सायोनारा s s
सायोनारा s s
नोकरी निमित्त दहा वर्षे पैठणला होतो. (१९७९ ते १९८९). त्यावेळी आलेले हे दोन अनुभव. औरंगाबाधून फोन आला. विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्यासाठी आलेले एक जपानी प्रतिनिधी मला भेटू इच्छित होते. हे जपानी कनेक्शन माझ्या काही लक्षात येईना. निरोप अर्जंट होता. लगोलग मी गेलो. ते प्रतिनिधी कामात होते. पण त्यांनी निरोप ठेवला होता. मला गेस्ट हाऊस वर बोलावलं होतं. मी गेलो. ते प्रतिनिधी माझी वाटच पहात होते. आपल्या बॅगेतून त्यांनी एक छोटेसे पार्सल काढले आणि माझ्या हातात देत म्हणाले: "धिस इज फॉर यू !" मला तरी ही काही लक्षात आलं नाही हे बघून ते म्हणाले: "यू हॅड रीटन टू द कंपनी, नो ?" आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे झालं होतं असं की आमच्या औरंगाबादच्या ’नाट्यरंग" नं एक बालचित्रपट काढला होता. नांव होतं "सोनेरी डोक्याचा मासा". माझा मित्र कै. कुमार देशमुखच्या याच नावाच्या बालनाट्यावर आधारीत असा तो पिक्छर. सगळेच हौशी. सगळ्यांनी कॉंट्रीब्यूशन केलं. त्यावेळी सोळा एम.एम., ३५ एम.एम. आणि ७० एम.एम. मधे चित्रपट निघत. पण ते काही आम्हाला परवडणारं नव्हतं. म्हणून सुपर एट मधे तो चित्रपट काढला. त्यासाठी लागणारा कॅमेरा आमचे खामगावचे स्नेही बालासाहेब खेकाळे यांचा. तेच कॅमेरामन. रंगीत चित्रपट पूर्ण झाला. तो दाखवण्यासाठी दोन सुपर एट प्रोजेक्टर्स घेतले आणि शाळा-शाळातून तो पिक्चर दाखवाला. पण मधेच काही तरी गडबड झाली आणि दोन्ही प्रोजेक्टर्स बंद पडले. मुंबईला चौकशी केली तेंव्हा कळलं की एक सुटा भाग आहे, तो मिळाला तर काम होईल, पण तो मुंबईत उपलब्ध नाही. काय करावं कळेना. महिना गेला. शेवटी मी संस्थेचा सचिव म्हणून त्या जपानी कंपनीला रागारा्गानं पत्र लिहिलं आणि विसरून गेलो! आता त्या जपानी कंपनीनं तो सुटा भाग पाठवला होता! मला कळेना की या माणसाचा आणि त्या कंपनीचा काय संबंध? कारण ते प्राध्यापक होते. मी त्यांना तसं विचारलं. यावर त्यांनी सांगितली ती हकिकत ऐकून तर मी थक्कच झालो. त्या जपानी कंपनी कडे माझा पत्ता होता. त्यांनी जपानमधील भारतीय दूतावासाकडे चौकशी केली की औरंगाबादला कोण जपानी मंडळी अशात जाताहेत. तिथं त्यांना या कॉन्फ़रन्स ची आणि या प्राध्यापकांची माहिती कळाली. मग त्यांनी यांना गाठलं आणि तो सुट्टा भाग मला द्यायची विनंती केली आणि पुढचं सगळं मी सांगितलंच आहे. हा सगळा प्रकार एखाद्या भारतीय वस्तूबद्दल घडता तर... याचा विचार करून मला खरंच सांगतो, गहिंवरून आलं. आणखी आश्चर्य तर पुढेच आहे. तो भला प्राध्यापक म्हणाला: " आय ऍम सॉरी फॉर द इन-कन्व्हीनिअन्स. काईंडली ऍक्सेप्ट अवर सिन्सिअर अपोलोजीज." असं म्हणून त्यांनी खिशातून एक पाकिट काढलं आणि माझ्या हातात देत म्हणाले," धिस शूड कव्हर युवर लॉसेस!". पाकिटात त्या प्रोजेक्टरच्या किमतीच्या जवळपास १०% भरेल इतकी रक्कम भारतीय चलनात होती, नुकसानभरपाई म्हणून! वर कंपनीचं पत्र. दिलगिरी व्यक्त करणारं आणि त्या प्रोजेक्टरचा एक महत्वाचा दोष दाखवल्या बद्दल वर आमचेच आभार मानणारं! माझ्या डोळ्यांसमोर भारतीय दुकानदारांचे आणि उत्पादकांचे अनुभव तरळून गेले.
दुसरा अनुभव असाच आहे. माझे एक स्नेही जायकवाडी धरणाच्या कामावर इंजिनिअर होते. तिथे जपानच्या सहकार्याने धरणावर रिव्हर्सिबल टरबाईन्चा पथदर्शी प्रकल्प चालू होता. मुख्य धरणातून पाणी काढून त्यावर गरजेच्या वेळी वीज निर्मिती आणि गरज कमी असते तेंव्हा ग्रीड मधून वीज घेवून हे पाणि परत धरणात असं त्या प्रकल्पाचं स्वरूप. त्याची अंतिम चांचणीची वेळ आली आणि काही जपानी इंजिनिअर्स आले. मला हा प्रकार पहायचा होता. त्या दिवशी ठरल्या प्रमाणे आमच्या इंजिनिअर स्नेह्याचा निरोप आला आणि जामानिमा करून मी गेस्त हाऊस वर पोहोचलो. माझे स्नेही आणि त्यांचे सहकारी सुट-टाय या वेषात होते. ठीक ठरल्या वेळी ते जपानी इंजिनिअर बाहेर आले. अर्धी चड्डी आणि हाफ शर्टात! परिचय इत्यादी सोपस्कार आटोपल्यावर ते आमच्या स्नेह्यांना म्हणाले: "यू आर नॉट रेडी? वी आर लेट!" त्यावर आमची स्नेही निघू या म्हनाल्यावर त्यांनी अशा काही नजरेनं पाहिलं की सगळे सर्द झाले. चूक ल्क्षात आली. आमचे स्नेही धावत पळत घरी गेले आणि सैलसर कपडे घालून आले! उन्हा तान्हात हिंडून त्या जपान्यानं कधी मशीनच्या खाली जाऊन, तर कधी वर जावून, कधी गुढ्ग्यावर बसून तर कधी पाठीवर असं करत तपासणी पूर्ण केली तेंव्हा आमचे सर्वांचे चेहेरे पहाण्या सारखे झाले होते. सगळं आटोपून घरी आलो. रात्री दहाच्या सुमाराला निरोप आला की मला दवाखान्यात बोलावलंय. मी गेलो, तर आमचे स्नेही या जपान्याला घेवून आलेले. मी तपासणी केली. डी-हायड्रेशन झालं होतं. सलाइइन वगैरे सगळं झालं. तीन चार तासातच फरक पड्ला. मी दवाखान्यातच होतो. जातांना त्या जपानी इंजिनीअरचा चेहेरा कृतद्न्य्तेनं भरून आला. सहज म्हणून त्यानं खिशात हात घातला आणि माझ्या हातात ४०० रुपये ठेवले. मी त्यांना समजावून सांगितलं की हे सरकारी हॉस्पिटल आहे. इथं मोफत उपचार होतात. पण गृहस्थ ऐकेना. उपचारासारखी एखादी गोष्ट फुकट मिळते हे त्याला पटेचना!! जपानी कोणाचे उपकार घेत नाही, घेतलेच तर ठेवत नाही वगैरे सांगायला लागला. मी ही इरेला पेटलो. "भांडणा"चा निकाल लागेना. शेवटी मी उपाय सुचवला. ते पैसे पुअर पेशंट फंड बॉक्स मधे टाकयचे. पण गडी स्वत:च्या हाताने टाकेना. मी पैसे तुम्हाला दिलेत, तुम्हीच काय वाटेल ते करा म्हणायला लागला. शेवटी मी माघार घेतली आणि माझ्या हातानं ते पैसे बॉक्स मधे टाकले. जातांना तो भला गृहस्थ कमरेत वाकून आणि हंसून मला म्हणाला: "सायोनारा !"
"लव्ह इन टोकियो" या सिनेमात लताजींच्या आवाजात "सायोनारा" हे गाणं आहे. मी ते बरेचदा ऐकलंय. पण शप्पथ सांगतो, खोटं नाही, मी त्या जपानी इंजिनीअरच्या तोंडून ऐकला त्या सायोनाराला तोड नाही!

.jpg)
मस्त अनुभव
आपल्याला सवय असते त्या तुलनेत गहीवरून याव असा अनुभव
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
फारच छान लिहिलय
येऊ द्यात अजुन. ज्यास्त कॉमेन्ट्स नाहीयेत म्हणून फिकीर करू नका. तुम्ही जर कंपुचा भाग असाल तर तुमच्या फालतू धाग्यांना ही १०० च्या वर प्रतिसाद मिळतात .. नाहीतर नाही. अनुभव मस्तच.
