पेप्पर चिकन

0
0

साहित्य:


१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला.
८-१० लसुण पाकळ्या ठेचलेल्या/बारीक चिरलेल्या.
४-५ मिरच्या उभ्या चिरलेल्या.
१/२ लिंबु.
२-३ चमचे काळीमीरी पुड. (बारीक आणि भरड दोन्ही)
कडिपत्ता.
१ चमचा हळद.
२ चमचे सोया सॉस.
मीठ चवी नुसार.
२ चमचे तेल आणि तुप.


१/२ ते ३/४ किलो चिकन मध्यम आकारचे तुकडे करुन आणि मीठ लावुन १०-१५ मिनिटे मुरत ठेवलेले.

कृती:


लसुण तेला तुपावर २ मिनिटं परतुन घ्यावा.

मग त्यात कडिपत्ता, कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकुन परत २ मिनिटं मोठ्या आचेवर परतुन घ्यावे.

कांदा गुलाबी झाल्यावर त्यात चिकन चे तुकडे टाकुन मध्यम आचेवर परतुन, झाकण लावुन १०-१॑२ मिनिटे शिजवत ठेवावं.

नंतर त्यात हळद, सोयासॉस,लिंबाचा रस आणि चवी नुसार मीठ टाकुन परत ५ मिनिटे झाकण लावुन शिजु द्यावं.

५ मिनिटांनी झाकण काढुन, मोठ्या आचेवर पाणी आटे पर्यंत परतत रहावं.
पाणी संपुर्ण आटल्यावर त्यात काळी मीरी पूड टाकुन मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतुन घावं.

गरमागरम पेप्पर चिकन

गम्पा भौ...... दि. २१ जुलै ला

1

गम्पा भौ......

दि. २१ जुलै ला आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरु होतोय..........

चातुर्मास 'पाळा' ही णम्र विनंती.......!!!

(त्रास होतो......)

(स्वगतः टे. क्लॉ. बदलत नाही का हा गम्पा wink )


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

(विषय दिलेला नाही)

2

Crazy

मस्त रे..

3

मस्तच दिसत आहे रे,
स्वाती

गणपा

4

आम्ही काय बोलणार

chik


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मस्त रे

5

कोंबड्यांचा हमामखाना. म्हणूनच 'अन् ड्रेस द चिकन' असा वाक्र्पचार असावा का? खी: खी: खी:

मस्त

6

मस्त रेसिपी...!
हास्य

गजब डिश ! झकास रे.

7

गजब डिश !

झकास रे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पेप्पर चिकन

8

मिसळपाव वर लोकांना छळतोस निदान मिमराठी तरी मोकळ सोड

लढ बाप्पू....मस्त रे गणा...

9

लढ बाप्पू....मस्त रे गणा... हास्य

याम्म्मीईई

10

याम्म्मीईई

झक्कास !!!

11

झक्कास !!!

सुरेख पाकृ.

12

आणि उत्तम फोटो.

आखाडी चा चखणा ठरला !!!!

मस्त !

13

भाऊ ,
डिश मस्तच !

पण या डिशला / पदार्थाला पेपर चिकन असे का म्हणतात ?
ते खुप क्रिस्पी आहे का ?
~ वाहीदा

पेपर नाय गं पेप्पर चिकन.

14

पेपर नाय गं पेप्पर चिकन. काळीमीरीवालं. wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा