डच बालकथा - २

0
0

एक अळी होती. कुरूप, बुटकी नि लठ्ठ. तिला ना हात होते ना पाय. टिंबाएवढे मिचमिचे डोळे होते फक्त. दिवसभर इकडे तिकडे आपले अंग ओढत कशीबशी सरपटत रहायची. झाडाची पाने कुरतडून कुरतडून खात रहायची. ही अळी खूप भित्री होती. कोणाची चाहूल जरी लागली तरी अंग चोरून घेत एखादया पानामागे लपून बसायची. तिला वेगात पळता सुद्धा येत नसे. पण या अळीच्या डोळ्यात कुतूहल मात्र अपार होते. समोर येणारी प्रत्येक गोष्ट ती निरखून बघायची. जगात किती वेगवेगळ्या, सुंदर सुंदर गोष्टी आहेत असे तिला सारखे वाटायचे. आणि मग स्वतःची कुरूपता बघून तिला अजूनच वाईट वाटायचे.

एकदा अळीला एक गोगलगाय दिसली. तिच्यासारखीच हळुहळू चालली होती. अळीला वाटले, अरे! ही पण माझ्यासारखीच की! पण जेव्हा गोगलगाय जवळ आली तेव्हा तिला दिसले. गोगलगायीच्या पाठीवर तिचे सुंदर घर होते! आणि तिला दोन सुंदर शिंगंसुद्धा होती. वार्‍याची एक मोठी झुळूक आली नि गोगलगाय अलगद पाठीवरच्या घरात गुडुप झाली!! अळी आश्चर्याने बघतच बसली. या थंडगार वार्‍याने तिलाही थंडी वाजत होती पण तिला नव्हते असे सुंदर घर...
रात्री देवबाप्पाशी बोलताना ती म्हणाली, "मला कधी मिळणार असे सुंदर घर??" "बाळा, थोडी वाट बघावी..." देवबाप्पा म्हणाला. अळी तशीच थंडीत कुडकुडत झोपून गेली.

सकाळ झाली. मस्त सोनेरी उन्हे पसरली होती. अळी खूष होती. नवा दिवस दिसला की ती अशीच आनंदी असायची. अचानक तिच्या टिंबुल्या डोळ्यांपुढे काहीतरी सुंदर चमकले. बघते तर काय? एक कोळी किडा भराभर जाळे विणत होता. त्या जाळ्याचे चमचमणारे धागे दवबिंदू अडकून अजूनच सुंदर दिसत होते. अळी कुतुहलाने पुढे गेली. एवढयात तो कोळी तिच्यावर वस्सकन ओरडला, "ए सुरवंटा, दूर हो, दूर हो.. दिसत नाही मी इथे जाळे विणतोय ते....!!!" बिचारी अळी! हिरमुसून मागे सरकली. पण तिला थोडा आनंदही झाला. तिला तिचे नाव कळाले होते. "सुरवंट".

सुरवंट रात्री बाप्पाला म्हणाला, "मला निदान जाळे विणायला तरी शिकव की..." "अरे बाळा, थोडा धीर धर रे. योग्य वेळ आली की सगळे काही मिळेल." बाप्पा म्हणाला. सुरवंटाने विचारले, "पण म्हणजे कधी ???" बाप्पाने काहीच उत्तर दिले नाही. सुरवंट हिरमुसून झोपी गेला.

सकाळी कसलीशी लगबग ऐकू आली म्हणून सुरवंटाने मान वर करून बघितले. समोर मुंग्यांची भलीमोठी रांग गाणी गात चालली होती. प्रत्येक मुंगीच्या हातात मोठ्ठा साखरेचा दाणा होता. सगळ्या मुंग्या पावसाळ्यात खाण्यासाठी म्हणून आपापल्या घरात अन्नाचा साठा करून ठेवण्यात मग्न होत्या. सुरवंटाला परत एकदा वाईट वाटले. त्याला फक्त झाडाची पानेच कुरतडून खाता येत असत. आणि मुंग्यांसारखे मोठ्ठा किल्ला असलेले घरही नव्हते त्याला.

आपल्याला असं काहीच का मिळत नाही याचे सुरवंटाला खूप दु:ख झाले. देवबाप्पाचा रागही आला. त्याने ठरवले. देवबाप्पाशी कट्टी करायची! खूप रडू यायला लागले. रडत रडत तो झोपून गेला.

केव्हातरी मधेच जाग आली. त्याला जाणवले की कुणीतरी आपल्या अंगावर मस्त मऊमऊ पांघरूण घातले आहे. त्या रेशमी पांघरूणात झोपायला त्याला एवढे छान वाटले! वाटले की कधी उठूच नये... निघूच नये या पांघरुणाच्या बाहेर. अजून झोपही येत होती. आता अजून गाढ झोप लागली. किती वेळ झोपला तो ते बाप्पालाच माहीत! सूर्य आला नि गेला सुद्धा... चांदोबा आला नि झोपलेल्या सुरवंटाला हळूच हाक मारून गेला.

