किडन्यापिंग...द थरार
दुपारची वेळ साधारण ४-४.३० झालेले.नुकतच म्हणजे साडेबाराला मावस भावाच लग्न झालेलं.गुलाबजाम खाल्ल्याने पोट तुडुंब भरलेल.खुर्चीवर फ्यान खाली बसून डुलकी काढून झालेली.आता रुखवताची बांधाबांध करण्याचे मामी लोकांचे हुकुम येत होते.तेवढ्यात माझा फोन वाजला.नीट रेंज येत नसल्याने जरा बाहेर गेलो.
आपल्या विमो भौंचा फोन होता.पुण्यात असशील तर भेटू म्हणत होते.पण मी आलो होतो सोलापुरात.पुण्यात आलो कि भेटू नक्की असे म्हणून फोन ठेवणार तेवढ्यात एक गाडी करकचत ब्रेक दाबत माझ्यासमोर थांबली आन एका दणकट माणसाचा हात बाहेर आला.तूच का तो XXXX असे म्हणून मला खेचून गाडीत घेतले.आता बरेच मित्र मला "त्या चार फुल्या" म्हणतात.पण माझे नाव ते खचितच नव्हते.मी नाही म्हणालो पण तो पर्यंत मी कार्यालयापासून १/२ किमी लांब आलो होतो.महावीर मंगल कार्यालयावरून गाडी आजोबा गणपती क्रॉस करून बाळी-वेस मध्ये शिरत होती.कोल कधीच कट झाला होता.
गाडीमध्ये तोंडावर रुमाल बांधलेली चार टाळकी दिसत होती.काय पण लोक होती ती...कळकट मळकट..भेंडी, रुमालच उठून दिसत होते.मला नक्की काय चालू आहे ते कळत नव्हते."ओ भाऊ, मला कुठे नेताय?मी काय केलय?" मी भेदरून विचारले.."ए भोXXX, भाऊ कोणाला म्हणतो बे?एक रुमाल बोलला."ओ दादा, काय चुकल..माझ वाक्य पूर्ण व्हायच्या आत निळ्या रुमालातून आवाज आला.."गप कि ,का उगी वटवट करतोयस?अय टोचन दे रे ह्याला,...नवीन फ्याम्ली तयार करतोय दादा-भाऊ म्हणून.येडXX "तो पर्यंत एकाने माझे हात अन पाय बांधले.झाल मी घाबरलो..कोणत इंजेक्शन म्हणून मी विचारणार तेवढ्यात एक ठोसा बसला थोबाडावर डाव्याबाजुने.गाडीत भर दुपारी चांदण्या चिमण्यान बरोबर खेळताना दिसल्या..."अबे चोच्या, ते टोचन नाही बे..ते आणलाय ते".."ओ आन्ना,आता मला काय म्हेत?...मला आपल हेच टोचन म्हयातेय"..चोच्या म्हणाला. "माहिती नाही तर विचारायचे न आधी.."मी हे बोललो न मोठी चूक झाल्याचे कळले..एकाच वेळी पोट आणि डावी मांडी या पैकी जास्त काय दुखते आहे ते समजत नव्हते.गुलाबजाम आणि मिक्स व्हेज भाजीची चव तोंडावर यायला लागली होती..
गाडी नक्की कुठे चालली होती काही कळत नव्हते.सुसाट पळत होती. आन्ना रुमाल आणि चोच्या रुमाल यात मी व्यवस्थित चिरडला जात होतो.आता गाडी कच्च्या रस्त्याने जात होती..माझ डोक समुद्राच्या लाटा किनार्यावर आदळतात तस टपावर आदळत होत.चोच्या रुमाल अन समोरचे दोन रुमाल आपापल्या ज्याकीताट टोचन शोधत होती.मी टोचन मिळण्याची वात पाहू लागलो.."सापडलं कि नाही बे?तरी सांगत होतो, च्यक करा च्यक करा.."द्रारेव्हाराने मागे तोंड करून म्हटले.."अरे मुस्कड्या, समोर बघ.."मी रस्त्यातल्या म्हशीकडे बघून ओरडलो.."काळ्या डावीकडे.. डावीकडे.."चोच्या रुमाल ओरडला...हुश्ह्ह..कशीबशी काळ्याने गाडी कंट्रोल केली..काळ्यावर शिव्यांचा भडीमार झाला..तेवढ्यात मला कोणतातरी उग्र दर्प नाकाजवळ जाणवला..क्लोरोफोर्म रुपी टोचन मला कळले होते..चुचु बै ल नविन बातमि मिळत होती..मी कीडन्याप होत होतो...
क्रमश:
.jpg)
हा हा हा मजेशीर दिसतय
हा हा हा मजेशीर दिसतय प्रकरण.
पण भौ खुप लवकर आटोपत घेतलात हा भाग. वाचे वाचे तो संपला पण.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
काय रे पंड्या हे काय
काय रे पंड्या हे काय आँ?
कहाणीतला वेग मस्तंच पण भाग अगदीच छोटा आहे.
-पुण्याचे पेशवे
पुढे?
पुढे?
जबरा सुरवात रे.. पुढे ??
जबरा सुरवात रे.. पुढे ??
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चुचुबै
चुचुबै
चुचु बै ल नविन बातमि मिळत
चुचु बै ल नविन बातमि मिळत होती..मी कीडन्याप होत होतो...
माताय तु किडण्याप व्हताना सुदीक ट्विटतो काय?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
चुचु बै ला कशी काय बातमी मिळत
चुचु बै ला कशी काय बातमी मिळत होती? का हे सगळे नाटक होते? का उत्कंठता ताणता आमची? का लवकर टाकत नाही पुढला भाग?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही