

राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन।
श्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली!
जोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,
खड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन !
वही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन!
एक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन!
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन
जमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया!
मुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया!
नाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन!
राधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.
- पँडित नरेन्द्र शर्मा

काहीतरी शोधताना अचानक वरील रचना दिसली व नकळत ब्रिजभूमी, वृँदावन, गोवर्धन नजरेसमोर आकार घेऊ लागले व अनेक दिवसापासून मनात सुप्त इच्छा होती की राधाकृष्ण ह्यांच्यावर आपण कधीतरी लिहावे म्हणून हा लेखन प्रपंच.
राधाकृष्ण ! जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करु येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा कृष्ण माहित होता तो महाभारतामुळे व थोडेफार गुणीजणांचा सत्संग हरिद्वारमध्ये लाभल्यामुळे. पण ह्या मथुरा-वृंदावन-गोवर्धनवारी नंतर कृष्ण जाणून घेण्याची व त्यापेक्षा आधिक राधिकाराणी ला समजून घेण्याची ललक मनामध्ये येऊ लागली व त्यांनतर शोध घेत, वाचन करत, थोरामोठ्यांना विचारलेल्या प्रश्नातून व आलेल्या उत्तरातून कृष्ण-राधिका मला समजतील का ह्याचे विवेंचन करु लागलो.
राधा !
एक अदभुत व्यक्तीरेखा. श्री कृष्णाच्या जिवनकथेतील एक महत्वाचा भाग. जीच्या शिवाय श्री कृष्ण पुर्ण होत नाही ना कृष्णकथा. प्रेमस्वरुप राधा, कृष्णाची सखी, प्रेमिका राधा, रायाण पत्नी राधा, ब्रीजची राधारानी. राधा राधा.. यत्र सर्वत्र राधा ! कृष्ण जीवन कथा राधामय होतं. सर्वात आधी कृष्ण म्हणजे देव हा विचार बाजूला ठेऊन मी लिहतो आहे माझ्या मते कृष्ण देवत्वाला पोहचलेला एक कसलेला राजकारणी, योध्दा व राजा होता जो आपल्या गुणामुळे, बुध्दी चातुर्यामुळे व डावपेचामुळे जिवनात यशस्वी झाला त्याच्या कथेतील एक भाग म्हणा अथवा जीने त्यांचे जीवन व्यापुन टाकले अशी राधा म्हणा. ही एक कल्पना आहे असे ही समजले जाते कारण जेथे साक्षात कॄष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नाहीत तेथे राधाचे कोठून मिळणार. त्यामुळे ह्या लेखाला काही इतिहास संदर्भ नाही आहे ना त्याचा मी कुठे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता महाभारतात कुठेच राधेचा संदर्भ येत नाही की उल्लेख पण जनसामान्यात राधेचा उल्लेख हा कृष्णाआधी येतो हे देखील नवलच नाही का ?
राधेकृष्ण...
राधा कोण हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण कृष्णावर तीची असिम भक्ती होती व ती कृष्णमय झाली. कृष्णाची बासरीची धुन जेव्हा जेव्हा परमसीमेवर पोहचत असे तसे तसे राधिकाराणी आपोआप कृष्णाजवळ खेचली जात असे. प्रेम भावना, कृष्णाला भेटण्याची अतिव इच्छामुळे अथवा प्रेमाचे अदभुत संगीतामुळे म्हणा पण ती मंत्रमुग्ध होऊन कृष्णमय होत असे. राधा शिवाय कृष्ण नाही व कृष्णाशिवाय राधा नाही ! कदंबाचे झाड कृष्णला अतीप्रिय तो नेहमी आपली बासुरी कदंब वृक्षाखाली बसून वाजवत असे. कृष्ण बासुरी वाजवतो आहे व राधा हलकेच डोके त्याच्या खांद्यावर ठेऊन मंत्रमुग्धपणे ते स्वर आपल्या हदयामध्ये जपून ठेवत आहे हे तर प्रसिध्द चित्र.

