आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार

0
0

मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते. साधारण दीड दोन महिन्यांपूर्वी प्राजुच्या 'फुलांची आर्जवे' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला हजर रहायचा योग आला होता. तेव्हाच या अल्बमचा प्रकाशन सोहळाही लवकरच होणार आहे असे कळले होते. तेव्हा पासून या कार्यक्रमाची वाट बघणे चालू होते.

मध्यंतरी, प्राजुने हा सोहळा १८ जुलैला पुण्यात होणार आहे असे कळवले आणि बर्‍याच लोकांकडून 'या समारंभाला हजर राहू' अशा अर्थाचे निरोप मिळाले. या निमित्ताने प्राजुला प्रत्यक्षात भेटायची संधी मिळणार होती आणि आपल्या मैत्रिणीचे कौतुक करायला जातीने हजर रहायचेच असे तेव्हाच ठरवले. निरोप आले, निरोप दिले गेले. प्ल्यानिंग झाले आणि आम्ही १८ जुलैला सकाळी पत्रकार भवन, पुणे इथे जमलो. मी, अदिती, परा, पेठकर काका, राजे, चंद्रशेखर महामुनी, सोनाली घाटपांडे, प्रकाश घाटपांडे, मनिष, पुण्याचे पेशवे, दत्ता काळे, लिखाळ, शाल्मली, टार्‍या, राजेश घासकडवी, धम्या, अविनाश कुलकर्णी, श्रावण मोडक, मराठमोळा अशी दणदणीत उपस्थिती होती. प्राजु जातीने स्वागत करून गेली.

कार्यक्रम बरोब्बर १० ला सुरू होणार असल्याने बरेच लोक १०.३० पर्यंत आले. त्यामुळे आमच्या सारख्या टैमवर आलेल्या लोकांना जिन्यात उभे राहून धिंगाणा करायला वाव मिळाला. आल्यागेल्या लोकांवर लक्ष ठेवत, आम्ही जिन्यात गर्दी करून उभे होतो. एक दोन पुणेरी आज्यांनी आमच्याकडे थोडा जळजळीत कटाक्ष टाकून आम्ही लोकांना अडचण करतो आहोत हे आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला खरा. पण काही अस्सल पुणे-३० लोकही आमच्यातच असल्याने ते कटाक्ष रामानंद सागरच्या रामायणातल्या बाणांप्रमाणे मोडून पडले. शिवाय प्राजुच्या नात्यातले लोक सोडले तर एकगठ्ठा अशी आमचीच व्होटब्यांक असल्यामुळे प्राजु पण आमच्या दंग्याकडे कानाडोळा करून होती. wink

कार्यक्रम १०.३० ला मात्र अगदी सुरूच झाला. कार्यक्रमाला बरेच ओळखीचे चेहरे दिसत होते. काही चेहरे टीव्ही आणि चित्रपटातून दिसणारे तर काही जालावर दिसणारे. बर्‍याच मराठी कार्यक्रमातून किंवा चित्रपटातून दिसणारे, प्रसिद्ध कलाकार श्रीरंग गोडबोले आणि नटरंग या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव हे या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची धुरा मंजुश्री गोखले यांनी सांभाळली. सुरूवातीला प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांचे दोन शब्द वगैरे झाले आणि कार्यक्रमाला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली ती अल्बम मधल्या गाण्यांच्या आणि त्या गाण्यांवर केलेल्या सुंदर नृत्यांच्या सादरीकरणाने. पौलमी पेठे, अमृता काळे, मधुरा दातार, संगिता चितळे इत्यादी कलाकारांनी अल्बम मधली गाणी पेश केली. प्राजुनेही तिचे मनोगत व्यक्त केले. तिच्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण ती आमच्या सर्वांबरोबर वाटून घेत होती... अतिशय भावनाविवश झाली होती. काय बोलू आणि काय नको असे झाले होते तिला. सगळ्या आभारप्रदर्शानात तिने आपणा सगळ्या जालिय मित्रमंडळींचे खास आभार मानले. त्यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट (आम्हीच केलेला) सगळ्यात जास्त होता. wink


प्राजुचे पती आणि अल्बमचे निर्माते जगदीश पाहुण्यांचे स्वागत करताना.