सुरवंटाने डोळे उघडले. खूप वेळ झोपल्यामुळी अंग अगदी आंबून गेले होते. त्याला खूप आळोखेपिळोखे द्यावे वाटत होते... आणि हात-पाय उगवल्याने देताही येत होते!! यिप्पी... आनंदाने त्याने आपले नवे हातपाय ताणून दिले. तर काय?? अंगाभोवतालचे पांघरूण गळून पडले. सकाळच्या लख्ख उन्हात त्याला पहिल्यांदाच आपले सुंदर पंख दिसले. निळे निळे पंख नि त्यावर पांढरी पिवळी नक्षी ! कोळीकिड्याच्या जाळ्यापेक्षाही मऊमऊ... मस्त टोकदार मिशापण आल्या होत्या की! गोगलगायीपेक्षा ऐटबाज! त्याने अलगद पंख हलवले. आता तर हवेत उडता येत होते त्याला!! किती भिरभिर उडता येते पंखांमुळे! सगळ्या मुंग्या खालून त्याच्याकडे बघत ओरडू लागल्या, "ते बघा... बघा... किती सुंदर फुलपाखरू!!!"

फुलपाखराला खूप खूप आनंद झाला. सगळी फुले, किडे, मुंग्या, गोगलगाय त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. त्याच्या आनंदात सामील झाले होते.

एकदम मस्त गोष्ट. पुस्तक तयार

1

एकदम मस्त गोष्ट. पुस्तक तयार केले तर चित्रांसहीत असलेली गोष्ट वाचायला धमाल येईल.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

असच

2

असच म्हनते................मस्त...........

सुंदर कथा!!

3

पण बालकथा असूनही "तात्पर्य" नाही?
डचांना अजून तात्पर्यातली गंमत कळलेली दिसत नाही!!!हास्य
असो! डचांना म्हणावं की बालकथा या बालकथाच असू द्यात....
त्यांना तात्पर्याचे तोबरे लावू नकात!!
आमेन!!!!

+ १ खुप छान भाषांतर केले आहेस

4

+ १

खुप छान भाषांतर केले आहेस माया आवडले.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माया... खुप छान.. मस्त.. असं

5

माया... खुप छान.. मस्त..

असं कुठलाही अभिनिवेश नसणारं भाषांतर खुप कमी वेळा वाचलय..

तात्पर्य नाही हे सर्वात उत्तम.. (नाहीतर बर्‍याचशा बोधकथा दुर्बोधकथाच असतात हल्ली.)

आता दुशली शांग..

गोत्ट आवल्ली........!!! माया

6

गोत्ट आवल्ली........!!!

माया मावशी छान आहे. मना छान छान गोत्ट शांग्ते.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

ही गोष्ट जास्त मुलांना आवडली

7

ही गोष्ट जास्त मुलांना आवडली नाहीसं दिसतंय... thinking
असो. पुढची नक्की आवडेल हास्य

मला पण तात्पर्य न सांगणार्‍या गोष्टी आवडतात. Big smile
बाकी भाषेचे श्रेय मी घेत नाही. मूळ भाषा लेखकाचीच आहे. मी फक्त अनुवादक. सोप्या भाषेचे श्रेय लेकीकडे जाते. तिला ज्या भाषेत गोष्टी सांगते त्याच भाषेत लिहिते...!

प्रतिसादांबद्दल आभार हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

खुपच सुंदर अनुवाद. कथाही

8

खुपच सुंदर अनुवाद. कथाही सुरेख.

मत्त मत्त आवल्ली. हास्य
अजुन येउदेत कथा.

माया काकु गोष्ट आवडली

9


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मस्त मस्त

10

मस्त मस्त

कथा अप्रतिम आणि कथा सांगायची

11

कथा अप्रतिम आणि कथा सांगायची शैली देखील हास्य

एकदम मस्त लिहिलयस

12

एकदम मस्त लिहिलयस माया.......सर्वांना आवडेल अस.

मस्त!!!!!!!!

13

ही पण गोष्ट छान ग माया
आता तिसरी पण येउदेत Big smile

खुप छान !

14

खुप छान !

मस्त!!

15

मस्त!!

अरेच्चा.. हे उरलंच होतं.

16

अरेच्चा.. हे उरलंच होतं. मायातातू गोत्त आवल्दी. आणि शांन्ना. Innocent

मला डच भाशा पन शिकव ग

17

मला डच भाशा पन शिकव ग मायातै........