राधाकृष्ण ह्यांच्या नात्याची फोड करणे हे अत्यंत किल्ष्ट आहे, पुढील अनेक युगामध्ये ही प्रेमगाथा कधी कथेतून कधी बोली भाषेच्या गाण्यातून, संताच्या शब्दातून समोर येत गेली पण त्याचे सौंदर्य तसेच टिकून राहीले. तसे पाहता त्यांची कथा ही जगावेगळी प्रेमकथा आहे, सामजिक बंधन आहे, वयामध्ये खुप मोठे अंतर आहे, निर्मळ असे प्रेम आहे व वर्षानूवर्ष सहन करावा लागणारा विरह आहे व अनेक वर्षाच्या विरहानंतर फक्त काही क्षणाची भेट आहे ती ही दुरुन. पांडवांनी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञकर्म केले होते त्यासाठी अन्य गोकुळवासीच्या बरोबर राधा देखील तेथे गेली होती अनेक वर्षाच्या ताटातूटीनंतरची ही अंतःकरणाला वेदना देणारी भेट, काही क्षणाची. काय वाटले असेल तेव्हा राधेला ? कृष्णाचे काय तो तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा ? घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार ? ना ती शस्त्र हातीधरून सत्यभामे सारखे कृष्णाबरोबर जाऊ शकत होती अथवा ना ती कृष्णाएवढी प्रगाढ पंडित होती की उभ्या उभ्या जगाला गीतेचे अमृत पाजेल. ती तर साधीभोळी निरागस राधा. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय तिला दुसरे काही जमलेच नाही.
आता थोडे कळले आधी राधा का ते.. राधेकृष्ण......
पुढील भागात आपण थोडे खोलवर जाऊ.
( क्रमशः )
मस्त लिहिले आहेस रे...
>>>मस्त लिहिले आहेस रे...
-दिलीप बिरुटे
छान लिहीले आहे.
अजून लिहणार आहे पुढे.. पण अचानकच वाटले २ भाग करावेत म्हणुन केले.
सुंदर लिहिलय.......राधा म्हटल्यावर लिहायची इच्छा झाली होतॉ पण तुझे पूर्ण होऊ दे मग लिहिन.
तु पण लिही मग...
>>तु पण लिही मग...
लेख पूर्ण झाला की त्यावर लिहीन मी
अरुणा ढेरेंचं कृष्णकिनारा हे पुस्तक वाचलंय का तुम्ही?
खूप सुंदर लिहिलंय त्यांनी, राधा, कुंती, द्रौपदी ह्यांच्या आयुष्यातल्या 'कृष्णा'वर.
व्यासपर्वातही, दुर्गाबाई राधा कृष्णाच्या नात्याचा ओझरता उल्लेख करतात.
त्याची आठवण झाली.
'चिर-विरहामुळे राधा-कृष्णाचं एकमेकांबद्दलचं प्रेम कायम दोघांच्याही मनात जिवंत होतं' असं काहीसं वाक्य आहे व्यासपर्वात.
लिहीत रहा,
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
मनमेघा काय आठवण काढली आहे. अरुणाताईंची संवेदनशील जाणीव अशा नात्यांचा धांडोळा घेते तेव्हा कितीतरी आश्वासक वाटते. त्यांचे मैत्रेयी, उर्वशी यांच्यावरील लिखाणही असेच तलम तरीही अंतर्मुख करणारे.
राजे झकास लेखमाला. लगे रहो.
एकदम सही राजे...
पुढच्या लेखनाची वाट बघतो आहेआहात?
अवांतरः ते मंदीरांवर कधी लिहणार आहात?
श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया
अनुप जलोटांचे भजनच आठवले अगदी ...."रंग दे चुनरिया" - खरे आहे.. कृष्ण - राधा अगम्य आणि गूढ आहेतच, कायमच राहतील
>>कृष्ण - राधा अगम्य आणि गूढ आहेतच, कायमच राहतील
राम व सिता मिळणे अगम्य.... रामायण जगणे अगम्य
राधा कृष्ण तर आपल्यासारखे... आपल्यातील तर हे कसे अगम्य व गूढ होतील ?
राधा कृष्ण तर आपल्यासारखे... आपल्यातील तर हे कसे अगम्य व गूढ होतील ?
अगम्य आणि गूढ यासाठी की प्रेमाचा आदर्श म्हणून कृष्ण-राधेकडे सर्वजण पाहतात. पण कृष्णभक्ती आणि कृष्णप्रेम यांत आकठ डुंबलेल्या राधेचा कृष्णाबद्दलचा दॄष्टीकोन म्हणायचे होते मला. पत्नीचा दर्जा नसूनही कृष्ण म्हटला की त्याच्या बरोबर राधा येते. रुक्मिणी नाही
म्हणूनच जास्त अगम्य आणि गूढ
हो रे, मलाही अगदी शीर्षक वाचल्याबरोबर http://www.youtube.com/watch?v=xBO5UFyjqUs हेच आठवले. त्यावेळी डिस्को गाण्यांची फार क्रेझ होती. ती अनूप जलोटा ने पार पुसुन टाकली. अगदी पानटपर्यांवर सुद्धा त्याची गाणी वाजत असत. ते फक्त लोक जोवर टाळ्या वाजवत नाहीत तोपर्यन्त आकार लांबवणे केले नसते तर बरे झाले असते, त्यासाठी त्याचे हसे झाले. तेवढे नसते झाले तर बरे झाले असते.
लाल न रंगाउ मै
हरी ना रंगाउ
अपने ही रंग मे
रंग दे चुनरिया
>ते फक्त लोक जोवर टाळ्या वाजवत नाहीत तोपर्यन्त आकार लांबवणे केले नसते तर बरे झाले असते, त्यासाठी त्याचे हसे झाले
१००% खरं आहे हे...
माती करुन घेतली !
वाचतेय, पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
छान झालाय लेख.
पुष्करिणी
वाचतोय........!
-दिलीप बिरुटे
आज लेख टाकायची ही योग्य वेळ होती.
मस्त...!
खूप छान ..!