अमृता का़ळे


संगिता चितळे


पौलमी पेठे


प्राजु आणि जालिय मैत्रिण शाल्मली


नक्की किती मोठे व्हायचे त्याचे परिमाण सांगताना श्रावण मोडक आणि बाजूला आज्ञाधारक अभ्यासू लिखाळ भावोजी.


लिखाळ भावोजी की जान खतरे मे... द डेंजर बिहाइंड.


आधुनिक भरतभेट किंवा शिवाजी-अफझलखान भेट.


अवघडलेल्या अवस्थेतही जीवाच्या भितीमुळे बळंच कसं हसावं याचा वस्तुपाठ देताना परा


शूर‍ आम्ही सरदार.... बाजीराव पेशवे (पहिले की दुसरे ते अजून नक्की कळले नाहीये. माणूस बेरकी आहे. कळू देत नाही.)


हात जायबंदी करून घेताना प्राजु...


पुणेरी इंगा बघितलेला राजेश घासकडवी पुणेरी इंगा दाखवणार्‍या परा बरोबर...


आम्हाला काय ब्वॉ कोणी नेलं नाही कधीच समर्थ भोजनालयात, म्हणून मग आम्हीच गेलो आणि फोटो काढून हौस भागवली. मागे आमचे आधारस्तंभ (पहिले का दुसरे) बाजीराव ऊर्फ पुण्याचे पेशवे. कोपर्‍यात अर्धा मराठमोळा आणि मागे (काकूंना घाबरून) तोंड लपवत पेठकर काका.



ऑटोग्राफ घ्यायच्या निमित्ताने पुढे पुढे करताना परा, मनिष, आदिती आणि आपल्याला हे असं का नाही सुचत या विचाराने व्यथित टार्‍या.

एकंदरीत कार्यक्रम सुरेखच झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच भेटता आले बर्‍याच दिवसांनी. शिवाय या निमित्ताने काही जालिय भरतभेटी झाल्या, जुने मित्र परत भेटले. आपुलकीने चौकशी झाली, विचारपूस झाली. मजा आली. काही लोकांना जायची घाई असल्याने ते पळाले. आमच्या सारखे काही निरूद्योग लोक आता एकत्रच जेवू म्हणून एका हाटेलाकडे प्रयाण करते झाले. तिथेही दंगा झालाच भरपूर.


विचारविनिमय.


नंतर म्हणत होता टार्‍या की हेल्मेट सोडून देणार होता... एका फटक्यात काम तमाम.


टार्‍या त्याच्या खेळण्याबरोबर.


भाळी चंद्र असे धरिला... वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व धमालदादा बारामतीकर देशमुख


विद्वज्जनांना अन्नदान केल्याचे पुण्य मोजताना पेठकर काका.



संध्याकाळच्या बैठकीचे नियोजन करताना मंडळी. पेठकर काकांच्या आधाराने (कसाबसा) उभा असलेला राजे. wink

***

प्राजुच्या निमित्ताने असेच अजून बरेच प्रसंग आम्हाला उपभोगायला मिळो हीच इच्छा. कीप इट अप, प्राजु. हास्य

मस्त

1

मस्त व्रुत्तांत.................छायाचित्रेही मस्तच.............

"काला पहाड" ला पाहुन दातखीळी

2

"काला पहाड" ला पाहुन दातखीळी बसली आहे , मोकळी झाली की प्रतिक्रीया देईन हास्य

बाकी कट्टा एकदम जोरदार झालाय राऑ हास्य आम्हाला कोणीच बोलावलं नाही !!

(गावकुसाबाहेरचा) टार्‍या महार

मस्तं लेख बिका. कार्यक्रम

3

मस्तं लेख बिका. कार्यक्रम मस्तंच झाला. जरा घाईत असल्याने नंतरच्या कट्ट्याला मात्र हुकलो पण बरेच जालीय चेहरे प्रत्यक्षात पहायला मिळाले. हास्य देखोनी आणंद जाहला..