येऊ द्यात अजुन. अनुभव
+१ ह्याच्याशी सहमत.
गोगोल ह्यांची मीमराठीवरील लिखाणाची यादी पाहायला गेलो असता धक्काच बसला. त्यांचे मी मराठीवरील लिखाण फक्त प्रतिसादपुरतेच सिमीत आहे. नुसते प्रतिसाद लिहुनही त्यांना कंपुबाजी-कंपुबाजांचे धाग्याला भरघोस प्रतिसाद देणे ह्याविषयीचे असलेले ज्ञान बघुन उर भरुन आले.
त्यांना आलेले कंपुबाजीचे अनुभव त्यांनी नावानीशी अथवा निदान पुराव्यानिशी स्वतंत्रपणे लिहावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आणि तसे जमत नसेल तर निदान इतर सदस्यांच्या धाग्यावर असे प्रतिसाद देउन त्यांचे मत ह्या संस्थळाविषयी कलुषीत करु नये अशी विनंती करतो.
चालक-मालक गोगोल ह्यांच्या प्रतिसादाची योग्य ती दखल घेतील अशी अपेक्षा आहे.
+१
पराशी सहमत आहे. गोगोल यांचा प्रतिसाद पुर्वग्रहदुषित आहे
बाकी लेखाबद्दल नो कमेंटस.
डॉक.. एक लंबर.. अवांतर -
डॉक.. एक लंबर..
अवांतर - माणसाला जपानी रमलाची रात्र आठवायच्या ऐवजी जपानी विंजिनियरचा दिवस का आठवत असेल.
डॉक.. एक लंबर.. याला
डॉक.. एक लंबर..
याला +१
अवांतर - माणसाला जपानी रमलाची रात्र आठवायच्या ऐवजी जपानी विंजिनियरचा दिवस का आठवत असेल.
.
याला ..
-पुण्याचे पेशवे
अतिशय सुंदर लेखन !
अतिशय सुंदर लेखन !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सुंदर जपानी अनुभव
व्वा! सुंदर जपानी अनुभव. या त्यांच्या customer focus मुळेच जपानी कंपन्या कित्येक दशके आघाडीवर आहेत.
अतिशय
अतिशय 'भिकार'अनुभव...........!!! (ह घ्या
)
दुसर्या एका संस्थळावरील विशिष्ट शहरात(अर्थातच त्या शहरापुरता सीमित नव्हे तर जवळ्पास सार्वत्रिक) केलेल्या पुस्तक खरेदीवर लिहिलेला अनुभव,त्यावरील काळजाला भिडलेल्या प्रतिक्रिया,कसलाही जाज्ज्वल्य अभिमान आणि हे अनुभव........
ह्याट्ट्ट्ट!
शिका म्हणावे त्या जपान्यांना. नसते लाड नाही करायचे म्हणावं. आमचे दुकान, आमची संस्था फक्त आणि फक्त आमच्या नियमांनुसारच......चालू राहिल किंवा बंद पडेल तुम्हाला काय!!!
असो.........खरेच छान!!!
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
घ्या
दुसर्या एका संस्थळावरील विशिष्ट शहरात...
बघा आता कोण म्हणेल प्यारे अगदी 'इकडची काडीसुद्धा तिकडे करीत नाही' म्हणून?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
@ररा: आम्ही 'तिकडे' फक्त
@ररा:
आम्ही 'तिकडे' फक्त वाचनमात्र आहोत....... सदस्यत्व नाहीये.
काड्यांचा विषय काढलात म्हणून सांगतो.....त्यामधे अजिबात रस नाही.(अहो काड्याच त्या. रस कसा असेल?)मात्र आवश्यकता वाटल्यास उपलब्ध आहेत.
'तिकडे' नुकत्याच झालेल्या होळी(पर्यायी शब्द .......)नंतर वरील अनुभव वाचून तुलना करण्याचा मोह आवरला नाही इतकेच.
वैयक्तिक प्रश्न : आपण कुठ्चे.........????? (ह घ्या)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
मस्त अनुभव, आणी मांडलात सुरेख
मस्त अनुभव, आणी मांडलात सुरेख पद्धतीने.
गुड वन डॉक.