सुंदर गोश्त..आव्ड्या

18

सुंदर गोश्त..आव्ड्या हास्य

लोकं इथे मोठं व्हाचे नारे

19

लोकं इथे मोठं व्हाचे नारे लावत आहेत , मालकांनी १८ वर्षाखालच्यांना प्रवेश बंद करुन ठेवलाय .. आणि त्यावर एक बालकथा ? कमाल आहे wink बाकी मोठ्या बाळांना बालकथेत भारीच इंटरेस्ट हो !! खि खि खि

असुद्या हो टारूभौ.... या

20

असुद्या हो टारूभौ.... या ठिकाणी बालसाहित्य असे नाव देऊन लिहिणारी मी एकटीच दिसतेय..पण बालसाहित्य बरेच आहे; नाही का?? wink
मोठ्यांना जेव्हा रोगट आणि कुरूप जगाचा वीट येइल तेव्हा लहानांच्या दुनियेत घटकाभर रमता येईल इथे.... Innocent
शिवाय सगळ्यांनाच ' केवळ प्रौढांसाठी ' लेखन करता येईलच असे नाही. वाचणारालाही वीट येतो त्याचा कधीतरी Big smile


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

>>मोठ्यांना जेव्हा रोगट आणि

21

>>मोठ्यांना जेव्हा रोगट आणि कुरूप जगाचा वीट येइल तेव्हा लहानांच्या दुनियेत घटकाभर रमता येईल इथे....

ररा तुम्हाला माया म्हातारा म्हणतिये

मी? कुटं कवा कुणाला काय

22

मी? कुटं कवा कुणाला काय कशापायी मनलं ? अर्ध्याभौ माझ्या खांद्यावर दंबूक ठेवायची नाय हां.. wink


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

बरोबर आहे मायातै :)

23
पण बालसाहित्य बरेच आहे; नाही का??

तर तर , अगदी मनातलं बोललात, ते फक्त "बालकथा/बालगाथा/बालकविता" असं षिर्षक न देता लिहीतात.. काय एकेक जण ढिगाढिगानं बालसाहित्य टाकतोय wink ( आता ते बालसाहित्य "बालकांसाठी" लिहीलेलं नसुन "बालकांनी" लिहीलेलं असतं हा भाग अलहिदा

मोठ्यांना जेव्हा रोगट आणि कुरूप जगाचा वीट येइल तेव्हा लहानांच्या दुनियेत घटकाभर रमता येईल इथे....

आमचाही तोच मोटो "होता" , पण बर्‍याच "आठ्याळ राखुंड्यांना" पचला (की देखावला ?) नाही तो हास्य

शिवाय सगळ्यांनाच ' केवळ प्रौढांसाठी ' लेखन करता येईलच असे नाही.

नाहीतर सगळीकडेच पिवळी पानं पसरली आहेत काय ?

वाचणारालाही वीट येतो त्याचा कधीतरी

यु सेड इट हास्य

बाकी प्रतिसादाची णळी तुमच्याकडे नव्हती बरं हास्य

>>>>बाकी प्रतिसादाची णळी

24

>>>>बाकी प्रतिसादाची णळी तुमच्याकडे नव्हती बरं

तुला घाबरून कोणी प्रतिसाद दिला नाय कालपासून... म्हणलं चला आता आपणच किल्ली द्यावी Laughing out loud

>>>आठ्याळ राखुंड्यांना" Laughing out loud

लै म्हन्जे लैच्च आवडला शब्द Big smile ते काय काळजाला का काय तो भिडला !!


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

जाऊ दे रे टारबा... त्याण्च्या

25

जाऊ दे रे टारबा...

त्याण्च्या णशिबात णाही तुझे साहित्य वाचने..... (टार्‍याच्या प्रतिक्रिया ही तुकारामाच्या अभंगासारख्या चिरंतन आहेत असे सूत्रांकडून मागेच कळाले आहे)

बाकी वरच्या सं-वादातून चुचुला दोन-तीन तरी ब्रेकिंग न्यूज कळतील..... पण चुचुला हे कळेल????


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

सुंदर अनुवाद

26

सुंदर अनुवाद

>>> जयबाप्पाचा रागही आला.

27

>>> जयबाप्पाचा रागही आला. त्याने ठरवले. जयबाप्पाशी कट्टी करायची!

वरच्या कथेत वरील वाक्ये का आहेत? देवबाप्पा म्हणायचे काय? कथा दुसरीकडे उपयोगात येवू शकते. त्यामुळे कृपया दुरूस्त करा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पाभे, गोष्ट 'सांगण्याच्या'

28

पाभे, गोष्ट 'सांगण्याच्या' ओघात 'लिहिताना' चूक झाली. दुरुस्ती केली आहे.
मूळ कथेतही 'गॉड' असाच उल्लेख आहे हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