(पहिला का दुसरा)
पेशवे


-पुण्याचे पेशवे

प्रकाटाआ

4

प्रकाटाआ


-पुण्याचे पेशवे

अरेरे

5

नाही रे, तुझ्या वृत्तांताला नाही म्हणत. आम्ही काय मिसले ते लक्षात आले म्हणून अरेरे म्हणतोय. लै भारी यार. फटूंची ओळख एकदम समर्पक (म्हणून म्हणतो, लिवते र्‍हावा).

पेशवा पहिला की दुसरा हा प्रश्न मलाही पडला आहे (हाण्तोय आता पुप्या. खरेतर पुप्या नि टार्‍या सारख्या चिरेबंदी - चुकून शिफ्ट प्रेस केल्याने चिरेबंडी झाले होते, दुरूस्त केले आहे - लोकांच्या वाटे जायचे नाही असे ठरवले होते, पण पुप्याशी मांडवली झाल्याने हे धाडस केले आहे).

इतर अनेकांना प्रथमच पाहतोय.

पेठकरकाकांना 'यज्ञकर्म' वर्ज्य तर पर्‍याला नियमित व्हायला हवे असे वाटले.

घाडकडवी नि अदितीतैं बाबत थोडी निराशा झाली. एकदम जाड भिंगाचे चष्मेवाले स्कॉलरली असतील असे वाटले होते. हे तर अगदीच साधेसुधे लोक दिसतायत. जरा जिवात जीव आला. लै घाबरायचो यांना.

एक प्रश्नः पांढरा टी शर्टधारी कोण आहे?

बाकी शेवट्चा फटू 'तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी' या गाण्याची आठवण करून देणारा.

ररा, मोठी गोष्ट मिस केलीत

6

ररा, मोठी गोष्ट मिस केलीत तुम्ही.


-पुण्याचे पेशवे

अहो नीट बघा घासकडवी यांनी जाड

7

अहो नीट बघा घासकडवी यांनी जाड भिंगाचे contact lense घातले आहे. हास्य

>>एक प्रश्नः पांढरा टी

8

>>एक प्रश्नः पांढरा टी शर्टधारी कोण आहे?

तो मनिष !

***

लै मज्जा आली बॉ !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आँ

9

शेवटचे फोटो गुल्ल. मग आमच्या मागच्या प्रतिसादाची शेवटची ओळ गुल्ल करा बघू मालक.

अभिनंदन प्राजुताई.......!!!

10

छान कार्यक्रमाचा आणि कार्यक्रमानंतरच्या नंतरच्या बैठकीचा मस्त वृत्तांत..

शेवटच्या फोटोतील 'ढीगभर व्यासंग' पाहून मन भरुन आले.........!!!


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

फोटो सगळेच गजब आले आहेत

11

Laughing out loud

फोटो सगळेच गजब आले आहेत Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त..!

12

मस्त. वृतांत देखील मस्त्...अन् फोटो देखील मस्त.

वृतांत छान आहे.

13

वृतांत छान आहे.
आलो असतो तर बरे झाले असते असे एकदा वाटून गेले.
असो..पुढच्यावेळी नक्की.


श्रीवर्धन

चायला ह्याना निमित्तच हवे

14

Big smile चायला ह्याना निमित्तच हवे असते भेटायला...

टुकटुक

15

टुकटुक!!!

.

16

प्राजुतैं चे अभिनंदन!

वा ! मस्त झाला कार्यक्रम !!!

17

वा ! मस्त झाला कार्यक्रम !!! हास्य

वा बिका, वृत्तांत एकदम

18

वा बिका,
वृत्तांत एकदम झकास.

सर्वांना प्रत्यक्षात भेटण्याचा योग होता, कसा मिस करणार आणी भेटीगाठी केल्यावर छान वाटलं. हास्य
कार्यक्रम सुंदर झाला, कार्यक्रम पार पाडण्यास प्राजुतैला वेळात वेळ काढुन प्रसन्नदा, त्यांचे पत्रकार मित्र आणी राजे यांनी चांगली मदत केली.
मराठी बांधवांचा विजय असो. सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा.