दोन्ही अनुभव
जबरदस्त,अनुकरणीय आणि थक्क करणारे आहेत.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
फाऊल प्रतिसाद
फोटो किंवा स्मायली न टाकता प्रतिसाद दिल्याबद्दल जयपालचा हा प्रतिसाद फाऊल धरण्यात आलेला आहे
(जयपालच्या किड्यांचा आणि स्मायलींचा चाहता) चिमालिस
चिमालिस नका नका माझा प्रतिसाद फाऊल
ठरवु नका .... डोक्टर साहेब डोळ्यात अंजन घालणारा जपानी अनुभव दिल्याबद्द्ल ध्न्यवाद
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
उगाच नाही...
उगाच नाही जपान दुसर्या महायुद्धातील विनाशा नंतरही पुन्हा जगात मानाने ताठ उभा राहिला.देश आणि राष्ट्र या शब्दांत काय फरक असतो ते समजायचे असेल तर भारत अन जपान कडे पहावे.
धन्यवाद!
सातारकर, गोगोल, अर्धवट, राजे, चिमलिस, प्यारे, रमताराम, मराठमोळा, जयपाल, श्रीकांतः
सर्वांचे आभार.
प्यारेजी: आपल्या दुसर्या एका संस्थळावरील विशिष्ट शहरात(अर्थातच त्या शहरापुरता सीमित नव्हे तर जवळ्पास सार्वत्रिक) केलेल्या पुस्तक खरेदीवर लिहिलेला अनुभव,त्यावरील काळजाला भिडलेल्या प्रतिक्रिया,कसलाही जाज्ज्वल्य अभिमान आणि हे अनुभव........ या कॉमेंतचा संदर्भ लागला नाही
आपला स्नेहांकित...
-अशोक
हॅहॅहॅ..., डॉक्टरसाहेब,
हॅहॅहॅ..., डॉक्टरसाहेब, तुम्ही पुणेकर नाही हे नक्की
हाहाहाहा....... डॉ.साहेब, फरस
हाहाहाहा.......
डॉ.साहेब,
फरसाण, कांदा, टोंमॅटो, लिम्बू, (जनरली) मटकीची उसळ विथ तर्री, उरलेले पोहे('त्या'च शहरात घालतात बहुधा)अशा बर्याच पदार्थांना(अधिक वजा आवडीनुसार)एकत्र केल्यानंतर जो पदार्थ बनेल तो आणि मैद्याने बनवलेला ( पायाने
) तिंबलेला, बेकरीत मिळ्णारा पदार्थ असे दोन एकत्र केल्यानंतर जे बनेल ते नाव एका मराठी संस्थळाचे आहे.
या संस्थळावर एका विचारवंताने (शब्दावर आक्षेप नसावा)पुस्तक खरेदी करताना आलेला अनुभव सांगितला होता. त्यावर पावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने होतो त्या आजाराच्या उत्पादित परिणामासारख्या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्या संदर्भात मी लिहिले.........असो.
अधिक स्पष्टीकरण अपेक्षित असेल तर व्य. नि. पाठवावा ही णम्र विणण्ती......!!!
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
मराठी संकेतस्थळांवर इतर
मराठी संकेतस्थळांवर इतर संकेतस्थळांची नावे घेण्यास मनाई आहे असे दिसते. क्रिकेटला क्रिकेट (किंवा किमानपक्षी चेंडूफळी ) म्हणायचे सोडून लंबदंड-गोलपिंड-धरपकड-प्रतियोगिता म्हटल्यासारखे केले आहे म्हणून वाटले हो !!
हे वाचा. सगळे कळेल. मराठी,
हे वाचा. सगळे कळेल. मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!
हा दुवा देणे इथल्या धोरणात बसत नसेल तर खुशाल काढून टाका हा प्रतिसाद. मी नाही धागा काढणार, माझा प्रतिसाद का उडवला म्हणून
वाचक हलके घेतीलच, कारण मांजरीची नखे तिच्या पिल्लाला लागत नाहीत असे नुकतेच वाचलेले आठवले, तोच न्याय वापरला तर माझ्या या प्रतिसादामुळे कुणाच्या भावना नाही दुखावणार
(कातर स्वरात) का.... मेहेंदळे
(कातर स्वरात) का.... मेहेंदळे का.........????
अजून एक...
(खाली बघून डोके नकारार्थी हलवत)
मेहें...दळे, मेहें...दळे..........
बास का अजून हवेत.........???
(आयला........ मला येत न्हवतं व्हय ल्ह्यायला....)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
दुवा देणं न देणे हा सर्वस्वी
दुवा देणं न देणे हा सर्वस्वी सदस्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे प्रतिसाद उडवणे चुकीचे ठरेल. ठरावीक संकेतस्थळाचा दुवा मीमवर देउ नये, असा कुठला ही नियम / धोरण मीमचे नाही आहे ना कधी होते, इतर जागी काय अवस्था आहे हे माहित नाही परंतु मीमवर ना हरकत आहे एवढं नक्की.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त आणि चांगले अनुभव
मस्त आणि चांगले अनुभव आहेत.
