडवणे असतेच हे उघडच आहे.मग व्यक्त काय करायचे असते? "
मझ्या मते हा स्वताहाला व्यक्त करण्याचाच प्रकार आहे आणि आपण कोण बाजीराव लागुन गेलो आमुक यावर मत द्यायला असा स्वताहविषयीचा ग्रह असे आयडि निर्माण करण्यास कारणीभुत होतो.
पिहू
पिहू ?? अय्यो?? माझ्या
पिहू ??
अय्यो?? माझ्या आयडीसारखा दिसणारा आयडी??
आयडी आणि इमेज
संकेतस्थळ माहिती आणि अभिव्यक्तीचं माध्यम आहे.
अभिव्यक्त्ती निकोटीन सारखी नाही, प्रकट होणं (टू एक्सप्रेस) हा अस्तित्वाचा स्वभाव आहे आणि इंटरनेट हे आजच्या घडीला माणसाला लाभलेलं मोठं वरदान आहे. आपण त्याचा उपयोग कसा करतो ते आपल्यावर आहे.
आयडी नी अभिव्यक्तीला अडथळा येत असावा असं मला वाटतं कारण आयडीतून तयार झालेल्या इमेजचं सारखं भान ठेवाव लागत असेल.
आयडी मागे लपणं ही अवघड असावं कारण आयडी कोणताही असला तरी लिहिण्याची पद्धत आणि अप्रोच तोच रहातो, आयडी मागचा माणूस बदलत नाही.
स्वतःच्या नांवानी लिहितांना जवाबदारी येते पण ओशोंनी म्हटलंय `फुल रिस्पाँसिबिलिटी फुल फ्रिडम!
संजय
www.sanjayunlimited@yahoo.com
जे जगतो तेच लिहितो!
सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही
समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/
मी:- मला एक गोष्ट सांग, कितीही झालं तरी तु आंतरजाल सोडु शकतोस का
मी:- मला एक गोष्ट सांग, कितीही झालं तरी तु आंतरजाल सोडु शकतोस का? एखाद्या नशेसारखं आहे ते, एकदा चटक लागली की बास, शरीरातलं निकोटीन कमी झालम की जशी सिगारेटची तलफ लागते तसं थोड्या थोड्या वेळाने काहीतरी लिहायला, प्रतिसाद द्यायला हात सळसळतात.
http://www.youtube.com/watch?v=0FB0EhPM_M4&feature=youtu.be
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
मस्त जमलय.