आपला,
मराठमोळा

धन्यवाद

19

आपण सर्व जण आवर्जून उपस्थित राहिलात.. त्याबदल मनापासून आभार.

असेच आशिर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत राहुदेत.

- प्राजक्ता.


- प्राजु

मस्त वृत्तांत बिका.. प्राजुतै

20

मस्त वृत्तांत बिका..
प्राजुतै चे अभिनंदन..

प्राजुतैंचे हार्दिक

21

प्राजुतैंचे हार्दिक अभिनंदन...

आयड्यांमागचे चेहरे पाहून मजा आली.
मस्त वृतांत लिहिला आहे बिका.


पुष्करिणी

अभिनंदन प्राजुतै! पेशवे

22

अभिनंदन प्राजुतै!

पेशवे नावाला जागतात बाकी. सगळ्याच फोटोत कसे ऐटीत उभे आहेत!

बाजीराव - मस्तानी सिरीयल बघत

23

बाजीराव - मस्तानी सिरीयल बघत असावेत आजकाल..


पुष्करिणी

खुपच सुरेख कार्यक्रम

24

हास्य

खुपच सुरेख कार्यक्रम झाला.
खुप दिवसानंतर एवढ्या सगळ्या मित्रांना भेटलो प्रचंड आनंद झाला.
काही गोष्टीचे मोल करता येत नाही असे म्हणतात, त्यातीलच एक ही भेट जी नक्कीच अनमोल आहे, आज फोटो रुपाने ते जेव्हा हवे तेव्हा पाहू शकतोच पण अजून काही मित्रांची अनुपस्थीती नक्कीच जाणवली ती देखील परिपुर्ण झाली असती तर अत्यांनद झाला असता.

दंगा प्रचंड केला, अगदी सुरवातीपासून शेवट पर्यंत...
मनसोक्त हसणे व खिदळणे जवळ जवळ ३ तास अमर्यादितपणे चालू होते त्यांना कुठल्या शब्दात व्यक्त करावे हेच समजत नाही आहे, पण थॅक्स ऑल... तुमच्या सर्वांच्यामुळे खुप खुप मज्जा आली...

बिका & फॅमेली (+१) , यमी (आच्रत बाव्लत) , धम्या ( लेटलतिफ) , पेठकरकाका (सामनावीर) , टार्या ( हि & ही स्टाईल... काल नाही पडला तो बाईक वरुन) पर्‍या ( ह ल क ट) , राजेश ( गरिब बकरा), मोडक ( मॅजिक मुड मध्ये) , ममो (बा*** बें** २४ बीयर व तो व मी नाईंसाफि wink न सांगता पळून गेला.. ) , लिखाळ & फॅमेली ( ग्रेट.. सलाम साहेब) , पुप्या ( ह***** गाय्ब झाला मध्येच सोडून), घाटपांडेकाका( हिरोहोंडा प्रेमी) , मीम सदस्य दत्ता काळे (शांत कसे रहावे ह्यांच्याकडून मी शिकतो आहे wink ), सोनाली ( धडाडीची कार्यकर्ती), प्रसन्नदा (पुणेरी) (बिझी बी) आणी चंद्रशेखर महामुनी ( क्या कहे....... देव देव आनंद... wink )

आम्ही मज्जा केली......... तुम्हाला टुक टुक Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लेख

25

लेख मस्त......बिकादा.

कार्यक्रम फार सुंदर झाला, प्राजु आणि कुटुंबियांच्या सोबतीने मदत करणारे तिचे सुहृद यांनी खूप सुंदर काम केले.

>>आम्ही मज्जा केली......... तुम्हाला टुक टुक
अस्स्स का?? तुमचे सर्वांचे फोन बंद होते का?? की बँलंस संपला ???
आम्हाला गेलेल्या लोकांना बोलवायला काय झाल होत??? angery

ता. क. - हा राग फक्त राजेवर नाहीये......सर्वांवरच

वा ! मस्त झाला कार्यक्रम

26

वा ! मस्त झाला कार्यक्रम !!!
प्राजुचे हार्दिक अभिनंदन...