असेच अजुन बरे वाईट अनुभवही वाचायला आवडतील.
तस्मात डॉक लिहिते रहा.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
"तो" लेख वाचला
प्यारेजी
"तो" लेख वाचला. पुण्यात बाकरवड्या चांगल्या (?) मिळतात असं नांदेडला असतांना घरून सांगणं झालं. म्हणून गेलो. दुपारची वेळ. मंडळी आळसावलेली (जेवून?) पण बाहेर दुकानाला सुट्टी , मध्यंतर असल्याचं काही दिसत नव्हतं. मी मागणी केली तेंव्हा "मधली सुटी आहे, कळत नाही कां?" असं जरबेच्या स्वरात विचारणा झाली. मी नांदेडहून आलोय हे सांगितल्यावर "लंडन हून आला असाल हो! आता नाही" असा सज्जड दम भरून झाला. ’एक किलो घ्यायच्या होत्या" मी लालूच दाखवली. "एक क्वींटल घ्या हो, पण सुट्टीनंतर" "ती केंव्हा संपणार?" या माझ्या प्रश्नाला एका पाटीकडे बोट दाखवून मूक उत्तर मिळालं!!
................ मी सद्ध्या पुण्यातच आहे. "त्या" दुकाना कडे पुन्हा फिरकलेलो नाही!
आपला स्नेहांकित...
-अशोक
डॉ.साहेब, 'जी' वगैरे नको
डॉ.साहेब, 'जी' वगैरे नको राव.... वय,अनुभव, इ.इ. सगळ्यानेच लहान आहे मी.
बाकी वरच्या प्रतिसादात सावधानता म्हणून हा खुलासा होता:
(अर्थातच त्या शहरापुरता सीमित नव्हे तर जवळ्पास सार्वत्रिक)
@मेहेंदळे: त्या दुकानाची माहिती आहे का..........???का देऊ? (महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावातील दूध डेअरीच्या...... जाऊ दे)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
प्यारेराव (राव म्हणू नका असे
प्यारेराव (राव म्हणू नका असे म्हणाला नाही आपण अजून ;-) ) ,आता इथे माझा काय संबंध? मी त्या दुकानाबद्दलच काय पण कुठल्याही शहरातल्या कुठल्याही दुकानाबद्दल कुठल्याही संकेतस्थळावर काहीही बोललो नाही (अजूनतरी). हे म्हणजे फार्सीकल नाटकात गोंधळ वाढवण्यासाठी एखादे पात्र भलत्यालाच उद्देशून चुकीचा संवाद म्हणजे तसे वाटते आहे. किंवा माझे वय झाले असावे आणि आकलनशक्ती कमी झाली असावी.
क्षमा ..... काका! (हा शेवट्चा प्रतिसाद)
आपुन वि-नम्रता के साथ आपकी क्षमा चाहता है.....!!! (सौजन्यः मुन्ना)
आपको हुई तकलीफ के लिये और (उच्चार अवूर) अंतःकरण को हुए दु:क्ख के लिये भी हम दिल्गीर है.........!!!(सौजन्यः आरारारा... विथ उ.निकम साहेब...दोघेही हलके घेणार्यातले आहेत हे आम्हाला अंतःकरणापासून ठाऊक आहे.)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
तुम्ही जर कंपुचा भाग असाल तर
तुम्ही जर कंपुचा भाग असाल तर तुमच्या फालतू धाग्यांना ही १०० च्या वर प्रतिसाद मिळतात >>>>
अनुमोदन
बाकी लेख सर्वोत्तम..
आजुन लिहीत जा
मस्त अनुभव बोध घ्यावा असेच.
मस्त अनुभव बोध घ्यावा असेच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
आता मात्र असाच अनुभव येईल ह्याची
खात्री नाही हो डॉक.
आजकाल जपानी मालाला उठाव कमी झालाय, त्यामुळे जपानी कंपन्या डबघाईला आल्या आहेत.
त्यामुळे, असाच अनुभव येईल असे नाही.
पण जपानी कंपनीवाले, मुळात चूक कुठे आहे ह्याची शहानिशा करून, ते कसे पर्फेक्शनिस्ट आहेत हे मात्र नक्की दाखवून देतील.
खरोखरच त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच आहे.